Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. म्हणून या विरोधी शक्तींच्या प्रभावापासून टूर नेण्यासाठी लोकांची कुण्डलिनी तुम्ही जागृत करणे फार आवश्यक आहे. तुम्ही सर्व सहजयोगी, तुमच्यामधील प्रत्येक जण हे करण्यास समर्थ आहे. ते करतांना लोकांना त्यांचे दोष दाखवण्याची, त्यांना कमी लेखण्याची, स्वतःचा संयम न सोडण्याची काळजी घेऊन शांतपणे तुम्हाला हे कार्य पार पाडायचे आहे. तसे झाले तर शिवांना त्यांचा तिसरा डोळा वेळ येणार नाही. मारामान्या, भ्रष्टाचार, अनैतिक घटना इ. प्रकारांबद्दलच जास्त नजरेस येतात, आणि माणूस सुन्न होऊन जातो. श्रीशिवांचे तांडव-नृत्य सुरू होण्याचा हा समय असावा असे वाटते; त्याच्याशिवाय तरणोपाय नाही असे वाटू लागते. विशेष म्हणजे शिवांचा क्रोध पार उफाळला तर त्यांतून कोण कसे वाचणार हे मला समजत नाही. प्रेम व करुणेचा सागर असले तरी त्यांचा राग विनाशकारी आहे. सा्या विश्वाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ आहे. जगभर विध्वंस चालवलेल्या, लहान बालकाचे रुप घेतलेल्या महाभयंकर राक्षसाचा त्याच्या पाठीवर उभे राहून शिवांनी वध केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहेच. त्याच्याच पाठीवर मग ते नृत्य करु लागले होते ही जग वाचवल्याच्या आनंदाची अभिव्यक्ति होती. त्याच अर्थाने जगांत सज्जन, धार्मिक, परोपकारी प्रकोप करण्याची उघडून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्यामध्ये शिवतत्त्व प्रस्थापित केले पाहिजे. Read More …