Public Program Pune (India)

Public Program, Pune, India 7th March 2000 हिंदी भाषण आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्या बरोबर सोवळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार; मग या देशाचे आपण एक नागरिक आहात, त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. अहो आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मिडीयम मध्ये शिकलो. पण आमचे वडील मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होताना, तेंव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेंव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषा ही शिकून घेऊ. हि माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात, ती देशभक्ती नाही; जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसेही करून पैशाकडे लक्ष घालायचं. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या मग आणखीन करा, हे करा, जेवढे पैसेवाले लोकं आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पहिला. Read More …