Christmas Puja

Ganapatipule (India)

Feedback
Share

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, अशारितीने त्यांनी दर्शविले की तुम्हा आज्ञाचक्राच्या बाहेर येता. आज्ञाचक्राचे दोन बीजमंत्र आहेत एक हं दुसरा क्षं. क्षं म्हणजे क्षमा. जो दुसर्याला क्षमा करतो, त्याचा अहंकार कमी होतो. अहंकारी माणसाला स्वतःविषयी काही दृढ समजुती असतात त्यांना धक्का पोहोचला की त्यांचा अहंकार चढतो. अपमान वाटतो त्यांची विचित्र स्थिती असते. इसा मसीहांनी सांगितले की कोणीही तुमचा अपमान केला, दुःख दिले तर आपण त्यांना क्षमा करां त्यामुळे काय घडते पहा. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा ती घटना तुम्ही विसरून जाता नंतर तुम्हाला कसलाच त्रास होत नाही. त्याबाबत पुन्हा विचारही करणार नाही. ही शक्ती तुम्हाला आज्ञाचक्रामधून मिळते. ज्यांचे आज्ञाचक्र ठीक आहे ते क्षमा करणारच क्षमा आल्यात. पण केवळ या १२ लोकांनी पुष्कळ कार्य केले लोक त्यांना ‘नॉत्टिक्स’ (gnostics) म्हणतात. ‘ज्ञ’ जाणणे यापासून नॉस्टिक्स शब्द झाला. ते बरंच काही जाणत होते. त्यावेळच्या धर्मगुरुंनी त्यांना बरेच छळले. खिस्तांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यात फार अडथळे येत त्यावेळी लोक आत्मसाक्षात्कारी नव्हते. खिस्त नेहमी सांगत ‘स्व’ला जाणा ‘स्वतः’ जाणा याचे महत्व त्या शिष्यांना समजले नाही ते तसाच प्रचार करत राहिले त्यामुळे हळूहळू अधर्मच वाढत राहिला. एकदा ते एका लग्नकार्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी पाण्यात हात घालून एक पेय निर्माण केले त्याची चव द्राक्षाच्या रसासारखी होती. त्यालाच लोक मद्य समजले. म्हणून त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली लोक दारू पिऊ लागले. आम्ही इंग्लंडमध्ये होतो, तेथे सर्व कार्यक्रम ते लोक मद्य देऊ लागले, एकमेकांच्या घरी गेलात तरी मद्य पुढे करतात एवढा मद्याचा वापर होऊ लागला. या रितीला खिस्तांचा संदर्भ जोड़ू लागले. कुठलाही धर्मपिता असली अधर्म असणारी गोष्ट लोकांना करायला लावेल का? भारतात पूर्वी लोक कधीही मद्य घेत नसत. पण इंग्रज आले त्यांनी मद्यही येथे आणले व तेव्हापासून लोक मद्य घेऊ लागले. आता तर बरेच मद्यपी झालेत. (खिश्चन लोक मद्य घेणे म्हणजे धर्म समजतात) रोममध्ये चर्चमध्ये मद्य तयार करतात. असला अधर्म म्हणजे करणे हा मोठा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे. आता दुसरा बीजमंत्र हं आहे. तो बिलकूल क्षें च्या उलट आहे. तुम्ही कोण आहात हे आधी जाणा. तुम्ही मन बुद्धी चित्त अहंकार नाही. तुम्ही ‘हं’ म्हणजे आत्मा आहात. आमच्या आत गर्वामुळे, अहंपणातून अज्ञानाने व मुर्खपणातून जे चुकीचे भ्रम आहेत ते सर्व व्यर्थ आहेत त्याला काही अर्थ नाही, हे जाणणे म्हणजेच आत्मतत्व. तुम्ही शुद्ध साक्षात आत्मा आहात, अत्यंत पवित्र आहात. अशा रितीने त्यांनी या दोन गोष्टी सांगितल्या प्रथम म्हणजे क्षमा करा. ज्यांनी त्रास दिला त्यांना विसरा व क्षमा करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही दुसरी म्हणजे आत्मा तुम्ही आत्मा आहात, त्याला जाणा, ज्याला कोणी शिवू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही त्याच्याशी रममाण व्हा. आत्म्याला जाणण्यासाठी तुम्हाला कुंडलिनीच्या जाग्रणाची आवश्यकता आहे. कुंडलिनी जाग्रणानंतरही तुम्ही त्यात स्थिज्ञ व्हायला पाहिजे. आतून स्थिज्ञ व्हायला पाहिजे म्हणजे आतून तुम्ही एकदम शांत होता, विचलित होत नाही. ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत होता ते सर्व नष्ट होते, तुम्ही आत्म्याचा आनंद घेऊ लागता. यासाठी कुडंलिनीच्या जाग्रणाची आवश्यकता आहे जाग्रणानंतरही लोक भटकत राहतात. महापाप आहे लोक असल्या चुकीच्या गोष्टींना जवळ करू लागले. खिस्तांच्या जीवनाचा एकच उद्देश होता, आता चक्राचे भेदन करणे, त्यांनी स्वतःला क्रॉसवर चढवून घेतले व पुन्हा जिवंत प्रकट झाले. हा काही चमत्कार नाही.

प्रतिक्रीया हे सर्व नष्ट करण्याकरिता खिस्तांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. ते ईश्वरी व्यक्तीत्व होते. ते व्यक्तीत्व सागरासारखे आहे. जे शून्यस्तरांत असते. सागरामुळे ढग निर्माण होऊन पाऊस पडतो व नद्या भरून वाहू लागल्या की विचारात गुंततात. पण जेव्हा तुम्ही आज्ञा चक्राच्यावर जाता तेव्हा हे सर्व संपते. याबद्दल बायबलमध्येही लिहिलेले आहे म्हणूनच आज्ञा चक्राचे महत्व आहे, जो कपाळावर टिळा लावून येईल ते बचावेल असे म्हटले आहे. असे लोक म्हणजे सहजयोगीशिवाय कोण असेल? कार्य प्रचंड आहे. ते बारा लोक होते. आपण तर हजारो आहात. एकेकाने जे कार्य केले त्याच्या एक सहस्रांश सुद्धा तुम्ही करू शकला नाही. आपण सर्वांनी माझ्या कार्यात हातभार लावून सर्व विश्वात त्याचा प्रचार करावा. पुन्हा समुद्राला येऊन मिळतात. असे व्यक्तीत्व अगदी सर्वांच्या खाली म्हणजे नम्रता. नम्रता असणे हा एक सहजयोग्यांचा गुण आहे. जे नम्र नाहीत ते सहजयोगी नाहीत. काही लोक पाहिलेत ते रागावतात, ओरडू लागता? हे सहजयोगी असूच शकत नाही. अशी नम्रता तुम्हांला स्थिरता पक्केपणा देऊ शकते मग तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. नुसते पहात राहता. अशा रितीने तुम्ही ‘साक्षीत्व’ मिळवता, साक्षीत्ववृत्तीमुळे तुम्ही सृष्टीकडे पहाता पण विचार करत नाही. त्याची मजा घेता, मग त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. यातून तुमच्या व्यक्तीमत्वातला आनंद प्रत्ययास येतो. आजच्या लोकांची समस्या हीच की प्रतिक्रिया दाखविणे, कोणती घटना घडू द्या वर्तमान पत्र उघडू द्या, लगेच प्रतिक्रिया बाहेर पडते. हे रोजच्या जीवनात घडते. प्रतिक्रियेतून काहीच इंग्रजी भाषणाचा अनुवाद मी जेव्हा परदेशात असते तेव्हा नेहमी इंग्रजीतूनच बोलते. येथे बरेच लोक हिंदी जाणतात म्हणून येथे बेदल म्हणून हिंदीतून बोलते. मी लोकांना खिस्तांच्या महान अवताराबद्दल सांगितले. ते एका महान कार्याकरिता आले ते म्हणजे त्यांना लोकांचे आज्ञाचक्र उघडायचे होते, फार महान कार्य होते त्याकरिता त्यांनी मोठा त्याग केला. क्रॉसवर चढले. या घडणाच्या घटनांची त्यांना आधी कल्पना होतीच कारण परमेश्वरी व्यक्तीत्व होते. सर्व त्याग करण्यात त्यांना कसलीच ते निष्पन्न होत नाही. जर त्यातून काही घ्यायचे असेल तर तुम्ही साक्षीत्वच्या स्थितीत असणे जरुर आहे हीच आपल्याला खिस्तांच्या जीवन त्यागातून शिकवण आहे. त्याचा जन्म हाच अत्यंत हलाखीत, गरीब परिस्थितीत प्रतिकूल वातावरणात अडचण नव्हती, हे करण्यात. त्यांना वाटले दुसरा कोणता तरी मार्गाने लोकांचे आज्ञा चक्र उघडेल. पण त्यांना जीवनाचा त्याग करावा लागला. या त्यागातून त्यांना हे दाखवायचे होते की आपल्या क्षुद्र व उथळ जीवनातून वर यायचे असेल तर त्यागाची आवश्यकता आहे. त्याग पण कशाचा? आपल्यातील षड्रिपुंचा. पण कुंडलिनी जागाणाने तुम्ही आपोआप या षड्रिपुंच्या तावडीतून मुक्त होता. (Detached) तुमच्यातील कुंडलिनीच्या शक्तीवर अवलंबून आहे. जर तिचे उत्थापन व्यवस्थित झाले तर लोक एका घटकेत आत्मसाक्षात्कारी झालेले पाहिले, असे थोडे लोक आहेत. बरेच लोक मी पाहिले ते समस्येतच अडकतात. विशेषतः झाला. यातून हेच जाणायचे उथळ गोष्टी पोकळ भौतिकतेमुळे माणूस मोठा होत नाही. मोठेपणा आतून असावयास हवा. त्यावेळेस तुम्ही त्याचा विचारही करत नाही, कशाचीच तमा बाळगत नाही. त्यामुळेच तुमचे जीवन उज्वल ते होते. याप्रमाणे त्यांचे जीवन होते. त्यांना आपत्यातील श्रीमंतीचा वा गरिबीचा, कुठल्याही पदाचा व सत्तेचा विचार नव्हता. कारण ते ईशवरी व्यक्तीत्व होते. सुरवातीला लोक जेव्हा गणपती पुळ्याला येत तेव्हा इथल्या गैरसोयीबद्दल कुरकुरत आता तसे नाही. इथे तुम्ही आपले ‘साक्षीत्व’ वाढवण्यासाठी येता, इथन्या सुंदर आकाशाकडे पहा. त्यांच्या रंगछटा पहा. तुसते बघत रहा. त्याची मजा घ्या. अशा आध्यात्मिक स्थितीत तुम्ही असता तेव्हा तुम्ही आनंदात, शांतीच्या स्थितीत करुणामय असता. या गोष्टीना तुम्ही केवळ आपल्या अहंकारामुळे मुकता. आहे. जो तुमच्या जीवनातील संपन्नता व आनंदाला अडथळा उभा करतो. त्याच्याकडे तुम्ही बघत रहा. त्याचे खेळ पहा आज्ञा चक्रांच्या. लोकांना एक सवयच होते की प्रतीक्रिया दर्शविणे. काही घडले की प्रतिक्रिया होणे, कुठल्याही बाबतीत. हे सर्व तुमच्यातील सवयीमुळे (Conditioning) किंवा अहंकारातून (Ego) होते. स्वतःच्या अहंकारामुळे आपण कोणीतरी विशेष वा उच्च आहोत असे सतत वाटते आणि कोणी काही बोलले की लगेच त्यांना सलते, हे सर्व अहंकारामुळे घडते. अहंकार हा तुमच्या आज्ञाचक्राचाच भाग आहे व दुसरा (Conditioning पूर्वग्रह. ज्यांना सतत दुसऱ्याकडून मान घेण्याची सबय असते व एखाद्याने चुकून दुर्लक्ष केले की त्यांचा पारा चढतो. अशा अनेक क्रिया मोठा शतरू तो तुमचा पण त्यापासून अलग रहा साक्षीरुप रहा मग त्यांचे खेळ आपोआप संपतील. आजच्या युगाची अहंकार हीच मोठी समस्या आहे. सर्व राष्ट्रांच्या जगाच्या समस्या यामुळेच

लोकांना या जगांत कोण विचारते! लोकांनी तसे घडावे असे वाटते तर तुम्हीपण तसे आदर्श व्हा. हे जाणून तुम्ही खिस्तांच्या अवताराला, जीवनाला पूर्ण न्याय दिल्यासारखे होईल. त्यांनी ज्या तन्हेने अहंकाराला पार केले तो एक उत्तम आदर्श आहे. जगात काही राष्ट्रे खिस्तांचा अभिमान आहेत. लोकांना त्याची उलट मजा वाटते. सहजयोगातही ही एक समस्या आहे. लोकांच्या अहंकाराबाबत कसे सांगावे? पण ही समस्या तुम्ही सहजयोगीच हाताळू शकता. एक माझे व तुमचे प्रश्न सोडविण्याचा उत्तम उपाय आहे. माझ्या जीवनाचे एक भव्य चित्र माझ्यासमोर आहे. सर्व विश्वाला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. तसा तुम्ही सर्वांनी निश्चय करा. त्याबाबत आपले आत्मपरीक्षण करा. या जगासमोर मी कोण आहे ? सहजयोगात जे शिकायला मिळते सहजयोगी जे आत्मनिरीक्षण करु शकतील ते दुसऱ्यांना शक्य नाही. हा मिस्टर इगो कोण आहे ? त्यासाठी तुम्ही अत्यंत नम्रतेने श्री खिस्तांचा मंत्र म्हणा, त्याची तुम्हाला मदत होईल. लोकांच्या स्तुतीला तुम्ही बळी पडू नका. बाहेरच्या जगात जे अहंकाराचे, स्पर्धांचे जे घाणेरडे साम्राज्य पसरले त्याला सामोरे जा. हे अहंकार दूर करण्याचे यश तुम्ही मिळवा, ते परम आहे. तुमचे नम्र स्वभावाचे दर्शन कायम राहील. स्वार्थी बाळगतात. तेच स्वतःला मोठे अहंकारी, गर्विष्ट समजतात हे विचित्र वाटते. अशा लोकांनी नम्रता, करुणा यांचे दर्शन घडवावे, त्याचा अंगिकार करावा. म्हणून विशेषतः पाश्चात्यांनी सहजसंस्कृतीचा अंगिकार करावा तुम्ही तसे व्हाल व मग लोकांना तुमचा हेवा वाटेल. तुम्हाला मी खिसमसच्या शुभेच्छा देते. खिस्तांच्या जीवनाचा आदर्श जाणून घ्या. ईश्वराचे तुम्हाला अनंत आशिर्वाद. + के