Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही Read More …