Makar Sankranti Puja

Pune (India)

Upload transcript or translation for this talk

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही दुष्ट लोकांनी सर्व काही बरबाद केले आहे. पण तुम्हाला विशेष वरदान आहे, तुम्ही तरुण आहात आणि पुष्कळ काही करू शकता. महाराष्ट्रातील लोकांना सांगितले तर तप करतील, उपवास करतील, पति वा पत्नीचाही त्याग करतील, परंतु तपस्यापेक्षाही भक्ती अधिक श्रेष्ठ आहे. भवती ही आनंदस्वरूप आहे हे फार वेगळे आहे. जे भक्तीत लीन, रममाण होतात ते सहजयोगाला अगदी हृदयातून धरतात. सहजयोगाला कुठल्याही तपस्येची जरुरी नाही, काही सोडायचे नाही, जसे आहात तेथेच सर्व काही प्राप्त होते. परंतु दुसर्यांना दिले पाहिजे. मग आम जनतेला सहजयोग कशाला दिला गेला ? तपस्येतून काय मिळते, ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही. परंतु तुमच्या भक्तीतून सर्व काही देता येते. भक्तीसाठी काही द्यावे लागत नाही, जसे हे सोडा ते सोडा असले. काही नाही केवळ प्रतिज्ञा करा की माझे जीवन मी सहजयोगासाठी समर्पित करतो. काही सोडू नका. कसल्याच तपाची जरुरी नाही. तुमच्यातील भक्ती प्रसारीत झाली पाहिजे, ती लोकात प्रज्वलीत व्हायला हवी आणि पहा मग त्यातून काय आनंद मिळतो. आपल्यापुरताच सहजयोग सिमित ठेवला तर आनंद त्वरीत लुप्त होऊन जाईल. आनंद वाढविण्यासाठी तो दुसर्यात भरायला हवा, करतो. श्री माताज्जींच्या व्यक्तीपुरता मर्यादित असू शकत नाही. तो सर्व विश्वासाठी आहे. जगात असे खूप सहजयोगी असतील जे सहजयोगाचा प्रसार करत नाही. ते आपल्या जीवनापुरतेच समाधान मानतात. त्यांना जे मिळाले त्यातच ते समाधान मानतात. तुम्ही उघडपणे सहजयोगाविषयी बोलले पाहिजे. काही लोक फार बिचकतात. सहजयोग सांगण्याविषयी असे लोकही बरेच काही करू शकतील. आपण शुद्ध, पवित्र व्हावे म्हणून लाखो लोक त्या गंगा नदीत येऊन स्नान करतात. आपण काय प्राप्त केले याबद्दल किती लोकांना खात्री आहे, या बद्दल मला शंका आहे. पण ते जर जाणले तर प्रत्येकजण महान कार्य करू शकतो. त्यामुळे खूप समाधान मिळेल, ते ऋणमोचक आहे. तसा बरेच लोक आपला वेळ पफुकट घालवतात. तुम्ही ते घडवून आणा. स्वतःचे आत्मपरीक्षण करा व मी सहजयोगांकरीता काय केले? असा प्रश्न विचारत जा. लोकांना हे पटविणे तसे अवघड आहे, त्यासाठी खूप परिश्रम घ्या. तुम्हाला सर्व विश्वात परिवर्तन घडवून आणायचे आहे याला महत्त्व द्या. ती वेळ आता आलेली आहे. नवीन क्लुप्त्या व कल्पनांना धरून कार्यासाठी सज्ज व्हा. स्वतःपुरता सिभित ठेवू नका. आपणा सर्वांकडून मला या सर्व अपेक्षा आहेत. ০ ও ৫ 3