Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, सर्वत्र ठायी ठायी पसरलेली आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच तुम्ही ती जाणूं शकता. प्रेम हीच त्या परमात्म्याची शक्ति आहे आणि प्रेमामधूनच ती कार्यान्वित होत असते. सर्वसाधारण लोकांच्या हे लक्षांत येत नाहीं; दुसऱ्याबद्दल मत्सर वा द्वेषभाव बाळगणें, दुसऱ्याशी भांडण-तंटा करणे या सर्व हीन प्रवृत्ति आहेत. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तमच्या मनांत सदैव प्रेमभावनाच फूलली पाहिजे. आपल्या या भारतदेशांत सध्या जी अशांत परिस्थिति दिसत आहे ती बघितल्यावर मनांत प्रथम जाणवते की धर्माच्या नावाखाली लोक एवढे अकांडतांडव कसे करु शकतात? धर्माबद्दल कुणी कांही बोलले वा केले की त्याची तीव्र प्रतिक्रिया दुसरे लोक लगेच व्यक्त करुं लागतात; या क्रिया-प्रतिक्रियेला कांही अर्थ नसतो; उलट त्यामुळें लोकांच्या मनांतील परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना क्षीण होत जाते. म्हणून परमात्म्याची ही प्रेमशक्ति लोकांच्या मनांत कशी दृढ़ करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो व शिकवायला पाहिजे इकडे लक्ष द्या. आपल्या मुलाला वाढदिवस पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) निर्मलधाम दिल्ली दिनांक २१ मार्च २००२ ১২০ दुसर्याच्या मुलाने मारले तर त्याला जाऊन उलट थप्पड मारायला आपण सांगणार कां? त्याऐवजी त्याला समजावले की-मारलं Read More …