Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja [Original Marathi transcript talk] मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? पण जेव्हा त्यांना कळतं हे सहजयोगामुळे घडलं तेव्हा ते ही सहजयोगात येतात. ही कमालीची गोष्ट आहे. ते वरदान तुम्हाला मिळालेले आहे. फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मेहनत केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दुसर्यांना दिलं पाहिजे. एकट तुम्ही अनुभवून होत नाही. हा अमृताचा पेला तुमच्या तोंडात आहे तो दुसऱ्यांच्याही जाऊ देत. दुसऱ्यांनाही बरं वाटू देत. त्यांचही भलं होऊ देत. म्हणून सर्व सहजयोग्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही दूसऱ्यांनाही सहजयोगात उतरवू. सगळ्या जगात सहजयोग पसरला आहे. तो फार थोडा आहे. आणखीन पसरायला पाहिजे. ख्रिस्तांचे फक्त बारा शिष्य होते आणि त्यांनी ख्रिश्चानिटी वाढवली. पण केवढ्या चूका झाल्या त्यांच्या. पुष्कळच चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सहजयोग पसरवता तेव्हा त्या चुका करू नका. सरळ, धोपटमार्गाने ते काही कठीण नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिली आहे ती वापरा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या हातून किती तरी सहजयोगी होऊ शकतात आणि तुम्ही तसा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हाच विचार करावा, की आम्ही कोणाला पार करू? कोणाला आम्ही याच वरदान देऊ ? ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जस तुम्हाला सहजयोग मिळाला तशीच ही जबाबदारी Read More …