Mahashivaratri Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Mahashivaratri Puja 15th February 2004 Date: Place Pune Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आज आपण महान गुरुची पूजा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. सर्व देव- देवतांचा हा महान गुरू कोण, या महान शक्तीचे स्वरूप काय आहे व ती कशी सर्वत्र संचारित होत राहते हे आपण नीट जाणले पाहिजे. हे गुरुतत्त्व म्हणजेच साक्षात् शिव, शिवशक्ति म्हणजेच गुरुशक्ति, ही गुरु-शक्ति मिळाल्यावर तुम्ही स्वत:च स्वत:चे गुरु होता. या शक्तीचे एकमेव कार्य व उद्देश म्हणजे कल्याण. ज्याला या शक्तीचे आशीर्वाद मिळतात त्याचे सर्व प्रकारे कल्याणच होते, सर्व प्रकारची सफ़लता मिळते; एवढेच नवहे तर त्याचे जीवनच प्लावित व अलंकृत होते. मानवाचे संपूर्ण कल्याण आत्मसाक्षात्कार मिळण्यामधूनच होणार ; आत्मसाक्षात्काराशिवाय कल्याण संभवत नाहीं. आत्मसाक्षात्कारानंतरच मानवाला सर्व सुख खन्या अरथने मिळत असते; त्याच्या जीवनालाच तेज येते; पण त्याहीपेक्षां मोठे आशीर्वाद म्हणजे तो पूर्णार्थनें समाधानी होतो. समाधान हे त्याला मिळणारे वरदानच म्हटले पाहिजे आणि त्या समाधानांत तो रममाण होतो. अशा कल्याणामधून तुमची सर्व शारीरिक व मानसिक संकटे आणि व्लेश होत असतात. किंबहुना आजार येणें म्हणजे खरे कल्याण अजून होत नाहीं असे समजावे. तसेच सांसारिक सर्व अडचणी व समस्या पण दूर होतात. कुण्डलिनी सहस्रारात आल्यावर सर्व देवांचे देव म्हणजे महादेव ही कल्याणकारी शक्ती उपलब्ध होते आणि मानव संतुलनांत येऊन खन्या शांतीचा अनुभव घेतो. त्यासाठींच आपण या गुरूला शरण गेले पाहिजे; त्यांनंतर मग कांहीं मागायचे उरतच नाहीं आणि सर्व कांहीं मिळाले अशी श्रध्दा तयार होते; त्यांतूनच तुम्हाला प्रेमाची शक्ति प्राप्त होते, किंबहुना ही प्रेमशक्ति तुम्हाला कवटाळते आणि तुम्ही रोमांचित होऊन जाता. ही शक्ति मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. ज्याने ही शिवशक्ति प्राप्त केली आहे अशा गुरुकडूनच ती तुम्हाला मिळूं शकते आणि तुम्हालाही गुरुपद मिळते. मग तुमचे सारे भौतिक, मानसिक व शारीरिक प्रश्न नाहींसे होतात. हेच त्या शक्तीचे आशीर्वाद असतात हे लक्षांत घ्या. आणखी एक आशीर्वाद म्हणजे तुम्ही स्वत: गुरूपदावर आरूढ झालात की हेच आशीर्वाद तुम्ही इतरांनाही मिळवून देत राहता आणि त्यातून आणखी नवे गुरु तयार होतात. ही कल्याणकारक शक्ति मिळालेला मानव अत्यंत समाधानी असतो, त्याला बाकी कसल्या इच्छाच होत नाहींत. हीच शिवशक्ति आहे. स्वतः शिवदेखील ध्यानांतच शांतपणे बसलेले आहेत. हा आत्मसाक्षात्काराचाच प्रसाद आहे पण तो देणाराही त्या उच्च स्थितीला पोचलेला सिध्द असावा लागतो. हे गुरुपद मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळे असे कांहीं करावे लागत नाहीं, ध्यानस्थितीमधें प्रगत व प्रगल्भ होत स्थिरावल्यावर ही परिपक्वता सहज प्राप्त होते. मग तुम्ही कांहीं मागतही नाहीं; तुमच्या फक्त सान्निध्यांत येणार्यालाही समाधान व शांति मिळते. हीच स्वर्गसुखाची शांति व आनंद आहे. म्हणूनच त्याला म्हणतात. सहजयोगात तुम्ही अधिकाधिक प्रगल्भ होत या स्थितीला उन्लत होऊन पोचले पाहिजे आणि त्यांत स्थिरावले पाहिजे. तुमच्या जवळ ही क्षमता आहे. या स्थितीला १ श्री शिवपूजा दूर पुणे प.पू श्रीमाताजी निर्मलादेवींचेभाषण १.५ फेब्रुवारी २००४ सहजयोग्यांनी कैवल्य’स्थिती पर्यंत उन्नत व्हायला पाहिजे. कैवल्य” स्थिति सर्वांना अनंत आशिर्वाद. येण्याचाच ध्यास घ्या.