Talk of the Evening Eve of Diwali

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007.

[Marathi translation from Hindi talk]

आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, भांडणे नाहीत; ते या सृष्टीवर दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी, वाईट लोकांना नष्ट करण्यासाठी अवतार घेतात. सर्व ठिकाणी होत आहे. मी पाहते आहे, की जे दुष्ट लोक आहेत ते उघडे पडत आहेत, आता सर्वत्र हे घडत आहे. आपल्या सर्वांचे काम हे आहे, की त्यांना बाजूला करा. जे दुष्ट आहेत, वाईट आहेत पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात असे सर्वजण नरकात जाणार. आम्हाला माहीत नाही की किती नरक आहेत. आता ज्या वातावरणात आपण बसला आहात, ज्या जागेवर बसला आहात, याचा नरकाशी काहीही संबंध नाही. पण आपण यात राहून अधर्मासारखे वागाल, चुकीचे काम कराल तर आपणसुद्धा नरकात जाल. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत आणि तिथपर्यत पोहचण्याची व्यवस्था देखील खूप चांगली ठेवली आहे. कारण त्यामुळे तिथे जाणाऱ्यांना माहीत नसते, की आपण कोठे चाललो आहोत. जे उरतात ते स्वर्गात जातात. या पृथ्वीवरील कोणाला माहीत नाही, की वाईट काम करणाच्या सर्वांना नरकात जावे लागते. दिवाळीचा अर्थच हा आहे, की आपण जसे बाहेर दिवे लावतो तसे आपल्या सर्वांच्यात देखील ते प्रज्वलित झाले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे, की या अंध:कारातील वातावरणात आपण सर्वजण प्रकाश आहात, दिवे आहात. आपल्याला प्रकाश पसरावयाचा आहे. पण जर आपला आतला प्रकाशच कमी असेल तर आपण बाहेरच्यांना कसा प्रकाश देऊ शकाल? याचा आपण विचार करा. तर पहिल्यांदा आपण सहजयोग्यांनी लक्षात घेतले पाहिजे, की आपला आतला प्रकाश जागृत ठेवा. यासाठीच कदाचित आपण या सृष्टीत आलो असू. इसामसीहपर्यंत याबाबत कोणीही बोलत नव्हते. ते आज्ञा चक्रावर आले. त्यांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले, की त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता. ते परमेश्वराचे पुत्र होते, तरी अहंकार नव्हता. त्यांच्या आधीच्या लोकांनी थोडेफार सांगितले, पण इसामसीहांनी आपल्या सर्वांचे आज्ञा चक्र ठीक व्हावे यासाठी अवतार घेतला होता. या दिल्लीत आज्ञा चक्र खूप पकडते. याचे कारण काय ? तर पूर्वी इंग्रज इथे वास्तव्य करत होते. त्यांनी आपल्याला अहंकार, घमेंड करायला शिकवले. आपल्याला माहीत आहे, की आम्ही ते दिवस देखील पाहिले आहेत, की जेव्हा भारत पारतंत्र्यात होता. त्या पारतंत्र्यातून आपण सर्वजण बाहेर आलो आहोत. आपण सर्वजण स्वतंत्र झालो आहोत. स्वातंत्र्य काय आहे? ‘स्व’ ला ओळखणे. ज्यांनी ‘स्व’ ला ओळखले, त्यांनी ‘स्व’च्या तंत्राला जाणले. सहजयोगात आपण स्वत:ला ओळखले असून आपल्याला माहीत आहे, की आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्याला ‘स्व’ च्या तंत्राने चालायचे आहे. दिल्लीत खूप काम झाले आहे, हे दिसते आहे. दिल्लीच्या बाहेरदेखील खुप काम झाले आहे. इथल्या लोकांच्यात जो दोष आहे तो तुम्हा सर्वांना माहीत आहे. मला सांगण्याची आवश्यकता नाही. पण आपण आता

स्वतंत्र झालो आहोत तर आपण हे पाहिले पाहिजे, की आपल्यात तर हा दोष नाही ना? पहिला दोष म्हणजे आपल्या आज्ञा चक्रावर पकड येत आहे. ईसामसीह सुळावर चढले पण आपण त्यांच्याकडून काही शिकलो नाही. उलट जे इसाई देश आहेत त्याठिकाणी जास्तच अहंकार आहे. त्याचा प्रभाव आपल्यावर देखील खुप होता. पण इथे सर्वात वाईट गोष्ट ही आहे की, आपण एकमेकांना ओळखले नाही. सगळीकडे भांडणे, मारामाऱ्या, एकमेकांच्या मनात द्वेष, अशुद्ध मन. पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी आपली मने स्वच्छ केली पाहिजेत. सहजयोगात हे सर्व शक्य आहे. कुठल्या कुठे लोक पोहचू शकतात. कोणालाही हिमालयात जाऊन बसण्याची आवश्यकता नाही. या दिल्लीत बसून तुम्ही मिळवू शकता. पण आपण चोहीकडे बघितले, तर सर्वत्र अहंकारी लोक आहेत. मोठ्या प्रमाणावर आज्ञा चक्र पकडले आहे. त्यामुळे अवघड आहे. आता परमेश्वराने एक नवीन गोष्ट पाठविली आहे, ती म्हणजे कॅन्सर. जर आपल्याला कॅन्सर झाला आणि आपले आज्ञा चक्र पकडले असेल, तर ते ठीक होणे मोठे संकट आहे. त्यामुळे ज्यांना कॅन्सर झाला आहे, त्यांनी सहजयोगात येऊन जर आपला अहंकार आहे तो काढून टाकला, म्हणजे ते ठीक होतील. ज्या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी अहंकार येतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शासकिय कर्मचारी असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर अहंकार आहे. यापेक्षा जे बाहेरच्या देशातून आले आहेत ते इथल्यापेक्षा जास्त अहंकारी आहेत. ते दारू पितात. जरा विचार करा ईसाई म्हणवून घेता आणि शिवाय दारू पिता. दारू पिणे म्हणजे स्वत: स्वत:च्या विरुद्ध जाणे. आपण आपले आज्ञा चक्र खराब करतो. त्यामुळे आज्ञा चक्राचा मान ठेवला जात नाही. ज्याचे आज्ञा चक्र ठीक झाले असेल तो कधीही दारू पिणार नाही. आपण इकडे तिकडे पहाल तर लोक दारू घेणारे दिसतील. पण त्यांना बाहेर पडण्याचा कोणता मार्ग त्यांना सापडत नाही. कारण त्यासाठी सुद्धा ते दारूच पितात. कोणतेही व्यसन हे माणसाला गुलाम करते. कोणतेही व्यसन. इकडे ते लोकांना तंबाखू टाकून पान खाण्याचे व्यसन आहे. मला सांगा परमेश्वराने आपल्याला इतक्या प्रेमाने बनवले आहे, कशासाठी? आपण या जगातील सा्या देशांपेक्षा वेगळे आहात. भारतीय आहात. आपल्याकडे दोन-चार रोग मी जास्त पाहते आहे. त्यातील एक म्हणजे जेवणाच्या ठिकाणी पैसा खाणे. मी आत्ता ज्या रस्त्याने आले मला खूप वाईट वाटले त्याठिकाणी पूर्वी रस्ता नव्हता. आता नव्याने रस्ता केला आहे. पण कोणीही म्हणणार नाही, की हा नवीन रस्ता झाला आहे म्हणून. हे सर्व हिंदुस्थानीच करू शकतात. इतके बेशरम लोक मी जगात कुठेही पाहिले नाहीत. मोठ्या पेक्षा मोठे हे काम करू शकतात. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की सर्वप्रथम आपले आज्ञा चक्र ठीक केले पाहिजे. आज्ञा चक्र पकडलेला स्वत:ला जगाचा कारभार मी चालवतो असे समजत असतो. साऱ्या जगाला मी ठीक करू शकतो असे समजत असतो. वास्तविक तो स्वत:च ठीक नसतो, तर दुसर्याला काय ठीक करणार? आपण असे अनेक लोक पाहिले असतील, की ते स्वत:ला फार मोठे समजतात आणि प्रत्यक्षात फार वाईट काम करीत असतात. या देशात लोक पैसे खातात. मला सांगा परमेश्वर यांना माफ करेल का? सर्वात मोठा गुन्हा म्हणजे चोरी करणे आणि पैसे खाणे. जो अशा प्रकारचे वाईट काम करीत असेल तर त्याने जरी पूजा केली, वाचन केले, पाठ केले, नमाज पढले, अल्लाहाला आवाज दिला तरी काहीही उपयोग होणार नाही. आज आपल्या नवीन वर्षाची सुरवात होत आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माझी अशी इच्छा आहे, की आपण सर्व लोक आजपासून खोटे बोलणार नाही, कधीही खोटे बोलणार नाही. मी जगभर फिरले आहे. हिंदुस्थानी खोटे बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्यावर खोटारडे म्हणून ठप्पा लागला आहे. आपल्याकडे कितीतरी मोठे संत साधू होऊन गेलेत. ज्या ठिकाणी सुफीसारखे लोक झालेत त्या ठिकाणी खोटे का बोलता? तर आपण सर्वांनी आज शपथ घेतली पाहिजे, की आजपासून आम्ही खोटे बोलणार नाही. काही

झाले तरी खोटे बोलणार नाही. त्यासाठी हिम्मत पाहिजे. आपण तर पार झालेले आहात, त्यामुळे आणखी काय हिम्मत पाहिजे? आपण खोटे बोलू शकत नाही. जर तुम्ही असे झालात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील, की तुम्ही खरे आहात. सहजयोग्यांनी खरे वागले पाहिजे. आपण जरी मोठे व्यवसायिक असाल, इंजिनीअर असाल, रस्ते तयार करणारे ठेकेदार असाल, डॉक्टर असून सर्वांवर उपचार करीत असाल तरी आपल्यासाठी हा नरक ठरू शकतो. तेव्हा पार झालेले जर खोटे बोलू लागले, तर त्यांना काहीही फायदा होणार नाही. आपल्या देशाबाबत बाहेर जे बोलतात, की आपल्याकडील लोक फार खोटारडे, फसवे, पैसे खाणारे आहेत ते ऐकल्यावर मला फार वाईट वाटते. आज फार शुभ दिवस आहे. तेव्हा सर्वांनी निश्चय केला पाहिजे की, आजपासून आम्ही खोटे बोलणार नाही. काही झाले तरी. आम्ही स्वत: कधी खोटे बोलत नाही. खोटे बोलण्याने स्वत:चेच नुकसान होते. खोटे काम केल्याने आपलेच नुकसान होते. अशा खोटारडे फसवेगिरी करून कितीही पैसा कमवला तरी आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही. आपण नरकातच जाल . सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, की जगात आपल्या देशाची खूपच बदनामी झाली आहे. ही बदनामी का झाली ? कारण आपल्याकडे असे वाईट लोक आहेत. आपण एक संस्था तयार करा. आपल्याला समजले, की हा खोटा आहे, तर आपण त्याला जाब विचारा की, ‘साहेब, याचा अर्थ काय ?’ जसे हा रस्ता ठीक बनविला नाही तर तुम्ही माहिती मिळवा की, किती पैसे खर्च झाले आणि यात कोणी किती पैसे खाल्लेत ? पैसे खाणारे दारूच पिणार. दारू तर आपली दुश्मन आहे. आपल्या सर्वांची अवस्था चांगली आहे. खूप देशात गरीब लोक आहेत. मी पाहिले आहे, की ते प्रामाणिक आहेत. सर्वात प्रथम प्रामाणिकपणा पाहिजे. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की मी कोणाशी बेईमानी करणार नाही आणि बेईमानी करणार्यांना साथ देणार नाही. कोणी तसे केले तर त्याला उघडे पाडू. आता काही जण म्हणतील की, असे आहेत, तसे आहेत. पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, की तुम्ही सहजयोगी आहात. सहजयोगी हे पोलिस सुद्धा कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यापेक्षा कमी नाही. सहजयोग्यांत फार शक्ती आहे. सर्व शक्ती प्रामाणिकपणाची आहे. प्रामाणिक असलेच पाहिजे. मी खूप खुश आहे. कारण खूप सहजयोगी प्रामाणिक आहेत. सच्चे आहेत. आपल्याला आणखी प्रामाणिक सहजयोग्यांची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणा अतिशय आवश्यक आहे. नाहीतर आपले आज्ञा चक्र सुटू शकणार नाही. अहंकारामुळे आज्ञेवर पकड येते. एकदा अहंकार आला, की तो कोणतीही मोठी चूक करू शकतो, वाईट वागू शकतो. दुसर्याचे नुकसान करू शकतो. पैसा खाऊ शकतो. त्यामुळे तो शेवटी नरकात जातो. मी आपल्याला सांगते, की आपण पैसे खाता कामा नये. त्यामुळे आपण काही मरत नाही. जास्त पैसे जमवून काय करणार? दोन चार ठिकाणी घरे घ्याल. उजेड पाडाल. दोन चार बायका ठेवाल. त्यामुळे काय? पण आपण जेव्हा नरकात जाल त्या ठिकाणी आपले फार हाल होतील. आजच्या या दिवाळीच्या दिवशी मी हे सांगते आहे. कारण आजच्या या दिवशी सीतामाई प्रभू रामचंद्राकडे परत आल्या. ज्यावेळी आपल्यात चारित्र्य येईल, त्यावेळी आपण (वाईट सवयीच्या) गुलामीत राहू शकणार नाही. आपण स्वत:चेच गुलाम आहात. दुसऱ्यांचे नाही. नंतर आपण कोणत्याही गोष्टीसाठी खोटे बोलणार नाहीत. आम्ही दिल्लीत खूप दिवसापासून राहिलो आहोत. आम्ही हैराण झालो आहोत, की लोक किती खोटे बोलतात म्हणून! बाप रे बाप, त्यांना भीती वाटत नाही! सफाईदारपणे खोटे बोलणे. त्यामुळे, मला माहीत नाही, कदाचित त्यांना फायदा होत असेलही. काही रुपये पैसे मिळतदेखील असतील. पण त्यामुळे ते कधीही स्वर्गात जाणार नाहीत. माझी अशी इच्छा आहे की, सहजयोग्यांनी आज शपथ घेतली पाहिजे की, आजपासून

मी कधीही खोटे बोलणार नाही आणि कधी खोटे बोलणाऱ्यांना मदत करणार नाही. बाहेरच्या देशातील लोक आपल्या लोकांना ‘बेइमान लोक आहेत’ असे म्हणतात. मी खूप जग पाहिले आहे. सर्वात मला रशियाचे लोक आवडतात. खूप चांगले सहजयोगी आहेत. मी रशियाला या वर्षीदेखील जाऊ शकले नाही. पुढच्या वर्षी जाणार आहे. पण याचा अर्थ हा नाही, की आम्ही लोकशाही रुजवू शकलो नाही. त्यांचे पाहिल्यावर आपल्याला सुद्धा कम्युनिस्ट व्हायला हवे असे वाटते. तिकडे चोरी, लबाडी, खोटे बोलणे अजिबात नाही. सर्वकाही प्रेमाने. प्रेम. मला पण खूप मानतात. आपल्याला समजले पाहिजे, की आपण कुठे चाललो आहोत. दोन चार खूप पैशासाठी आपण कुठे चाललो आहोत ? त्यापासून आपण काय मिळवणार आहोत? तर पहिल्यांदा आपल्याजवळ प्रामाणिकपणा असायला हवा. तुमच्या फसवेगिरीमुळे तुमच्याच लोकांना त्रास होतो. हिंदुस्थानी लोकांना बेईमान लोक आहेत, असे म्हणतात, हे ऐकून मला लाज वाटते. तुमच्याकडे कितीतरी संत झाले, महान योगी झाले, तरी या ठिकाणी फार चोर लोक असून चोऱ्या करतात? वाईट वागतात? ह्या अगोदर आपली आज्ञा घाबरली आहे. मोठे श्रीमंत झाले. शेवटी पहा. हे वाईट वागून मोठे झालेले सर्व जण आता नरकाकडे चाललेले पहायला मिळतात. मी आपल्याला आज दिवाळीच्या दिवशी सांगते की, नरक म्हणजे अंध:कार आणि तुम्ही प्रकाश झाला आहात. आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी अंध:कार – अंधार आहे त्याच्या विरुध्द उभे रहा. त्यांना सांगा हे सर्व वाईट आहे. त्यामुळे आपला देश सुधारेल. पूजा- पाठ आपण करीत आहोतच. पण आपल्या आतील शक्ती आहे. तिचा उपयोग असत्याच्या विरोधात करा. खूप लोकांना माहीत नाही, की पैसे मिळवणे हा रोग आहे. ते सर्व नरकात जाणार. मी आपल्याला हे यासाठी सांगते. कारण यापूर्वी याबाबत कोणी हे सांगितलेले नाही. दिवाळीच्या दिवशी मी आपल्याला सांगते की, आपण आनंद साजरा करू, दिवे लावू आपल्या हृदयात. त्या दिव्यांमुळे आपल्या लक्षात येईल की कोण कसे आहे, कोण चोर आहेत. आता मी एक दुसर्यांची भांडणे पहाते. हिंदु -मुस्लिमांची लढाई आता नष्ट झाली आणि दुसर्या लोकांची सुरू झाली आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप भांडखोर पण आहोत. दुसर्या देशात इतके धर्म नाहीत. आपल्याकडे कोणत्याही कारणावरून भांडणे होतात. भांडणे पहिली. नवरा- बायकोत भांडणे, त्यांच्या मुलांमध्ये भांडणे, परत त्यांच्यात आणखी भांडणे. सहजयोग काय आहे? सहजयोगात प्रेम आहे. फक्त प्रेम. आपल्या आत जी प्रेमशक्ती आहे तिला जागृत करा. आजचा दिवस खूप शुभ आहे आणि आपल्याला आपल्या हृदयात दिवे लावायचे आहेत. आपण निश्चय केला पाहिजे, की आम्ही मेलो तरी खोटे बोलणार नाही. आपल्याकडे पूर्वी असे लोक झाले होते. आता आपले इतके नाव खराब झाले आहे की, हिंदुस्थानी बेईमान आहेत म्हणून. माझ्या पहाण्यात आले नाहीत, पण ऐकण्यात आले. त्यामुळे फार दुःख होते. आपल्या हिंदुस्थानसारखा दुसरा पवित्र देश नाही. ज्या ठिकाणी अनेक मोठमोठ्या संतांनी जन्म घेतला तेवढा दुसरीकडे कोठेही नाही. सुफी आहेत, या ठिकाणीच जन्मले. जेवढे महान लोक झाले ते सर्व हिंदुस्थानात झाले. त्यांच्या नंतरच्यांनी जे शिकवले त्यामुळे लोक चोर झाले, जे चोरी करतात ते कधी स्वर्गात जाणार नाहीत. या ठिकाणच्या जीवनापेक्षा जास्त काळ जीवन नरकात घालवावे लागेल. आजच्या दिवशी मी नरकाबाबत अशासाठी सांगते आहे, कारण नरक म्हणजे अंधार आहे. तो नरक मी पहाते आहे. आता आपले दिवे जागृत झालेत. त्यामुळे आपल्या लक्षात येईल, की कोण नरकात जाणार ते. आता तुम्ही सरकारला मदत करा. त्यांना बेईमान लोकांना पकडून द्या. खोटे बोलणाऱ्यांना पकडून द्या. आपण छोट्या पोजिशनवर असाल किंवा मोठ्या पोजिशनवर, आपण सांगून टाकले पाहिजे, की कोण चोर आहे. चोरांना पकडा, खोटे बोलणार्यांना पकडा. आता तुमच्याजवळ शक्ती आहे ती कशासाठी ? तुम्ही जागृत झालात, तुमच्यात प्रकाश जागृत

झाला तो कशासाठी. त्या प्रकाशात आपण स्वत:ला पहा. अंधारात काही दिसणार नाही. पण प्रकाशात पहा की आपण कशासाठी आहोत? आणि खोटे बोलण्यापासून आपल्याला काय फायदा आहे? आम्ही संसारी आहोत आम्ही कधी खोटे बोलत नाही. कधीच नाही आणि बोलू शकत नाही. ज्यावेळी आपण खोटे बोलाल त्यावेळी आपली आतली प्रकाशाची शक्ती नष्ट होईल. आपण दिवे असल्याने या आजूबाजूच्या अंधारापेक्षा वेगळे आहात. आपल्या प्रकाशाने या अंधाराला नष्ट करावयाचे आहे. आपल्या देशातील लोकांना जगभर बेईमान समजतात, पण आपल्या देशासारखे लोक कुठेच नाहीत, हे ऐकून खुप दुःख होते. किती चुकीचा आपल्याबद्ल समज झाला आहे म्हणून. हे लोक बेईमानी करून काय मिळवतात? त्यांचा शेवट भयंकर आहे. जेवढे बेईमान आहेत ते सर्व उघडे पडतील. त्याची व्यवस्था झाली आहे. आपण पार झालात. कारण आपण बेईमान नव्हता म्हणूनच. आपण पार झालेले सत्यावर प्रेम करता आणि सत्याचा आदर करता. माझी अशी इच्छा आहे, की आपण सत्याच्या बाजूला उभे राहिले पाहिजे. जसे यमुना नदीत लोक कचरा टाकतात. यमुना तर सरळ नरकातच उतरते, पण त्या नरकापासून तुम्ही वाचाल.. कारण तुम्ही पार झाला आहात. ज्यांची जागृती झाली आहे ते घसरत नाही. पण जर आपल्याला खरोखर सहजयोगात आतमध्ये उतरायचे असेल तर प्रथम निश्चय करा की, काही झाले तरी बेईमानी करणार नाही. पैसे कमवणे हा या दुनियातला धंदा झाला आहे. त्यामुळे काय होते ? कोणी पैसेवाल्याला लक्षात ठेवत नाहीत. जर आपले आपल्या देशावर प्रेम असेल तर प्रथम खरेपणा जोपासा. नाहीतर खोट्या माणसाच्या प्रेमाचा काय भरोसा? हे फार अवघड आहे. आपण पहाता की आपला शेजारी असा आहे तर आपण पण तसेच होऊ. पण आपण असा का विचार करीत नाही, की आमच्यासारखे आमच्या शेजाऱ्यांना तयार करू. आपण छोट्या पोझिशनवर असाल किंवा मोठ्या पोझिशनवर, आपण सांगून टाकले पाहिजे, की कोण चोर आहे. खोटे बोलणाऱ्याला पकडा, चोरांना पकडा. सर्वात प्रथम आज सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, की आम्ही आजपासून बेईमानी करणार नाही आणि बेईमानांना प्रोत्साहन देणार नाही म्हणून. खोटारडेपणा हा आपल्या देशाला शाप आहे. खूप लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीतकमी दहा वेळा तरी खोटे बोलतील. पण तरी त्यांचे पोट भरत नाही. आता आपली गरिबी दूर झाली आहे. सर्व काही ठीक चालले आहे. खाणे-पिणे सर्व ठीक आहे. आता तुम्ही भिकारी नाहीत. मग खोटे का बोलता? आजच्या दिवशी सर्वांनी निश्चय करा, की आम्ही खाटे बोलणार नाही आणि कोणी खोटे बोलणारा असला तर त्याला साथ देणार नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहणार नाही. यातच खरा आनंद, सुख आहे. त्यामुळे खोटे लोक नरकात जातील आणि त्यांच्यामागे आपणसुद्धा जाल. आपल्याला परमेश्वराने जागृत केले आहे . आपल्या आतल्या प्रकाशाकडे पहा. तुमच्यासारख्या लोकांनी निश्चय केला पाहिजे, की काही झाले तरी, अगदी आमची मान कापली तरी, आम्ही कधी खोटे बोलणार नाही. भारतात बरेच जण चांगले आहेत हे मला माहीत आहे. पण ज्यावेळी बाहेरच्या देशात मी आपल्या लोकांबद्दल वाईट ऐकते त्यावेळी फार दुःख होते. जसा हा जो रस्ता तयार केला आहे हा काय रस्ता आहे ? मला तर वाटते, की आपण जंगलात चाललो आहोत. याबाबत आपल्याला काही समजले तर तुम्ही सर्वांनी त्याला जाब विचारा, की असा रस्ता कोणी बनविला? का बनविला? कोणी पैसे खाल्ले? तुम्ही सर्वजण एक होऊन भारतात घुसलेल्या या भुताला बाहेर काढा. कोठेही गेलो तर लोक म्हणतात, की हिंदुस्थानींवर विश्वास ठेवू नका. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही! ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवायला हवा ते तर हिंदुस्थानीच आहेत. आपल्याकडे अनेक लिडर, महान आत्मा, महान लोक होऊन गेलेत. त्यांचे किती जगभर आज नाव आहे. त्यांना लोक कितीतरी मानतात. आपल्याला पण

मानतात हे मला माहीत आहे. पण तुम्ही चोरांबरोबर उभे राहू नका. जर आपल्या लक्षात आले, की हा माणूस चोर आहे तर त्याच्या घरी खाऊ नका. त्यामुळे चोर फार अडचंणीत येतील. मी आपल्याला सांगते की, तुम्ही सर्वजण परमेश्वराने नेमलेले पोलीस आहात. जेवढे चोर आपल्याला आढळतील त्यांच्या नोंदी ठेवा. यासाठी आपल्या मुलांच्यातदेखील हिम्मत तयार करा. जर कोणी वाईट काम करताना, खोटे बोलताना आपल्याला दिसले तर त्याची माहिती मिळवा. आपला देश मोठ मोठ्या संतांनी जागृत झाला आहे. त्यामुळे आपण संगळे संत आहात. तुम्हाला खोटे बोलण्याची आवश्यकताच नाही. एकवेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल त्यामुळे काही कोणी मरत नाही. आपल्याला खाण्यापिण्यासाठी मिळत आहे, पण त्यावर दारू पितात , ज्यामुळे आपण नष्ट होऊन जाऊ. दारु घेतल्याने काही आपले चांगले होत नाही. अमेरिकेत नवीन गोष्ट सुरू झाली आहे. सोळा वर्षाचा मुलगा/मुलगी झाली, की त्यांना पालक सांगतात की तुम्ही आता घराबाहेर जा. मग ते नोकरासारखे गाड्या पुसून काम करून पैसे मिळवतात. मी तिकडे सगळीकडे ही सोळा वर्षांची गरीब मूले काम करतांना पहाते. आपल्याकडे मुले सोळा वर्षाची झाली तरी आपण त्यांना लहान समजतो. तो काय करणार? त्याला कसे जमणार ? असा विचार करतो. त्याला या वयात आपल्याकडे कधीच घराबाहेर काढत नाही. अमेरिकेत मात्र आई- वडील दोघेही त्यांना घराबाहेर काढतात. अशा अमेरिकन्सचे किती दिवस चालणार? तुम्ही पहाल ते नष्ट होत चालले आहेत. एकदोन विमाने घेण्याने कोणी मोठा होत नाही. आपण कोठे आहात? आमचा हिंदुस्थान असा देश आहे, की साच्या जगाला वाचवू शकतो. पण त्यासाठी आपल्याकडे खरेपणा आला पाहिजे. सगळीकडे खरेपणा, प्रत्येक गोष्टीत खरेपणा आला पाहिजे. मला हे कळत नाही, की खोटे वागण्याची आवश्यकताच काय? आता जे श्रीमंत आहेत त्यांनी आता थांबले पाहिजे त्यांना आता आणखी कमवण्याची आवश्यकता नाही. जास्त पैसे मिळवलेले लोक, आजपर्यंत आनंदी झालेले मी पाहिले नाही. आपण सहजयोगी आहात. आपल्या आतमध्ये प्रकाश जागृत झाला आहे. त्या प्रकाशात आपल्याला आपला सत्याचा मार्ग दिसतो. जरी आपण हिंदू असलात, मुसलमान असलात, इसाई असलात तरी काही फरक पडत नाही. आपण सर्वजण मनुष्य आहात आणि जर माणसात प्रामाणिकपणा नसेल, तर तो बेईमान आहे. प्रामाणिकपणाचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा म्हणजे परमेश्वराचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. असे अशिर्वाद मिळतात, की सहजासहजी आपले सर्व ठीक होते. मात्र भारतातील लोक हे कसेही असले तरी सर्वजण पैशाच्याच मागे लागतात. तसेच अनेक गरीब पण आहेत. आज त्यांची सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे. ते सुद्धा आनंदी झाले पाहिजेत. आम्ही आमच्याच लोकांना धोका देतो. फार हुशार आहेत. यामुळे आपल्यात अहंकार येतो. त्यामुळे कोणीही वाचू शकत नाही. अहंकारामुळे कॅन्सर झाला तर तुम्ही वाचू शकत नाही. त्यावेळी मी सुद्धा वाचवू शकत नाही. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, की सर्वात प्रथम आपला अहंकार आहे तो जाळून टाका, नष्ट करा. अहंकाराबाबत लाज वाटली पाहिजे. कोणत्या गोष्टीचा अहंकार आहे? आपल्या देशात तर कशाचाही अहंकार येऊ शकतो. एखाद्याने बी. ए. पास केले, की आला अहंकार. त्यापेक्षा जास्त शिकला, की आला जास्त अहंकार. डॉक्टर झाला की आला अहंकार, इंजिनीअर झाला की आला अहंकार. त्यामुळे आज्ञा चक्रावर पकड येऊन ते सर्व नरकात जातात. ती एक महाभयंकर जागा आहे. आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिली असून तुम्ही सर्वजण पार झाला आहात. तरीदेखील तुम्हाला नरकात जावयाचे असेल तर खुशाल जा. आजपर्यत हे कोणी सांगितले नाही. आजचा दिवस खूप शुभ आहे. खूप चांगले काम झाले. प्रभू रामचंद्रांच्या काळात सीताजी परत आल्या. अजून बरीच कामे झाली आहेत ती सर्व पार लोकांकडूनच झाली आहेत.

आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की आजपासून बेईमानी कधी करणार नाही. जो कोणी करतांना दिसेल त्याला पकडून देऊ. मी पहाते या देशात काळ्यांचे-गोऱ्याबरोबर भांडण, आणखी कोणाचे तरी भांडण. भारतात एकमेकांपासून तोडून काही कोणाचा फायदा नाही होणार त्यापेक्षा तुम्ही ज्यावेळी प्रामाणिक वागाल, तुमचे चारित्र्य चांगले असेल त्यावेळी ठीक होईल. इंग्रजांकडून काही शिकण्यासारखे नाही. आजकाल त्यांची अवस्था फार वाईट आहे. पण आपल्याला आपल्या देशाला वाचवायचे आहे. तसेच सर्व जगाला वाचवायचे आहे. आता तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही पार झाला आहात, तरी खड्ड्यात पडायचे असेल तर कोण काय करणार? माझी अशी इच्छा आहे, की सहजयोग्यांची एक कमिटी तयार झाली पाहिजे. ज्याठिकाणी आपल्याला चोरीची माहिती मिळाली, की कमिटीला सांगा. कमिटी सर्व ठीक करेल, त्यामुळे कमिटीचे नाव होईल. आपली पोझिशन वाढेल. सर्वात प्रथम तुम्ही बेईमानी करावयाची नाही. करणाऱ्याला करू द्यावयाची नाही, देशावर कलंक आहे. आपल्या देशात तेलात भेसळ, भेसळ, जिकडे पहाल तिकडे भेसळ. सगळीकडे लोक आपल्याला त्यामुळे हसतात. तुपात कोणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही. तसे पाहिले तर सर्वात चांगले लोक भारतात आहेत. इतके लोक दूसरीकडे पार नाही झाले. पैसे कमविण्यापेक्षा पुण्य कमवा. गरीब लोकांकडे पहा. आजचा दिवस फार आनंदाचा आहे. कारण आजच्या दिवशी आपल्याला स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. आम्हा सर्वांना स्वर्गातच राहण्याची इच्छा आहे. पण स्वर्गात भित्रे लोक जाऊ शकत नाहीत. घाबरण्याचे काही कारण नाही. अरे दोन पैसे कमी मिळाले किंवा जास्त मिळाले त्याने काय फरक पडणार आहे ? १७-१८ वर्षापासून पहात आहे, की आता लोक पूर्वीपेक्षा श्रीमंत झालेत. पूर्वीपेक्षा त्यांची स्थिती चांगली झाली आहे. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेईमानी. सगळीकडे नुसती बेईमानी. आज सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की, कोणीही बेईमानी करणार नाही. कोणी आढळल्यास त्याचा आम्ही विरोध करू. सहजयोगात तुम्हाला का आणले, पार केले, तर तुम्ही हा (आत्म)प्रकाश सर्वत्र पसरवा. आपण बेईमानांना मदत करतो त्यामुळे आपल्या आतला प्रकाश नष्ट होतो, तर आपण तो दुसर्यांना काय देणार? दोन पैसे कमी जास्त कमविण्याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या पाठीशी राहतो. आपल्या देशात जेवढे लोक मरतात तेवढे दुसरीकडे कोठेही मरताना दिसत नाहीत. कारण मरणारे सर्वजण नरकात जातात. तुम्ही बेईमानी केली, की तुमचे एक पाऊल नरकाकडे पडते. त्यामुळे परत खोटे बोलण्याची वाट पहावी लागत नाही. तुम्ही सर्वांनी खरे बोलले पाहिजे. जो माणूस नेहमी खरा बोलतो तो एक वेगळा होतो. त्यात जर सहजयोग करीत असेल तर भव्य होतो. जसे आज तुम्ही सुफींची आठवण काढता तसे त्यावेळी तुमची लोक आठवण काढतील. तुम्ही काही करू नका. फक्त बेईमानांना पकडा. याची आवश्यकता आहे. इथे लोक भांडतात, की यमुनेमध्ये कचरा टाकू नका म्हणून. मी इतक्या देशात फिरले आहे पण कुठेही नदीत कचरा टाकतांना आढळत नाही. अरे तुम्ही कचरा म्युन्सिपालटीकडे द्या. त्यांना त्यासाठी कर द्या. आम्ही असे लोक पाहिलेत, की त्यांनी कधी बेईमानी केली नाही आणि बेईमान लोकांच्याकडे कधी ते जात नसत. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवत नसत. कारण ते आपल्या कल्याणाबरोबर देशाचे कल्याण करीत होते. आपण सहजयोगी आहात. फक्त शपथ घ्या, की आम्ही कधीही कसली बेईमानी करणार नाही. फक्त ओळखा आणि आपल्या आंतरात्म्याला सांगा, की हा बेईमान आहे आणि सहजयोगी आहे. तर आपण एकत्र येऊन बेईमान लोकांना उघडे पाडा. तुम्ही जरी बारा सहजयोगी एकत्र आलात, तरी खूप झाले. कारण परमात्मा या कामासाठी तुमच्या पाठीशी आहे. थोड्याफार श्रीमंत लोकांमुळे देशाचे भले होणार नाही. पण प्रामाणिक लोकांमुळे होणार आहे. पण सर्वात मोठी गोष्ट आपल्यावर कलंक हा आहे, की आपण बेईमान आहोत आणि सहजयोगी कधीही

बेईमान असत नाहीत यावर माझा विश्वास आहे. सगळी भांडणं सोडून आपण एकत्र झाले पाहिजे. आपण सर्व इमानी आहोत. आपला देश बदनाम आहे. म्हणून आजपासून कोणी बेईमानी करताना आढळले तर सर्वांनी मिळून त्याचा पाठलाग करा, त्याची झोप उडून जाईल. मला वाईट वाटते, की प्रत्येक गोष्टीमध्ये बेईमानी. अगोदर हे लहान लहान गोष्टीमध्ये आऊटकास्ट करत होते आणि आपल्याला वेगळे करत. पुर्वीपासून आपला देश इमानदार आहे. आपल्यामध्ये एवढे चांगले गुण होते, आपण का विसरलो आहोत ? कुठे गेले ते ? सगळीकडे मी पहाते नुसती बेईमानी. प्रत्येक पावला पावलावर बेईमानी. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले पाहिजे, की कधीही बेईमानी करायची नाही म्हणून. प्रामाणिक वागाल तर परमेश्वर तुम्हाला मदत करील. नाहीतर जगातले सर्व वाईट आजार तुम्हाला जडतील. आजकाल दारू पिणे ही फॅशन झाली आहे. आपण काय वेडे बनण्याकरता इथे आला आहात. जे कोणी करतात त्यांची मैत्री सोडा त्यांना मदत करू नका. मी पाहिले आहे, की जे कोणी दारू पितात अशांच्या घरी लोक जातात आणि ते देखील दारू ढोसतात. तर अशांच्या घरी जाणे बंद करा. आपल्या देशाचे आपल्यालाच भले करावयाचे आहे. आपल्या लक्षात आले, की एखादा माणूस बेईमान आहे तर त्याच्या घरी जाणे बंद करा, त्याच्याबरोबर खाणे बंद करा. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका. तुम्हाला परमेश्वराने प्रकाश दिला आहे, त्याकडे पहा. त्याची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही जरी असा विचार केला की ज्याने देशाशी गद्दारी केली त्याला परमेश्वर सोडणार नाही, तरी खूप झाले. पण तुम्ही बहिरे झालात, असा माणूस काही चांगले करत नाही. तुम्हाला काही समजत नाही. आजपासून प्रामाणिक वागण्याची प्रतिज्ञा करा, प्रामाणिक वागणाऱ्यांनाच साथ देण्याची प्रतिज्ञा करा. आपल्या देशात आणखी आत्मसाक्षात्कारी लोक जन्म घेतील. पण त्यासाठी सगळीकडे प्रामाणिकपणा हवा. तर आजचा माझा संदेश हा आहे, की आपल्या आत्मसाक्षात्काराच्या प्रकाशात त्याचा वापर करा. त्यापासून तुम्हाला शक्ती मिळेल. तुम्हाला जे काही करावेसे वाटते ते करा. पहा तुम्ही आपली स्वतंत्रता मिळविली आहे. ‘स्व’ ला ओळखले आहे. माझी अशी इच्छा आहे की इथे खूप मुले जन्मावीत, पार व्हावीत. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की खोटे बोलणार्यांना कधीही मदत करणार नाही! ना त्यांना घाबरणार ! परमेश्वर त्यांच्या पाठीशी नसून तुमच्या बरोबर आहे याची जाणीव ठेवा. एकमेकांबरोबर भांडत बसता, ते योग्य नाही. तुम्ही कशासाठी भांडता? महामूर्ख, काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला खायला चांगले आहे, प्यायला चांगले आहे, आणखी काय पाहिजे तुम्हाला? आजकाल असे भारी कपडे पाहिजेत, मोठे घर पाहिजे अशा प्रकारचे लोक शेवटी नरकाकडेच जाणार. आता जसे सुफी झाले, आपण पण सूफीच आहात. तुम्ही सर्वजण स्वच्छ झालात. आता तुम्ही प्रामाणिकपणावर कविता करा, खोटेपणा नष्ट करा. आपला भारत आज इतका गरीब राहिला नाही, की त्याला खोटे बोलण्याची आवश्यकता वाटावी. तरुणांनी आपल्या देशाचा हा कलंक पुसण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे प्रकाश आहे त्यामुळे तुम्हाला हिम्मत मिळेल. काहीही अशक्य नाही. यमुनेमध्ये कचरा टाकण्याच्या विषयापेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचा स्वत:च्या प्रामाणिकपणावरचा विश्वास उडणे. सत्यासाठी आज सर्वत्र दिवे लावले जातात. आज जगात सर्वात जास्त सहजयोगी भारतात आहेत. त्यानंतर रशियात आहेत. आता रशियन लोक फार प्रामाणिक वागतात. आपल्याकडे कम्युनिझम आले तर कदाचित आपणसुद्धा त्यांच्यासारखे प्रामाणिक होऊ. जबरदस्तीने करायला भाग पाडणे, ही काही फार मोठी गोष्ट नाही. आजच्या दिवशी आपण सर्वांनी निश्वय केला पाहिजे, की आजपासून आम्ही कधी वाईट वागणार नाही आणि दुसऱ्यांनादेखील वाईट वागू देणार नाही. त्यामुळे आपला देश खूपच समृद्ध होईल. ह्या वाईट लोकांमुळे आपल्या देशातील धर्म नष्ट होत चालला आहे. तेव्हा आजचा माझा संदेश म्हणजे आम्ही प्रामाणिक राहू आणि दुसऱ्यांना देखील प्रामाणिक रहावयास भाग पाडू.

इथले लोक हे करायला टाळतात, घाबरतात. आपण आत्मसाक्षात्कार मिळवला आहे तर घाबरायचे कारण काय? घाबरण्याची आवश्यकताच काय? माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, की हिंमत वाढवा. ‘स्व’ च्या तंत्राला जाणा, त्याचा वापर करा. या दिल्लीत यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते, एवढे लोक आज पहातेय. तेव्हा या वाईट वागणाऱ्या राक्षसाला नष्ट करण्याचा निश्वय करा. हिंदुस्थानातील लोक जमिनीसाठी एकमेकात भांडत बसतील. अरे आपले आहे ते ‘स्वराज्य’ आहे. ‘स्व’ चे राज्य, स्वराज्य. ज्यावेळी तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल त्यावेळी होईल. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. कोणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. दिल्लीत यापूर्वी मी कधीच एवढे लोक पाहिले नव्हते. तर आज या शुभ दिवशी निश्चय करा, की आम्ही कधीही बेईमानी करणार नाही. आमचा प्राण गेला तरी चालेल. मागील दहा वर्षात आपला देश फार खराब झाला आहे. इतक्या संख्येने तुम्ही सहजयोगी आहात. तुम्हाला कोणाला घाबरण्याचे काय कारण? कोणत्या गोष्टीला घाबरावयाचे? सर्वांच्या पाठीशी परमेश्वर आहे. सुफींच्या लक्षात आले, की परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांनी जगातील वाईट गोष्टी घालवून टाकल्या. मला वाटते, की आजपासून तुम्ही कधी कशाप्रकारची चोरी करू नका आणि कोणाला करण्यास मदत करू नका. या देशात आजकाल जातीपातीवरून भांडणे मोठी चालू असतात. आपल्याला आपला देश वाचवायचा आहे की बुडवायचा आहे? आपल्यावर आता खूप जबाबदारी आली आहे. या कलियुगाला बदलावयाचे आहे. हजारोंमध्ये तुम्ही पार झाला आहात. इतके लोक दुनियेत कोठेही पार झालेले नाहीत. म्हणून मी सारखे सारखे हेच म्हणते, की तुम्ही खरेपणाच्या पाठीशी रहा. मी स्वत: तुमच्या पाठीशी आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. आज हा निश्चय करा, की आम्ही कसलीच चोरी चालू देणार नाही, जिथे माहीत होईल, तिथे आम्ही भांडू. (आत्मसाक्षात्काराच्या) प्रकाशाचा वापर करा. हिंमत धरा. हिंमतीने काम करा. या देशातील ज्या वाईट गोष्टी आढळतील त्या नष्ट करा. प्रामाणिकपणा तुमच्यात नसेल, तर तुम्हाला परमेश्वर मदत करणार नाही. पैसे मिळवणे हे काम परमेश्वर मिळवणे नसून, धर्माने वागणे म्हणजे परमेश्वराला प्राप्त करणे आहे. एवढ्या संख्येने सहजयोगी दुनियेत कुठेही नाहीत. सहजयोगी कधी वाईट काम करीत नाहीत. मी यासाठी सांगते की इथले वातावरण खराब आहे. फार बदनाम झालेत लोक. आपल्याकडे सर्वकाही आहे. खायला, प्यायला कपडेलत्ते, सिनेमा पहा, पैसा आहे. पण पैसा कमवण्याचे व्यसन प्रथम गेले पाहिजे. मला खात्री आहे, की मी आज आपल्याला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल आणि आजपासून सर्वजण शपथ घ्या, की आजपासून आम्ही बेईमानी करणार नाही आणि बेईमानी करणाऱ्यांना विरोध करू. आपल्या देशाला आज सर्वात जास्त इमानदारीने वागणाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट नाही. आपल्या आईमध्ये प्रामाणिकपणा आहे. दहा शर्ट ऐवजी एक घेतला तर त्यामुळे काय बिघ्नडणार आहे? हे बायकांनादेखील सांगा. आजचे भाषण वेगळे आहे, निराळे आहे. तुम्हा सर्वांना आवडले हे फार चांगले झाले. सर्वांना धन्यवाद.