Dyan Ki Avashakta, On meditation (India)

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech

[Marathi translation from Hindi]

आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. […]

Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja

आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, […]

Puja (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! […]

Puja talk, How We Earn Our Punyas Pune (India)

Puja Talk at India Tour. Pune (India), 17 December 1988.
So now welcome to you all for this Puna place. In the Shastras is described as Punya Patana, meaning the city of Punyas. That’s the reason I wanted to stay in Puna, thinking that people are very auspicious and full of punyas, and I am sure I’ll find them very soon, all those who have come to this place will be there available for Sahaja Yoga. […]

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, […]

Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type

मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. […]

Puja Talk, God is Satchitanand (Marathi talk not on the video) Ganapatipule (India)

Puja Talk, India Tour. Ganapatipule (India), 6 January 1988.
It is said that God is Satchitanand. He is truth, He is attention and He is joy. In Sahaja Yoga, first you have discovered the truth. Discover the truth on your fingertips. The truth that you can discover on your central nervous system is the truth. First you discover the truth and you can tell about it, talk about, explain about it but you cannot give it to others unless and until the other person gets Realization. […]

We should have patience, sweetness and genuineness, Evening Program Ganapatipule (India)

Talk to yogis, India Tour. Ganapatipule (India), 3 January 1988.

I hope you are all very comfortable now and that you are enjoying the food as well. [Applause]

Also we are approaching the fag end of our tour. This tour was arranged, as you know, like a journey through your Sushumna Nadi at different, different points different, different Chakras. In the same way we have passed through various places and now we have reached Ganapatipule where we have to get our Sahasrara fully drenched with blessings of Shri Ganesh. […]

A Sinless Life Ganapatipule (India)

Talk on New Year’s Day, Ganapatipule (India), 1 January 1988.
Happy New Year to you all!
May God bless you this year with all His divine powers. May all the choicest flowers of joy and happiness be showered upon you. May God give you wisdom to become great Sahaja Yogis, so that a new world can be created beautifully out of you.
Very happy to meet you all today here. First day, I am sure there must have been lots of inconveniences. […]

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type

आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. […]

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja

हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. […]

Puja, Complete Your Realization (India)

Puja in Aurangabad (India), 19 December 1987.
English Part
I’m sorry I was dealing with some newspaper people, journalists, and they came very late, whatever it is. I found them to be very sensible and very understanding.
All of us have come to Aurangabad, and it seems this place is full of vibrations. Maybe here Shalivahana has ruled in this area, but also there have been many saints who were born on this side of Maharashtra, […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi

आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, […]

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type

श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. […]

Christmas Eve Puja Pune (India)

1985-12-24 India Tour 1985/86: Christmas Eve Puja – with Music and Bhajans, Pune
Sahaja Yogi: May we wish You, [Mother,] a Happy Christmas. For all the existent [unclear].
Shri Mataji: Same to you all. Happy Christmas and very happy New Year. Please be seated. Please be seated. [Mother speaks in Marathi.]
Today it’s a great day for Me to celebrate the Christmas Eve in Poona. Poona is called as Punya Patanam in our ancient books. That means this is the place which is very holy, […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979.

[Translation from Hindi to Marathi]

‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type

आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत , त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या या पुण्यभूमीत, जेथे अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे तेंव्हा श्री गणेशाचे महात्म्य काय आहे, या श्री अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वरगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. […]

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra 

[ 1 ]

ही पुण्यभूमी आहे.

राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, […]

Puja Pune (India)

Sahajyogyanshi Hitguj Date 26th February 1979 : Place Pune Seminar & Meeting Type

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. […]

Sahajayogyanshi Hitguj Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, […]

Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe Pune (India)

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९

पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. […]

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९

अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. […]

Seminar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९

अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. […]

Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi

लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . […]

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976.

सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, […]

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi

हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. […]

Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

Talk

भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. […]