Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja

[Original Marathi transcript talk]

मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? […]

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja

[Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari]

मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, […]

New Year Puja, You All Have to Become Masters in Sahaja Yoga (India)

New Year Puja 31st December 2000 Date: Place Kalwe : Type Puja

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

बुद्धिवादाला काही अंत नाही. समजून घ्यायचे नाही, ऐकायचे नाही त्यातून ते कसे सगळीकड़े आत्मसात होणार? बुद्धिवादाचे पेवच फुटले आहे पुस्तकावर पुस्तके लिहितात, पण त्यांना काय अनुभव आहे ? तुम्ही लोकांनी ठासून सांगायला हवे ‘आम्हाला हे पदत नाही. सर्व फालतूच्या गोष्टी. प्रत्येकावर टीका करायची, रामावर कृष्णावर टीका करायची संतावर टीका करायची. ही काय श्रद्धा आहे? ज्याना स्वतःवरच श्रद्धा नाही ते कसे सहजयोगात येणार? […]

Public Program Pune (India)

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type

सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. […]

New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi

त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. […]

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi

नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. […]

Mahashivaratri Puja Mumbai (India)

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi

आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, […]

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja

मी ह्यांना सांगत होते की आज आपण श्री गणेशाची पूजा करूयात. श्री गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच ऐकले नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. […]

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. […]

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type

सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. […]

Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)

भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९०

सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. […]

Public Program, Bhartatil Bhrashtachar (India)

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type

त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ […]

Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

असं आपण म्हणतो की परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. लहानपणापासून आपण असं म्हणतो नी त्याची भक्ति करतो. पुजा ही करतो पण तो किती शक्तिमान आहे याची आपल्याला किंचितही यत्किंचीतही, जरी कल्पना आली, तरी आपल्याला कधीही, कुठल्याही गोष्टीचे भय वाटणार नाही. हे सारं विश्व तो एका बोटावर फिरवतो आहे. अशा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सम्ताज्यांत आपण उतरल्यावर कोण आतां आपल्याला श्रास देऊं शकणार आहे ? […]

Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne (India)

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. […]

Puja Pune (India)

Puja Date 3rd December 1990: Place Pune

[Original transcript Marathi talk, scanned from Chaitanya Lahari]

काल मी आपल्याला सांगितलंच आहे की, आपल्याला अध्यात्माची एवंढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला हुवीं. आपल्याला आपलीच कदर नाही तिथे अध्यात्माची कार्य असणार ! भारतातला, त्यांतला त्यांत महाराष्ट्रतला प्रत्येक मनुष्य परमेश्वराच्या अत्यंत प्रमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला फार आस आहे, आपण जर खेंडयांत राहातो तर आपल्याला वाटत मी काय क: पदार्थ आहे. आपला उपयोग फार होणार आहे, […]

Public Program (India)

पब्लिक प्रोग्राम

ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९

           या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.

            कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, […]

Puja Talk, In 10 years we can change the whole world (and Talk about the science) (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type

आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. […]

Public Program Pune (India)

2nd Public Program 27th December 1989 Date: Place Pune Public Program Type

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्य कार्य आहे? सत्य एक अशी शक्ति आहे जिला परमचेतन्य असे म्हणतात. डी परमर्शक्ति सर्व जिवंत कार्य करीत असते – सृष्टीमध्ये नाना प्रकारचे चमत्कार रोज दिसतात. पण सगळ्यांत मोठा चमत्कार परमेश्वराने केलाय, तो म्हणजे, मानव- या मानवामध्ये त्याने जी व्यवस्था करून ठेवलीय ती ল। अन्युत्तम आहे असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्या उत्कांतीमध्ये जे जे टप्पे आपण गांठले सर्वात प्रथम मुलाधार – […]

Public Program Day 1 Pune (India)

Sarvajanik Karyakram Date 26th December 1989: Place Pune Public Program Type

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याला शोधणा-या सर्व साधकांना आमचा नमस्कार सत्य काय, आणि असत्य का्य है सुध्दा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहीजे ज्यांना आत्मसाक्षात्कार आला नाही, त्यांच्याबद्दल कबिराने म्हटलं आहे, “कैसे समझावूं, सब जग अंधा।” आत्मसाक्षात्काराशिवाय ती सूक्ष्मदृष्टी येत नाही, ज्यांने चराचरांत पसरलेली ही परमेश्वरीशवित आपण जाणू शकती कोणीही उठाव, आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालच चे प्रकार आहेत, यण है अशा्त्रीय आहे . […]

Mataji’s Updesh (India)

सहजयोग्यांना केलेला उपदेश नागपूर, ५ मार्च १९८९

आईच्या गावाचं एक विशेष स्थान आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहेत ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशीरा सुरु झाले. […]

Puja (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! […]

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, […]

Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type

मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. […]

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type

आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. […]

Christmas Puja, Reach Completion of Your Realization Pune (India)

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja

आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. […]

Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi)
१९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर)
पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. […]

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja

हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi

आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, […]

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja

आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type

सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं तयार करायची असली तर त्यासाठी एक मशिन असलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल पुष्कळशा लोकांना अजून काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. […]

Puja by the Krishna’s river (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja

आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, […]

Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja

आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, […]

Welcome Puja at Chalmala (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja

सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. […]

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986.

मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, […]

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi)

मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja

आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकीकडून वाढतो आणि एकीकडून आयुष्य कमी होते, पण सहजयोगाचे उलटे आहे. वाढदिवस आला, तर असं समजायचं की आपल्या आत्मिक वृक्षाची एक आणखीन वाढ झालेली आहे. आपला आत्मिक वृक्ष वाढत चालला आहे. जरी आयुष्य कमी होत चाललं तरीसुद्धा आत्म्याचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणि प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलोकित करून टाकतात. […]

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja

या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, […]

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type

श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type

आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, […]

Public Program Ganapatipule (India)

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type

गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, […]

Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja

आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, […]

Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune Type Puja

इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं , त्याला काहीतरी प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक की पुण्याला लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पूण्यनगरीत कारणं आहेत, पण मुख्य म्हणजे मला वाटतं की तुम्हा वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, […]

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई

आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja 3rd February 1985 Date : Warnali Place Type Puja

आता मराठीत काय सांगायचे, की ह्या इतक्या सुरम्य स्थानी तुम्ही आलात आणि इथे जगताप साहेबांनी आपली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी पूरे पडणार नाहीत. इतकं प्रेमाने सगळ्यांना दिले आणि केले. त्याबद्दल हे सगळे सहजयोगी इतके आश्चर्यचकित झाले, की आपल्या देशात असा असेल तर किती होऊ शकेल! एवढे प्रेमाने वागून, सगळ्यांची प्रेमाने व्यवस्था करणे हे फार जर एकतरी मनुष्य मोठे काम आहे. […]

Public Program, Rudhigat hone hi tamasik pravrutti ahe Nashik (India)

Rudhigat Hone Hi Tamasik Pravrutti Aahe Date 18th January 1985: Place Nasik Public Program Type

सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार असो! नाशिकला आजपर्यंत अनेकदा येणे झालेले आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतके अंतर आलेले आहे, की हे क्षेत्रस्थळच आहे की काय आहे? अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे श्रीरामचंद्रांनी पायसुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चुणूक आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशिकमध्ये एवढी का कमी आहे, […]

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja

आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, मला अशी मेहनत पडली किंवा मला त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. […]

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. […]

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! […]

Public Program in Shri Ram Temple (India)

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984.

फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की ‘बाबा, […]