Public Program Pune (India)

Public Program, Pune, India 7th March 2000

हिंदी भाषण

आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. […]

Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230)
[Shri Mataji speaks English]
आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. […]

Shri Lakshmi Puja (India)

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१
(श्री माताजींचे स्वागत गीत)
माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले ||
आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |
माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले ||
आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है ||
(श्री माताजींचा जयजयकार)
श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. […]

Press Conference Kolhapur (India)

Press Conference, Kolhapur, India, 20-12-1990

काळापासून आपल्या देशामध्ये कुंडलिनी शक्ती आहे . असे वर्णन केले आहे.  आता किती अनादी पुस्तकात आहे ते मी तुम्हाला सांगते.  चाप्टर लिहून घ्या. कारण जे काय असते. संस्कृत वाचलेले नाही. त्याच्यामुळे माहिती नाही.  पान 427 आता हे पुस्तक घ्या. पुष्कळ आहे. हंस उपदेश  आता योग तुरा मनी, हे आधी शंकराचार्य यांनी  लिहले ते बघू या. योग तुरा मणी,  लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा आहे. त्यात एक शर्मा म्हणून धर्ममार्तंड आहेत. […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja

आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. […]

Public Program (India)

Public Program Sangli,6th January 1986

सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन  सहजयोगाबद्दल  लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की  ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . […]

Public Program (India)

Public Program,Vaitarna,India,16th January 1985

की ह्यात काहीतरी विशेष आहे. आपण जाणून घेतलं पाहिजे की ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली.  यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतले पाहिजे. असा थोडासा आपण समजुतदारपणा ठेवला पाहिजे. <Pause >  कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थिती मुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल. पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा  देशातली  मंडळी इथे का येतात असा आपण एकदा जर  मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला  […]

Public Program in Sadoli (India)

Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984.

(Dots indicate that the content is unclear)

सहजयोगी १ :  

साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत.  नवीन पर्व आले.  नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये,  भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी.  फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले.  विश्वामित्रासारखा,  राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा,  […]

Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984

ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, […]

Public Program (India)

Public Program in Anjaneri, the birthplace of Shri Hanuman (Marathi). Maharashtra (India). 19 February 1984.

श्री हनुमानांनी मिळवलं होतं, जसं अंजनी देवी नं मिळवलं होतं. त्या अंजनी देवी सारखं, हनुमानासारखं, जर आपण आपल्या हृदया मध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्म साक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणाताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व, दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं.

आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजुन झोपलेली आहेत, ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्या शिवाय, […]

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India

या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. […]

Public Program (India)

Public Program, Ahmadnagar, India 22nd January 1984

राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही  वाटत  कारण  सगळी  माझीच  मुलं  आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं  की , ह्या मनुष्याला  खरोखर  लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा  नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं  नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण  बहुतेक लोक समाजकार्यासाठी  एवढ्यासाठी करतात  की  आपण राजकारणात येऊन पैशे  कमवू . […]

Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra.

माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  […]

Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe Dhule (India)

Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983

  नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. […]

Public Program Kolhapur (India)

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi

कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. […]

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982.

आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी

आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, […]

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript)

आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका , 

सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.   

ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ).

नारळ वगैरे  फोडा इथे.

सहजी :  हो. फोडतो ना.

श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. […]

Puja, Be Thankful To God (India)

Be Thankful to God; Count Your Blessings
27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India

.आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, […]

Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982

महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, […]

Public Program Pune (India)

1980-01-11 Program at Akurdi, Pune

आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका.  हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं  मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे  सुसज्ज  केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type

आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. […]

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra 

[ 1 ]

ही पुण्यभूमी आहे.

राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, […]

Sahajayogyanshi Hitguj Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, […]

Seminar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९

अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. […]

Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi

लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . […]

Sahaja Yoga is a big blessing (India)

Sahajayogacha Upyog Saglyani Karun Ghyava ICI 25th March 1977 Date : Place Kalwe Public Program Type Speech Language Marathi

यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे, की मी आज आपल्याला सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. असे योगायोग जुने असतात. जन्मजन्मांतरातले असतात ते. आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहीत नाहीत. पण हे पूर्वजन्माचेच योगायोग आहेत. आणि त्यामुळेच आज परत, या जन्मातसुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा, […]

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976.

सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, […]