Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996.

कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. […]

Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230)
[Shri Mataji speaks English]
आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi

आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, […]

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type

सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं तयार करायची असली तर त्यासाठी एक मशिन असलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल पुष्कळशा लोकांना अजून काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type

आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja 3rd February 1985 Date : Warnali Place Type Puja

आता मराठीत काय सांगायचे, की ह्या इतक्या सुरम्य स्थानी तुम्ही आलात आणि इथे जगताप साहेबांनी आपली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी पूरे पडणार नाहीत. इतकं प्रेमाने सगळ्यांना दिले आणि केले. त्याबद्दल हे सगळे सहजयोगी इतके आश्चर्यचकित झाले, की आपल्या देशात असा असेल तर किती होऊ शकेल! एवढे प्रेमाने वागून, सगळ्यांची प्रेमाने व्यवस्था करणे हे फार जर एकतरी मनुष्य मोठे काम आहे. […]