Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996.

कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. […]

Mahashivaratri Puja Mumbai (India)

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi

आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja

आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकीकडून वाढतो आणि एकीकडून आयुष्य कमी होते, पण सहजयोगाचे उलटे आहे. वाढदिवस आला, तर असं समजायचं की आपल्या आत्मिक वृक्षाची एक आणखीन वाढ झालेली आहे. आपला आत्मिक वृक्ष वाढत चालला आहे. जरी आयुष्य कमी होत चाललं तरीसुद्धा आत्म्याचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणि प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलोकित करून टाकतात. […]

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई

आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, […]

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja

आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, मला अशी मेहनत पडली किंवा मला त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. […]

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. […]

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984.

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979.

[Translation from Hindi to Marathi]

‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type

आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत , त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या या पुण्यभूमीत, जेथे अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे तेंव्हा श्री गणेशाचे महात्म्य काय आहे, या श्री अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वरगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. […]

Advice at Bharatiya Vidya Bhavan Mumbai (India)

Advice at Bharatiya Vidya Bhavan (Question and Answers). Bombay (India), 22 March 1977.

Yeh light isliye di hai ki aap doosron ko prakash den. Agar aap iska prakash doosron ko nahi doge to dhire dhire ye prakash khatam ho jaata hai. Is prakash ko aapko aise marg pe rakhna chahiye jahan log andhere mein bhatak rahe hain na ki is prakash ko table ke neeche le ja ke rakhna chahiye jahan woh bujh jaaye khud. Aap log wahan aayiye aapko koi taqleef hoyegi, […]

Sahajayogyanmadhe Dharma Stapna Aur Sahajayog, Dharma has to be established Within Mumbai (India)

Sahajyogyan Madhe Dharma Sthapna Zali Pahije 18th December 1976 Place Mumbai Seminar & Meeting Type

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितले की मी गणपतीसारखं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ही विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात . अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे, फारच हळुवारपणे सांभाळून, […]

Sahajyog Sagalyana Samgra Karto Mumbai (India)

Sahajyog Sagalyana Samgra Karto 29th May 1976 Date : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला मी पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो. मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार. तुम्ही करू नका. ते तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्या कडून काही नको. […]

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976.

सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, […]

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi

हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. […]

Seminar Mumbai (India)

1975-01-23 Seminar Mumbai, (Hindi)

Hindi- Till 17:50Marathi – 17:51 to 21:00Hindi – 21:01 to 27:17Marathi – 27:18 to 54:37Hindi – 54:39 to 55:17Marathi: 55:19 to 56:00

जैसे कोई माली बाग़ लगा देता है और उसको प्रेम से सिंचन करता है और उसके बाद देखते रहता है कि देखे बाग़ में कितने फूल खिल रहे हैं | वो देखने पर जो आनंद उस माली को आता है उसका क्या वर्णन हो सकता है| कृष्ण नाम का अर्थ होता है कृषि से, […]

Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

Talk

भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. […]

Teen Shaktiya (Marathi audio missing) Mumbai (India)

Teen Shaktiya

[Marathi Transcript – audio missing]

ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. […]