Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Sankranti Puja (English/Marathi). Rahuri, Maharashtra (India), 14 January 1986. English Part: Today is a sad day for Me because we’ll be now parting. I may not be able to meet you in Bombay. Maybe for a year this may not happen for some of you, and I would like to give you a little advice about the growth within yourself. It is believed by people that God is helping us and we are in His kingdom. So whatever happens He looks after us. It is true but as you are the instrument of the God you have to also look after yourself. For today’s delay I would like to apologize but the delay comes because from Poona Mr. Kulkarni was to come and see us do this puja. Now I told him that his wife is a negative lady, and he doesn’t understand his own importance, I would say. As a leader you must understand your importance. And another person who came, he asked, “Why don’t you come with me?” He said, “I have to come with my wife.” And that’s how this delay has taken place because he’s not here. He said he’ll come for puja so the main thing was first to arrive here in time without a negative force pulling him. So we conclude that it is important that first of all we should know that in any way we should not try to have any negative forces attacking us or involving us or attaching to us. Read More …

Public Program Rahuri (India)

श्री पंडित राव जाधव ,गौतम पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक ,उपसंचालक तसेच शिक्षक वृंद , फॅक्टीरीतले माननीय डिरेक्टर्स तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक ,सहजयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत ते पण . सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृन्द . इतकी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे प्रेमाची कि काय बोलावं ते च समजत नाही . प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते . पण नुसतं इतकं हृदय भरून येतंय कि त्यांना शब्दात घालून कस सांगायचं ते मला समजत नाही . हि अबोध ,निष्पाप मूल इथं बसलेली आहेत हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे . आपल्या देशांनी हजारो वर्षांपासून तपस्या केलेली आहे . आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संतसाधु ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले त्यांनी आशीर्वाद दिला . लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे . आता आपला देश प्रगतीपर होत आहे . आपण प्रगतीकडे वाढत आहोत . हि फार मोठी गोष्ट आहे कि देश जो कि ३०० वर्ष गुलामीत खितपत पडला होता तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी आज वाढत आहे .  ह्या वेळी मला शिवाजी महाराजांची आठवण येते , त्यांनी सांगितलं होत कि स्व च तंत्र ओळखलं पाहिजे . स्वतंत्र व्हा . तसच ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे जेव्हा त्यांनी पसायदानातून परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषोनि दयावे पसायदान . पसायदान म्हणजे काय ?त्यांनी सांगितलं कि सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान . त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता “विश्व स्वधर्म सूर्य पाहो “, स्वधर्म सूर्य पाहो ,स्व म्हणजे आत्मा त्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो असं एक सुंदर भाकीत Read More …

Public Program – Sugarcane Factory Rahuri (India)

कोळपेवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तशी इतर कारभारी मंडळी ,इथे काम करणारी सर्व मंडळी तसेच कोळपे वाडीत राहणारी सर्व अबालवृद्ध मंडळी ,सर्वाना आमचा नमस्कार . आजच्या या शुभ दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे . आकाशामध्ये बघितलं तर सूर्य नसताना सुध्दा चंद्राची झाक अत्यंत सुंदर आहे . आणि त्या चंद्राबरोबर आज एक विशेष योग मी बघितला तो फार कमी असतो . तो म्हणजे शुक्र आणि मंगळ . चंद्रमा आपल्या योगशास्त्रात मानलेला आहे आणि म्हणूनच तो शंकराच्या डोक्यावर बसलेला आहे . छान असा तो चंद्र आणि शुक्र हि देवता आहे जी प्रेमाची शक्ती आहे . देवाच्या प्रेमाची शक्ती हि शुक्र आहे आणि मंगळ हे श्री गणेश ,अशी आज हि त्रिविध युती झालेली आहे . हे काहीतरी कोळपेवाडी हि विशेष जागा असल्या शिवाय होणार नाही .  तेव्हा ह्या भारतात तुम्ही जन्माला आलात हेच फार मोठं सुकृताचं लक्षण आहे . असं सर्व शास्त्रात लिहिलं आहे आणि पाश्चिमात्य देशात सुध्दा लोक मानतात कि भारतवासी म्हणजे काहीतरी विशेष लोक आहेत . आज आपल्याला सांगितलं कि माझे यजमान लंडनला फार मोठ्या पदावर नोकरीला आहेत . आणि जरी तुम्ही मला संत म्हणता पण मी एक गृहस्थातील बाई  आहे . आणि मी गृहस्थाश्रमातच सहजयोग थाटलेला आहे . त्यांच्या हुद्याला धरून मला पुष्कळ ठिकाणी जावं लागत . तेव्हा तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांना भेटण्याचा खूप वेळा योग आला . तेव्हा त्या मला एकदा म्हण्याला कि तुमच्या देशामध्ये लोकांमध्ये असं काय आहे किज्याच्या मुळे  इतकं स्थैर्य त्यांच्या मध्ये आहे . स्थैर्य कुठून आलं आहे . आत्म्याचं बळ असल्याशिवाय इतकं स्थैर्य लोकांमध्ये येऊ शकत नाही . आमच्या लोकांमध्ये हे स्थैर्य नाही . आणि हि गोष्ट खरी आहे . Read More …

Devi Puja: On Leadership (Morning) Rahuri (India)

Talk about leadership, Rahuri, Maharashtra, India, 22nd January 1985. (English/Marathi) English Transcript …and this is the place where my forefathers reigned as kings, and they had a dynasty also. Now, the other place we went to, Musolwadi, is the place where the Goddess first of all hit him with a beam, so it is called as Musolwadi. It means a beam, ‘musol’ means a ‘beam’. So this is a place where [the] Goddess has done a lot of work. There is another place called Aradgao where he was running and he was screaming, so it’s called as arad. ‘Arad’ means ‘screaming’ (‘gao’ means village). So the whole place is already very much vibrated because also the Nathas, the nine Nathas — we saw one Ganifnath there — but all of them lived in this area and worked very hard. The last of all, Sainath, was very near here, as you know, in Shirdi. So this is a very, very holy place and a place of great worship where many a times the Goddess was worshipped. Rahuri itself, if you go round, you find there are nine deities sitting there. These are also created by Mother Earth. They are beautiful things. No one knows about them. You can go and have a look. There are nine of them and these represent the nine incarnations of the Goddess, or nine styles of the Goddess. Now, in this beautiful place we are here, though it is spoiled by many things, but, as you Read More …

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले Read More …

Public Program – Rahuri School Rahuri (India)

फत्तेबादच्या या एज्युकेशन सोसायटी चे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटत मला .कारण पूर्वी हि मी फत्तेबदला आले होते आणि या ठिकाणी परत एकदा प्रोग्रॅम झाला तर बरा  अशी  माझी फार इच्छा होती .आणि त्या इच्छे प्रमाणे आज हे घडून आलं .त्या बद्दल या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यानं चे मी फार आभार मानते .तसेच इथले शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि विध्यर्थी आणि फत्तेबाद शहरातील भाविक ,सात्विक अशी मंडळी या सर्वाना आमचा नमस्कार .आपल्या समोर सहजयोग म्हणजे काय आता व्यवस्तीत रूपाने चव्हाण साहेबानी मांडलेलं आहे . रस्त्याने चालताना कुणाशी बोलत नाही जस काही कुणी घरात मेल आहे ,सुतक पाळतात असेच ते वागत होते .तर त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतंय ,तुम्ही दुःखी  का .तर ते म्हणतात आम्ही एव्हडी धावपल केली सगळं काही मिळवलं पण आमची चूक झाली नसेल ना काही  .तुकाराम बुवांनी कोणती चूक केली नाह ज्ञेनेश्वरांनी   कोणती चूक केली नाही आणि ते आनंदात होते म्हणजे त्यांच्या त काहीतरी आपल्या पेक्षा विशेष होत .हे लक्षात आणलं पाहिजे .आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले .संत साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि रामाला सुद्धा आपल्या पायातल्या वहाणा काढून अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्या साठी म्हणून हे लोक आले पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही .आपल्याला त्याची माहिती नाही .त्याला कारण असे आहे कि हि जी मंडळी येत आहेत त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ;आणि जे मिळालाय त्यामुळे त्यांना समजत कि हि भूमी काय विशेष आहे .तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार भेटेल .नामदेवांनी सांगितलं आहे फार सुंदर  कि आकाशात पतंग उडते आणि मुलगा हातात पतंग उडवत आहे पण जरी Read More …

Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …

Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …

Shivaji School, Vishesh goshti sathi vel aali aahe Rahuri (India)

Vishesh Goshti Sathi Vel Aali Aahe 3rd February 1982 Date : Place Rahuri Public Program [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दर आहे जितकी तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर दूर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रियात आहेत, दु:खात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती तऱ्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …

Talk Rahuri (India)

Talk तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . Read More …

Public Program Rahuri (India)

Public Program At Agricultural University ICU 1st February 1982 Date: Place Rahuri Public Program Type मराठी माणसाला अजून स्वत:बद्दल विशेष जाणीव नाही. विशेष करून तरूण मंडळींना सांगायचे आहे मला. परवा एका भाषणात एक गृहस्थ मला म्हणाले की आपल्या तरूण मंडळींची अगदी अधोगती होते आहे माताजी आणि त्याबद्दल तुमचे काय कार्य चालले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हे लोक उद्या वाया जाणार. दारू पिऊन, अगदी वाट्टेल तसे वागून सगळ्यांची नाचक्की करणार आहेत. यांना कोणाही बद्दल आता श्रद्धा वाटत नाही, कुणाचाही मानपान ठेवत नाही, सगळ्यांची थट्टा करतात आणि अगदी त्यांचे जीवन एखाद्या मूर्खासारखे झाले आहे. मी म्हंटले, ‘इतके काही वाईट नाही आहे हो . असं सगळच म्हणू नका तुम्ही. काही लोक आहेत तसे. आणि सगळ काही इतके बिघडलेले नाही आणि बिघडू शकत नाही.’ कारण अनंत शक्त्या या आपल्या भारत भूमीला आशीर्वादीत करताहेत. या तुमच्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी नावाची शक्ती आहे. पण ही कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे एवढच आहे. पण तिचे परिणाम मात्र आपल्या चरित्रावर, आपल्या संस्कृतीवर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले ज्यांचे वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर एक असे झाले तरी आपल्याला माहिती आहेत की कितीतरी संत साधू वारंवार म्हणजे तुम्ही दत्तात्रयांच्या वेळेपासून पाहिले तर आदिनाथ सुद्धा – त्यांच्या आधी पासून आदिनाथ-दत्तात्रयांचे जे अवतरण होते सुरूवातीचे आदिनाथांचे, ते सुद्धा या महाराष्ट्रात झाले. इतकच नव्हे तर जे मोठे मोठे संत-साधू झाले त्यांनी नेहमी महाराष्ट्राला भेट दिली. जे बाहेर होते, गुरूनानक होते ते इकडे आले किंवा जे जे असे- वल्लभाचार्य होते फार मोठे ते महाराष्ट्रात येऊन गेले. इतकेच नव्हे तर श्री राम आणि श्री सीता या पुनीत भूमीवर फिरलेले आहेत. त्यांचे Read More …

The Meaning Of Nirmala Rahuri (India)

  The Meaning Of Nirmala, 1980-01-18 आपण अशे भेटलो म्हणजे आपापल्या हितगुजाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याबद्दल जे काही बारीक-सारीक असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो एकमेकांना, कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे कारण आपल्या आईचं नावंच मुळी निर्मला आहे. आणि या नावामध्ये पुष्कळ शक्त्या आहेत. पहिला शब्द ‘नि’ आहे. ‘नि’ म्हणजे नाही, नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. तुम्ही जे नाही आहे वास्तविक, पण आहे असं भासतं, त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे म्हणून, पण हे काही नाहीच. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो, की असं वाटतं की हेच आहे, हेच आहे व्यर्थ आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे. सगळं वाईट दिसतं. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वर वरच्या थरावर जे पाणी असतं, ते अत्यंत गढूळ, घाणेरडं, त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात; पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की, इतकं सौंदर्य त्याच्यात, एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काही बाह्यातलं आहे हे सगळं भ्रम आहे. हे नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. ‘नि’ शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली, हे नाही, हे नाहीय इथून सुरुवात करायची. ‘नेति नेति वचने निर्मोही (अस्पष्ट) हे नाही, हा विचार नाही, हा विचार नाही. परत हा विचार नाहीय असं म्हणत गेलं पाहिजे. ‘निः’ शब्द जो आहे तो विसर्गासहित ‘निः’ आहे त्याचा अर्थ लागतो, तर कायतरी दुसरं आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही, तर काहीतरी त्याच्या Read More …

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra  [ 1 ] ही पुण्यभूमी आहे. राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, सह म्हणजे आपल्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. [ 2 ]   असे हात करून बसा, कुंडलिनी जागृत व्हायची तर असे हात करून बसा साधे, टोप्या जरा काढा, काळे कारगोते असतील तर काढून घ्या, म्हणजे बरोबरच होईल ते काळे. काही गळ्यात माळाबीळा असतील तर काढून ठेवलेल्या बऱ्या, कारण त्याने रुकते, कुंडलिनी तिथे थांबते.  आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही संस्था आहे असं अनादी काळापासून लोकांनी सांगितलेलं आहे. विशेष करून आदिशंकराचार्यानी, मार्केंडेयस्वामींनी त्याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. त्यानंतर कबीर, नानक यांनीसुद्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेल आहे. ही तुमची आई आहे आणि आई हे फार पवित्र स्थान आहे. आता फ्रॉईड सारख्या घाणेरड्या माणसाने आपल्या आईशी घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी स्थिती काढलेली आहे. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालीये ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य वाटत कि ह्या राक्षसांनी, हिटलरनी तर नुसता लोकांचा शिरच्छेद केला पण याने सगळ्यांची ही कुंडलिनीच फिरवून टाकलेली आहे कारण कुंडलिनी ही आई आहे आणि ती पवित्र आई आहे. आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना सहजयोग लाभू शकत Read More …

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …

Public Program Rahuri (India)

1976-0314, Public Program,Rahuri  महात्मा फुले विद्यापीठाचे प्राध्यापक साहेब, प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहज योगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग यांना माझा नमस्कार. (टाळ्यांचा आवाज)सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य याचा मेळ कधीकधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालत आहे तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते कधीकधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असो आपल्यापुढे आज (अस्पष्ट) भाषण दिलंय (अस्पष्ट) एक तास, त्यानंतर एक तास चव्हाण साहेब बोलले असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच आहे मुळी किंवा वाद-विवाद करण्याचा सुद्धा नाहीय. तुम्ही एक साधी गोष्ट की आपण अमिबा पासून माणसं झालोत तर आपण कोणता वाद-विवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणचं शास्त्र त्यात घातलत, कोणचं आपण टेक्निक लावलत. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोहोचलोय म्हणतो तरीसुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्यांनी आपण जिवंत कार्य करू शकतो. आता आपण शेतकरी आहात आपण बघता की बी-बियाणं दिसायला जिवंत दिसत नाहीत पण पृथ्वीच्या पोटात घातल्या बरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडू लागते, घडतं, ते करू शकत नाही, आपण त्यासाठी जर समजा एखाद्या बी- बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का? ते जमेल का? त्याला अंकुर फुटेल? सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप त्याला इंग्लिश मध्ये स्पाँट्यानुएस्ली म्हणतात ते. त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान Read More …