Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …

Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi) १९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर) पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही. आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल. सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो Read More …

Public Program Sangamner (India)

परमेश्वराला  शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र  आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी  ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात  ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .   महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं Read More …

Public Program Sangamner (India)

संगमनेरचे सहजयोगी तसेच संगमनेरचे रहिवासी आणि आसपास च्या गावातून आलेल्या अशा सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार . मी आधीच म्हंटल आहे कि सत्यशोधक असायला पाहिजे . ज्यांना सत्य शोधायचं असत ते सत्य शोधल्या शिवाय चैन घेत नसतात . अनेक जन्म जन्मांतरातलं जे आपण पुण्य गाठलेल आहे ,सत्य शोधताना आपण ज्याज्या गोष्टी मान्य करत गेलात आज त्याच्याच पुण्य प्रतापाने आपला जन्म या आधुनिक काळा मध्ये या महान थोर योगभूमीत भारत भूमीत झालेला आहे . हि भारत माता योगभूमी आहे . योगभूमी म्हणजे इथे जन्मलेल्या मनुष्याला योग प्राप्त होऊ शकतो फार सहज . त्याला कारण या देशा  मध्ये अनेक संतसाधु झाले . कित्येक अवतरण झाली . विशेष करून महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे स्वतः रामचंद्र सुध्दा अनवाणी आणि साक्षात सीता देवी हि सुध्दा इथे अनवाणी चाललेली आहे . अशा या पुण्य भूमीत आपला जन्म झालेला आहे . आता येताना मी कोमलवाडी म्हणून गाव आहे तिथे बघायला गेले होते . फार भयंकर दुष्काळ ग्रस्त असे ते गाव आहे . जवळ पासची बरीच खेडी तशाच स्तिथीत आहेत . ओसाड पडलेली . तिथे मला कळलं कि कानिफनाथांची समाधी आहे . त्या समाधीची स्तिती बघून मला इतकं आश्चर्य वाटलं कि एव्हडा महान आत्मा या ठिकाणी स्तीत आहे आणि त्याच्या कडे कोणाचंच लक्ष नाही . कुणीतरी प्रश्न विचारला कि माताजी एव्हडे मोठे महात्मा इथे झाले मग ह्या लोकांची स्तिती अशी खराब का . तर मी असं सांगितलं कि ह्या साधुसंताना आम्ही लोकांनी फार छळलेल आहे ,त्यांना मुसलमान म्हंटल ,त्यांना मारलं . इतकं लोक म्हणतात कि त्यांना मारून नाही टाकलं . त्यांना खायला प्यायला सुध्दा पाणी दिल नाही . पण तसाच एखादा भामटा आला जेल मधून सुटून ,आणि त्यांनी जर ढोंग केलं आणि तो जर भगवे वस्त्र घालून आला कि लागले Read More …

Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984 ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे  चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना Read More …