Public Program Astagaon (India)

आजचा दिवस फार मोठा शुभा शिशाचा आहे . कारण आज आपल्याला माहित असेलच कि शाकंबरी देवीच्या नवरात्राचा पौर्णिमेचा दिवस आहे . म्हणजे आज शेवटची रात्र आहे . शाकंबरी देवी हि शेतकरी लोकांची देवी आहे . आणि तिचा प्रादुर्भाव मेरठ जिल्ह्यात झाला होता . त्या वेळी आमचे साहेब तिथे कलेक्टर होते मेरठ जिल्ह्यात तेव्हा मी तिथे पुष्कळ शेतीच काम केलं होत . आणि त्या शेतीत पुष्कळ चमत्कार घडले . आणि लोकांना आश्चर्य वाटलं कि इतक्या तर तऱ्हेच्या भाज्या आणि पीक एव्हड्या मोठ्या प्रमाणात पण एव्हड्या लहानशा जागेत कस आलं . असो . आजचा दिवस विशेष आशिर्वादाचाच आहे . कारण आजच्या दिवशी शाकंभरीदेवीने सर्व जगाला आशीर्वाद दिला होता . आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला होता . कि त्यांच्या हातून अशी पीक आणि अशी धान्य तशीच उत्तम भाजी ,फळे सगळी ह्या सगळ्या संसारात शेतकऱ्यांच्या हाती ,त्यांच्या करवी ,त्यांच्या मेहनतीने सर्व जगाला मिळूदे . ह्या त्यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करावासा वाटतो . त्यांच्याच आशीर्वादाने आपण लोक शेतकरी झालात . आणि जी काही सुजलाम सुफलाम आपली भूमी आहे तिचा फायदा यांनीच होतो .  आता हे परदेशी लोक इथे आले आहेत . आणि यांना महाराष्ट्रा विषयी फार आस्था आणि भक्ती आहे . त्याला कारण असे आहे कि महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे संतसाधु होऊन गेले . त्यांनी इथे आपलं रक्त ओतलं . आजच एका नवीन गुरूंची ओळख झाली त्यांचं नाव हैबती . खरोखरच ते आत्मसाक्षात्कारी असतील पण त्यांना दोनचार माणसंच जाणतात . पण ह्या लोकांची शुध्दबुध्दि आहे . त्यातून पैसे वैगेरे मिळवायचे याच त्याच्या मागे त्रांगड नाही आहे . सगळे श्रीमंतीत राहणारे लोक आहेत . त्यांना पैशाची कदर नाही आहे . परमेश्वराची कदर आहे . आणि ज्या महाराष्ट्रात एव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांची पुस्तक Read More …