Shri Bhoomi Devi Puja New Delhi (India)

Nirmal Dham Bhoomi Pujan Date 7th April 2000: Noida Place Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] करण्याचा माझा मानस होता. तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, आपल्या मुलांचे व्यवस्थित पालन-पोषण करता येईल, समजात त्यांना प्रतिष्ठा मिळेल अशी व्यवस्था व शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे. अर्थात एक संस्था सुरू सत्याच्या शोधात असणार्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. एवढ्या टूरवरच्या ठिकाणी आपण लोक या कार्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने याल असे मला चाटत नव्हते. पण तुम्हा सर्वांना इथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. एकदा आम्ही गाडीने प्रोग्रामसाठी जात असताना दौलताबादजवळ आमची गाडी नादुरुस्त झाली. म्हणून मी केली म्हणजे सर्व काही झाले असे नाही. कारण हा एक खाली उतरले. खरे तर हीहि एक ‘सहज चीच घटना म्हणायचे, खाली उतरल्यावर मला तिथे साधारण शंभर एक होण्यासाठी साया समाजाचेच परिवर्तन व्हायला हवे, महिला व त्यांच्याबरोबरची मुले एका नळावर पाणी भरत असल्याचे दिसले. त्यांच्या अवतारावरून त्यांची परिस्थिति घरातील स्त्री व मुलांबाळाचे बाबतीतील त्यांचे कर्तव्य पार हलाखीची असल्याचे माझ्या लक्षात आले. चौकशी केल्यावर मला समजले की त्या सर्व बायका घटरस्फोटित मुसलमान एरवी इथल्या स्त्रियांची हालत सुधारणे शक्य नाही. इथे होत्या व मुलांसह अत्यंत हालाखीत जगत होत्या व दगड फोडण्याचे दुष्काळी मजुरी-कामावर लागल्या होत्या. राहण्यासाठी पडकी कच्ची घरे होती. अंगावर धड कपड़े पूर्वी कदाचित सती जाणे त्या पसंत करीत असाव्यात. नव्हते. त्यांची सर्व दशा पाहिल्यावर मला रडूच आवरेना. माझ्या मनात आले की आपल्या देशाची पुरातन संस्कृति व स्त्रियांमध्ये चारित्र्याची पवित्रता असूनही लोकांची अशी (पति) तर ‘मी म्हणेन Read More …

Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja (Starts at 12:48) इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.       सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा Read More …