Easter Puja, Crucify Yourself (India)

Easter Puja – You Must Crucify Your Ego Date 14th April 1995: Place Kolkata Type Puja [Marathi translation from English] ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी नाही पण आपल्या सर्वासाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रिस्तनीतीचा संदेश आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते म्हणाले माझे नाव.”इसामशी” आणि पुढे म्हणाले “मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं ? आता हाच माझा देश” पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या लोकांना वाचवायला आणि त्यांना “परम निर्मल तत्त्व सांगायला सांगितले” मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी ‘क्षमे’ बद्दल खूप सुंदर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, ‘माता आली आहे पहा’. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही म्हणाले , “मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे.जे तुम्हाला आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं काय होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही म्हणाले की, ‘माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते झालं Read More …