Guru Nanak Birthday (India)

Anniversary of Guru Nanak Birthday, Noida House (India), November 1999. [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ‘नामघारी’ पाहिले. नानकसाहेब स्वतःला मुसलमानांचा पीर व हिंन्दूचे गुरू म्हणायचे. पण त्यांनी जे बीज पेरले त्याला आता अंकुर फुटणार आहे आणि तेच आपले काम आहे. महाराष्ट्रातही ज्ञानदेव फार मोठे संत होऊन गेले पण त्याच्यानंतरही लोकांची हीच तन्हा. लोकानी पंढरीची वारी करायची, टाळ कुटत, फाटक्या कपड्चानिशी महिना-महिना पायी पेढरपूरची यात्रा करायची, तुळशीच्या माळा गळ्चात घालायच्या एवढ्यातच धन्यता मानली. वर पुन्हा तोडात सतत तंबाखू! स्वतःला वारकरी समजून ज्ञानदेवांच्या पादुका त्यांचया पायात वपलासुद्धा नव्हत्या. पालखीत ठेऊन त्याची मिरवणूक कादत चालत वारी करण्या पलीकडे काही मिळवले नाही. पुन्हा पालखीच्या वाटेवरच्या गावातल्या लोकांकडून जेवण मागायचे, हे भीक मागण्यासारखे नाही आज गुरू नानक साहेबांचा जन्मदिवस सगळीकडे साजरा होत आहे; तरीही आपल्याकडे इतवया उत्साहांत तो जसा अवेली साजरा होत आहे तितका पूर्वी कधी मला दिसला नव्हता नानकसाहेबांनी नेहमी सहजयोगव सागितला आणि घर्माव्या नावाखाली उपास-तापास, तीर्थयात्रा, कर्मकाण्डांत गुतणे इ. सर्व प्रकार वरवरचे असल्याचे सांगून त्यावर ते टीका करत. हे करणे म्हणजे धर्माचे अवडंबर माजवणे असे ते म्हणत. आतमधील खर्या ‘मी’ चा शोध घेणे व त्यामध्ये स्थिरावणे हे त्यांच्या दूष्टीने महत्वाचे होते. पण त्यांच्या बोलण्याचा व त्यांच्या कविताबा खोलवरचा गर्भित अर्थ समजून घ्यायला हवा ना? त्याच्या ग्रंथ- साहेबांमध्ये त्यांनी अनेक थोर संताच्या कवितांनाही स्थान दिले व ल्यांचे अभंग वा कविता ग्रंथसाहेबामध्ये आदराने नमूद केल्या म्हणूनच ग्रंथ-साहिब’ हा ग्रंथ लोक पूजनीय मानतात. पण त्याच्या अर्थाच्या खोलात जाऊन मनन केले नाही व नुसते शाब्दिक पठण केले तर काय फायदा होणार? ते कबीरानी म्हटलेच आहे “पढि-पढि पंडित मूर्ख भये” तसाच तो प्रकार. Read More …

Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery Mumbai (India)

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972. Translation from Hindi to Marathi सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप Read More …