Shri Saraswati Puja (India)

Shri Saraswati Puja 3rd February 1992 Date : Place Kolkata Type Puja ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वत:च्या आईला आपण जाणू शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभूमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत जातो, हे मी पाहिले आहे. मला आश्चर्य वाटतं की, जिथे इतकी वर्षे मी घालवली, इतके कार्य केले, तेथील लोक इतके गहन नाहीत. इथल्यासारखी इतकी सुरेख सामूहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा, विशेष म्हणजे इथलं प्रेम आणि सामूहिकता ही पूर्णत: नि:स्वार्थी आहे, हे बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. महासरस्वतीची इथे उपासना होणे फार महत्त्वाचे आहे. ह्या भूमीला तिने आशीर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे, पण ही सरस्वतीची उपासना फार सीमित आहे. इथले कष्ट आणि दारिद्रय यांचे कारण हे आहे. आपल्या कलागुणांची वृद्धी करण्यासाठी किंवा विद्वान बनण्यासाठी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. इथले लोक फार हुशार आणि अभिमानी आहेत, पण तरीही दारिद्रय कां? तुमच्याहून जास्त पैसा असणाऱ्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले पाहिजे. सरस्वतीचे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानवर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वाढीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मूर्तिशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही, पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभराच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे आणि जे फार सुरेखरीत्या निर्माण केलेले आहे ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतीकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायब्रेशन्सचा Read More …