Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan New Delhi (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja

आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, […]

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi)

मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979.

[Translation from Hindi to Marathi]

‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type

आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. […]