
Public Program Pune (India)
Public Program, Pune, India 7th March 2000
हिंदी भाषण
आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. […]