Talk of the Evening Eve of Diwali (India)

Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007. [Marathi translation from Hindi talk] आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, भांडणे नाहीत; ते या सृष्टीवर दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी, वाईट लोकांना नष्ट करण्यासाठी अवतार घेतात. सर्व ठिकाणी होत आहे. मी पाहते आहे, की जे दुष्ट लोक आहेत ते उघडे पडत आहेत, आता सर्वत्र हे घडत आहे. आपल्या सर्वांचे काम हे आहे, की त्यांना बाजूला करा. जे दुष्ट आहेत, वाईट आहेत पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात असे सर्वजण नरकात जाणार. आम्हाला माहीत नाही की किती नरक आहेत. आता ज्या वातावरणात आपण बसला आहात, ज्या जागेवर बसला आहात, याचा नरकाशी काहीही संबंध नाही. पण आपण यात राहून अधर्मासारखे वागाल, चुकीचे काम कराल तर आपणसुद्धा नरकात जाल. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत आणि तिथपर्यत पोहचण्याची व्यवस्था देखील खूप चांगली ठेवली आहे. कारण त्यामुळे तिथे जाणाऱ्यांना माहीत नसते, की आपण कोठे चाललो आहोत. जे उरतात ते स्वर्गात जातात. या पृथ्वीवरील कोणाला माहीत नाही, की वाईट काम करणाच्या सर्वांना नरकात जावे लागते. दिवाळीचा अर्थच हा आहे, की आपण जसे बाहेर दिवे लावतो तसे आपल्या सर्वांच्यात देखील ते प्रज्वलित झाले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे, की या अंध:कारातील वातावरणात आपण सर्वजण प्रकाश आहात, दिवे आहात. आपल्याला प्रकाश पसरावयाचा Read More …

Diwali Puja, Shri Lakshmi and Money Sintra (Portugal)

Diwali Puja. Sintra, Lisbon (Portugal) – 2 November 1997. Today, we have gathered here to worship Shri Lakshmi. In Diwali, in India, they worship Lakshmi because a great rakshasa called Narakasura was killed; also that Lakshmi came out of the sea, at the same time, long time back. This is like Her different appearances on the same ??. Lakshmi is the Goddess which gives us wealth, gives us prosperity. She is very blissful, no doubt. She gives you protection and also She is very humble because She stands on the lotus. She is very light, [which] means She does not put Her pressure on anyone. These are symbols of Shri Lakshmi. But also She is a part of Mahamaya in the modern times only. When people get Lakshmi, the money, they don’t understand that She is their Mother firstly, and She is to be respected. When this kind of perverse idea of Shri Lakshmi comes in such countries, such people meet their last end and destruction of the worst type ever. So this Lakshmi has to be used with a big balance, like standing on a lotus and not get into the pond, where there are all kinds of creatures to eat you all. You have to stand on the lotus: that means that you are above all the lures of this maya. Also in Sanskrit languages, we call Lakshmi as the maya. If somebody gets lot of money, they will say, “You got a lot of maya!” Now, this Read More …

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986. मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! Read More …