Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …