Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं Read More …