Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही Read More …

Shri Hanumana Puja Pune (India)

Shri Hanumana puja. Pune (India), 31 March 1999. [Translation from Hindi to Marathi – Excerpt] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) सारांश (Excerpt) Scanned from Marathi Chaitanya Lahari हनुमानानी आपल्या अनेक कामगिरीमधून हेडि दाखवून दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्त्य होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा त्रास देण्याचे होते, अशा लोकाना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्यांच्यामधील हा शक्ति व भक्तीचा संगम पाहण्यासारखा आहे आज श्री हनुमान, बजरंगबली पूजेसाठी आपण इथे जमलो आहोत. सहजयोग्यांसाठी श्री हनुमान हे एक आदर्श आहेत. ते आपल्या पूर्ण उजव्या बाजूवर कार्य करत असतात. तेच तुम्हाला जरुर ते मार्गदर्शन करतात, सदैव विवेक देतात. मदत करतात आणि तुमच्या संरक्षणाची काळजी घेतात. तसेच तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते तुम्हाला गुरुविषयी समर्पणाची शक्ति देतात ते रावणाला फक्त अग्नीचे मय बादायचे हो त्याना साहीत होते श्रीरामांचे एकनिष्ठ सेवक होतेच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणून त्यांनी लंकेत जाऊन लंकादहन केले; ल्यामध्ये कुणालाही, अगदी रावणालाही शारीरिक इजा झाली नाही पश त्याच्या शक्तिपुढे सर्वजण भयभीत झाले. सर्व लोकांना रावणाव्या दुष्कृत्याबद्दल काही वाटत नव्हते त आता लकादहन पाहून धायरुन गेले, रावण हा महापापी राक्षस आहे है त्यांना समजून चुकले. यातून या बजरंगवलीजवळ केवड़ी समज व संतूलन होते हे लक्षात घेतले पाहिजे. शक्लिशाली माणसांनी असेच संयमी असले पाहिजे. शिवाजीमहाराजही असेच होते. असे संतुलन तुम्ही मिळवले सुटका करता आली असती; पण सीतेनेच त्याला सांगितले की तुम्ही खन्या अर्थाने सहजयोगी झालात असे मी “तू माझ्या मुलासारखा आहेस आणि पती म्हणून श्रीरामांनी म्हणेन; तुमच्याजवळ शक्ति आली याचा अर्थ हा नाही की रावणाला ठार Read More …

Makar Sankranti Puja (India)

Shri Surya puja. Kalwe (India), 14 January 1990. Today is the day for us to celebrate in India very much. Because the Sun is now in Capricorn and from Capricorn it then comes to Tropic of Cancer. When the Sun comes back to this Earth then all the creativity of mother earth starts acting and she creates such beautiful things like flowers, nice nourishing things and fulfilling things like fruits and she makes our eyes cool down with the greenery she has and the way she blesses us is manifold with the advent of the Sun. In the same way now that the Sun of Sahaj Yoga is rising and is coming to the zenith and it has definitely shown you the result on the first principal that is your Mooladhara and your creative power of that Mooladhara which is the Kundalini has been rising and rising and opening your being, and showing the results in your life. It has made your lives very beautiful. It has made your life very joyous and very happy. Now we are at a point where we have to trigger a new jump, a new flight. And for this flight we have to see that we become very light in our Ideas, thoughts and in our Conditionings. You are so much full of conditionings. All types of Conditionings are on us. I don’t understand how we get struck to things which are of no value, which are of no sense. And they get lost….. Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. त्याला कारण असं आहे की आपण स्वत:बद्दल काही कल्पना करून घेतलेल्या आहेत. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा, की या देशामध्ये तऱ्हेतऱ्हेचे पॅरासाइट्स स्वच्छतेचा एवढा विचार नाही. या देशामध्ये त्हेतऱ्हेचे किटाणू, आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगाचे पॅरासाइट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते या देशात आहेत. इतर देशांमध्ये इथून जर काही पॅरासाइट्स गेलेत तर ते मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहूच शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाइट्स राहतात या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत ! एका शास्त्रज्ञाने विचारले होते मला की ‘तुमच्या इंडियामध्ये लोकं जिवंत तरी कसे राहतात?’ ‘अहो, म्हटलं जिवंतच राहत नाही, हसत-खेळत राहतात. आनंदात राहतात. सुखात राहतात.’ त्याला कारण हा सूर्य. या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत. आपलं हृदय उघडं करायला शिकवले आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर पंधरा मिनीट तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळंे काही घालून, जामानिमा, शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावे लागते. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकचं खाऊन टाकते. Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Sankranti Puja (English/Marathi). Rahuri, Maharashtra (India), 14 January 1986. English Part: Today is a sad day for Me because we’ll be now parting. I may not be able to meet you in Bombay. Maybe for a year this may not happen for some of you, and I would like to give you a little advice about the growth within yourself. It is believed by people that God is helping us and we are in His kingdom. So whatever happens He looks after us. It is true but as you are the instrument of the God you have to also look after yourself. For today’s delay I would like to apologize but the delay comes because from Poona Mr. Kulkarni was to come and see us do this puja. Now I told him that his wife is a negative lady, and he doesn’t understand his own importance, I would say. As a leader you must understand your importance. And another person who came, he asked, “Why don’t you come with me?” He said, “I have to come with my wife.” And that’s how this delay has taken place because he’s not here. He said he’ll come for puja so the main thing was first to arrive here in time without a negative force pulling him. So we conclude that it is important that first of all we should know that in any way we should not try to have any negative forces attacking us or involving us or attaching to us. Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Shri Saraswati Puja Dhule (India)

Shri Saraswati Puja, Dhulia (India), 14 January 1983. [Marathi Transcript] आता धुळ्याच्या सहजयोग्यांसाठी अस सांगायचं की, आता बरेच लोकं काल पार झालेले दिसले. आणखी थोडं सिरियसली पण सहज योगात येतायत अस वाटलं. तेव्हा धुळ्यांच्या लोकांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. राऊळ बाईंनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याचं घर‌ इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे सगळ्यांनी रविवारी सकाळी अगदी व्यवस्थित पणे ध्यान हे केलं पाहिजे. तसंच घरी रोज बैठक पाहीजे. बैठक जर तुम्ही केली नाही तर सहजयोगी जमणार नाही. तुमच्या वर अवलंबून आहे. जितकी तुम्ही बैठक कराल, जितकी तुमच्या मध्ये गहनता येईल, तितका सहजयोग वाढणार आहे. जर तुम्ही स्वतः मेहनत नाही केली, तर सहज योग वाढणार नाही आणि तुम्हालाही सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. म्हणून रोज अगदी न चुकता सकाळ-संध्याकाळ बैठक ही पाहिजे. सकाळी जरी थोडा वेळ असला, तरी संध्याकाळी व्यवस्थित आरामात बैठक पाहिजे. हळुहळू तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या जवळ पुष्कळ टाईम वाचू लागले, कारण बाकीचे तुम्हाला काय आवडणारच नाही. इकडे जायचं, तिकडे जायचं, गप्पा मारायच्या, फालतूच्या गोष्टी तुम्हाला काही आवडणार नाही.  नको रे ते असं होईल उगीचच्या गोष्टी करत राहतात. उलट तुम्हाला वाटेल की काय बसून राहिलेत सगळे, बेकारचे लोक यांना काही समजत नाही. उगीचच आपला कशाला इथे वेळ घालवायचा. तेव्हा ते ही सुटून जाईल आणि त्याच्या नंतर मग, तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुम्ही जमू लागला, जसे तुम्ही मूळात जाल. मुळं दोन चारच असतात पण ती जेव्हा खोल जायला लागतात झाडं वाढू लागतं. असा सहज योग वाढताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा तुमच्यावरअनंत आशिर्वाद आहे. काल मी धुळ्याच्या लोकांना खूप समजावून सांगितले. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे, खूप पॉजिटिवली राहिलं Read More …