Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230) [Shri Mataji speaks English] आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. जे पोलिटिक्स मध्ये चाललेलं आहे तेच आपल्या आज घरोघर, सहजयोगामध्ये झालेलं आहे. ह्याचा पाय त्याने ओढायचा, त्याचा पाय त्याने ओढायचा, म्हणजे आहे तरी काय मला समजतच नाही. अहो जर तुमच्यामध्ये सामुहिकता आली नाही, समष्ठी आली नाही तर या वैष्टी स्वरूपासाठी का आम्ही इथे एवढे दिवस इथे मेहनत केली आणि संत साधूंनी हेच सांगितलं का? इथपर्यंत सांगितलं, ‘तेची सोयरिक होती’. अहो त्या ज्ञानेश्वरांनी एवढं कशाला सांगितलं? ते कोणासाठी सांगितलंय? मला समजत नाही. परदेशातल्या लोकांसाठी सांगितलेलं दिसतं. कारण इथं कोणावर परिणामच होत नाही त्याचा. तुमचे सोयरिक कोण? तेच सहजयोगी. पण ह्याचं हे चुकलं आणि त्याचं ते चुकलं आणि एवढी मोठमोठाली मला पत्र पाठवतात. मला हे ऐकून बरं वाटेल का? देवीला प्रसन्न केलं पाहिजे कि तिला अशा गोष्टी लिहून पाठवल्या पाहिजे? आता प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे सुद्धा मला वाटतं कि मी कोणाशी बोलते. अहो तुम्ही संत, साधू, तुम्हाला साधू केलं मी, संत केलं, तुम्हाला इतक्या उच्च दशेला आणलं. धृवासारखं तुम्हाला नेऊन बसवलं त्या अढळ पदावर आणि तुम्ही आता कुठे इथे पडले आहात, मला समजतच नाही याला Read More …

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. लिनीचं जागरण नाड़ी आणि त्याच्यांतच यां नाडीतूनच प्रथम कुंडलिनीचे जागरण होतं. आणि अगदी केसा सारखी वर आली तरी ब्रम्हंध्राचे छेदन करते. ब्रम्हरंघ्राच्या छेदनाने झाला साक्षात्काराची सुरूवात होते. मध्यमार्ग अशा विशेष प्रकारे बनविला गेला आहे की, त्यामध्ये कितीही बाधा आल्या तरी कुंडलिनीच्या जागरणानंतर मोठा होऊँ शक्तो. या मग पाया’ असे पहिल्यादा शिखर मग पाया सा गोष्टीचा अपोग करून सहजयोगांत आम्ही ‘आधी कळस असे करून हे मंदीर बांधलं. प्रत्येक ठिकाणी जिये जिये पृथ् पैसे मिळवायला लोकानी सुरूवात केली. हे स्वयंभू विग्रह तपार केले तिथे तिथे वाईट पध्दतीने ीतत्वाने पृष्व मंदीरांची स्थिती वाईट झाली. लोक आपला की या मंदीरीतलं चैतन्य दबून जातंय की पैसा मिळवत मिळबत सुख्वात केली. ं लागलं राहीले त्यामळे कधी कधी असं बा पण आपण आला त्य डोट पावती प्रगत होलक्ष्मी आहांत तर असं होतं पशरकतं की महालक्ष्मीची परनी प्रन या मैहीगंत गन

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं Read More …