Adi Shakti Puja (India)

Adi Shakti Puja (Hindi). Jaipur (India), 11 December 1994. MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari [Translation from Hindi to Marathi] मागारसलेले असतात आपण शक्तीचे पूजारी आहोत, शक्ति-धर्माचे उपासक आहत ; पूर्वी राजे-महाराजेसुद्धां शक्तीचीच आराधना करायचे. प्रत्येकजण आपापल्या देवीला मानतो; या सर्व देवतांना वेगवेगळी नांवे आहेत.जयपूरच्या देवीला गंगीर असे नांव आहे. ईश्वराच्या विरोधी कार्यात मर्न असतात; देवाच्या नावांखाली पैसा कमावण्याच्या मारगे असतात. अशा लोकांना आदीशक्तीचा अवतार झाल्याचं समजलं तर ते पळून तरी जातील किंवा त्यांच्यासारखे लोक एकत्र येऊन या आदिशक्तीच्या कार्यात अडथळे निर्माण करतील म्हणून तिला महामायेचं रुप धारण करणें आवश्यक होतं. ; ते कलियुगांत आदी-शक्तीनें एकदा राजस्थानमधे अवतार घेतला होता. त्यावेळी सती-देवी या नावांने हे अवतरण झाले. तिनें खूप जणांना कृपाशीर्वाद दिले आणि राजस्थानी संस्कृतीमधें अजूनही दुसरं कारण म्हणजे आजपर्यंत कधीही कृणी केलं नाही त्याचा प्रत्यय दिसून येतो, पत्नीचा धर्म, पतीचा घर्म, स्त्रीचा असे फार मोठं आणि तितकच सूक्ष्म कार्य या स्वरूपांकडून अनेक धर्मांचे या शकतीमधून होणार असतं. म्हणजेच सामूहिक चेतनेचें कार्य, आणि हे होत उदात्तीकरण झाले, सती-देवी ही साक्षात गंगौरच होती. तिचे असतांना कुणालाही कसलाही त्रास न होता घडणार जणूं तुम्ही घर्म, राजाचा धर्म अशा लग्न झाल्यावर एकदां प्रवास करत असतांना त्या मंडळींवर गुंडांनी हल्ला केला आणि त्यातच तिचा पति मारला गेला त्याच वेळी ती मेण्यांतून बाहेर आली आणि तिनें आपले स्वरुप प्रगट कैलं: आणि सर्व गुडांना ठार मारले. त्यांत तिनें स्वतःलाही बोटीमधे बसून आरामांत पैलतीरावर जाणार असं. धर्माबहल जे लोक सांगत होते ते स्वतः चांगले होते पण ज्याना त्यांनी ते सांगितलं ते तसे नव्हते. त्यांना खऱ्या अर्थाने धर्म समजलाच नव्हता पण दुसर्या लोकांनाही त्यांनी भ्रमांत Read More …

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …

Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …