Shri Chandrama Puja Vaitarna (India)

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984. आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि Read More …

Shri Mahakali Puja (India)

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982. [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. Read More …