Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …

Public Program (India)

1987-12-23_Sarvajanik Karyakram- Atmyache Darshan_Akole-MARATHI अकोल्या गावामध्ये जी आत्मानुभावाची प्रगती झालेली आहे त्याला अगस्त्य मुनिंचे आर्शीवाद तसेच लव आणि कुश यांचे गेलेले बालपण आणि श्री सितेची शुभेच्छा सर्वच कारणीभुत आहेत. ह्या महाराष्ट्रात संत साधुंनी फार मेहनत घेतली आहे. ते जिवंत असतांना लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही. जे धर्ममार्तंड होते त्यांनी त्यांचा छळ केला. आणि जनसाधारणा मध्ये एव्हढी शक्ती नव्ह्ती की त्यांना या छ्ळवाद्यां पासन संरक्षण द्यावे. ती गोष्ट कधी-कधी जिवाला लागुन राहते. ऋषिमुनींच्या वेळेला असला प्रकार नव्हता. पण ह्या कलीयुगामध्ये मोठ-मोठ्या संत साधुंनी फार छळ सहन केला. कारण मानवाला त्यांच्या शक्तीची जाणीव नव्हती, त्यांच्या व्याक्तीत्वाची कल्पना नव्हती. ते केव्हढ मोठ कार्य करत होते त्या बद्धल जाणीव नव्हती, आज त्यांच्याच कार्यावर आम्ही हा सामुहिक सहाजयोग उभारलेला आहे, त्यांच्याच मदतीनी, त्यानींच पेरलेली बिये आज फुलली आहेत आणि त्यावरच आमच काम चालु आहे, तेव्हा त्यांना अनेकदा नमस्कार करुन, माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे झाल–गेल ते विसरुन जावं आज वर्तमान काळात हया वेळेला ह्या कलीयुगामध्ये जेव्हा सगळी कडे आपल्याला अंधकार दिसतो आहे. राक्षसांचे जसे काही थैमान चालले आहे. कुठे जाव – काय कराव काही कळत नाही, कश्या रितीने या संकटातुन मुक्त व्हाव, सर्व देश त्राही-त्राही करत असतांना, हा सहजयोग आपल्या समोर उभा राहीलेला आहे, एकदा नळाला(नल राजा) कली सपडला, कली सापड्ल्या वर नळानी त्याला असा जाब विचारला कि तु महाद्रुष्ट आहेस, तुझ्यामुळे जगामध्ये परमेश्वरी तत्व नष्ट होतेय, तुझ्यामुळे लोकांची द्रुष्टी भलत्या गोष्टींकडे जाते, त्यांच्या चित्तामध्ये अनेक तऱ्हेचे विकल्प येतात तसेच अनाचार आणि अत्याचार याचा सुळसुळाट होतो. तेव्हा अश्या तुला मी नष्ट का करु नये?, तु सुध्दा माझा आणि माझ्या पत्निचा विरह घडवुन आणलास Read More …

Talk (India)

(1987-12-01_Unknown_Talk_Marathi_India_DP-Op…)         आपण लोकांनी आमची स्तुती केली आणि सर्व देवतांचे आणि देवांचे हृदय आवरून घेतलेलं दिसतंय आणि सगळे अगदी पूर्ण आनंदात आले आहेत. परमेश्वराचं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे आणि शुद्ध कार्य आहे. आपल्याला माहिती आहे की, पूर्ण हृदयानी ह्या लोकांनी आपल्याला हे अनुदान केलेलं आहे, कारण आपण आमची स्तुती केली. ही स्तुती खेडोपाडी पोहोचवली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे, संदेश दिला पाहिजे की कल्याणाचे मार्ग आता उघडे झाले आहेत. जे काही आजपर्यंत लोकांनी खोट्या गोष्टी पसरवून देवाला बदनाम करून ठेवलं आहे. ती आज अशी वेळ आली आहे की आपण परमेश्वराला सिद्ध करू शकतो. परमेश्वराला सिद्ध करण्याची ही फार मोठी वेळ आलेली आहे. मोहम्मद साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की ज्या वेळेला पुनरूत्थानाचाचे दिवस  येतील, त्याला त्यांनी कयामा म्हटलयं… त्यावेळेला तुमचे हात बोलतील, जसं आपल्या सहजयोगामध्ये आपल्या हातावरती कळतं कोणची चक्र धरली आहेत. तुमचे हात बोलतील आणि तुमचे पाय बोलतील आणि तुमच्या विरुद्ध साक्ष देतील की तुमच्यात काय चुका आहेत असे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकानी सहजयोगासाठी पुष्कळ कार्य केलेलं आहे. मच्छिंद्रनाथ पासून सर्वांनी. ते एकच आहेत. ते एकच जीव आहेत. त्यांनी अनेकदा जन्म घेतलेले आहेत. तेव्हा मोहम्मदसाब असोत किंवा दत्तात्रेय असोत किंवा मच्छिंद्रनाथजी असोत हे सगळे एकच जीव आहेत आणि त्यांनी दुसऱ्याही देशांमध्ये जन्म घेतलेला आहे. ह्याची प्रचिती आपल्याला येईल की मी हे जे म्हणते ते खरं आहे आणि त्यांनी अनेकदा जन्म घेऊन जगामध्ये धर्म स्थापना केली. पण शुद्ध आचरण ठेवून सुद्धा पूर्णत्व येत नाही. आत्मानुभावाशिवाय पूर्णत्व येत नाही म्हणून आत्मानुभव हा गांठला पाहिजे. शुद्धाचरण तरी का? असा प्रश्न जर केला तर त्याला म्हणायचं आत्मानुभवासाठी आणि आत्मानुभव कां तर आत्मानुभावाशिवाय पूर्णत्व येत Read More …

Public Program Sonai (India)

Public Program, Sonai (India), January 21st, 1985 सोनाईचे सहजयोगी तसेच सोनाईचे भक्त लोक, सत्याला शोधणारे सर्व जीव, सर्वांना आमचा नमस्कार. सहजयोग आज आलेला आहे अशातली गोष्ट नाही, अनादी काळापासून सहज योगाची क्रिया घडत आहे. रामचंद्राच्या वेळेला राजा जनकानी नचिकेतला आत्मबोध दिला असे म्हणतात, त्यानंतर इंद्राला सुध्दा आत्मबोध घ्यावा लागला. म्हणजे जोपर्यंत आपल्या आत्म्याचा बोध आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपण अर्धवट आहोत. बुद्धासुद्धा जेंव्हा एक राजपुत्र म्हणुन जन्माला आले, तेंव्हा त्यांच्या लक्षात अशी गोष्ट आली की मानवाचा जीव, मानवाचे आयुष्य हे अपूरे आहे. त्याची बुद्धी ही अपूरी पडते. म्हणून काहीतरी ह्याच्या पलीकडे असले पाहिजे, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्यांच्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे कधीही संपत नाही. असा कधीही न संपणारा आनंद कुठेतरी असलाच पाहिजे, अशा शोधात बुद्धसुद्धा फिरले आणि  शेवटी एक दिवशी ते असे एका झाडाखाली आरामात पडले होते थकून – त्या वेळेला सहजच त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना आत्मबोध झाला. अशाप्रकारे आपल्या देशात अनेक लोकांचा आत्मबोध झालेला आहे. तसेच पुष्कळांना जन्मत:च हा आत्मबोध मिळालेला सुध्दा असतो. पण तरीसुद्धा असे साधुसंत फार कमी झाले. अशी फार अवतरण कमी झालेली आहेत आणि त्यामुळे लोकांना असे वाटते की हे काही आपल्या ह्याचे नाही, हे जनसाधारणासाठी नाही. पण आजचा सहजयोग हा समजोंमुख आहे. समाजाकडे लक्ष आहे. कारण ही जी क्रिया आहे ती पूर्वी एक दोन लोकांनाच साध्य होती आणि जे एक दोन लोकच म्हणवून मोठ्या पदाला पोहोचत असत ते आज सगळ्यांना उपलब्ध झाले पाहिजे अशी मला लहानपापासून इच्छा होती आणि म्हणून ती कशी उपलब्ध करून द्यायची, त्याच्यामध्ये काय लोकांना त्रास आहे, कशामुळे लोकांना ही मिळत नाही, ही ज्ञानाची गुरुकिल्ली का मिळत नाही याचा Read More …

Talk to Yogis Mumbai (India)

1975-12-21 Talk to Yogis Mumbai Marathi कसलि ग-हाणी आणी कसली रडकथा, कही मला ऐकायच नाही, तोंड बंद ठेवा. आनंदाच सर्व साम्राज्य उघडलेले आहे. काय वेड्या सारख लावलेल आहे, रडगाणी, मला येत हसायला, तुम्हाला येत रडायला, वेडे कुठले, खुळे. अरे काय वेड्या सारख करता.आता सांगु तरी कस, तेच मला समजत नाही. नसते सिरियस झाले वेड्यासारखे.लहान मुला सारख व्ह्यायला पाहीजे.समोर सुर्यासारख सगळ दिसत असुन सुध्दा दिसत नाही  म्हणजे काय म्हणायचे त्यांना?. अहो अंधळा असला तर त्याला म्हणता येइल कि बॉ हा अंधळा आहे. पण सुर्यासारख सगळ समोर दिसत असुन त्या आनंदाचा हाच व्दार आहे. आणी तरी तुम्ही आनंदाला मिळवत नाहि. म्हणजे आहे काय तुमाच्यात दोष. तुमच्यात भोक पडली आहेत, का झालय काय?. वरुन सगळ नुसतं सगळ वाहत सुटल आहे तुमच्यावर. ते जुने प्रकार आहे सोडा ते. एकदा सोडला न तो- जो आपल्यात आहे. की आपण आपले होतो. जो हमे सता रहा उसको पहले उधर छुट्टि करके आओ, उसको बाहर. फिर देखो आप कितने अंदर होते हैं. सब छोडो पिछे. हर एक क्षण पिछे छोड दो. ये क्षणमे खडे हो जावो.  अंधर घुसने कि बात है, हम बैठे हुये है यहा पर  सबको धकेलने के लिये, सबके सब मेरे खोपडी पे मत गिर जाना. दो चार गिरेगे तो ठिक है. ह्सत खेळत- मजेत सगळ होणार आहे. अहो नुसती रास लिला, आहे काय त्यात मोठ भारी? काय तुम्हाला करायच आहे? घागरी सुध्दा फोडल्या नाही तुमच्या. सगळ्यांची मडकी फोडली असती तर बर झाल असत. तसही काही केलेल नाही. आणी फोडली आहेत मडकी. वरुन झर-झर-झर वरती खाल पर्यंत धावत आहे न सगळ. काही वादविवाद घालायचे नाहीत. Read More …

Talk Pune (India)

TALK IN MARATHI-PUNE-1973-0916 जगातल्या पाठीवर कुठंही चर्चिला गेलेला नाही जितका आपल्याभारात वर्षात झालेला आहे कारण हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो ,हिच एक योग भूमी आहे. बाकी सगळ्या भोग भूमी आहेत . हि एक यॊग भोमि आहे म्हणून इथे फार मोठ मोठ्या प्रवृत्तीने म्हंटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आहेत आणि ह्या भूमीतच ह्या विषयवर हजारो वर्षांपासून म्हणजे कृष्णाला जर ६ हजार वर्षे झाली असतील तर रामाला जवळ जवळ ११ हजार तरी वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधी कितीतरी आधी पासुन हजारो वर्षांपूर्वी वेदात वैगरे, इतिहासकारांना कदचित त्यांना पटायचे नाही माझे म्हणणे पण हझारोवर्षांपासून ह्या भारत वर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे दृष्टा होते त्यांनी आत्मसाक्षत्कारावर पुष्कळ काम केलेले आहे पण आज काळ त्यांच्याबद्दल वाचतेय कोण , त्यांच्या बदल जाणतय कोण ,आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते कि प्रत्येक गोष्टींमधय उठलं कि आम्ही हिंदू आहोत ,म्हणजे आम्ही काही विशेष आहोत असे सुद्धा पुष्कळ लोकं स्वतःला समजतात,पण ज्या आदिशंकराचार्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना वैगरे ज्यांनी केलेली आहे , त्यांनी जे तत्त्व या संसारात मांडलेले आहे,त्यांनी जी चैतन्यावर कामं करून त्याचं निरूपण केले आहे त्याबद्दल फार छाती ठोकपणे साऱ्या संसारा समोर इतक्या मोठ्यापणे सत्य मांडलेलं आहे , ते कोण जाणताय ? त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही.फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अशा रीतीने आपल्या बद्दल एक कल्पना डोक्यावर चालवली आहे पण ब्राह्मण म्हणजे कोण ? हे सुध्दा जे त्यांनी सांगितलेलं आहे , ब्राम्हण तो कोण ज्याचा दुसरांदा जन्म झालेला आहे. आणी तेच कृष्णांनी सांगितले आहे तेच सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे ,म्हणजे महंमद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेले आहे, आपले साईबाबा Read More …

Public Program Dhule (India)

1972-0409 Public Program Note: 1) Please note that the brackets present in this transcript represents:   a) […] = Unclear text/Missing audio   b) [अबकड/अबकड] = Best guesses text1/text2 (text not confirmed)  c) (abcd/अबकड) = Additional explanatory text खरोखर म्हणजे राजकुंवर राऊळ सारखी बाई या धुळ्यात आहे, हे या धुळ्याचे मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले. मी तिला म्हटलं होतं एकदा धुळ्यात अवश्य येईन. आणि या ठिकाणी किती भक्तिभाव आणि किती प्रेम आहे, त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये, आदिकालापासनं सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरात सुद्धा आता घंटी वगैरे वाजत आहेत, चर्चमध्ये सुद्धा लोक जातात, मस्जिदीत जातात, धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेलं आहे. पण जे वास्तविक कार्य आहे, ते कुठंही झालेलं दिसत नाही. देवळात जातो आपण सगळं काही व्यवस्थित करतो, पूजा-पाठ सगळं व्यवस्थित करतो, घरी येतो, पण तरी सुद्धा असं वाटत नाही, की काही आपण मिळवलं आहे. आतली जी शांतता आहे, आतलं जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे, तो कधी सुद्धा मिळत नाही. कितीही केलं, तरीसुद्धा असं वाटत नाही, की आपण देवाच्या जवळ गेलो आहोत. किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे, की जिच्या मांडीवर आपण डोकं ठेवून आरामाने म्हणू शकतो, की आता आम्हाला काही करायचं नाही.  माझं असं म्हणणं  नाही, की देवळात माणसाने जाऊ नये. जावं, अवश्य जावं. […] मधाची ओळख पटवण्यासाठी पहिल्यांदा फुलाच्या गोष्टी करू, तर बरं होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते [सांगण्यासाठीच/चांगल्यासाठीच], म्हणजे फुलांची नावे सांगितली. विष्णू पासून ते शिवापर्यंत, तसचं मुसलमानांमध्ये अली पासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत, सगळ्यांची वंशावळ झाली. Read More …