Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९ आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या Read More …