Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. तुम्ही काही कमी पुण्य केलेले नाही, जे या देशात जन्माला आले. पण तो पुण्याचा पेटारा मागेच राहिला. तिकडे बघा कुठे असतो! तो पेटारा उघडला पाहिजे. त्याच्यात बघा स्वत:च स्वरूप म्हणजे कळेल केवढ्या मोठ्या देशात जन्म झाला तुमचा आणि इतिहास तुमचा केवढा उज्वल, किती मोठा! मला कधी कधी वाटतं, की हे मावळे परदेशात जाऊन जन्माला आलेत की काय? त्यांचे मावळ्यांसारखेच आहेत. गुण आणि तिकडचे उपटसुंभ इकडे आलेत की काय? अहो, ब्राझीलमध्ये, अमेरिकेत तर सोडा, पण ब्राझीलमध्ये अशा देशात, की जिथे आपल्यासारख्यांचा कधी संबंध आला नसेल तिथेसुद्धा सहजयोग इतका जोरात पसरला आहे आणि इतके गहरे लोक आहेत. यू.पी.मध्ये ३० आयएएस ऑफिसर्स सहजयोगात आहेत आणि इथे एकाही आयएएस ऑफिसर्सना…, शेपट्या आहेत सगळ्यांना. आधी त्यांच्या शेपट्या पडल्या पाहिजेत, मग माणसात येतील. शिष्टपणा फार. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भयंकर शिष्टपणा आहे. हा शिष्टपणा जायला पाहिजे. नम्रता नाही. त्यातल्यात पुरुषांपेक्षा बायका जरा जास्त शिष्ठ आहेत. हे जर एकदा झालं आणि घटित झालं, आपली स्वत: ची ओळख जर झाली तर आपोआप मनुष्य नम्र होतो आणि हा शिष्टठपणा जायला पाहिजे. फार आवश्यक आहे. जर महाराष्ट्रीयन लोकांचा इतिहास बघितला, अहो, हा खरच महाराष्ट्र आहे! फार Read More …