Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. ‘अवघाची संसार सुखाचा करेन’ असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत – होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. ‘प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग Read More …