Puja Brahmapuri (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दूसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वरगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल. तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण Read More …