Public Program Komalwadi (India)

कोमलवाडीचे सहजयोगी तसेच इथले व्यवस्थापक ,इथले सगळे रहिवासी ,तसेच आसपास च्या गावातून आलेले सर्व भक्तजन ह्या सर्वाना आमचा नमस्कार . भारताच्या खेडेगावातच भारताचा आत्मा राहतो . शहरात रहात नाही . खेडेगावातूनच भारत उठवला पाहिजे . जी जागृती करायची ती खेडेगावातच करायला पाहिजे . शहरातून प्रगती करून काही फायदा होणार नाही आहे . हि गोष्ट अनेकदा अनेक पुढाऱ्यांनी सांगितली . तरी सुध्दा पुष्कळांना ती गोष्ट समजलेली दिसत नाही . त्यामुळे अजून सुध्दा आपल्या खेडेगावची स्तिती पहिली कि माझं हृदय अगदी भारावून जात . आणि काय बोलावं आणि काय बोलू नये हेच समजत नाही . कानिफनाथांची इथे समाधी आहे हे समजल्यावर माझ्या लक्षात आलं कि हि जागा आमच्या मोक्याची आहे . कारण आमचा त्यांचा फार संबंध आहे . ते आमचेच आहे म्हंटल तरी चालेल . आमची त्यांची जात एक आमचं त्यांचं सगळं काही वागणं ,विचार सगळं एक आहे . तेव्हा त्यांच्या गावी येन भाग्याच आहे . त्यातून तुमचं हे विशेष सुकृत दिसत ह्या गावी तुम्ही जन्माला आलात . हि पुण्य भूमी जिथे त्यांच्या सारख्यांच्या वास राहिला . ते इथे पायी हिंडले ,फिरले ,गरीबांची सेवा केली . परमेश्वराच्या आशिर्वादाला सगळ्यांना साक्ष म्हणून ते इथे आले होते . अशा महान व्यक्ती इथे तिथे हिंदुस्तानात राहिलेल्या आहेत ,पण त्यांची आपल्याला ओळख नव्हती ते जेव्हा जिवंत राहिले तेव्हा त्यांना सगळ्यांनी त्रास दिलेला असणार . त्यांना कुणी मानलं नसणार . कुणी मुसलमानातून आले तर कुणी हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही मुसलमान ,हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही हिंदू . अशी नसती भांडण करून, लहान लहान गोष्टीन कडे लक्ष देऊन ,ते काय खातात ,ते काय बोलतात असतंस बघून ,त्यांचं जे भव्य स्वरूप होत ते बघायचं नाही आणि कोणत्यातरी लहान गोष्टीत अडकून Read More …