Public Program

Komalwadi (India)

1985-01-20 Public Program Marathi, Komalwadi India DP-RAW, 83'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

कोमलवाडीचे सहजयोगी तसेच इथले व्यवस्थापक ,इथले सगळे रहिवासी ,तसेच आसपास च्या गावातून आलेले सर्व भक्तजन ह्या सर्वाना आमचा नमस्कार . भारताच्या खेडेगावातच भारताचा आत्मा राहतो . शहरात रहात नाही . खेडेगावातूनच भारत उठवला पाहिजे . जी जागृती करायची ती खेडेगावातच करायला पाहिजे . शहरातून प्रगती करून काही फायदा होणार नाही आहे . हि गोष्ट अनेकदा अनेक पुढाऱ्यांनी सांगितली . तरी सुध्दा पुष्कळांना ती गोष्ट समजलेली दिसत नाही . त्यामुळे अजून सुध्दा आपल्या खेडेगावची स्तिती पहिली कि माझं हृदय अगदी भारावून जात . आणि काय बोलावं आणि काय बोलू नये हेच समजत नाही . कानिफनाथांची इथे समाधी आहे हे समजल्यावर माझ्या लक्षात आलं कि हि जागा आमच्या मोक्याची आहे . कारण आमचा त्यांचा फार संबंध आहे . ते आमचेच आहे म्हंटल तरी चालेल . आमची त्यांची जात एक आमचं त्यांचं सगळं काही वागणं ,विचार सगळं एक आहे . तेव्हा त्यांच्या गावी येन भाग्याच आहे . त्यातून तुमचं हे विशेष सुकृत दिसत ह्या गावी तुम्ही जन्माला आलात . हि पुण्य भूमी जिथे त्यांच्या सारख्यांच्या वास राहिला . ते इथे पायी हिंडले ,फिरले ,गरीबांची सेवा केली . परमेश्वराच्या आशिर्वादाला सगळ्यांना साक्ष म्हणून ते इथे आले होते . अशा महान व्यक्ती इथे तिथे हिंदुस्तानात राहिलेल्या आहेत ,पण त्यांची आपल्याला ओळख नव्हती ते जेव्हा जिवंत राहिले तेव्हा त्यांना सगळ्यांनी त्रास दिलेला असणार . त्यांना कुणी मानलं नसणार . कुणी मुसलमानातून आले तर कुणी हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही मुसलमान ,हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही हिंदू . अशी नसती भांडण करून, लहान लहान गोष्टीन कडे लक्ष देऊन ,ते काय खातात ,ते काय बोलतात असतंस बघून ,त्यांचं जे भव्य स्वरूप होत ते बघायचं नाही आणि कोणत्यातरी लहान गोष्टीत अडकून राहायचं ह्या आपल्या पद्धती मुळे आपण पुष्कळशा अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपण मुकलो आहोत . तरी त्यांनी आपलं आयुष्य इथे घालवलं तरी सुध्दा त्यांच्या पासून आपण काहीही फायदा करून घेतला नाही . पण त्याचा हा मला फायदा आहे कि ह्या भूमीला त्यांचे पाय लागले हि भूमी पवित्र झाली . आणि तिथे तुमच्या सारखे पवित्र लोक जन्माला आलेत हा माझा फायदा . तेव्हा आपण ह्या योग्य भूमीत जन्माला आलात . हि भारत भूमी म्हणजे योग  भूमी आहे ,जगातल्या सर्व भूमी पेक्षा श्रेष्ठ हि भूमी आहे . त्यातल्या त्यात इथे असे संतसाधु झाले ती आणखीन त्याहून विशेष श्रेष्ठ भूमी ,आणि अशा श्रेष्ठ भूमीत आपण जन्माला आलो म्हणजे आपण पण कुणीतरी श्रेष्ठ ,विशेष असलं पाहिजे . पण मग आमची अशी स्तिती कशी ?. असं लोक म्हणतील कि का बुवा जर आम्ही एव्हडे विशेष असून अशा पवित्र ठिकाणी जन्माला आलो आहोत तर आमची अशी स्तिती का ?. पाहिलं कारण म्हणजे आपण तेव्हडा पवित्र पणा ठेवला का ?,दुसरं असं आहे कि आपला संबंध अजून परमेश्वराशी झाला नाही ,आत्मबोध आपल्याला घडला नाही ,आपण उगीचच परमेश्वर म्हणायचं आणि कोणत्याही भलत्या माणसाच्या मागे लागायचं . त्यांनी देव मिळत नाही ,उद्या कोणताही भामटा जेल मधून सुटला आणि भगवे वस्त्र घालून आला कि झालं सगळ्या बायका चालल्या त्याच्या पायावर . एखाद्या बाईच्या अंगात संचार झाला तर लोकांना वाटत ती देव आहे ,आता देवाला यायला एखादी अशी बाई मिळते का ?. अहो देवाचं सगळं सांभाळायला कोणीतरी विशेष पाहिजे . हे आपण डोकं वापरलं पाहिजे . तर अशी एखादी बाई तिच्या अंगात संचार झाला कि लागले तिच्या पाठीमागे ,तिच्या अंगात भूत येतात खरतर . ती भुताने पछाडलेली बाई असते आणि तिच्या अंगात संचार आला कि आपण म्हणतो तिच्यात देवी अली . मुंबईतल्या सगळ्या मोलकरणींना देवी येतात . आता देवीला कुणी दुसरं मिळालं नाही कि मोलकरणीच्या च अंगात शिरावं . आपण विचार केला पाहिजे . ह्या अशा गाष्टीन मुळे आपली आजची तरुण पिढी सुध्दा त्यांना वाटत आपले सगळे आईवडील जे आहेत ते भोळे भाबडे आहेत . आणि त्यानी असाच काहीतरी विचार करून आपलं आयुष्य नुसतं बेकार केलाय . आणि आता आम्ही कशाला देवावर विश्वास ठेवायचा ?. आम्ही देवावर विश्वास ठेवण्या सारखं आहे काय ?. असं त्यांना वाटत आणि असं एकदा वाटू लागलं कि म्हणजे मग त्यांना असं वाटत कि परमेश्वर नाहीच . पुष्कळ मुलांना असं वाटू लागलेलं आहे कि देव बिव काही नाही आहे हे सर्व खोट दिसत आहे . तर देव आहे हे सिध्द केलं पाहिजे . तो सिध्द केल्या शिवाय आजच्या आधुनिक काळात कोणी त्याला मानणार नाही . आम्ही कानिफनाथांना मानतो कारण आमची स्तिती दुसरी आहे . तुमच्या ह्या स्तिती मध्ये तुम्ही देवाला मानता किंवा नाही मानत हे बरोबरच आहे तुम्हाला अजून माहीतच नाही खर काय खोट काय ते . कानिफनाथ खरे होते कि खोटे होते हे कुणी सांगायचं . मी म्हणते म्हणून तुम्ही का ऐकून घ्यायचं तेव्हा काहीतरी तुमच्या परिस्तितीत बदल झाला पाहिजे . . 

आता आपण नुसते म्हणजे पहिल्यांदा आर्थिक परिस्तिथी बघतो कारण आपली द्रीष्टी तशी असते ना कि आर्थिक परिस्तिथी पहिल्यांदा बारी झाली पाहिजे . आर्थिक परिस्तिथी बरी झाली म्हणजे सगळं बर होईल असं आपल्याला वाटत . हि गोष्ट खोटी आहे . परदेशामध्ये लोकांजवळ इतका गडगंज पैसा आहे ,प्रत्येका जवळ दोन दोन गाडया ,सुंदर घर आहेत . पण त्यांची स्तिती काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल . सहा वाजल्या नंतर ते दारू पिल्या शिवाय जिवंत राहू शकत नाहीत ,दारू पिऊन झिंगून पडतात . मुल  बाळ त्यांची रस्त्यावर पडली ,बायका मुल सोडली ,दहा दहा लग्न केली तरी त्यांना सुख नाही . सगळे अनाथ आश्रमात राहतात ,पन्नास वर्षाचे झाले कि सगळे अनाथ आश्रमात राहतात कारण सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत घटस्फोटच घेत राहतात . मुल बाळ त्यांची इतकी व्रात्य निघाली कि ते आजकाल काय काय निघालंय तुम्ही कधी खाल्लं नसेल अशा गोष्टी खात राहतात . ते तुम्हाला माहिती नाही ,आम्ही तर जन्मात कधी पाहिलं सुध्दा नाही आपल्या देशातच होत सगळं असं म्हणतात . गांजा बिंजा ,त्यांच्या कडे मोठे मोठे श्रीमंतांचे ,मिनिस्टरांचे मुल ते खातात . प्रायमिनिस्टर खात असले तरी मला आश्चर्य वाटणार नाही . असा वेड्यांचा बाजार तिकडे भरलेला आहे . म्हणजे एव्हडे पैसे मिळवून शेवटी असं वेड व्हायचं असेल तर त्या पेक्षा पैसे नकोत . बर मुल तरी काय आमच्या कडे त्यांची मुल अली म्हंटल तुमचं असं कस चैतन्य येऊ राहिलाय ,मरणाला टेकले तुम्ही ,तरुण मुल ना तुम्ही ?म्हंटल करता काय ?म्हणे आम्ही मरणाचा विचार करतो . म्हणे आम्ही असा विचार करतो कि मरायचं कस ?,झाडावरून उडी मारावी कि पहाडा वरून उडी घ्यायची कि समुद्रात बुडायचं . म्हंटल हेच एक विचार आहे का तुम्हाला म्हणे आता मारायचं कस?पण म्हटलं का? म्हणे आम्हाला काही सुखच नाही ,आम्हाला काही आनंदच मिळाला नाही . ह्या पैशाला घेऊन काय चाटायचं आहे . बर एकदुसऱ्याचं तोंड बघत नाहीत लहान आठ वर्षाचा मुलगा झाला कि त्याला नोकरी कर असं आई म्हणते नाहीतर जेवायला देत नाही ,तो उपाशी मेला तरी चालेल . त्या इंग्लॅन्ड सारख्या शहारा मध्ये ,इंग्लंड सारखा देश जिथे कि साहेब म्हणजे आपल्याला फार मोठं वाटत पण महामूर्ख आहेत सगळे . त्यांच्या गावात ,त्या लंडन ला ,त्या शहारा मध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुल आईबाप मारून टाकतात . चांगली मुल ,झेपत नाही म्हणून . कारण दारूला पैसे पाहिजेत . नवरा हि पितो आणि बायको हि पिते . आणि दोघे जण मिळून मारून टाकतात नशेमध्ये . आपल्या कडे कुणी असं करत का दारू जरी पीत असलं तरी ?.हि त्यांची मनस्तीती आहे . तेव्हा आपण अजून काही गमावलेलं नाही ,तेव्हा ते जे आता गेले ते कोलमडले ,आता त्यांना कस बचावायचं हेच मला समजत नाही . धर्म कशाशी खातात ते माहित नाही आई बहीण माहित नाही . कोणतीच आई बहीण माहित नाही . स्वतः ची आई सुध्दा दिसते कि नाही माहित नाही . हि त्यांची परिस्तिथी पैसे मिळवून झाली आहे . 

आपल्याकडे सुध्दा उद्या जर एखादा गरीब माणूस दिसला त्याला मी १०० रुपये दिले तर तो उठून गुत्त्यावर जाणार . त्याच मी भलं करायला गेले मी एक आई आहे ,भलं करायला गेले तर तो गेला गुत्यावर . मग आईला काय वाटेल अरे कशाला दिले मी याला १०० रुपये . याच नुकसानच केलं मी पैसे देऊन . भलं करायच्या ऐवजी वाईटच झालं . आईच्या द्रीष्टीने विचार करायला पाहिजे . म्हणजे नुसत्या पैशाने आपली हालाकीची स्तिती ठीक होत नाही . मग काय व्हायला पाहिजे ?. तुमच्या मधला आत्मा जागृत झाला पाहिजे . जेव्हा आत्मा जागृत होतो तेव्हा मनुष्य अधर्म करत नाही . पैसे कितीही आले तरी सुध्दा आतून सगळं सुटलेलं असत काही धरलेलंच नसत . काही किती ऐश्वर्य असलं तरी माणसाला त्याची पर्वा वाटत नाही . आता आम्हीच बघा आमच्या घरी राजमहालात रहातो पण इथे तुम्ही म्हणाल तर इथे झोपून जाईल व्यवस्तीत ,काही होणार नाही माझ्या शरीराला . आरामात कुठे झोपतो ,काय खातो काही फरक पडत नाही . कानिफनाथ आणि आम्ही फरक नाही आमच्यात . आणि कानिफनाथांच  जे एक आयुष्य आहे अवधुताच ते मिळवण्यासाठी त्यांनी फार मेहनत केली असेल . पण तुम्हाला तसच ते मिळणार आहे . पण लक्षात हे घ्यायचं कि कानिफनाथांना काही सांगावं लागायचं नाही कि बाबारे तू वाईट काही करू नकोस . ते चांगलच करायचे . तुम्ही त्यांना किती त्रास दिला तरी ते तुमचं भलंच करायचे . ते कस झालं ?आत्म्याची शक्ती अली म्हणजे ,आपल्यामध्ये मनुष्य समर्थ झाला म्हणजे मग तो वाईट कामाला लागत नाही . 

ह्याच्या मध्ये धर्म जागृत झाला कि त्याला सांगावं लागत नाही मग ते आपोआप सुटत सगळं ,मी कुणाला सांगत नाही, हे सोडा ते सोडा काही सांगत नाही . एकदा तुमच्या आत्म्याचा मी दिवा पेटवला म्हणजे तुम्ही बरोबर ठीक होणार . हे मला माहीत आहे . त्या दिव्या मध्ये तुम्हाला सगळं काही दिसणार काय वाईट आणि काय चांगलं आहे ,हीच आज सहजयोगाची किमया आहे . कसाही असेनाका मनुष्य त्याचा एकदा दिवा कसातरी पेटवून टाका ,मग धुग धुग धुग धुग  आधी जळतो पण तो बघतो मग ,अरे हे आहे माझ्यात मग स्वतः स्वच्छ करतो ,स्वतः चेच तुम्ही गुरु व्हाल . परत देवाला पैसे नाही लागत ,देवाला पैसे समजतच नाही . पैसे कशाला द्यायचे ?कोणी आला भामटा त्याला आपले दोन पैसे द्यायचे . आता खेडेगावात सगळे सांगतात कि माताजी पैसे घेत नाहीत . ते म्हणतात बर पाच नाहीतर दहा पैसे घ्या . त्यांना समजतच नाही कि पैसे कशाला देवाला द्यायचे . अहो कितीतरी कार्य देव तुमचं करतो त्याचे किती पैसे दिले तुम्ही त्याला . किती पैसे मोजले ?. बघा हि जमीन आहे ,त्याच्यात तुम्ही बी पेरता ते अंकुरीत होत आपोआप ,हि जिवंत क्रिया होते ना त्याला किती पैसे दिलेत तुम्ही ?तुम्हाला मुल व्हावीत म्हणून देवाला किती पैसे दिले ?. ह्या आकाशातून कधी कधी पाण्याचा वर्षाव होतो ,पाऊस पडतो . त्याच्या साठी तुम्ही किती पैसे देता ? . जे काही आपल्याला जिवंतपणी जे मिळत म्हणजे आमचं हृदय धडधडतंय त्याच्या साठी आम्ही किती पैसे दिले . ?आपला श्वास जो सुरु आहे त्याच्या शिवाय आपण एक सेकंद हि जिवंत राहू शकणार नाही ,त्यासाठी आपण देवाला किती पैसे दिले ?. मग पैसे कशाला द्यायचे देवाला ?एकहि माणूस जो देवाच्या नावावर पैसे मागतो त्याच्या कडे तुम्ही बघितलं पण नाही पाहिजे . पण आपण डोकं वापरत नाही . धर्माच्या बाबतीत डोकं वापरत नाही बाकी सर्व बाबतीत वापरतो . जर आपण धर्माच्या बाबतीत डोकं वापरलं तर आपल्या लक्षात येईल कि याला पैसे लागत नाहीत . 

दुसरं वाईट वाटून नाही घ्यायचं आई जे  आहे ते खर सांगणार आहे . सगळं काही खर सांगायलाच मी निघालेली आहे . आता आपल्याकडे हे आहे कि उपास करायचा . कशाला देवासाठी उपास करायचा ?देवांनी सारी सृष्टी तुमच्यासाठी निर्माण केली . ती काय तुम्ही उपास करावं म्हणून ते हि देवासाठी ,आणि तेही त्याच्या वाढदिवसा दिवशी करता . रामनवमीच्या दिवशी तुम्ही उपास करता म्हणजे हे आहे काय . सुतक पाळायचं आहे का वाढदिवसा दिवशी गोडधोड करून खायचं असत ?. डोकं वापरा . काहीही ब्राम्हणांनी सांगितलं कि ऐकायलाच पाहिजे असं नाही काही . ब्राम्हणाचे असं आहे कि तुम्ही उपास करा आणि जेवण मला द्या . आलं का डोक्यात काही , तशीच आपल्या देशात उपासमार आहे उपास कशाला करता तुम्ही . मग काही नाही तर चालले  टाळ कुटत ,तंबाकू तोंडात भरायची ,टाळ कुटत त्या वारकरी लोकात जायचं तिथे जाऊन त्या बडव्यांना पैसे द्यायचे . त्या बडव्यांनी तुमची डोकी फोडायची . आणि डोकी फोडली म्हणजे आम्ही काय वारकरी ,वा हे कसले वारकरी ,डोकं नाही का तुम्हाला . ?तिथं पर्यंत पायी जायला कुणी सांगितलं . ?आणि त्या देवाचं नाव बदनाम होत हो ,तुम्हाला सांगते मी आता एका ठिकाणी गेले होते तर वारकरी लोकांनी मला बोलावलं होत मला रडूच आले बोललंच नाही गेलं . मी म्हंटल याना बोलायचं तरी काय . अहो नुसती पाप्याची पितर . अशे झालेले नुसते सुकून गेलेले ,त्यांच्या अंगावर नीट कपडे नाहीत काही नाही . म्हंटल कसले वारकरी बघवत नाही मला . म्हणे देवाच्या दारी जातात ,हे का ते ?. अहो त्या सुदाम्याला सुध्दा त्यांनी सोन्याची द्वारका दिली . तो काय याना असा ठेवणार होता का पण हे काय वेडेपणा . तुम्ही त्या बडव्यांनी सांगितलं ते कशाला ऐकायचं . वाऱ्याला निघाले पालखी अली ,चालले पैसे द्यायला त्याला . हा काय वेडेपणा आहे आपला ,धर्माच्या नावावर आपण काय काय वेडेपणा करतोय . आणि मग म्हणायचं कि आम्ही एव्हडं केलं तरी आम्हाला देवांनी काही नाही दिल . सगळं ब्राम्हणा साठी केलं तुम्ही ,सगळं ब्राम्हणांनी सांगायचं ,आई मेली ना आता एक गाय दान दे . बर ती तुझ्या आईला जाईल , असं का ,आधी तू जा तिकडे म्हणावं . तिच्याकडून लिहून आण . अक्कल ठेवायला पाहिजे . काही नाही देत तर तूप दे . ते आईला जाईल . आता हे तरी समजलं पाहिजे कि हे आईला कस जाणार आहे हो . आई मेली हे लक्षात येत कि नाही तुमच्या ?. येतंय का ,आई आता आमची गेली ती दुसऱ्या ठिकाणी आहे तिथे काय आता आम्ही पोहोचू शकत नाही . आणि हा सांगणारा सुध्दा पोहोचवू शकणार नाही याला जाऊदेत आधी तिकडे . लिहून आण म्हणावं आई कडून दस्तावेज करून . पण मग तिला गाय द्यायची ,तिला हे द्यायचं तिला ते द्यायचं . घरात खायला नसलं तरी सुध्दा आपल्याकडे कुणी मेल कि झालं . लोक रडायला लागतात म्हंटल झालं काय ?. अहो पैसे नाहीत माताजी ,कशाला ?अहो त्या ब्राम्हणाला द्यायला . म्हणजे कुणी घरात मेला त्याच्या नंतर तुम्ही डबल मरा तुम्ही आणखीन . तर तस काही करायची गरज नाही आहे . जो माणूस गेला तो गेला त्याच्यासाठी काय थोडं बहोत पिंडदान वगैरे करावं . कावळ्यांना दिलेलं बर या लोकांना देण्या पेक्षा . असच भामट्यानी सगळ्यांनी मिळून तुम्हाला सगळ्यांना लुटलेलं आहे ,आणि तुम्ही अजून तसच करता आणि मग तुमची मुल म्हणतात आम्ही काही ऐकत नाही . 

देवळांची स्तिती पहिली कि आश्चर्य वाटत कि इतके पैसे हे लोक देवळात मोजतात ह्या देवळांच करतात काय ?कुठे जातात पैसे सगळे ?एकही देऊळ ठिकाणाचं नाही . एव्हडं सुंदर महादेवाचं मंदिर पाहिलं मी रस्त्यावर कुणाचं लक्ष नाही तिकडे . पण आता रस्त्यावर एखाद्या मनुष्याला बसुद्या चालले पैसे घालायला त्याला . तर माणसाचा खुळे पणा जो आहे तो देवा कडे नेणारा नाही . देवा कडे जायचं असेल तर दक्ष असावं लागत . ,विचार केला पाहिजे . देव जर आहे तर त्या आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही . प्रेमानी ,तो प्रेमाचा भुकेला आहे ,तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे . पैशानी कसा तो विकत घेणार आपण ?त्याला काही कमी आहे का ?त्याला काय आपण देणार ?हे सगळं ब्रह्मांड आपल्याला त्यानं देऊन ठेवलेलं आहे आपण काय देणार त्याला ?तेव्हा देवा बद्दलचे विचार किंवा  धर्मा बाबतचे विचार आपण व्यवस्तीत घेतले पाहिजेत . अनेक अशे विचार आपल्याकडे आहेत ते सगळे खुळेपणाचे आहेत . आपण त्याला सामाजिक म्हणतो पण मला तर कधी कधी असं वाटत कि हे इतके आत रुळलेले आहेत कि ते काढायचे म्हंटले तर त्याला आत्मबोध झाल्याशिवाय लोक काढणार नाहीत . नुसत्या तऱ्हा आहेत . आता आपल्या कडे मुलीच लग्न म्हणजे प्रश्न . मुलीच  लग्न करायचं म्हणजे अगदी झालं ,एक मुलगी जन्माला अली म्हणजे लोकांना असं वाटत कि काय डोक्याला ताप झाला . मग ते पैसे घेणार ,मग त्या मुलीला बडवायचं पैसे नाही दिले तर ,त्या मुलीला छळायच . हि पध्दत आपल्या पुरुषांची . मग तीच त्यांना मुलगी झाली कि तीच पण तसच . सारक्याला वारके . हे असं चालूच आहे रहाटगाडग . या रहाटगाडग्याला कुठेतरी मोड घालायला पाहिजे कि नको ?. आज तुमच्या मुली आहेत त्यांची हि स्तिती ,उद्या तुमची जी मुल आहेत त्यांच्या मुलींची पण हीच स्तिती होणार . तेव्हा त्याच्या साठी काहीतरी करायला पाहिजे . आणि त्या साठी तुम्ही आत्मबोध घेतला पाहिजे . 

आत्मबोध घेतल्यावर मनुष्य समर्थ होतो . कृष्णाने सांगितलंय कि “योग क्षेम वाहामयं “. आधी योग घ्या मग तुमचं क्षेम बघणार . उगीच टाळ कुटून ते मिळणार नाही ,ते दिसतंय ना समोर एव्हडे टाळ कुटून कुणाला काय मिळालय का ?गुढगे फोडून काही मिळालं नाही . योग आधी झाल्या शिवाय देव मिळत नाही हे कृष्णांनी स्वतः गीतेत सांगितलं . तस कुणी सांगत का तुम्हाला ?काही नाही ,आम्ही गीता मांडली ,सत्यनारायण मांडला ,नारायणाला आणखीन कशाला सत्य पाहिजे तो साक्षात सत्य आहे . सत्यनारायण म्हणजे ते बसलेत ते . घेणारे मध्ये पैसे ,सत्यनारायण मांडला ,घ्या एव्हडे पैसे द्या . अहो नारायण म्हणजे साक्षात सत्य ,त्याला कशाला आणि सत्य ,आपण असं म्हणतो का सत्याला सत्य . ?म्हणजे हे जे मध्ये बसलेत सत्य खाणारे . असल्या तऱ्हेचे प्रकार करून करून आपण धर्माची विटंबना केली . स्वतःला हि आपण ठगून घेतलं आहे . आईनी जे सांगायचं ते सांगायचं आहे . काही असलं तरी आपण हे जाणलं पाहिजे कि आपण साक्षात स्वतः आत्मा आहोत . तो जो आपण आत्मा आहोत त्याला आपण मिळवलं पाहिजे . म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या साध्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली . ती तर कुणी वाचतच नाही आणि आम्ही काय म्हणे दिंड्या काढल्या . अहो ते काय दिंड्या घालत होते काय ?ठीक आहे तुम्ही नाचा कुडा,आनंद घ्या त्याला काही हरकत नाही . पण त्यांनी दिंड्या घातल्या होत्या का ?. त्यांनी सांगितलं का दिंड्या घाला म्हणून ?काही सांगितलेलं नाही . पण आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही फक्त ती डोक्यावर घेऊन दिंड्या घालतो . म्हणजे काय आत डोक्यात जाणार आहे का ज्ञानेश्वरी ?. समजा तुम्हाला काही पोटात दुखत असलं आम्ही तुम्हाला औषध दिल कि हे औषध घ्या . तुम्ही जर ते डोक्यावर ठेऊन म्हणा नुसतं औषध घ्या तर पॉट दुखायचं थांबणार आहे का ?आणि मग म्हणायचं डॉक्टर कस हो आम्ही डोक्यावर औषध ठेवलं तरी बर वाटलं नाही . देवाला आतून घ्यावं लागत . त्याचा परिणाम आला पाहिजे . जे देवांनी सांगितलं ते समजून घेतलं पाहिजे . मग देवाला तुम्ही दोष देणार नाही . कळलं का ? आपलं काहीतरी त्यामध्ये समज थोडासा कमी राहिला आहे . आणि दुसऱ्यांनी गैरसमज करून दिलेला आहे हे लक्षात घ्या . यांच्यात तुम्हाला मी दोष मुळीच देणार नाही . तुम्ही साधीभोळी माणस ,कुणी काय म्हंटल तसे वागता . पण आता आपलं डोक ठिकाणावर ठेऊन असं लक्षात घेतलं पाहिजे कि आपल्याला आत्मबोध आत्ता पर्यंत झाला नव्हता आता तो आत्मबोध आम्ही घेणार . तो आत्मबोध घेण्याची व्यवस्था सुध्दा देवाने तुमच्यात करून ठेवली आहे . त्याला कुठे जायला नको . जस आता हि पृथ्वी आहे यांच्यात बी रोवलं कि त्याला अंकुर फुटतात . ती व्यवस्था त्या बी मध्ये पण आहे आणि त्या पृथ्वी मातेत सुध्दा आहे . तशीच तुमच्यात सुध्दा सगळी व्यवस्था करून ठेवली आहे त्याच्या साठी काही विशेष करायला नको . फक्त ते जरा रोपल कि थोडीशी मेहनत करून त्याचा वृक्ष केला पाहिजे . मग सगळ्या व्यवस्था व्यवस्तीत होणार आहेत . सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या आपण उलटी  कडून सुरु करतो . म्हणजे काय कि आमची आर्थिक परिस्थिती खराब तर आमची आर्थिक परिस्थिती ठीक करा . ते झालं एक कारण आणि त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक परिस्तिथी ठीक नाही म्हणून आमची स्तिती अशी आहे . तर कारण आणि परिस्तितीशी झुंजत झुंजत जरी कारण गेलं तरी परिस्तिथी तशीच राहते . हे नाही तर ते . कोणीही सुखी दिसत नाही मला ,पैसेवाले पण नाही आणि गरीब पण नाही .सगळे  दुखी आहेत .  एकाला एक तऱ्हेचा त्रास तर दुसऱ्याला दुसऱ्या तऱ्हेचा त्रास . याच्या पलीकडे जे आहे प्रभूच निदान आपल्या हृदयात जे आत्मा स्वरूप आहे त्या आत्मारामाला मिळवलं पाहिजे . असं सगळ्यांनी सांगितलं . तुकारामांनी सांगितलं ,नामदेवांनी सांगितलं ,सखूबाईनी सांगितलं ,कुणी सांगितलं नाही आपल्या देशात पण तिकडे आपलं लक्षच नाही . आत्मा मिळवायला सांगितलं ना ,आत्म्या मध्ये लिन व्हायला सांगितलं ना . ते कार्य आम्ही करत आहोत तुम्हाला तुमच्या जवळ जे आहे ,”तुझं आहे तुझ्या पाशी “ते दयायला आम्ही आलो आहोत . 

आईला ठेऊन काय करायचं आहे . जे आहे तीच ते तुमच्यात आलं म्हणजे झालं . आमचं जे काय आहे ते सगळं च्या सगळं तुम्ही घेतलं तर त्याच्याहून धन्य आम्ही अजून नाही होणार . सगळ्यात मुख्य म्हणजे जे आमचं आहे ते सर्व तुम्हाला द्यायचं आहे . सगळं प्रेमानी तुमच्या हवाली करायचं आहे तुमचं तुम्हाला घ्या . ह्या तुमच्या वडलांनी जी काय संपत्ती दिली आहे ती तुम्ही घ्या . आणि आता देवाच्या साम्राज्यात या . अगदी सोपं काम करून टाकायचं आहे . काही कठीण नाही . यांच्यात काही तपश्चर्या नको . काही डोकं फोडायला नको आणि उपास करायला नको आणि जीवाचे हाल करून घेऊ नका . फार झालं ,मला तर सहन होत नाही बघून बघून . कशाला एव्हडे देवासाठी हाल करायचे . पारायण वाचा ,अमुक करा तमुक करा.  सांगितलं होत आधी भक्ती मार्ग घ्या ,असं सांगितलं होत कि भक्ती मार्गात राहिले तर निदान वाईट मार्गाला जाणार नाहीत . पण भक्ती मार्ग घ्या म्हणजे अगदी पिसाटल्या सारखं झालं आता . साक्षात देव येऊन उभारला तरी या भक्ती मार्ग्यांना दिसायचाच नाही . त्याच्या समोर बसून विठ्ठल विठ्ठल ,विठ्ठल जरी साक्षात उभा राहिला तरी विठ्ठल विठ्ठल चालणार . विठ्ठलाला ओळखणार कसे ?. विचार करा . विठ्ठलाला ओळखायचं असेल तर तुमच्यात आत्म्याचा बोध झाला पाहिजे . तो झाल्या शिवाय तुम्ही विठ्ठलाला ओळखू शकत नाही . तो विठ्ठल जाणायला आत्मा पाहिजे त्याच्या शिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही कि हा विठ्ठल खरा कि खोटा . उद्या जर कुणी भामटा विठ्ठल बनून आला तर तुम्ही कस म्हणणार खर  आहे कि खोट आहे . कशी ओळख पटणार तुम्हाला ,नाही पटणार . कारण वरपांगी लोक असतात ते आणखीनच वरून च ढोंग करून येतात . चांगलंच ढोंग साधतात . चांगल नाटक करून येतात . दोन चार हत्ती घेऊन आले दोनचार घोडे घेऊन आले ,चालली म्हणे पालखी . वा ,भाड्यावर घ्यायचं सगळं ,भाडोत्री काम . आणि तुमच्या कडून पैसे उकळायचे . तेव्हा लक्ष कुठे असायला पाहिजे ?आपल्या आत्म्या कडे . नामदेवांनी एक फार सुंदर कविता लिहिलेली आहे ,आणि नानक साहेबानी त्याचा एव्हडा मान  केला कि ती त्यांच्या ग्रंथसाहेब मध्ये घातलेली आहे . नामदेवांच्या बऱ्याच कविता ग्रंथसाहेबा मध्ये आहेत . कि आपण शीख लोक म्हणतो ते त्याला पाळतात . त्यांनी असं म्हंटल कि एक मुलगा पतंग उडवत आहे . पतंग आकाशात भरारी मारते .इकडे तो यांच्याशी बोलतो ,त्यांच्याशी बोलतो ,खेळतो पण लक्ष त्याच संबंध कुठे आहे तर त्या पतंगा कडे . मग खेडेगावाचं छान वर्णन दिल कि मी आता बघितलं कि चार चार घागरी डोक्यावर ठेऊन बायका चालल्या आहेत त्या हसतात ,बोलतात ,गप्पा मारतात इकडच्या तिकडच्या पण लक्ष सगळं घागरी  कडे . तसच एका आईच वर्णन केलं तिने आपल्या कडेवर एक मुलगा घेतला आहे आणि ती झाड लोट ,सडा सारवान सगळं करते आहे . पण लक्ष तीच मुला कडे . तस माणसाचं लक्ष आपल्या आत्म्या कडे असायला पाहिजे . असं नामदेवांनी सांगून ठेवलं आहे . ते तुमच्या साठी सांगितलं आहे . आमच्यासाठी सांगितलं आहे . आपल्या देशातल्या लोकं साठी ,साऱ्या जगातल्या लोकं साठी सांगून ठेवलं आहे . ते लक्षात घेतलं पाहिजे कि आपलं लक्ष आत्म्याकडे असायला पाहिजे . 

आज पर्यन्त साधुसंताना आपण छळलं . कुणालाही सोडलं नाही ,आता मात्र ओळखून घेतलं पाहिजे कि कोण साधू आणि कोण संत . आणि दुष्ट कोण आणि खरं कोण आहे . ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे कि “खळांची व्यंकटी सांडो “.खळ आहेत जगात त्यांनी  केव्हड छळलं लोका ना ,त्यांची व्यंकटी सांडो ,त्यांनी जो आम्हाला त्रास दिलेला आहे ,छळलेलं आहे ,वक्र मार्गाने वागवतात आहेत ती सांडली पाहिजे . त्या सर्वान साठी तुमच्या मध्ये त्यांनी सांगितलं आहे कि ,”दुरितांचे तिमिर जाओ “. दुरित म्हणजे कोण ,आपण लोक जे देवा पासून दूर आहेत ,त्यांचे तिमिर म्हणजे अंधार गेला पाहिजे . आणि स्वधर्म सूर्य .स्वधर्म म्हणजे आत्मा ,आत्म्याचा जो धर्म आहे त्याचा सूर्य तुम्हा सगळ्यांना तो दिसला पाहिजे . तो मिळाला पाहिजे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे . ते कुणी ज्ञानेश्वरी सांगताना तुम्हाला सांगणार नाहीत . कारण ती सगळी पोटभरू लोक . 

तेव्हा आता आपण अशा पुण्य भूमीत जन्माला आलात ती पुण्य भूमी सुध्दा एक योग भूमी आहे . त्यात तुमचं एव्हडं मोठं पुण्य आहे . सुकृत आहे . त्याच्यावर आपला विश्वास बसतो न बसतो असं आहे . तेव्हा आता तुम्ही सगळ्यांनी आपला आत्मबोध घ्यावा . आणि सगळ्यांनी पार व्हावं . त्याच्या नंतर पुढे एक नवीन स्तिती येते . पुनर्जन्म होतो माणसाचा आणि तो पुनर्जन्म झाला कि माणूस एक नवीन परिस्तितीत येतो तेव्हा देवाचं साम्राज्य त्याच्यावर येत आणि सगळे देवदूत त्याची मदत कशी करतात ते तुम्ही बघा . अनेक चमत्कार घडतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि श्री माताजी केव्हडा तुमचा आशीर्वाद असं म्हणाल तुम्ही . पण खर पाहिलं तर हे तुमचं स्वतः च आहे . ते तुम्ही मिळवलं ,  देवाच्या साम्राज्यात आले म्हणून देव तुमची व्यवस्था करत आहे . या ठिकाणी बरच कार्य होण्या सारखं आहे आणि त्याबद्दल मी चर्चा करिन इतर लोकां बरोबर . बघू काय जमेल तेव्हडा आपण करायचं पण परत मी सांगते कि नुसतं मुलांना शिकवून होणार नाही .शिकवलं म्हणजे अजून व्रात्य होतील ,तुमची किंमत सुध्दा करणार नाहीत ,तुम्हाला फाड फाड बोलतील ,तुम्हाला म्हणतील तुम्ही खेडूत . त्यांना नुसतं शिकवून होणार नाही त्यांना एक सुंदर मनुष्य करायचं आहे . आणि अशेच लोक आपल्या देशाचे जेव्हा उत्तम नागरिक होतील तेव्हाच आपल्या देशाची दशा खरोखर ठीक होणार आहे .  

तेव्हा आतून मुळातूनच कार्य करायला पाहिजे ,वरपांगी कार्य करून काही उपयोग नाही आहे . ते उडून जाईल ,वाऱ्यावर जाईल आणि विरून जाईल . तेव्हा चांगल गहन कार्य करायला पाहिजे ,तुम्ही लोक सगळे शेतकरी आहेत आणि तुम्ही लोक हि गोष्ट जाणता . जर आपण वाऱ्यावर बी असं घातलं तर ते काही येत नाही . खडकाळ जमिनीवर घातलं तर तिथे येणार नाही . तुम्हाला एक उत्तम पैकी सुपीक जमीन पाहिजे त्या सुपीक जमिनी मध्ये चांगली मेहनत करून व्यवस्तितीत जर बी तुम्ही लावलं तरच त्याला काहीतरी फायदा होण्या सारखा आहे . तेव्हा असच काहीतरी गहन कार्य आपल्याला करायचं आहे आणि त्या साठी आम्ही तुमच्या गावाची निवड केली आणि इथे कानिफनाथांची समाधी आहे आणि इथे सुध्दा आमचे सहजयोगी आहेत . आणि इथले जे तुमचे बाकीचे लोक आहेत ते सुध्दा मदतीला तयार आहेत . कारण आम्ही आता तुमच्या जमिनी साठी कलेक्टर कडे जाण किंवा काय असं म्हणू शकत नाही . त्याची आम्ही काही व्यवस्था करू शकत नाही . तेव्हा तुम्हा लोकांनाच हे करावं लागेल आणि ते सगळे मिळून तुम्ही करा . नाशकाला सुध्दा फार मोठे आमचे डॉक्टर साहेब आहेत तिथे आणि ह्यांनी सांगवी साहेबानी सांगितलं कि गाव फार छान आहे ,हि लोक पण फार छान आहेत आणि इथले लोक उगीचच काहीतरी शंका कुशंका काढणारे महामूर्ख नाहीत ,त्यांना स्वतःच चागलं वाईट समजत . तेव्हा मी म्हंटल बर चला आपण बघून येऊ . तर तुम्हाला भेटून फार आनंद झाला आणि बऱ्याच दिवसाच्या जशा काही भेटी गाठी आज झाल्या असं वाटून अगदी हृदय माझं भरून आलेलं आहे . तरी तुम्ही बोलावलात त्या निमंत्रणा बद्दल मी तुमची फार आभारी आहे .  

आता सगळे जण शांत बसा . थोडं पुढे सरकून बस म्हणजे ऊन लागणार नाही . आणि टोप्या काढा सगळे आई समोर टोप्या लागत नाहीत . कारण इथून ब्रम्ह रंध्र आहे ते छेदले पाहिजे . तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय तर मला नाही बर वाटत . हातात काळे गंडेदोरे वैगेरे बांधायचे नाहीत . हे नुसतं लुटण्याचे धंदे आहेत . म्हणे हा काशीचा गंडा ,एक पैशाचं विकत घ्यायचं काळ्या रंगांचं ते ,काहीतरी मंत्रून टाकायचं घाणेरडं आणि ते बांधायचं आणि दोन रुपये घ्यायचे . आणि तुम्ही देता ते . बर आहे आपला धंदा एक रुपयाचं घेऊन दोन रुपये कमावणं . ह्या कलियुगा मध्ये काळ काही ठीक बसत नाही असं मी पाहिलं आहे . आणि खूप गर्मी ओढली जाते आत मध्ये . आणखीन काळा बुक्का जरी लावला तरी कपाळावर गर्मी होते ,आम्ही ते पाहिलेलं आहे ,म्हणून काळा नाही आपण लाल लावायचा ,ब्राम्हण कधी नाही काळा लावणार . तुम्हाला काळा लावणार आणि स्वतः मात्र लाल भडक लावून फिरेल . लक्षात घेतलं पाहिजे ,हा का नाही लावत ,त्याला म्हणावं तू आधी लाव मग मी लावतो . त्यांनी काय म्हंटल पैसे घाला तर आधी तू घाल मग मी घालतो म्हणायचं . हे लोक कधी देवाला दोन पैसे देत नाहीत तिथे बसून ,तशी ब्राम्हणाची जात फार उच्च ,तुम्हाला ब्राम्हण करायचं आहे . ज्यांनी ब्रम्हाला जाणलं ते ब्राम्हण . परत उलट आता ब्राम्हणांवर उलटले . रामदास स्वामी एव्हडे मोठे शिवाजी महाराजांचे गुरु ,केव्हढे मोठे हनुमानाचा अवतार तो ,म्हणे आम्ही ब्राम्हणांचं छापणार नाही . म्हंटल कोण ब्राम्हण ?म्हणे समर्थ ,असं का ,अहो म्हंटल त्याला काय जात संन्याशाला . हे असलं उलट आता सुरु . म्हणजे हे नाही तर ते . म्हणजे धड हे नाही आणि धड ते हि नाही अशी स्तिती म्हणायची . म्हणून सांगायचं असं कि तुम्हाला ब्रम्ह जाणलं पाहिजे ,तुम्ही जाणलं पाहिजे ब्रम्ह ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झाला तो खरा ब्राम्हण . तशे ब्राम्हण असले तर ते पूजनीय आहेत ,कानिफनाथ हे महाब्राम्हण . जरी ते मुसलमान असले तरी ते महा ब्राम्हण आहेत . असं समजलं पाहिजे . हि ज्यांना समज येईल तोच खरा धार्मिक मनुष्य . ज्याला हि समाज नाही तो कट्टर ,काही कामाचा नाही तो ,उद्या वाया जाणार ,भांडेल ,काय ओरडेल ,काय त्याला राग काय येईल ,आदळ आपट नुसती ,त्याच्यात जरा सुध्दा प्रेमाचा अंश सुध्दा राहणार नाही . कट्टर पणा करायचा नाही ,जे काही सुंदर आहे ते सर्व काही देवाचं आहे . असं लक्षात ठेवलं पाहिजे . 

बर आता चष्मे सुध्दा काढून ठेवा . यांनी डोळ्याला सुध्दा फार फरक पडतो . तेव्हा आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे कि आपली जात आता विश्वाची जात झाली . विश्वधर्मी जन्माला आलो आपण . विश्वाचा धर्म त्याला कसली जात ,कशाला जातबित घेऊन बसलात उलट मार खायची गोष्ट . जातीचा मोठा प्रॉब्लेम आहे . ते समजावून सांगते एकदा बर होईल . आता एका जातीत मुलीच म्हणे आमच्याच जातीत लग्न करा . बर केलं मग ,नवऱ्यानी हाणली आणि घरी पाठवलं ,आले का जातवाले म्हणावं ठीक करा आता सगळ . जातीत करून फायदा काय झाला . उलट जातीत केलं तर तू दिवाळीला एव्हडे पैसे घेऊन ये ,त्यांनी काही पाठवलं नाही त्याचा साऱ्या जातीत गवगवा . पैसेच नाही दिले ,दागिनेच नाही दिले ,अमूकच नाही केलं . जातीत केलं म्हणून . निदान आपापसात थोडी तरी जात बदला ,थोडीतरी जात बदलून लग्न करा . सुरवात करा जराशी . गांधिजीं सारखं तर नाही होऊ शकत म्हणा . पण तरी थोडस तरी बदललं पाहिजे ना . हे जातीत केलं तर डोक्यावरच बसणार तुमच्या . अगदी जातीतल्या जातीच्या पोटातल्या पोटातलं करायचं आणि काही फायदा होतो का त्यांनी ?काहीच नाही . एक बनवून ठेवलेलं आहे काहीतरी आणि त्यात हलायची काही सोयच नाही . मग बदनामी करायची ,अहो त्यांनी मुलगी तर पाठवली पण साड्या दोनच पाठवल्या . पण त्यांची स्तिती जर तशी नसेल तर त्यांनी काय मरावं . म्हणून या जातीत जातीत करून तरी काय मिळतंय मला हे समजत नाही ,लोक का नाही विचार करत कि जात जात घेऊन बसलो त्यांनी आम्हाला काय मिळालं ?. कुणी जात वाले तुमची मदत करत असतील तर सांगा ,उलट त्रास देतात . आता ज्ञानेश्वरांचंच बघा ब्राम्हण कुळात जन्माला आले आणि ब्राम्हणांनीच त्यांना त्रास दिला . कुणी महारा मध्ये जन्माला आलं तर महार त्रास देतील . ख्रिस्त ,जु ,जु लोकां न मध्ये जन्माला आले त्यांनी त्यांना फाशी दिली . म्हणजे भलं केलं का कुणी ?असं मी कुठं ऐकलं नाही कि मोठे साधुसंत ,आता रामचंद्र एव्हडे मोठे जन्माला आले त्यांना वनवासात दिल पाठवून . अयोध्येच्या लोकांनी सीतेला घरा बाहेर काढलं . एका धोब्यांनी हे केलं . अयोध्येच्या लोकांचा काय फायदा झाला रामाला . जन्मभर बायको शिवाय रहावं लागलं . हि जात जात ,गणगोत ह्यांनी काय होतंय आपलं कि आपण कुठं हलु शकत नाही . तिच्यातच संपून जातो आपण . आणि आपण सत्चिल लोक आहोत कोण काय म्हणेल ,गणगोत काय म्हणतील ,जातीत प्रश्न उठेल असतंस . थोडी तरी जात बदला . फार नको असली तरी थोडी तरी . 

त्याला धरून पुष्कळ भांडण झाली आहेत आत्ता पर्यंत तेव्हा आता आम्ही कोणच्या जातीचे नाही तर विश्व जातीचे आहोत असे मानून चाला . बर होईल ते . विश्वाची जी जात एक आहे म्हणजे मानव जात हि एक आहे . देवाने आपल्याला एकसारखं बनवलेलं आहे . आपण हसतो सारखे तुम्ही कोणच्याही देशाचे असा हसायच्या वेळी एकसारखं हसतो ,रडायच्या वेळी एकसारखं रडतो . त्याच्यात काही फरक आहे का चेहऱ्यात कुठे . कुणी हसायच्या वेळी रडत आणि रडायच्या वेळी हसत असं दिसलं का कुठे ?. सगळी कडे सारखच आहे ना मग तो कुठल्याही देशाचा ,कुठल्याही जातीचा ,कुठल्याही धर्माचा असुदे तो सारखाच ,तसाच असतो ना . त्याला शिंक हि तशीच येते ,खोकला हि तसाच येतो ,आजारही तसाच येतो . सगळं विश्व धर्मी असल्यावरती आपण आपल्या मनानी काहीतरी जाती बनवायच्या आणि स्वतःला कोंडून घ्यायचं ,गळ्याला फास मारायचा हे कुठलं शहाणपण आहे . तेव्हा ह्या फासातून निघालं पाहिजे . धार्मिक असायला पाहिजे ,दारू प्यायली तरी हरकत नाही ,बायकांना मारलं तरी हरकत नाही ,चोऱ्या केल्या तरी हरकत नाही . पण जात फार मोठी . जात आहे काय तुमची ?. आता देवाची जात आपल्याला काढायची ती सर्व विश्वाची जात . जशी देवाला जात नाही तशी तुम्हाला हि जात नको तर बर होईल . तुम्ही आता देवधर्मी व्हा . फक्त देवाची जात आपल्याला पाहिजे असं मनात धरायचं . म्हणजे तुम्हाला वाटेल आता मोकळे झालो बुवा . नाहीतर घाणीला बैल लावतो झापड लावलेला तसे फिरतो आहे जातीच्या पाठीमागे तिथंच तिथंच . ती झापड काढायला पाहिजे . आणि ती झापड काढणं काही वाईट नाही ,चुकीचं नाही फार चांगली गोष्ट आहे . पण त्याचा अर्थ असा नाही कि बेफाम धावत सुटायचं . माणसाला स्वतंत्रता येण म्हणजे पहिल स्वच तंत्र म्हणजे आत्म्याचं तंत्र यायला पाहिजे . जर तुमच्या आत्म्याचं तंत्र तुम्हाला आल तर मग हि झापड आपोआप पडणार . हि गळून पडणार . तर असं प्रेमाचं साम्राज्य आपल्याला स्थापन करायचं आहे . आणि या प्रेमाच्या साम्राज्यात आपण जात पात बगत नाही . विदुराच्या घरी जाऊन ज्यांनी भाजी खाल्ली तो श्री कृष्ण ,शबरी एक भिल्लीण म्हातारी तिच्या दातांनी उष्टे केलेले ज्यांनी बोर खाल्ली तो राम . अशी अनेक उदाहरण आपल्या त आहेत . त्यांनी काय जात पहिली का त्यात . पण बघतात शिवाजी महाराजांना आम्ही राज्याभिषेक देणार नाही का ?कारण ते म्हणे कुणबी आहेत . आणि आता महार सुध्दा बसलेत राज्यावर . मग बोला आता म्हणावं . आणि ब्राम्हण हि बसलेत राज्यावर त्यांना उतरवा मग . इतकच नाही गांधीजींना म्हंटल तुम्ही येऊन प्रायश्चित करा . म्हणजे एव्हड्या मोठ्या माणसाला पण प्रायश्चित्त करायला लावलं या मूर्खांनी . ते म्हणाले मी नाही केलं तर भारतात जेऊ देणार नाहीत मला ते . आणि मारलं च शेवटी . पण जर का त्यांनी प्रायश्चित्त घेतलं नसत तर पुष्कळ आधीच मारून टाकलं असत . हे म्हणतील तस करायचं प्रायिश्चत्त घ्या ,इथे पैसे ठेवा ,हे करा ,ते करा . कुणाला काय कशाची खातात तो धर्म माहिती नाही ,कसले मंत्र मुर्खा सारखे म्हणतात ते माहिती नाही . कुठे देव देवता बसलेत ते माहिती नाही . काहीतरी आंधळ्या सारखं . आणि ते आंधळ्यांना आणखीन आंधळे करत आहेत . तेव्हा ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतलं पाहिजेत . कि आम्हाला जेव्हा आत्म्याचा धर्म मिळाला तेव्हा आम्ही आत्म्याच्या धर्मा प्रमाणे वागणार . तो खरा धर्म आहे . बाकी सर्व धर्म हे झूट आहेत . कारण हे सगळे खोट करत आहेत ,धर्माच्या नावाखाली आमच्यावर अत्याचार करत आहेत . कस शक्य आहे हे ,धर्म हा म्हणजे प्रेम आहे . धर्मामध्ये प्रेम मिळायला पाहिजे ,आनंद मिळायला पाहिजे ,सौख्य मिळायला पाहिजे ,सगळी सुबत्ता मिळायला पाहिजे जर ती मिळत नाही तर असा धर्म काय कामाचा . हा खरा हिंदू धर्म आहे तो घेतला पाहिजे . हिंदू धर्माच विशेष कि आत्म्याचा शोध लावण हा हिंदू धर्माचा गाभा आहे . कुठेही विचारा तुम्ही . हे बाकीचं थोतांड जे आहे ते काही नाही आहे . तेव्हा जे लोक तुम्हाला पैशा साठी किंवा पोटभरू पणा साठी जे काही सांगतात ते काही ऐकायचं नाही . मी जातीवरती बोलायचं होत म्हणून बोलून गेले कारण इथे आता परत शाळा सुरु झाली म्हणजे हा प्रकार सुरु होईल ,कि हा अमका महाराचा मुलगा हा कसा शाळेत येणार माताजी ?मग महारा बरोबर आमची मुल कशी जेवणार ?.वैगेरे  ते काही चालणार नाही . मला जितका एक ब्राम्हण प्यारा आहे तितकाच एक महार प्यारा आहे . सगळी मुल माझ्या जीवाची आहेत . तेव्हा तस मी काही चालू देणार नाही तुमचं . जातीपाती तुम्ही गावाच्या बाहेर ठेवायची . हे एकमात्र वचन पाहिजे मला सगळ्या गावकऱ्या न कडून कि असल्या गोष्टी बोलायच्या नाहीत ,कुणी कुणाला दुखवायचं नाही . कुणाला कमीजास्त बोलायचं नाही . कारण आमचं प्रेमाचं साम्राज्य आहे त्याच्या मध्ये सगळी मुल माझ्या जीवाची आहेत . ती मुसलमान असो ,हिंदू असो ,शीख असो सगळे माझ्या जिवाभावाची आहेत . कुणाला कमीजास्त आपण बोलायचं नाही . आणि शिवाशिवी ,सोवळ ओवळं हे सगळं बाहेर ठेऊन टाकायचं . गेले दिवस ते . गांधीजी झगडत गेले पण काही झालं नाही विशेष असं दिसतंय . पण आता निदान तुमचा आत्मा जागृत झाल्यावर तरी सगळं हे नीट होईल मला माहित आहे . 

आता तुमचा आत्मा कसा जागृत होतो ते थोडस मी सांगते . तुमच्या मध्ये कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे . ती जागृत होते . ती शक्ती तुमच्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे . आणि तुमच्या मध्ये सात चक्र आहेत . म्हणजे मूलभूत . तशी अनेक आहेत पण मुख्य सात आहेत . आणि ती कुंडलिनी अशी वर उठली आणि ब्रम्हरंध्राला छेदली कि तुम्ही सूक्ष्म होता . सूक्ष्म झाल्यावर तुमच्या हातामध्ये गारगार असं येऊ लागत . तुमच्या डोक्यातून  गारगार येऊ लागत . मग हि सगळी ब्राम्हशक्ती तुमच्या हातात आल्यावर तुम्हाला कळत कि दुसऱ्या माणसाला काय त्रास आहे . म्हणजे तुम्ही सामूहिक चेतने मध्ये जागृत होता . 

तुम्ही एकदा सामूहिक चेतने मध्ये जागृत झाला म्हणजे तुम्हाला हे कळत कि दुसऱ्या माणसाला काय त्रास आहे तुम्हाला काय त्रास आहे . आणि हि सात चक्र तुम्हाला एकदा कळली कि डावीकडे कि उजवीकडे ते कळत . ते कळलं कि तुम्हाला ते त्रास नीट कसा करायचा ते हि कळत . ते कळल्यावर तुमच्या तब्बेती बऱ्या होतात . तब्बेती बऱ्या झाल्या कि डॉक्टर ची बिल सुटली . नंतर तुमची मनस्तीती चांगली होते . मनस्तीती चांगली झाल्या नंतर देवाचा आशीर्वाद येतो आणि त्यामुळे सर्व तऱ्हेने सुबत्ता येते . हि सहजयोगाची मी थोडक्यात माहिती दिली . जरी ती तुम्हाला आधी सांगितली तरी तिचा अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते ,सगळ्यांना आलं तर फार उत्तम आहे . सगळ्यांना होईल अशी आशा आहे मला . कारण कानिफनाथांनी इथे मेहनत केलेली आहे ती काही वाया जाणार नाही . त्यांच्या दमावरच मी म्हणते कि लगेच झालं तर बर . 

टोप्या ,चष्मे ,जोडे काढून ठेवा . आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे स्वतः बद्दल कोणाचीही कमी कल्पना करून घ्यायची नाही . कि मी हे पाप केलं ,ती चूक केली हेकाही खर नाही तुम्ही काही पाप केलेलं नाही . तेव्हा असं काही नाही कि तुम्हाला आत्म्याचं दर्शन नाही झालं पाहिजे . अगदी सहज सरळ ते होणार आहे . मी काहीही पाप असं केलेलं नाही आहे . आणि हा विचार डोक्यातून पूर्ण काढून टाका . आणि देव हा प्रेमाचा सागर ,दयेचा सागर आणि सगळ्यात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे . त्यामुळे मी कोणतीही अशी चूक केलेली नाही कि ज्याला देव क्षमा करणार नाही . 

आता अशे हात दोन्ही ठेऊन डोळे मिटा आणि लक्ष टाळूवर ठेवा . आता मी थोडी फुंकर घालते . आता बघा तुमच्या हातावर काही गारगार येतंय का ?. झालं ना सुरु ,वाटतंय का थोडं ,सूक्ष्म  आहे ते . आता कानिफनाथांना नमस्कार करा . त्यांना असं म्हणायचं कि आम्ही तुमचे आभारी आहोत ,धन्यवाद तुम्हाला . हि त्यांची कृपा आहे लक्षात ठेवलं पाहिजे . त्यांची आठवण ठेवली पाहिजे ,त्यांचं देऊळ बांधूया इथे मस्त . आता बघा आणखीन जास्त गारगार वाटायला लागल . जीव खुश झाला बघा त्यांचा . 

कळलं का ?देवाचा धर्म आपण इथे घेतला , कानिफनाथांच्या धर्म आपण घेतला आता . झालं ,छान झालं . फार आनंद झाला तुम्हाला भेटून . आता इथे एक सेंटर सुरु करा . आता कसा गार वारा सुरु झाला बघा . तर तुम्ही फार महान लोक आहात ,सांगणं एव्हडेच कि स्वतः कडे लक्ष ठेवा . स्वतःचा मान ठेवा . तुम्हाला आता साधूपण येणार ,मोठी माणस होणार तुम्ही . संसार काही सोडायचा नाही ,संसारात राहूनच सगळं काही होत . परमेश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी राखो . आता तुमच्या इथे खूप पाऊस यायला पाहिजे आणि तो येईल तुमच्या भक्तीने तो येईल . ज्या लोकांना गारगार आलेलं नाही ती लोक कुरबुरीतील ,काही बाई बोलतील पण तिकडं लक्ष घालायचं नाही . आम्हाला  अनुभव आलेला आहे आम्ही काही या गोष्टीन मध्ये विश्वास ठेवणार नाही म्हणायचं . आता पुढच्या गावी जातो आम्ही संगमनेर ला . आता तुम्हाला सोडून जायचं तरी जीव भरून येतो . आणि तिकडे लोक वाट बघत बसलेत . अनंत आशीर्वाद .