Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982 महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त. पण हृदय मात्रं प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही. पण एकंदरीत प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. किती तरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत. जशी आपल्या मराठी भाषेत आहेत. कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे , त्याच्याच लहरी आदळून, आपटून, नवीन नवीन शब्द बनवतात. आणि त्या शब्दांचे तुषार, त्यातनं संगीत जाणवतं. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे, अश्या लोकांमध्ये मात्र, थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे हे लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच नाही. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते. विशेषतः जर एखादं मूल आजारी असलं तर तिचा जीव नुसतं कासावीस होतो त्या मुलासाठी. हे कसं? केवढं तिच्यासाठी हे धन आहे मोठं, स्वतःचा जीव आतमध्ये घालून, डोक्यात घालून, रात्रंदिवस ती त्या मुलाच्या सेवेसाठी असते. हे कुठून येतं? हे एवढे त्यागाचे जीवन पण वाटते का त्याग आहे? कसंही करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल हीच आस्था ह्या देशात बायकांना आहे. आणि आहे. अजून  पुष्कळांना आहे. तेंव्हा बाहेरचं Read More …