Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …