Talk of the Evening Eve of Diwali (India)

Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007. [Marathi translation from Hindi talk] आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, भांडणे नाहीत; ते या सृष्टीवर दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी, वाईट लोकांना नष्ट करण्यासाठी अवतार घेतात. सर्व ठिकाणी होत आहे. मी पाहते आहे, की जे दुष्ट लोक आहेत ते उघडे पडत आहेत, आता सर्वत्र हे घडत आहे. आपल्या सर्वांचे काम हे आहे, की त्यांना बाजूला करा. जे दुष्ट आहेत, वाईट आहेत पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात असे सर्वजण नरकात जाणार. आम्हाला माहीत नाही की किती नरक आहेत. आता ज्या वातावरणात आपण बसला आहात, ज्या जागेवर बसला आहात, याचा नरकाशी काहीही संबंध नाही. पण आपण यात राहून अधर्मासारखे वागाल, चुकीचे काम कराल तर आपणसुद्धा नरकात जाल. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत आणि तिथपर्यत पोहचण्याची व्यवस्था देखील खूप चांगली ठेवली आहे. कारण त्यामुळे तिथे जाणाऱ्यांना माहीत नसते, की आपण कोठे चाललो आहोत. जे उरतात ते स्वर्गात जातात. या पृथ्वीवरील कोणाला माहीत नाही, की वाईट काम करणाच्या सर्वांना नरकात जावे लागते. दिवाळीचा अर्थच हा आहे, की आपण जसे बाहेर दिवे लावतो तसे आपल्या सर्वांच्यात देखील ते प्रज्वलित झाले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे, की या अंध:कारातील वातावरणात आपण सर्वजण प्रकाश आहात, दिवे आहात. आपल्याला प्रकाश पसरावयाचा Read More …