Shri Lakshmi Puja Chalmala, Alibag (India)

लक्ष्मी पूजा – अलिबाग (भारत) १९९१ (श्री माताजींचे स्वागत गीत) माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले |  माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले | माँ का नाम अति मिठा है, कोई गाके देख ले || आ जाती है माँ कोई, बुलाके देख ले | माँ का नाम अति मिठा है || (श्री माताजींचा जयजयकार) श्री माताजी निर्मला देवी की जय ………………………….. की जय………………………….. की जय ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलोय आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला, की लोकांची दारू सुटली, हि फार मोठी गोष्ट आहे. ह्या कोकणात दोन त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे , जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालं आहे बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहजयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंध पडले. त्या बद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे, हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं , तिकडे विचार नाही, पैशे किती नासतात तिकडे विचार नसतो. तेव्हा तर सहजयोग असा पसरत गेला; मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे, निरनिराळ्या इथल्या  खेड्यातन्– पाड्यातून सहजयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जातील आणि अत्यंत त्रासात आहेत ते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मिचं स्थान, लक्ष्मिची Read More …

Welcome Puja at Chalmala Chalmala, Alibag (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या की आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, ‘अणू-रेणूहनही थोडका , तुका आकाशाएवढा.’ मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टीकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, Read More …