Public Program Angapur (India)

Shri Mataji is welcomed by the sahajis at the public program. Bhajans are sung. Shri Mataji’s speech starts at time 21.45आपणा सर्वांचा उत्साह आणि प्रेम बघून, एका आईचं हृदय किती गहिवरू शकतात हे समजण्याची क्षमता तुम्हा आयांना असू शकते मुलांना असू शकते. कारण हा देश आईंचा देश आहे. आईची थोरवी इथे  माणलेली  आहे आणि महाराष्ट्राची आई बहुतेक सुज्ञ बाई असते. आपल्या अंगापूरच्या योगभुमीत, आधी रामदास स्वामींनीच तपश्चर्येने पुष्कळ कार्य करून ठेवलेलं आहे. परवा तुकारामांच्या भजनात एक अभंग म्हणून दाखवला, तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. एक महत्त्वाचा निरोप – हा मार्ग, परमेश्वराचा मार्ग फार सहज सरळ आणि सुलभ होणार आहे. या सर्व साधू संतांनी आमच्यावर फार मेहरबानी केली, त्यामुळे लोकांना आज महाराष्ट्रात आज जाणीव आहे, की  आत्मसाक्षात्कार शिवाय जगात काहीही दुसरं मौल्यवान नाही.  पण ही जाणीव इथे दिसत नाही की, किंवा आपण असं म्हणूया, हिंदुस्थानात ही जाणीव कमी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात संतांची फार मोठी देणगी आहे. आणी तो वारसा त्यांनी गीतेतुन, ज्ञानेश्वरी सारखी सुंदर कविता रचून,  अनेक ग्रंथ लिहून, लोकांना जाणीव दिली की आत्मसाक्षात्कार म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे आणि त्यातच सगळं काही आहे. पण त्या संतांच्या सांगण्यावरून, आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, या दिवसाची वाट पाहणे, हे सुद्धा काहीतरी  विशेष पूर्वसर्वतामुळे  घडतं. म्हणून असं म्हटलं पाहिजे की अंगापूर आणि सातारा जिल्ह्यातले जी  लोक इथे आलेली आहेत, त्यांची काहीतरी पूर्व पुण्याई ही फार असली पाहिजे,  पूर्व सुखरूप काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी इतके लोक मला सहज योगी दिसत आहेत. सहज योगाचे लाभ किती आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते तुम्हाला परत परत काय सांगावे. पण एक गोष्ट Read More …

Public Program Angapur (India)

अंगापूरच्या या पंचक्रोशीत या पवित्र भूमीत आज येत आलं त्या साठी मी इथल्या सहजयोग्यांचे फार आभार मानते . अंगापूर बद्दल बरीच माहिती मी आधी वाचली होती . श्री रामदास स्वामींना इथे श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती मिळाल्या त्यांनी त्या चाफळ मध्ये नेऊन ठेवल्या . त्याही मी पहिल्या आहेत . तेव्हा कधीतरी अंगापूरला जावं अशी माझी फार इच्छा होती . हि पवित्र घटना आहे आणि त्या एका घटने मुळे रामदास स्वामी नि अनेक ठिकाणी श्री हनुमानाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे . त्यांनी जे कार्य केलं ते समाजोन्मुख होत ,समाजाकडे त्यांची द्रीष्टी होती . समाजाला परमेश्वरी ओळख झाली पाहिजे ,परमेश्वर मिळवल्या शिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही हि त्यांची ठाम समजूत होती . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं कि हा परमेश्वरी साक्षात्कार करायला किती वेळ लागतो . त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्यांनी सहज शब्द अनेकदा वापरला पण सहज लोक नाहीत त्यांची वृत्ती सहज नाही . त्याला कारण श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात . एक तामसिक लोक असतात दुसरे राजसिक असतात आणि तिसरे सात्विक लोक असतात .  तामसिक लोक ते असतात जे काहीतरी चुकीचं डोक्यामध्ये भ्रामक घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागे सगळं आपलं आयुष्य घालवत असतात . आणि राजसिक लोक ते असतात ज्यांना चूक आणि बरोबर यातला फरक कळत नाही वाईट काय आणि चांगलं काय यातला फरक कळत नाही . हे अशे राजसिक लोक असतात . आणि तिसरे सात्विक लोक असतात जे परमेश्वरच नाव घेतात कारण त्याना माहित आहे कि सन्मार्गाने एकदा आपण वागलो कि आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल . ह्या विचाराने जे राहतात ,या ध्येयाने जे राहतात ते खरे सात्विक म्हणायचे . जे लोक उगीचच देवाचं नाव Read More …