Public Program

(India)

1985-02-02 Public Program Marathi, Sadoli Khalsa India DP-RAW, 64'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

ताराराणी हायस्कूल चे संचालक , तसेच शिक्षक वृंद , कोल्हापूरचे अबालवृद्ध आणि आसपास च्या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . आजचा विषय सहजयोग तर आहेच आणि सहजयोगावर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं आहे कि सहजयोग म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला योगाचा जन्मसिध्द अधिकार . सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . हि जिवंत क्रिया आहे . आणि ती जिवंत क्रिया आपल्या मध्ये घाटीत होते त्या साठी काहीही क्रिया करावी लागत नाही . अक्रियेत ते घडत हे मागच्या वेळेला तुम्हाला समजावून सांगितलं होत . पण महालक्ष्मीच्या परिसरात बसल्यावर हि महालक्ष्मी कोण ?तिचा आपला काय संबंध? ,आपण देवळात जाऊन काय मिळवायचं ? वैगेरे ह्या गोष्टींची कुणाला माहिती नाही . देवळात जायचं खणानारळानीं ओटी भरायची एव्हडं जे साधुसंतांनी सांगितलेलं आहे तेव्हड आपण करतो . तिच्या परिसरात राहून तिच्या आशीर्वादाने हि सश्यशामला भूमी पुनीत झालेली आहे तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा ती आपली एक प्रवृत्ती आहे . तरी सुध्दा हि महालक्ष्मी कोण ?हि महालक्ष्मी तत्व रूपाने आपल्या मध्ये वास करत असते . आणि जी सुषुम्ना नाडी अशी जी आपल्या मध्ये जी मधोमध आपल्या मध्ये आहे ,जिच्यातून कुंडलिनीच उत्थापन होत त्या नाडीला महालक्ष्मीची नाडी असं म्हणतात . डावी कडे महाकाली आणि उजवी कडे महासरस्वती ह्या दोन्हीच्या मिलनानी बनलेल जे मधोमध अशी पोकळी आहे ह्या पोकळीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात . म्हणजे महालक्ष्मी हि सुषुम्ना नाडी आहे आणि तिच्यातूनच कुंडलिनीच उत्थापन होत म्हणून जरी हि महालक्ष्मी आहे तरी तिच्या समोर जाऊन आपण उदे उदे आंबे असं म्हणतो . अंबा हि कुंडलिनी आहे . जो आपण जोगवा म्हणतो तेही तेच आहे . ग्रामीण विभागा मध्ये जोगवा म्हंटला जातो ते हि कि तुम्ही मला जोगवा द्या . म्हणजे पैसे मागणे नव्हे . योग द्या . उदे उदे अंबे ,तुझा जर उदय झाला ,तुझी जर आमच्यात जागृती झाली तर आम्हाला योग मिळेल याला जोगवा म्हणायचं . हे आपल्या ग्रामीण विभागातून लोक रोज गात असतात . पण ते काय आहे याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही . हि जी महालक्ष्मीची शक्ती आपल्या सुषुम्ना नाडीत वास करते ,ह्या महालक्ष्मीच्या तत्व मुळेच आज आपण एका अमिबा पासून माणूस झालो आहोत . 

हि धर्म धारण करण्याची शक्ती आहे . म्हणजे आधी आपण एक कार्बन म्हणून एक जड मात्र होतो . त्या ठिकाणी गणेश शक्ती आहे . त्याच्या नंतर जेव्हा माणूस हा नुसता अमिबा स्तिथीत असतो आणि जेव्हा पासून त्याच जीवन सुरु होत त्याच्यात जिवंत पणा येतो . तेव्हा महालक्ष्मीची शक्ती कार्य करते . त्याच्या मध्ये आपण धर्मधारणा  करतो . जनावरांचा धर्म वेगळा तसाच मानवाचा सुध्दा एक धर्म असतो असं म्हंटल तरी चालेल . तर कार्बनची चार व्हॅलेन्सीज आहेत तर माणसाला दहा व्हॅलेन्सीज आहेत . म्हणून माणसाचे दहा धर्म आहेत . जर तो धर्मातून चुत झाला तर हि कुंडलिनी चढू शकत नाही . कारण ती सुषुम्ना नाडी आहे ,तिच्या मध्ये काही तरी विकृती येते . हि महालक्ष्मी जिला आपण रात्रन्दिवस मानतो हि स्वतः सूक्ष्मां मध्ये जरी महालक्ष्मी स्वरूप असली आणि सुषुम्ना नाडी स्वरूप असली तरी सुध्दा तरी जडामध्ये डॉक्टर लोक तिला पॅरासिम्फाटेटिक नर्व्हस सिस्टीम म्हणतात . जेव्हा आपल्याला कोणतेही कार्य करायचं असल ,समजा आपल्याला धावायचं असल तर आपण धावू लागतो . आणि धावताना आपली गती जास्त होऊ शकते . आणि त्या गती मुळे आपण आपल्या हृदयाची गती पण वाढवू शकतो . पण एकदा थांबल्यावर हळू हळू  हे आपलं हृदय परत आपल्या स्तितीत जेव्हा येत ती स्तिती स्थापकता परत आपल्या जागेवर जी सहजच जी शक्ती आणते तीच महालक्ष्मीची हि शक्ती आहे . तिला पॅरासिम्फटेटिक नर्व्हस सिस्टम असं म्हणतात . आणि त्या बद्दल डॉक्टरांना काहीही विशेष माहिती नाही . ह्या  शक्ती मुळे माणूस जे काही कार्य करीत असतो ते ह्या शक्तीच्या अनेक ठिकाणी उत्क्रांतीच्या वेळेला जी अनेक अवतरण झाली त्यांनी चक्र बनली आहेत . 

म्हणजे विष्णूची जेव्हडी अवतरण झाली ,नारायणाची जेव्हडी अवतरण झाली त्यांनी चक्र आपल्या मध्ये बनली आहेत . आणि त्या चक्रान मुळे आपलं उत्थान झालं आहे . हि चक्र आपल्या मध्ये सुषुम्ना नाडीवर अशी बरोबर बसलेली आहेत . आणि ह्या चक्रान मध्ये ज्या देवता आहेत त्या जर आपण जागृत केल्या तर आपल्याला जो हा चक्रांच्या विकृती मुळे झालेला शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक किंवा धार्मिक त्रास आहे तो नष्ट होतो . तेव्हा जी महालक्ष्मी इथे स्तीत आहे तीच माहात्म्य समजण्यासाठी तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध झाल्याशिवाय ते समजत नाही . कुणी सांगितलं कि हि महालक्ष्मी आहे ?आणि हि साडेतीन वेटोळे घातलेली कुंडलिनी जी हि ह्या महाराष्ट्रात पठारात आहे आपल्याला माहीत आहे माहूरची महासरस्वती रेणुका देवी , आणखीन तुळजापूरची भवानी ,कोल्हापूरची महालक्ष्मी ,आणि सगळ्यांच्या वर जी आदिशक्ती जिच्या पासून ह्या तीन शक्ती झाल्या आहेत ती वनीला नाशका जवळ जिला सप्तशृंगी असं म्हणतात . हि महालक्ष्मी शक्ती जी आहे त्यांनीच माणसाच्या धर्मधारणे मुळे त्याला ज्ञान प्राप्त होत . ज्ञानाचा अर्थ बुध्दिनि जाणणे ते नव्हे . ज्ञानाचा अर्थ बोध आहे . ज्याला आपण वेद म्हणतो तो वेद शब्द सुध्दा विद पासून आला . म्हणजे आपल्या नसांवर जे आपण जाणले आहे ते खरं ज्ञान आहे . एखाद्या आंधळ्याला तुम्ही जर रंगाबद्दल विचारलं तर त्याला समजणार नाही . एखाद्या जनावराला तुम्ही जर म्हंटल कि तू ह्या घाणेरड्या गल्लीतून जा तर तो सरळ निघून जाईल . पण माणसाला ते सहन होणार नाही . कारण आपल्या उत्क्रांतीत मनुष्य स्तितीत आपण आल्यावर आपल्याला घाण सहन होणार नाही . पण पापाची घाण सहन होते कारण अजून आपण त्या उच्च स्तीतीला पोंहोचलो नाही जिथे पापाची घाण आपल्याला सहन होत नाही . हि सुषुम्ना नाडी जिच्यातून हि कुंडलिनी जागृत होते . तीच पीठ संबंध विश्वाचं तुमच्या कोल्हापुरात आहे . पण कुठेही जा मग ते नाशिक असो कोल्हापूर असो किंवा बनारस कुठल्याही क्षेत्र स्थळी भामट्यांचं राज्य झालं आहे . सगळ्या जगातले भामटे देवी वरती कसा आघात करावा असा विचार करून तिथे पोहोचले आहेत . जगातले सगळे दारुडे ,जगातले सगळे पापकर्म करणारे ,जगातले सगळे मांत्रिक आहेत जे दुसऱ्यांना त्रास देतात अशा सर्व घाणेरड्या लोकांना येऊन इथेच रहायला मिळत ,ते पोटभरू लोक आहेत . काहीतरी खोट सांगून ,भोंदूपणा करून तुमच्या कडून पैसे घ्यायचे . तुम्हाला फसवायचं आणि हे देवीचं स्थान आहे इथे सगळे भक्तगण येतील त्यांच्यात काहीतरी विकृती करून टाकायची . हे त्यांचं कार्य असत . कारण भक्त गण हे येणार देवीच्या देवळात . कारण ती मोक्याची जागा आहे . आणि त्याच ठिकाणी त्यांना वार केला पाहिजे . 

आता आपली युध्द तलवार घेऊन होणार नाही ,तलवारीचे दिवस गेले . आता सत्य आणि असत्य याचा झगडा चालू झाला आहे . त्यात जे सत्य धरतील त्यांच्या वरती असत्याची नेहमीच वाईट द्रीष्टी असणार पण शेवटी सत्यमेव जयते .एक दिवस असा येईल कि सत्य समोर येईल . ह्या महालक्ष्मीच्या देवळा मध्ये आपण काय प्राप्त करतो ?काहीही लोकांना माहित नाही . किंवा यातून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे ,देवळात आपण का जातो ?किंवा काय त्याच्यातून मिळणार आहे . ज्या  लोकांना चैतन्याच्या लहरी आलेल्या आहेत ,आमच्या बरोबरचे पुष्कळ आता चौदा देशातले सहजयोगी आलेले आहेत ते योगी आहेत . त्यांना मी म्हंटल तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात जाऊन बघा तर तिथे गेल्यावर ते म्हणाले कि इतकं सुंदर वातावरण होत ,चैतन्याच्या इतक्या लहरी होत्या . ह्या चैतन्याच्या लहरी त्यांना ज्या जाणवतात त्या सर्वसामान्य माणसाला जाणवत नाहीत . पण आपल्याकडे वयोवृद्ध लोकांनी ,मोठमोठ्या संतांनी ,द्रष्ट्यानी हे सांगितलं कि महालक्ष्मी म्हणजे हे जागृत स्थान आहे . पण हे कशावरून याला जाणण्या  साठी तुमच्या जवळ काही एकमेव असे साधन नाही आहे . ज्यांनी तुम्ही म्हणू शकाल कि खरोखर हि महालक्ष्मी ती आहे . जिच्या मुळे आपलं उत्थान होत . जिच्या मुळे आज आम्ही अमिबा पासून माणूस झालो . हे सांगण्यासाठी आपल्याजवळ काहींनाही म्हणून तुम्ही आधी आत्मबोध घ्या नाहीतर आमच्या भाषणाचा आणि हे सर्व सांगण्याचा काहीही अर्थ लागणार नाही . आम्ही सांगतो ते खर किंवा खोट हे तिथे जाऊन पाहण्या साठी पहिल्यांदा आपल्याला आत्मबोध आला पाहिजे . 

आपल्या देशात अनेक चमत्कार झालेले आहेत . पण लोकांना आत्मबोध नसल्यामुळे त्यांनी संताना नुसतं छळून काढलं . जर त्यांना त्या वेळेला आत्मबोध झाला असता तर संतांचा एव्हडा छळ झाला नसता . हा आत्मबोध जो आपल्याला घडतो हा आपला जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो आपण प्राप्त केलाच पाहिजे . कुणी म्हंटल हे स्वयंभू आहे त्याला काही अर्थ आहे का . आता हि फॉरेनची लोक आहेत त्यांना महालक्ष्मी कशाशी खातात .गणपती कशाशी  खातात ते माहित नाही आपल्यालाही माहित नाही विशेष . पण ह्यांना तर ग पासून सुरवात असताना सुध्दा महालक्ष्मीच्या देवळात जाऊन तिथे काय झालं ते मला सगळं सांगायला लागले . ती आपली स्तिती अली पाहिजे . पण मी म्हणते कोल्हापुरात सगळ्यात कमी सहजयोगी आहेत . आश्चर्याची गोष्ट आहे ज्या ठिकाणी महालक्ष्मीच्या ऐश्वर्यानी लोक नटलेत ,तिच्या कृपेत वाढतात तिथे सगळ्यात कमी जागृती . हा विरोधाभास समजत नाही . आणि इथे भामट्यांचं एव्हडं राज्य पसरलेलं आहे कि पुष्कळांना असही वाटत कि माताजी सुध्दा एक भोंदू असतील . वाटत ते बरोबर आहे त्याला माझी हरकत नाही . पण तुम्ही एखाद्या सायंटिस्ट प्रमाणे आपलं डोकं उघड करून बघितलं पाहजे . कि खरोखर माताजी म्हणतात ते खोट कि खर . ह्या सुषुम्ना नाडीमुळेच शेवटी सत्य जाणवलं जात आणि उत्क्रांतीचा मार्ग आहे तो . अमिबाला किती सत्य माहित होत म्हणजे किती विद होत ,नसांवर त्याला किती जाणवत होत ,आज एक माणूस आहे पुढची गोष्ट करतो पुढचे मनोरे बांधतो . कितीतरी काम तो करू शकतो . हे सगळं करण्याची त्याला जी शक्ती आली ती ह्या महालक्ष्मीच्या कृपेमुळे . तिने तुम्हाला ह्या स्थराला आणून सोडलं आहे . आणि तिच्याच मुळे तुम्ही त्याच्या वरच्या स्तराला म्हणजे आत्मतत्वाला प्राप्त होणार आहे . हि केव्हडी मोठी तिची कृपा आहे . ती शक्ती जरी आपल्या मध्ये असली तरी ती आपल्याला अजून लाभली नाही . तिच्या शी  आपला  काहीसुद्धा अजून संबंध झालेला नाही . ह्या महालक्ष्मी तत्वाला आपण कस जागृत व्हायचं आणि ते कस मिळवायचं हे तुम्ही सहजयोगात शिकू शकता . हि कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि ती जागृत झाली पाहिजे असं अनेकांनी सांगितलं  . परवा एक गीता वाचणारे गृहस्थ माझ्याकडे येऊन म्हणाले कि गीतेत कृष्णांनी या बद्दल नाही सांगितलं काही . अहो जेव्हा तो गीता सांगत होता तेव्हा युध्द समोर सुरु होत . त्यांनी हे सांगितलं कि तुम्ही स्तीतप्रज्ञ झालं पाहिजे . तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . कसा ते नाही सांगितलं . त्याचा अर्थ असा नव्हे कि त्यांनी कुंडलिनी ला काहीच महत्व दिल नाही . म्हणून ज्ञानेशांचं महत्व आहे कारण त्यांनी सहाव्या अध्यायामध्ये कुंडलिनी हि आहे आणि त्या कुंडलिनीच जागरण सुषुम्ना नाडीतून होऊ शकत आणि त्यामुळे आत्मसाक्षात्कार घडतो असं स्पष्ट पणे लिहिलं आहे . पण त्यावर अतिशहाणे जे असतात त्यांनी सांगितलं कि सहावा अध्याय वाचायचा नाही . आणि सर्व लोकांनी सहावा अध्याय असा मिटवून ठेवला . कारण सहावा अध्याय वाचला म्हणजे तुम्ही लोक सगळे संन्यासी होता . असं काहीही कुणी सांगितलं कि तुम्ही लोक खुळ डोक्यात घेऊन बसता . त्या सहाव्या अध्यायातच त्याच जेव्हडा गाभा आहे तो दिलेला आहे . ज्ञानेशांना समजायचं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे . इकडची तिकडची पुस्तक घालून आणि विद्या घालून ज्ञानेश्वरी समजणार नाही . 

ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं ,कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषूनी दयावे पसायदान . हे पसायदान . ते घ्यावे . हे पसायदान आम्ही घेतलं पाहिजे . हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं . ते गेले एकीकडे आणि भलत्याच कामाला आपन लागलेलो आहोत . आणि दिंड्या घालत बसतो . अर्थात भक्तिमार्ग काही  चुकीचा नाही . भक्तीचा हा मार्ग घेतला पाहजे त्यामुळे परमेश्वराकडे आपलं लक्ष असत . पण भक्ती मार्ग हे काही ध्येय नाही ,ध्येय काय आहे तर आपल्याला आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे . आत्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे . हे त्याच ध्येय आहे आणि जर ते गाठलं नाही तर तुम्ही त्या मार्गातच इकडे तिकडे फिरत राहिलात तर त्या मार्गाला सुध्दा काही अर्थ राहणार नाही . पण हि सुज्ञता हा विवेक आपल्या मध्ये कमी होत चाललेला आहे . विशेष करून ज्या ठिकाणी क्षेत्र असतात तिथे . कारण अशा ठिकाणी आपण सगळ्या भामट्याना बघतो . भामट्याना बघितलं कि वाटत कि असं कस जर महाकाली किंवा महासरस्वती किंवा महालक्ष्मी ह्या एव्हड्या मोठ्या शक्त्या आहेत तर ह्या  भामट्याना  ह्यांनी इथे कस बसू दिल . हे तुमच्यावर अवलंबून आहे . त्या शक्ती स्वरूप आहेत . पृथ्वी तत्वांनी तुम्हाला हे दिलेलं आहे तरी सुध्दा तुमची कुठे प्रवृत्ती आहे ,हजारो माणस त्या भामट्यांकडे जातात . नंतर इथे घागरी फुंकतात . घागरी फुंकणं म्हणजे नुसती भूतविद्या . भुतांचा अंगात संचार होण्याला आपण देवीचा संचार होणं म्हणतो . या पेक्षा अजून काय सांगणार . अहो हि भूत असतात . देवीला कुणाच्याही अंगात यायला काहीतरी बघावं लागत ना . सोपं काम आहे का . तीच चरित्र बघा ,तीच वागणं बघा ,तिच्यात काही देवी स्वरुपत्व असेल तर देवी येणार ना . ती भूत आली  कि आपल्याला वाटत कि काही विशेष आहे आणि त्यात आता तंत्रिकांनी हे घागरी फुंकण्याचे काम सुरु केलेलं आहे . आणि मला इतकं वाईट वाटलं कि प्रत्येक नवरात्रीत इथे हे घाणेरडं काम होत असत . हे अत्यंत घाणेरडं काम आहे त्यामुळे एकदिवस देवी रागवून जाणार . आणि अजून चालूच आहे . ते काही संपतासंपत नाही . कुणा एखाद्या बाईच्या अंगात आलं कि सगळे तिच्या पायावर . हि तामसिक प्रवृत्ती आहे . कोणत्याही चुकीच्या गोष्टीला आपल्या डोक्यावर बसवून घ्यायचं ,त्याच्या साठी खुळ व्हायचं . हि तामसिक वृत्ती आहे . 

दुसरी सुशीक्षीत ,वैचारिक लोक आहेत त्यांची दुसरी प्रवृत्ती असते कि चांगलं आणि वाईटच समजत नाही . देवळात कशाला जायचं ,देवळात काय आहे ,तिथे जाऊन उपयोग काय ,तिथे जाऊन आपल्याला काय फायदा होतो . त्यांनी आर्थिक फायदा काय होतो . हे सगळे भामटे बसलेले असतात . हि एक प्रवृत्ती झाली . मग देवच नाही ,देव आहे किंवा नाही ,चांगल तरी कशाला राहायचं . चांगुलपणानी काय फायदा होतो . अशा रीतीने त्यांची बुध्दी अहंकाराला बळी पडते . पण जी खरी सात्विक मंडळी आहेत ती मात्र देवाला ओळखतात ,आणि देवाच्या चरणी लिन होतात . आज ह्या महालक्ष्मीच्या परिसरात मी गेले होते तर मला आश्चर्य वाटलं तिथे दुकान घातली आहेत लोकांनी . पैशाचा नुसता व्यवहार चाललेला आहे . महालक्ष्मी तत्व हे पैशाच्या पलीकडे आहे . ज्या माणसाला लक्ष्मी पूर्णपणे मिळते सर्व्ह तो महालक्ष्मी कडे वळतो . महालक्ष्मी तत्व हे पैशाशी संबधीत नाही . पैशांच्या पलीकडे गुणातीतात  आहे . म्हणजे पैशांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम माणूस भोगतो ,त्यांनी झालेले त्रास भोगतो . जशे आज परदेशात आहेत . परदेशामध्ये तरुण मुल सुध्दा आज आत्महत्येला निघाले आहेत . त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही असं का करता तर म्हणतात आम्हाला जर कुठे सुखच मिळाल नाही तर आता आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे . त्यांच्या जवळ मोटारी आहेत घर आहेत सगळं आहे तरी पण आम्ही आता आत्महत्या करणार त्याच्या शिवाय आम्हाला मार्ग नाही . तिथे इतके सामाजिक प्रश्न आहेत . तिथे इतके भयंकर हानी चे प्रकार चालले आहेत . ते बघितलं कि असं वाटत कि आपला देश अजून कितीही गरीब असला तरी लोक जिवंत आहेत . भयंकर लोक स्तितीत चाललेले आहेत ,इतकी मूर्ख  पणाची काम करतात . पिना तोंडात घालायच्या किंवा केसांना रंगवून घ्यायचं . नागव होऊन फिरायचं . काहीही प्रकार त्यांचे चालू असतात . त्याला काही अर्थ नाही . म्हंटल तुम्ही हे का करता ,तर यात काय वाईट आहे ?तुम्ही कशाला असं म्हणता . अशा एकंदर परीस्तीतीला बघताना लक्षात येत कि सांपत्तिक परिस्तिथी जरी सुधारली तरी आपलं डोकं ठीक होत नाही . आपलं हृदय ठीक होत नाही ,आपल्यात स्वच्छता येत नाही . कितीही शिक्षण तुम्ही घ्या ,काही करा तरी सुध्दा त्याला काहीही अर्थ रहात नाही . 

इथे जे लोक आलेले आहेत ते फार विद्वान आहेत ,फार मोठे शिकलेले ,phd ,mad म्हणते मी त्यांना . अशे सगळे लोक आलेले आहेत , आणि त्यांना असं लक्षात आलं कि आम्ही इतकं शीक्षण घेऊन ,पैसे कमवून ,सगळं करून आता काही आम्हाला मिळालं नाही .तेव्हा आता महालक्ष्मी तत्वात उतरणे . म्हणजे आमचं आता उत्थान झालं पाहिजे ह्या मानव स्तितीच्या पलीकडे जी अतिमानव स्तिती जी आहे ती आम्हाला आली  पाहिजे .  ती सहज रित्या भारतीय लोकांना येते ,विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना . हा महाराष्ट्राचं आहे अनादी काळापासून म्हणूनच सर्व साधुसंतांनी इथे जन्म घेतला . पुष्कळशा अवतरण णांनी इथे पायधूळ झाडली . हा असा विशेष देश आहे आणि त्या देशात तुम्ही जन्माला आले . त्यातून साडेतीन वेटोळे घालून विश्वाची कुंडलिनी जी इथे बसलेली आहे . त्याची साडेतीन पीठ मी आपल्याला सांगितली . अष्टविनायक त्यांच्या सेवेला उभे आहेत . अशा परिस्तितीत एक मराठी माणूस करतो काय . त्याच लक्ष कुठे आहे ?एक तर तो अशा भामट्यांच्या पाठीमागे वाया जातो किंवा कुणीतरी टुम काढली काही तर त्यांच्या मागे धावतो . किंवा देव नाही अशा आरोळ्या घालत असतो . देव आहे तो तुमच्यात आहे तो तुम्हाला अजून मिळालेला नाही . म्हणून तो नाही असं म्हणून आपण आपल्यात जो संघर्ष करत आहोत तो थांबवला पाहिजे . देव हा तुमच्या मध्ये आहे . आणि त्याची फक्त जागृती व्हायची आहे . तो जर तुमच्या चित्तात आला तर तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता . तुमच्या मध्ये सामूहिक चेतना येते . म्हणजे तुमचं काहीतरी रूपांतर होत . म्हणजे तुम्ही एका नवीन स्तीतीला येता . जी स्तिती तुमची नवीन होते तिला द्विज असं म्हणतात . द्विज म्हणजे असं कि ज्याचा पुनर्जन्म झालेला आहे . पुनर्जन्म झाल्याबरोबर तुमच्या हातातून थंडथंङ असं ,आदिशंकराचार्यानी सांगितलं आहे सलीलां सलीलां अशी गारगार झुळूक यायला लागते . आणि सगळीकडे हि पसरलेली हि विश्वव्यापी शक्ती ती जाणवायला लागते . हि जर जाणवली नाही तर त्यात आमचा दोष नव्हे त्यात तुमचाही दोष नव्हे . त्यात काहीतरी सुषुम्नानाडीच चुकलेले आहे . ते बघायला पाहिजे . जर सुषुम्नानाडीच काही चुकलेले असलं तर ते नीट केलं पाहिजे . ते जर नीट झालं तर कुंडलिनी म्हणजे हि अंबा उठली पाहिजे . आणि उठल्यावर तुम्हाला पार केलं पाहिजे . हे सर्व विश्वाचं तत्व आहे . ते फक्त एका धर्माच ,एका राष्ट्राचं कुणाचं नाही सर्व विश्वाचं तत्व आहे . आणि ह्या तत्वामध्ये तुम्ही आत्म्यामध्ये जागृत झालं पाहिजे .असं सगळ्यांनी सांगितलं आहे .  फक्त आपल्या देशामध्ये कोणत्याही धर्मामध्ये कोणत्याही तऱ्हेची संघटना आपण न केल्या मुळे इथे फार मोठमोठाले गुरु ,साधुसंत ,द्रष्टे ,अवतरण झाली आणि त्यांनी हे प्रस्थापित केलं कि जो पर्यंत आत्मबोध होत नाही तो पर्यंत देवाची ओळख पटत नाही . रामदास स्वामींना विचारण्यात आलं कि ह्या आत्मसाक्षात्काराला किती वेळ लागतो ?त्यांनी सांगितलं तत्क्षण झाला पाहिजे . त्यांना लोकांनी विचारलं कि प्रपंच सोडून परमार्थ केला पाहिजे का ?तर ते म्हणाले प्रपंच सोडून परमार्थ होत नाही . स्पष्ट त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या असून सुध्दा आपण अजूनही त्या गोष्टी समजून घेत नाही . विशेष करून शिवाजी महाराजांनी सांगितलं होत कि स्वधर्म जागृत झाला पाहिजे . 

स्वचा धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म . आणि स्वच तंत्र जाणलं पाहिजे . म्हणजे या योगामध्ये कुशलता अली पाहिजे . असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होत . इतकंच नव्हे पण ज्ञानेशानी सांगितलं आहे ,जेव्हा त्यांनी पसायदान मागितलं तेव्हा त्यांनी ज्याज्या इच्छा केल्या त्यातली एक फार सुंदर इच्छा आहे स्वधर्म सूर्य विश्व पाहो ,सर्व विश्वानी हा स्वधर्माचा सूर्य पहिला पाहिजे . अशी त्यांनी इच्छा केली . आणि तो सूर्य तुमच्या हातात आहे . तो तुम्ही मिळवून घेतला पाहिजे . त्याचा आदर केला पाहिजे . त्याची इज्जत केली पाहिजे . आणि तुम्ही स्वतः त्याला प्राप्त झाला ते मिळवलं पाहिजे . उगीच गोष्टीं मध्ये ,भ्रामकते मध्ये वेळ घालवू नका . भांडण करून ,वितंडवाद करून होत नाही . हि बुध्दिच्या पलीकडची गोष्ट आहे . तेव्हा उगीचच बुध्दीला ताण  देऊ नका . माझ्या मते आज जेव्हडी मंडळी अली आहेत ती पार होऊन सहजयोगाला लागली तर कोल्हापूरला पुष्कळ कार्य झालं असं म्हणावं लागेल . आणि कोल्हापुरात इतकी जर मंडळी सहजयोगी झाली तर एकेक माणूस एकेक हजार काय दहा दहा हजार लोकांना पार करू शकतात . त्यांना हि शक्ती येते . तेव्हा सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहजे . तसच बायकांना जेव्हा हि शक्ती येते तेव्हा त्यांना समजत कि आपण कोणत्या प्रकारे दुसऱ्याच भलं करू शकतो . स्वतःच भल करू शकतो आणि जे कृष्णांनी योगक्षेम वाहामयं सांगितलं आहे कि योग झाल्या नंतरच क्षेम होणार आहे ते कस घडत ते बघितलं पाहिजे . कारण तुम्ही मग परमेश्वराच्या साम्राज्यात जाता . आम्ही प्रत्येक वेळी कोल्हापूरला आलो आहोत ,पुष्कळ मेहनत केली ,वर्षाहून वर्ष आलो आहोत पण तरी सुध्दा इथे काही सहजयोग जमत नाही . त्याला कारण एक हेही असू शकत कि सहजयोगामध्ये जी मंडळी आली आहेत त्यांच्या मध्ये काही लोक फार निगेटिव्ह आहेत . आणि त्यांच्या मुळेपण पण सहजयोग जमत नसेल असं माझं निदान लागलेलं आहे . तरी सुध्दा आपण आपली प्रगती करून घ्यायची . आणि अशे लोक आम्ही काढून टाकू ,तुम्ही स्वतःच्या प्रगतीला प्राप्त व्हा . प्रत्येक माणूस हे करू शकतो . त्याला कुणाचा काही तुम्हाला वारसा लागत नाही किंवा तुम्हाला काही विशेष जून असल पाहिजे असहि नाही किंवा तुम्ही फार जाणलं असल पाहिजे अशी नाही . हळू हळू सगळं जाणत जातात फक्त एव्हडं लक्षात ठेवायचं कि सगळी तयारी आपल्या आत मध्ये फक्त दिवा पेटवण्यासाठी आपण बटन दाबतो तसाच हा दिवा पेटवला जातो . आमचं देणंघेणं काही लागत नाही . कारण एक पेटलेला दिवा जर दुसऱ्या दिव्याला पेटवतो तर मग देणंघेणं काय लागत ?तुमची तयारी आहे तुम्हाला ते प्राप्त व्हावं आणि त्याच्या मध्ये लाभ झाल्यानंतर तुमची तुम्ही पूर्णपणे प्रगती करून घ्यावी अशी माझी आपल्याला विनन्ती आहे . 

आज बघू किती लोक पार होतात . झाल्यानंतर मात्र जर लोक यात बसले नाहीत आणि ध्यान लावल नाही तर मात्र मी काही करू शकत नाही . आता सांगलीला आमचा प्रोग्रॅम झाला आणि सांगली हे गाव कोल्हापुरा पासून दूर आहे तरी तिथली व्यवस्था चांगली दिसते ,तिथली जमीन अजून सुपीक आहे . तिथे जर बी घातलं तर त्याचे वृक्ष होतील असा मला पूर्ण विश्वास आहे . आता कोल्हापुरात ह्या देवीच्या कृपेमध्ये तुमची काय स्तिती होणार आहे ते बघायचं . तेव्हा कृपा करून तुम्ही कोल्हापूरचे लोक आहेत ,इथे कोल्हासुराला देवीने मारले आहे तेव्हा असा कोल्हासुराला तुम्ही मानता कि देवीला मानता हे बघितलं पाहिजे . हि स्तिती आजची जी आहे ती वास्थुस्तीती अशी आहे कि लोकांच्या डोक्यातच घुसत नाही सहजयोग . आणि तो कसा घुसवायचा ,कसा समजावून सांगायचा याचा माझा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे . पण लोकांच्या डोक्यातच घुसत नाही कारण दुसरं काहीतरी घुसलेल असल म्हणजे हे कस जाणार ?म्हणून आपण सगळ्यांनी सहजयोग प्राप्त करावा . आत्म्याचं स्वतःच दर्शन घ्यावं आणि सच्चीदानंद जे आत्म्याचं स्वरूप आहे ते ओळखून घ्यावं . सांगायचं म्हणजे भाषण कितीही मोठं दिल तरी सुध्दा सर्व विषय मी आज सांगू शकत नाही . फार मोठा विषय आहे हा आणि आज हजारो माझी भाषण मराठी ,हिंदीत ,इंग्लिश मध्ये आहेत . तिन्ही भाषेत माझी हजारो भाषण आहेत तेव्हा आजच्या भाषणात जेव्हड मला सांगता आल तेव्हड मी सांगितलं . आता आपली आपण जागृती करून घेऊया आणि जागृती नंतर मग आपण पुढे कस वागायचं साधना कशी करायची त्या साठी केंद्रावर आलं पाहिजे . केंद्रावर आल्याशिवाय हे कार्य होणार नाही . देव कृपेने इथे तुम्हाला एक केंद्राची जागा मिळाली आहे ,काही पैसे खर्च करायला नको ,काही मेहनत नको फक्त थोडासा वेळ परमेश्वरा साठी दयायचा ,तो पण स्वतःच्या स्वार्थासाठी . स्वचा अर्थ लागला म्हणजे तुम्ही स्वार्थ मिळवला . ह्या साधुसंतांनी पण सुंदर शब्द लावलेले आहेत ,स्वार्थ ,हा स्वार्थी आहे असं म्हणणं म्हणजे ती शिवी नाही आहे ती . खरोखर जो माणूस स्वार्थी असेल तो स्वचा अर्थ मिळवून घेईल . तसाच तो समर्थ होतो . समर्थ झाल्यावरती मग त्याला काहीही सांगावं लागत नाही ,तो स्वतःचाच गुरु होऊन स्वतःलाच बर करतो ,दुसऱ्यांना बर करतो आणि सर्व देशाची अशी उन्नती झाल्यावर सर्व विश्वाची सुध्दा आपण उन्नती करू शकतो . मी प्रश्न या साठी विचारत नाही कारण काही भांबावलेले लोक येतात आणि काहीही विचारतात . आणि सगळ्यांना अस्वस्थ करून सोडतात . ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी मला लिहून दयावेत त्याची उत्तर मी त्यांना लिहून देईन . आता आपल्याला आश्चर्य वाटेल कि चौदा देशातून इतके लोक आलेले आहेत त्यांच्या पेक्षा कमी पुरुष इथे आलेले आहेत . म्हणजे त्यांच्या समोर तरी कस दिसत ते बघा . म्हणजे इथले लोक कुठे भरकटलेले आहेत समजत नाही . आता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं कि इथे देवीचं इतकं सुंदर मंदिर आहे तिथे इतके कमी लोक सहजयोगा साठी कसे आले ?. त्यांना समजत नाही हि गोष्ट . कारण त्यांच्या एकेका देशात हजारो लोक सहजयोगात उतरले आहेत . ते मग मुसलमान असो ,हिंदू ,ख्रिश्चन ,शीख असोत ,हजारो लोक सहजयोगात उतरले आहेत . आणि आपल्या देशात मात्र लोकांचं लक्ष परमेश्वराकडे नाही . जे इतके भाग्यवंत आहेत ,ज्यांना देवाने एव्हडा वारसा दिलेला आहे . त्यांची हि स्तिती आहे . ह्यांच्या कडे बघा म्हणजे हे नुसते जड तत्वात म्हणजे नुसते मटेरिअलिझम मधेच वाढलेले नाहीत . अध्यात्मिकात सुध्दा हे तुमच्यावर जातील . पण जर तुम्ही अध्यात्मिकात उतरले तर तुमच्या जवळ पुंजी फार मोठी आहे ,संपदा फार मोठी आहे . त्या संपदेवर तुम्ही फार मोठे होऊ शकता . मग हे तुमच्या पायावर येतील . पण आपली स्तिती समजली पाहिजे . आपली संपदा ,संपत्ती समजली पाहिजे . आल्या बरोबर त्यांनी मला सांगितलं कि कोल्हापुरात देवीचं एव्हडं स्थान आहे तर इथे इतके थोडेसे लोक कसे ?. असो जितके आहेत त्यांनी यावेळी पार व्हायचं आणि सहजयोगाचा प्रचार करून सहजयोग कसा वाढवायचा ते शिकून घ्यायचं . 

आता एक साधं करायचं आहे . सहजयोगात काही क्रिया करायची नसती विशेष फक्त आपल्याला संतुलनात यावं लागत . त्या साठी डाव्याहातामध्ये जी शक्ती आहे ती इच्छा शक्ती आहे . आणि त्या शक्ती मध्ये आपण काय काय मिळवलेलं आहे ,आणि काय काय चुका केलेल्या आहेत त्या बद्दल आपण कोणतीही कमीपणाची भावना घेतली नाही पाहिजे . माझं हे चुकलं ते चुकलं काही झालं तरी परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे असं समजून तुम्ही डावाहात माझ्याकडे करायचा आणि गणेशाचं नाव घेऊन आपला उजवा हात या पुण्य भूमीवर ठेवा . चष्मे ,टोप्या काढून ठेवाव्यात कारण ब्रह्मरंध्र छेदायचं असत . त्याच्या नंतर मी फक्त उजवा हात माझ्याकडे करायला सांगीन आणि डावाहात आकाशाकडे करायला सांगीन . मागच्या बाजूला . फक्त ह्या दोन क्रिया आहेत संतुलनासाठी . महासरस्वती आणि महाकाली च संतुलन साधायचं . आणि डोळे मिटून ठेवायचे ,मी सांगितल्या शिवाय डोळे उघडायचे नाहीत . लक्ष डोक्यावर  टाळूकडे ठेवायचं .आणि मनात एकच शुध्द इच्छा ठेवायची कि आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळायला पाहिजे . इतकच नव्हे तर ह्या शक्तीच जे कौशल्य आम्हाला आल पाहिजे . अशी इच्छा करायची . योगाचा अर्थ असा आहे कि परमेश्वराशी संयोग होणे . आपला संबंध ह्या सर्व व्यापी शक्तीशी झाला पाहिजे . आता डाव्याहाताकडे लक्ष ठेवायचं . त्या हातामध्ये गारगार असं काहीतरी येतंय असं वाटेल . कोल्हापूरच्या लोकांची फार मोठी जबाबदारी आहे . तुम्ही तीच देणं लागता . येतंय का गारगार बघा . सूक्ष्म आहे ते . आता  उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावाहात वर आकाशाकडे .आता हि क्रियाशक्ती आहे . आपण वापरलेली आहे सर्व तऱ्हेने . सर्व प्रथम आपल फार मोठं काहीतरी चुकलेले हं लेकरं आपण कोणतीही क्रिया करून क्षमा करत नाही . म्हणून मी सर्वाना क्षमा केली असं म्हणायचं .   कारण ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांना तुम्ही क्षमा केलीत कि त्यांच्या कचाट्यातून तुम्ही सुटता . म्हणून मी सर्वाना क्षमा केली असं म्हणायचं . आणि आमचं काही चुकलं असेल तर त्यालाही क्षमा कर म्हणायचं . आता असा निश्चय करायचा कि मला आत्मसाक्षात्कार झाल्यावर मी सहजयोग पूर्णपणे शिकून त्यात सिद्ध होईन . आता डोळे हळूहळू उघडायचे माझ्याकडे बघायचं आणि निर्विचारात बसायचं . दोन्ही हात माझ्याकडे . तुम्हीच आमच्या कुलस्वामिनी आहात का असा प्रश्न विचारायचा . तीनदा असा प्रश्न विचारायचा . आता दोन्ही हातातून गार यायला लागेल . . आता दोन्ही हात एका नंतर एक डोक्यावर धरून बघायचं टाळूतून गार येतंय का . आता दोन्ही हात आकाशाकडे वर करून विचारायचं कि हि च ब्राम्हशक्ती आहे का . हीच सर्वव्यापी परमेश्वराची प्रेम शक्ती आहे का . हीच ऋतुंभरा प्रज्ञा आहे का . आता हात खाली करून बघा हातात गार येतंय का . अशा प्रकारे तुमच्या कुंडलिनीचा सहस्रार भेद झालेला आहे . या पुढे आता तुम्ही इथे केंद्रावर आल पाहिजे . हे सामूहिक कार्य आहे . हे जंगलात एकट्याने बसून करण्याचा सहजयोग नाही आहे . केंद्रावरच सामूहिकते मधेच तुमची वृध्दी होणार . सगळ्यांना एकत्र बसून ध्यान केल्यावरच लाभ होणार . त्याच ठिकाणी हे कार्य घडत . 

आता कुंडलिनी जागृत करण्याआधी कवच कस घ्यायचं ते तुम्हाला सांगते . देवीचं कवच असत ते कस घ्यायचं ते बघा . कवच हे आपल्या सात चक्राना द्यायचं असत त्याचे सात प्रकाशाचे आपल्याकडे पुंजे आहेत . त्यांना आपण आधी आपल्या हातातून वाहण्याऱ्या शक्तींनी आधी त्याला संरक्षण दिल पाहिजे . ह्यांनी फार आपल्याला लाभ होतील . घरातून बाहेर पडताना सुध्दा आपण बंधन घेतल तर त्याचा फार फायदा होतो . आता कृपा करून डावाहात असा माझ्या कडे करायचा आणि उजवा हात असा डावी कडे घालायचा आणि डावीकडून असा डोक्यावरून घेऊन असा उजवीकडे आणायचा म्हणजे एक बंधन बसलं . असं सात वेळा करायचं . आता कुंडलिनी कशी जागृत करायची ,तुम्ही जिथे बसला आहात त्याच ठिकाणी कुंडलिनी तुमच्या समोर आहे . तर हा डावाहात कुंडलिनीच्या समोर असा ठेवायचा . आणि उजवा हात त्याला असा फिरवायचा जसे आपण घड्याळाचे काटे फिरवतो . 

तसेच फिरवत दोन्ही हात डोक्यावर घ्यायचे आणि वर आकाशाकडे बघून अशी फिरत देऊन एक गाठ बांधायची . हे असच तीनदा करायचं . आता बघा हातात चैतन्य येतंय का . आता तुम्ही संत झाले . “आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला “. तेव्हा सर्व संतजनांना आमचा नमस्कार . 

आता पुढे काय करायचं त्यासाठी हे केंद्र आहे . तेव्हा सर्वानी इथे एकत्रित व्हावं ,आणि सगळ्यांनी मेहनत करावी . आणि जे आपलं साध्य आहे ते पूर्णपणे संपादित करावं . पूर्णत्वाला जा . आता सगळ्यांनी बसल्या ठिकाणाहून मला नमस्कार करावा . या बद्दल चर्चा करता येत नाही . आपल्या शांततेत राहायचं . हि जी शांतता आहे तीच आत्म्याची खूण आहे . ह्या शांततेत आनंद वाटेल . आणि साक्षी झाल्यासारखं वाटेल . नाटक संपलं असं वाटेल . आणि बघत राहायचं कस कस आपल्यामध्ये ह्या आत्म्याचा प्रकाश हळूहळू कसा येतो . आणि आपलं चित्त कस शुध्द होत जात . आणि आपल्याला कसा आनंद मिळतो . फक्त साक्षी रूपाने बघत राहायचं . तेव्हड एकदा स्थापित झालं म्हणजे सहजयोग किती  मोठी गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल .