Public Program (morning)

Musalwadi (India)

1985-01-21 Public Program Marathi, Musalwadi, India DP-RAW, 73'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

मुसलवाडीच्या सर्व गावकऱ्यांना आमचा नमस्कार . 

आपल्या देशामध्ये आपण अजून पुष्कळ अंधारात आहोत . ते अजून आपण समजून घेतलं पाहिजे . आपल्या देसाची अशी दुर्दशा का म्हणून लोक विचारतात . हि मोठी भारी योग भूमी ,महाराष्ट्र म्हणजे फार मोठी पुण्य भूमी आणि संतांची भूमी . हे सगळं असताना आपल्या देशाची अशी दशा का होती आहे . आता आम्ही गेलो होतो एका खेडेगावात त्याच नाव कोमलवाडी आणि तिथे कानिफनाथांची समाधी आहे . असं लोकांनी शोधून काढलं . ते सहजयोगीच शोधून काढू शकतात . कारण चैतन्याने कळत . आता आम्ही जस मुसलवाडीला म्हसोबाचं स्थान आहे हे शोधून काढलं ते सुध्दा चैतन्याच्या दमावर . आणि तिथे बघितल्यावर एकदम दुष्काळ ,भयंकर परिस्तिथी .लोक अगदी वाईट मार्गाला लागलेले काही विचारू नका ,असं वाटलं कि नरकात आपण आलो कि काय . आणि जिकडे पहाव तिकडे म्हणून काही हिरवं असं दिसतच नव्हतं . त्यांनी सांगितलं पाच वर्षातून एकदा पाऊस पडतो आणि पडला तरी थोडा पडतो . आता हिवाळ्यात हि स्तिती तर उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी पण मिळणार नाही . मग एकानी प्रश्न विचारला कि माताजी हे एव्हडे कानिफनाथ इथे असताना ,एव्हडं त्यानी इथे काम केलं मग अशी स्तिती का ?प्रश्न येतो कि नाही कि देवाचं एव्हडं साम्राज्य आहे तर मग लोकांना एव्हडा त्रास का होतो आहे . म्हणजे कारण असं आहे कि कानिफनाथांना फार छळल इथल्या लोकांनी . ते जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना छळल ,तो मुसलमान ,अमका ,ढमका म्हणून त्यांचे नुसते हाल करून टाकले . त्या शिवाय असं म्हणतात कि त्यांना मारून टाकलं . म्हणून त्या अशा दुसऱ्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला . कुणीतरी तिथे समाधी बांधली पण ती समाधी बघून तर मला रडू कोसळलं . त्याच्यावर थोडे बहोत दगड होते आणि कशीतरी ती रचलेली दगडांची लहानशी अशी समाधी होती आणि त्याच्यावर टाकलेले एक लहानसं फाटलेलं कापड होत . हि त्यांची आपण इज्जत केली . ज्यांनी एव्हडं तुमच्या साठी केलं त्याची हि इज्जत आणि त्याच्यातून थंड थंड अशा लहरी येत होत्या . चारीकडे अगदी सामसूम होत एकही पान हलत नव्हतं . पण तिथून अशा थंड थंड लहरी येऊन ते कापड हालत होत . असे ते जिवंत असताना त्यांना एव्हडं छळलं आपण मग त्याची आता फळ नको भोगायला ?

संत साधूंना जे छळलं आहे त्याची आधी  आपण फळ भोगतो आहोत . सीतेला छळलं ,रामाला छळलं कुणाला सोडलं नाही . त्याची आपण फळ भोगायला नकोत . एक गोष्ट हि ,त्याला कारण काय तर अंधता . आपल्याला द्रीष्टी नाही ,द्रीष्टी नसल्या मुले कोण साधू कोण संत हे समजत नाही . ज्ञानेश्वरांना आपण छळलं आहे . मुक्ताई कुठल्या कुठे जाऊन ब्राम्हणी इथे का मेली ?तिचा जन्म कुठे झालेला ,राहिली कुठे ती ,मग मुक्ताई ब्राम्हणीला येऊन का मेली . ?आपण लक्षात घेतलं पाहिजे . आपल किती चुकलेलं आहे ते आपण लक्षात घेत नाही आणि देवाला दोष देत बसतो . दुसरं म्हणजे काय स्तिती आपण लोक म्हणजे कोणाचंही जे जून आहे ,जे कुठून पुस्तकात आलाय ,एखादा गुरु बाबा येऊन त्यांनी काही सांगितलं कि झालं . आणि जस एखाद्या घाण्याला जसा बैल आपण बांधला आणि त्याला झापड घातली कि तो आपला गोल गोल जसा फिरतो तसे आपण फिरत असतो . हा विचार करत नाही कि असं आपण का करायचं ?आता भक्तिमार्गी लोक आहेत कबूल ,भक्ती मार्ग केला पाहिजे कशाला ?मार्ग कशासाठी असतो कि ध्येय गाठलं पाहिजे ,अहो मार्गातच रुळत राहायचं म्हणजे त्याला काही अर्थ आहे का त्या मार्गाला . आपल्याला जर शिडी मिळाली तर शिडीने वर चढून जायचं ,आत मध्ये यायचं हा प्रश्न आहे का शिडीवरच फिरत राहायचं  . म्हणजे भक्ती मार्ग काही वाईट नाही पण त्या भक्तिमार्गावरच रुळत राहिले तर त्या भक्तिमार्गाला तरी काय अर्थ राहणार . 

परवा मला एक वारकरी पंथाचे होते त्यांनी बोलावले . कि माताजी वारकरी पंथांच्या इथे या . त्यांना बघून तर मला रडायलाच आलं कारण इतके रोड झालेले ते लोक ,ती स्तिती त्यांना कँसर झालेला इथे तंबाकू खाऊन खाऊन ,अगदी रोड त्यांच्या अंगावरती कपडा नाही काही नाही . अहो तो विश्वेश्वर ,तो श्री कृष्ण ज्याने सुदाम्याला सोन्याची द्वारका दिली त्या एव्हड्या मोठ्या देवांचा तो स्वतः धन्वंतरी मग त्यांनी या लोकांना एव्हडे रोग कसे दिले असणार?. कुणी प्रश्न विचारेल ,बाहेरचा माणूस विचारेल कारे बाबा तू एव्हडा देवाचा भक्त महिना महिना वारी करता मग तुझी अशी स्तिती का आहे ?. काही काही लोकांचं डोकंच बिघडलेलं म्हंटल झालं काय ?म्हणे हे भ्रमिष्ट झाले , कसे झाले म्हंटल ?कसे झाले तर म्हणे असं डोकं फोडलं म्हणे तिथे लोकांनी . मग हे काय हे देवाचं काम झालं का ?असं कस होऊ शकत ?जो देव एव्हडा मोठा कृपाळू ,एव्हडा आनंद देणारा ,सुख देणारा साक्षात जो धन्वंतरी असा श्री कृष्ण आहे तर त्याच्या दर्शनाला गेलेले लोक असे का ?हा विचार केला पाहिजे . जर आपण विचारच केला नाही तर आपण तामसिक लोक आहोत . तामसिक लोकांचं वैशिष्ट असं असत कि जे चूक असत ते मानून त्याच्या पाठीमागे आपलं सर्व आयुष्य घालवायचं . हे तामसिक लक्षण आहे . जे चूक आहे ,निरर्थक आहे त्या गोष्टी वरती बसायचं आणि म्हणायचं कि नाही हेच मुख्य आहे . म्हणजे एखाद्या मुलासाठी एखाद्या आईच मरण ,त्याच्या साठी सगळं करन सगळं काही एका मुलासाठी दाव्यावर लावायचं हे तामसिक लक्षण आहे . हे तामसिक लक्षण आपल्यामध्ये फार आहे . आपण मुलांवर माया करतो कबूल पण मुलबाळ हि सुध्दा एका सीमेपर्यंत ठीक आहेत . सगळी कडे त्यांच्यासाठी मरण मग ती सून अली कि तिला छळणं ,मुलाला सुने पासून हटवण हे सगळं काम आपलं चालू असत . तामसिक पणाची हि सगळी लक्षण आहेत . 

याच्या नंतर आणखीन पुष्कळ प्रकार आहेत आपल्या कडे ,याच्या नंतर जातपात काढली आपण खरोखर जात म्हणून काही  गोष्ट आणि आहे हि मी तुम्हाला सिध्द करून देते ती अशी कि आता गीते मध्ये म्हणे लिहिलं आहे ,. शक्यच नाही  . व्यास कोण होते ,कोळीणीचा मुलगा तो हि असा तसा झालेला ,वाल्मिकी कोण होते ?कोळी होते . सगळ्यांना माहित आहे ना ,रामानी भिल्लिणिची बोर खाल्ली ती हि उष्टी . आपल्याला जातपात हि जी डोक्यामध्ये गोष्ट आलेली आहे हि अगदी चुकीची आहे कि ती जी जन्मापासून असते . तुम्ही कुणाच्या उदरात जन्माला आला त्याला जातपात म्हणता येत नाही . जात म्हणजे तुमची प्रकृती काय आहे ?तुम्ही तामसिक आहात ,राजसिक आहात कि सात्विक आहात ह्या तीन प्रकृत्या वरती जाती अवलंबल्या आहेत . फक्त तीनच जाती जगामध्ये आहेत . बाकी सगळं जे भांडण लोकांनी काढलं आहे ते अगदी चुकीचं आहे . ज्यांनी ब्रम्हाला जाणण्याचा प्रयत्न केला तो ब्राम्हण असला पाहिजे ,तो सात्विक असला पाहिजे . तस दिसत का तुम्हाला ?पोटभरू लोक पैसे खातात तुम्हाला खोट बोलतात अशा लोकांना तुम्ही मानाल का ते साधुसंत आहेत म्हणून ?पण आपलं लक्ष त्या चुकीकडे च जायचं आणि ,जे नेमकं चुकीचं आहे ते घ्यायचं आणि जे सत्य आहे ते धरायचं नाही हे तामसिक लक्षण आहे . आणि अशा तामसिक पणात आपण फसल्या मुले आपली प्रगती होत नाही . ते काढलं पाहजे . आपलं जे चुकल आहे ते चुकलेलं आहेच . 

आता मग जातीतीत ,जातीतच लग्न करायचं म्हणजे आता एक जात आहे तेल्याची त्या तच लग्न करायचं . मग त्या तेल्यान बडवून मुलीला  पाठवलं तर बाकी तेली कुणी याला सांगायला तयार नाहीत कि तू हुंडा नाही दिलासा ,अमूक नाही दिलंस उलट सांगायचं काही लाज न वाटता आम्ही एव्हडा हुंडा घेणार ,हे घेणार ते घेणार म्हणून . हा तर जातीपातीचा प्रकार आपल्याकडे . तेव्हा हि जातपात आपल्या देशातून जायला पाहिजे . खरी जात म्हणजे तुमच्या मध्ये तीन जाती आहेत ,पहिली तामसिक म्हणजे जे खोट त्याला मुख्य मानून आपण चालायचं ,आता जेल मधून माणूस सुटून आला आणि त्याने भगवे वस्त्र घातले आणि बाबाजी म्हणून आला तर झाले ,सगळे गेले त्याच्या पायावर ,पालखी अली म्हणे . हा काय प्रकार काय आहे ते समजत नाही . कधीतरी यातून निघायला पाहिजे हो . हजारो मानस अशी खायला नाही घरात अन्न अन्न दशा झालेली आणि या लोकांना तुम्हाला पोसायला आणि कशाला पाहिजे . तुम्ही गृहस्थाचे लोक या संन्याशांना तुम्हाला कशाला पोसायला पाहिजे . स्वतः विचार केला पाहिजे आणि ते जे खरे होते त्यांना मात्र छळले होते . तुकारामांना आपण छळलेलं आहे ,साईनाथ एव्हडे मोठे होते पण मुसलमान ,अमका ,तमका म्हणून त्यांना पण आपण छळलेलं आहे . 

मुसलमानांचंही तसच आहे ते आपापसात भांडत बसले जातपात घेऊन . डोकं फोडत राहिले एकदुसऱ्याचं . मग हिंदू मुसलमानांचं भांडण म्हणून गांधीजींनी सुध्दा या आत्ताच्या आधुनिक काळात येऊन सांगितलं कि बाबा तुम्ही लग्न जातीच्या बाहेर करायला सुरवात करा . ते जर असे म्हणाले असते कि फॉरेन मध्ये लग्न करा तर त्यांना दहा दहा गोळ्या घातल्या असत्या . पण त्याच म्हणणं असं होत कि विश्वधर्म स्थापन झाला पाहिजे . जगामध्ये एक विश्वधर्म आहे सर्व धर्माचं तत्व ,सार घेऊन तुम्ही जर त्यांची प्रार्थना वाचली ,सुरवाती पासून त्यांनी जी सुरु केली त्याच्यात गणेशापासून सर्व देवदेवतांच वर्णन ,अल्लाहो अकबर ,त्याच्या नंतर ते पारशांचा नंतर सगळ्या धर्माच ख्रिस्ती धर्माच आहे ,सगळ्यांचं जे सारभूत ते जमवून ती अशी त्यानी प्रार्थना मांडलेली आहे . कारण गांधी आश्रमात त्याच्या बरोबर मी राहिलेली आहे आणि अजूनही ते तशीच प्रार्थना करतात . 

आता बरोबर आहे याना मदत करायची आहे सगळं काही . पण हे कशाला आले ,आम्ही भारतात लोकांच्या कडे शिकायला आलो . आता तुम्ही म्हणाल माताजी आमच्या कडे काय शिकायला आहे ?पुष्कळ आहे तुम्हाला माहित नाही काय आहे ,मुख्य  म्हणजे बघता तुम्ही एवढ्या गरीब परिस्तितीत तुम्ही झोपड्यातुन राहता पण इतके तुम्ही आनंदात आहे . हे राजसिक लोक यांचं आणि डोकं दुसरं चालत . ते कस असत कि चूक काय आणि बरोबर काय तेच कळत नाही याना . यांच्या साठी चूकही चांगलं आणि चांगलं हि चांगलं . अशातले हे विक्षुब्ध झालेले लोक आहेत . त्याच्या डोक्यामध्ये अगदी संबंध कन्फयुजन स्तिती असते . त्यांना हे समजत नाही कि चागलं काय आणि वाईट काय . डाव्या हातानी खायचं कि उजव्या हातानी खायचं हे सुध्दा कळत नाही . तुमचं पण बघा तुमची स्तिती काय आहे ,तुम्ही कसही असलं तरी खुश असता ते बघितलं कि त्यांना कौतुक वाटत . आपला अहंकार घालवण्या साठी ते येतात . ज्या माणसाला अहंकार आला त्याला वाटत आम्ही कसेही वागलो तरी काय झालं . कसे राहिलो तरी काय झालं असा अहंकार आला म्हणजे मनुष्य वाट्टेल तसा वागायला लागतो . म्हणजे शिवाजीला म्हणायचं तू कुणबी आहेस ,आणि कुणबी राज्य करू शकत नाही ,मराठाच बसला पाहिजे . मग आता सगळे राज्यकर्ते तुमचे मराठा बसलेत काय ?त्यावेळेला एव्हडं बोलायला झालं एव्हड्या मोठ्या माणसाचा तुम्ही अपमान केला . काय गांधीजींना सुध्दा ते विलायतेतून आले त्याना म्हणे प्रायश्चित्त करा . म्हणून त्यांना नाशकाला झुकवलं यांनी . एव्हडा मोठ्या माणसाला सुध्दा झुकवलं ह्यांनी . पण गांधीजींना वाटलं मी झुकलो नाही तर माझं कुणी ऐकणारच नाही म्हणून जाऊद्या गाढवांच्या पुढे बोलायचं म्हणून ते हि मान्य केलं त्यांनी . पण मी आता सांगते हे जे सगळे मूर्ख पणाचे धंदे आहेत ते सर्व सोडले पाहिजेत . आणि शहाणपण घेतलं पाहिजे . नाहीतर ह्या देशाचं भलं होणार नाही . काही सरकारला दोष देण्यात अर्थ नाही ,राज्यकर्त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आपणच मूर्ख आहोत . नसत्या गोष्टी आपण घेऊन बसतो आणि मग हे असं होत . आता ह्या लोकांचं उलट झालेलं आहे ह्यांची डोकी अहंकारानी भारली गेल्या मुळे ह्याच्यात काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे म्हणजे इथं पर्यंत कि नाका मध्ये पिना घालून बसतात . 

विचारलं का तर म्हणे यांच्यात काय वाईट ?. पण कशाला घालायचं ,हे असलं आहे . तुम्हाला अजून हे कळत कि हे वाईट आहे कि चांगल आहे पण तरी सुध्दा वाईट आहे तिकडे धावणार . माहित आहे कि ते वाईट आहे . हा दांभिक माणूस ,आहे हा चोर ,आहे हा भामटा आहे ,देवाला पैसे नाही लागत पण पैसे घेतो कळत पण तरी तिकडे जायचं . कळत दारू पिणं वाईट आहे पण तरी तिकडे दारू प्यायला जायचं . कळत तंबाकू खाण वाईट आहे पण तरी खायचं . त्याच्यात काय वाईट आहे ?दारू पिण्यात ,तंबाकू खाण्यात काय वाईट आहे ?आपलं डोकं फोडून घेण्यात काय वाईट आहे ?हि ह्यांची परिस्तिथी ती त्याची परिस्तिथी आम्ही दोन्हीच्या मधोमध आहोत . मधोमध काय असत तर सात्विक गुण असतो . सात्विक गुणांमध्ये मनुष्याला अचूक कळत कि जे चांगलं ते धरायचं . तो सात्विक गुण आल्याशिवाय आपलं भलं कस होणार . चांगलं काय तिकडेच आपलं लक्ष नाही . किती म्हंटल शिस्त घाला ,किती म्हंटल सुसंस्कृत करा तरी सुध्दा होत काय मनुष्य एकदा स्वतंत्र तेला प्राप्त झाला कि वाट्टेल तसा वागू लागतो . 

आता पुष्कळांना असं वाटत कि आमची जर आर्थिक परिस्थिती ठीक झाली तर आम्ही ठीक होऊ . हि गोष्ट खोटी आहे . पैशाने कोणी मनुष्य ठीक होत नाही . आता पुष्कळ लोक इथे अशे आहेत कि त्याच्या जवळ मोठमोठाले घर ,दोन दोन तीन तीन मोटारी आहेत खूप श्रीमंत लोक आहेत . पण त्याची परिस्तिथी ठीक नाही . दोन दिवस नवरा बायको म्हणून राहतात मग सोडून जातात . मुलबाळ सुध्दा जिकडे तिकडे सगळे अनाथालयात . आणि हे पण चाळीस एक वर्षाचे झाले कि सगळे अनाथालयात पडतात . सगळ्यांना नावरां नाही न बायको नाही न मुलबाळ नाही . हि ह्यांची दुर्दशा . तेव्हा ह्यांच्या पासून काय शिकायचं आहे . ?आणि लोक मला म्हणाले माताजी तुम्ही इथं ख्रिस्ती धर्म घेऊन आले . अहो ख्रिस्ती धर्मानी यांचं काय भलं केलय मी तुम्हाला शिकवायला ख्रिस्ती धर्म मला काय समजत नाही का ?,कोणच्याही धर्मातील तत्व एकमात्र आहे पण हे तरी ते कुठं पाळतात किंवा तुम्ही तरी कुठे पाळता तुमच्या धर्मातलं ?तुमच्या धर्मातलं जे मूलभूत तत्व आहे आत्म्याला जाणून घ्यायचं तिकडे कुणाचं लक्ष आहे का ?नाही . जे सांगितलं ठासून ठासून ते आपण करायला तयार नाही ,कुंडलिनी हि आहे हे सर्व हिंदू धर्मातच सांगितलेलं आहे . तस प्रत्येक धर्मात लिहिलेलं आहे पण इतकं विषद ,सुलभ करून आपल्या देशात ल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे . आणि इतकं सगळं सांगून ठेवलेलं असून सुध्दा आपण जातपात घेऊन भांडत बसतो . आपण नुसते तामसिक लोक . 

दुसरं असं कि सात्विक माणसाची अजून एक ओळख असते कि त्याला संतसाधुंची ओळख असते . कोण खरा कोण खोट ते समजत . कुणी ढोंगी माणूस आपल्या अंगावरती भस्म फासून आला तर त्याला तो देव मानणार नाही . तुम्हाला मी सांगते माझी नातं आहे पार झालेली जन्मलेलीच आहे तर ती एकदा लढाख ला गेली तिचे आईवडील बरोबर होते तर तिथे एक लामा बसला होता एका ढिगावर जाऊन आणि तिथे जाऊन सगळे त्याच्या पाया पडत होते . हिला काय बघवेना ,पाचच वर्षाची होती ती त्याच्या समोर जाऊन कंबरेवर हात ठेऊन उभारली आणि म्हणाली कारे म्हणे तू हे भगवे कपडे घातलेस आणि डोकं मुंडवून घेतलंस म्हणजे तू साधू झालास कि काय ?. काही नाही म्हणे तू खोटारडा आहेस . हे दोघे घाबरले कि एव्हडीशी पोरगी काय बोलते आहे . मी खर ते सांगते खाली उतर सगळ्यांना पायावर कशाला घेतो आहेस ?. पण ते सात्विक म्हणून कळलं . ती सात्विकता आल्याशिवाय तुम्हाला कळणार कस ?म्हणजे आता इथे आम्ही का मान केला मुसळवाडीला ,ह्याला आम्ही का मान्यता दिली ?जागृत स्थान हे ,आता म्हसोबा म्हणजे काय ?हे तरी माहिती आहे का कुणाला ?ते सुध्दा माहित नाही . आता म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहेत हि . आता त्यांचंच अवतरण होणार आहे म्हणजे ज्याला आपण कार्तिकेय म्हणतो ते . ते घोड्यावर येतात . त्यांची ओळख पटायची असली तर वीर गावाला जाऊन बघा तिथे घोड्यावरून उतरले होते तिथे पाणी सुध्दा पाझरतंय . त्यांनी टाच मारली तर तिथून पाणी येतंय . तर हे म्हसोबा म्हणजे कोण तर हे कार्तिकेय ,यांच्या मध्ये भैरवनाथा नच स्वरूप जास्त आहे . त्याच्यामुळे हे शेवटी येणार . आणि अकरा रुद्राची शक्ती आहे ,त्यामुळे सगळ्यांचं हनन करतील जे वाईट मार्गाला गेलेले आहेत . मग ते तामसिक असोत नाहीतर राजसिक असोत . फक्त सात्विक लोकांना बचावणार आहेत ते . हे म्हसोबा ,हे एकादश रुद्र तुमच्या इथे आहेत हे आम्ही ओळखून काढलं ते कोणी साधुसंत असतील तर ओळखू शकतात . पण साधुसंत असायला पाहिजेत . अशा म्हसोबाचं इथे स्थान झालेलं आहे कारण जेव्हा देवींनी मुसळांनी मारलं होत त्याला राक्षसाला त्या राहुलl  त्या वेळेला भैरवाने मदत केली होती म्हणून इथे म्हसोबा आहेत पण ते म्हसोबा म्हणजे नुसते भैरव नाहीत तर त्यात अकरा रुद्र आहेत म्हणजे भयंकर विध्वंसक शक्ती आहे ती . आणि ते पांढऱ्या घोड्यावर येऊन सगळ्यांचा नाश करणार आहेत शेवटी . असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे . ते कुणी सांगायचं नाही . 

तेव्हा आता तुमची म्हणे कुलंथोरवी . अहो कुलंथोरवी म्हणजे काय तर सरळ गोष्ट अशी आहे तुमचं कुळ काय विचारलं तर तुम्ही काय सांगणार ?काय सांगणार ?आमचं कुळ काय ?कुळ कस सांगायचं असत ,कोणच्या देवीची उपासना करता ?कारण आपल्याकडे कुलस्वामीनींनीच आपण कुळ ओळखतो ना . मग आता तो कोणच्याही जातीचा असेना ,मराठा असो ब्राम्हण असला नाहीतर कोणच्याहि जातीचा असला त्यांची जी कुलस्वामिनी ,ती सगळ्यांची एक म्हणजे त्या सगळ्यांची कुळ एक झाली किनई . कळलं किनई . मग तुम्ही कस म्हणता जातपात अली . जर देवीवर अवलंबून आहे तर आता रेणुकादेवी आपल्या माहूरच्या ज्या आहेत त्यांना कुठे कुठे लोक मानतात . सगळ्या जगामध्ये ,कुठे गेलं तर राजपुताना देखील रेणुका देवीचं कुळ आहे . राजपुतान्या मध्ये जे लोक आहेत क्षुद्र जातीतले लोक सुध्दा त्यांना मानतातम्हणून माहूरच्या लोकांनी काय ठेका घेतलेला आहे तेव्हा हि कुलंथोरवी सुद्धा तुम्ही म्हणता ती सुध्दा जाणली पाहिजे कि ज्यांनी ज्यावेळी देवीची भक्ती केली त्यावेळेला ती देवी आली ज्यांनी भक्ती केली ते त्या कुळातले . आता तुम्हाला आमच्या कुळा बद्दल माहित नाही कि आम्ही इकडचेच आहोत . म्हणजे शालिवाहनांचे वंशज आहोत . आता आमचं ते कुळ झालं पण आमच्या शालिवाहनांच्या च वंशजा मधेच समजा जर एखादा वाईट माणूस निघाला तर तो आमच्या कुळातला नाही . मी वाळीत टाकणार त्याला . टाकलं पाहिजे . पण तस करत नाही आपण . तेव्हा मग तो मनुष्य मग त्या कुळातला नाही . तो कुळ खराब झालं ते निघून गेलं . असं धरायला पाहिजे ना तस होत नाही तो कुळातच राहणार . कितीही वाईट वागला ,काहीही केलं तरी तो कुळातच राहतो . मग आहे काय त्यात . अशा कुळाला काही अर्थ आहे का . देवी प्रसन्न होईल का ?स्वतः विचार असा केला पाहिजे कि ज्या देवीला आपण प्रसन्न केलं ,जी देवी आपण पुजली ,जिला आपण कुलस्वामिनी मानतो ,जिच्या नावाने आपण पत्रिका वैगेरे वाटतो त्या कुलस्वामिनीला पटेल असं आपलं वागणं आहे का .?ती खरी कुलंथोरवी . मी परवा विचारलं शिवाजी ची कोण आहे कुलस्वामिनी ?कुणाला माहित नाही . कात्यायनी त्याची कुलस्वामिनी . पण जगदंबा जी भवानी होती ती जाधवांची . तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जाधव तुमच्या इथे येऊन राहिले होते लखुजी जाधव . तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांना हे ब्राम्हणी गाव जागीर म्हणून दिली होती शालिवाहनानी . हे सगळं काही कुणाला माहितीच नाही आहे . म्हणजे ते इथे येऊन साक्षात तुमच्याइथे अहमदनगरला येऊन आश्रयाला राहिले होते . ह्या सर्व गोष्टी आहेत कि नाही त्या शास्त्रात बघाव्यात ,इतिहासात बघाव्यात . ते सगळं खरं आहे . पण त्या साठी . भांडण्या सारखं काय आहे . तेव्हा जे तामसिक लोक असतात ते नुसतं मागचच घेऊन बसतात . आता बापदादाचे दादाचे झालं सगळं ,गेले ते आता . सोडा ते आता कशाला घेऊन बसले . मागच धरून जे बसतात ,गत जे धरतात भविष्याकडे जे लक्ष देत नाहीत ते तामसिक लोक आहेत . आणि जे लोक नुसतं भविष्य च बघत बसतात कारण भविष्य हि रहात नाही ते असे राजसिक . पण जे बरोबर ह्या वेळी वर्तमान काळात राहतात ते सात्विक लोक आहेत तस तुम्ही सात्विक राहील पाहिजे . तो खरा विश्वधर्म स्थापन झाला पाहिजे . तो तूमच्या सगळ्यान मध्ये आहे ,तो विश्वधर्म हिंदुधर्माच्या एका मूलभूत तत्वावरती आहे कि आपल्याला आत्मबोध झाला पाहिजे . म्हणजे कोणत्याही धर्माला अपमान करायचा नाही . कोणत्याही धर्माचा निषेध करायचा नाही . सर्व धर्माचं सार  तत्व जे आहे तो असा धर्म विश्वधर्म स्थापन झाल्याशिवाय जगामध्ये शांती येणार नाही . 

धर्माच्या नावावरती भांडण ,काही म्हंटल तरी भांडण . ह्याच तत्व त्याच तत्व येऊन भांडण करतात . तेव्हा एक असा धर्म स्थापन करायला पाहिजे कि ज्यात सर्व धर्माचं सारभूत तत्व आहे . आणि ते झाल्या शिवाय कार्य होणार नाही . हि मंडळी स्वतःचा अहंकार घालवायला इथे आली आहेत तुमच्या पासून शिकायला आली आहेत . त्यांच्या मते तुम्हाला मुळीच अहंकार नाही . पण तस दिसत नाही कारण पुष्कळ शे लोक मी पहिले कि रस्त्याने आपले चाललेत ,चालली मिरवणूक चाललेत . त्यांना काही पर्वाच नाही . काही डोक्यात जातच नाही त्यांच्या . इथल्या काही काही  लोकांना जास्तच अहंकार आहे यांच्या पेक्षा पण याना असं वाटतंय कि ,हे भोळे आहेत . इथल्या लोकांना अहंकार म्हणजे काय ते माहीतच नाही अशी इतकी स्तुती करतात भारतीय लोकांची मी बाहेर गेले म्हणजे . अहो म्हणजे इतके भोळे लोक हे याना अहंकार म्हणजे काय माहीतच नाही . पण आपल्या कडे कसे लोक आहेत ते मला माहित आहे . आता म्हंटल चूप बसावं कशाला आपल आपणच सांगायचं . 

पण आपण असे आहोत ते आपल्याला माहित आहे . तेव्हा आपल्यात अहंकार पण कधी कधी फार येऊन जातो आणि तो अहंकार आसक्ती मला हे चालायचं नाही . मला जेवायचं असलं कि असच पाहिजे . अहो तुम्ही कसे हि जेवत असला तरी आहे तसे च रद्दी रहाणार आहात ना . पाट पाहिजे त्याला रांगोळ्या पाहिजेत ,आणि मी माझं सोवळ्याच बसून जेवणार . सोवळ्याच नेसा नाहीतर साधं धोतर नेसला तरी आतमध्ये तसच आहे . तुमच्यात तर काही फरक होत नाही . तुमचा जसा स्वभाव तसाच आहे . काही फरक आहे का ?तुम्ही जशे आहात तशेच आहात . कशाला वरपांगी पणा करायचा . मग त्याचा हट्ट धरायचा आमचं असं आहे मग यांच्यातलं पाणी नाही चालायचं . मला त्याचंच पाणी पाहिजे . हे सगळं करून मिळवलं काय तुम्ही . मला विचारायचं आहे हे सगळं ढोंग करून मिळवलं काय ?. मग आपली तरुण मंडळी बिघडतात ,ते म्हणतात हा कसला धर्म ,नुसता त्रास दायक धर्म आहे . या धर्मामध्ये नुसता त्रास . कि त्यांना हे नाही चालत ते नाही चालत ,अमूक नाही करणार ,पाणी नाही पिणार ,मग ते बिघडतात . मग ते कम्युनिस्ट झले म्हणजे आपण काय त्याना म्हणायचं ?देव नाही असं जर ते म्हणाले त्यांना काय म्हणायचं? तेव्हा त्या मुलानं समोर सुध्दा अस्सल धर्म ठेवला पाहिजे . अस्सल धर्म हा आहे ,देव हा आहे त्या ला जानण्या साठी तुम्हाला ह्या मानवी देहानी होणार नाही ,त्याच्या साठी परमेश्वरी तत्व तुमच्यात जागृत झालं पाहिजे . आणि हे परमेश्वरी तत्व तुमच्या मध्ये कुंडलिनी म्हणून आहे ती एकदा जागृत झाली म्हणजे तुम्हाला आत्मबोध झाला म्हणजे तुम्ही जर पार झालात त्याच्या नंतर तुम्हाला कळेल कि तुम्ही काय आहात . त्याच्या आधी तुम्ही मी मन ,बुद्धी ,शरीर ,अहंकार हे बघून असं वाटत कि तुम्ही तेच आहात पण नाही तुम्ही आत्मा आहात . आधी ते जाणून घेतलं पाहिजे . 

आपल्या देशाच्या अनेक मोट्या मोठ्या विभूतींच्या मुळे ,अवतरण ना मुळे ,त्याच्या पुण्याई मुळे इथल्या लोकांना फार लवकर आत्म्याचा बोध होतो . पण तितक्याच लवकर विसर पडतो . जशी आपली स्वतंत्रता मिळाली स्वस्तात मिळाली नि स्वस्तातच जाते तशातलाच प्रकार आहे . आपल्याला हे इतक्या लवकर मिळत ते फार लवकर विसरतो . पण त्याचे अनेक फायदे आहेत ,खरोखर आता मानवाला तेच व्हायचं आहे . सगळ्या मानवांची उत्क्रांती आता आत्मबोधात झाली पाहिजे . आणि ते होणार आहे . जिथे होईल तिथेच ते ठीक होणार आहे . महाराष्ट्रात मी एव्हडी मेहनत  एव्हड्या साठी करते कारण इथे नाथानी फार मेहनत केली आहे . त्याशिवाय इथे स्वतः रामचंद्र अनवाणी चालले आहेत . तसच तुम्हाला माहिती आहे कि इथे मोठमोठाले अशे पृथ्वी तत्वातून पुंज च्या पुंज ज्याला आपण स्वयंभू म्हणतो अशा पैकी साडेतीन वेटोळे घातलेली कुंडलिनी जी आहे ती या महाराष्ट्रात आहे . म्हणजे ती कोणची ? तर माहूरची रेणुका देवी ती महा सरस्वती झाली ,दुसरी महाकाली ती आहे तुळजा पुरची भवानी ,आणखीन महालक्ष्मी जी आहे ती कोल्हापूरची . पण बघा महालक्ष्मी च्या देवळात जाऊन आपण उदो उदो ग अंबे म्हणतो ,खर  म्हणजे महालक्ष्मीला अंबे म्हणतो कशाला तर त्या महालक्ष्मी तत्वातून ,महालक्ष्मी जे मध्यतत्व आहे त्याच्यातून कुंडलिनी उठली पाहिजे म्हणून तिला उदो उदो म्हणतो . पण ते सगळं सांगणार कुणी बसलेलच नाही . . तुम्हाला काही माहितीच नाही आहे काय प्रकार . साडेतीन वेटोळे घालून आदीशक्ती जी आहे अर्धमात्रा जी सगळ्यात मुख्य जी तुम्हाला आता जर वनीला गेलात नाशका जवळ च आहे ते तर गडावर बसलेली आहे . बघण्या सारखी आहे . तर हे सगळं काही जे झालेलं आहे त्याच्या सुध्दा पुष्कळ फायदा महाराष्ट्रात आहे . त्याशिवाय अष्टविनायक इथे बसलेले आहेत ते त्या कुंडलिनीला सांभाळत आहेत . अशाप्रमाणे हि सगळी व्यवस्था ह्या पृथ्वी तत्वांनी करून ठेवली आहे . तुमच्या साठी सगळी व्यवस्था करून एखाद्या महामूर्खाला सगळं काही द्यावं तस कधीकधी वाटत . एखाद्या माणसाने खूप आपली संपत्ती मिळवावी त्याच एव्हडं धन जोडाव सगळी काही व्यवस्था करावी आणि त्याच्या वरती एखाद्या वेड्या मुलाला बसवावं असं झालेलं आहे , तेव्हा एव्हडी जी संपत्ती तुमच्या जवळ मिळाली आहे ,जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्या उपयोग तुम्ही करून घ्यावा हे सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे . मी तुमची आई आहे ,आणि तुम्हाला जे खर ते सांगितलं . त्याच वाईट नाही वाटलं पाहिजे . आईने जे सांगितलं ते आमच्या भल्या  साठी ,कारण तुझं आहे तुझं पाशी ते द्यायला आलो ,जरी किल्ल्या द्यायला आलो तरी कळलं पाहिजे कि किती  संपत्ती आमच्या जवळ आहे . आणि म्हंणून सगळ्या मुलांनी सुध्दा लक्षात घेतलं पाहिजे कि तुम्ही एकदा पार झाल्या नंतर तुमची बुध्दी सरळ होईल ,अभ्यास चांगला येईल पण त्याच्याही पलीकडे स्वधर्मी बनाल . स्वधर्म म्हणजे ,स्व म्हणजे आत्म्याचा धर्म ,जे आपल्याला सांगितलं आहे कि “स्वधर्म सूर्य पाहो “,विश्व पाहो असं जे वर्णन केलेलं आहे ते तुमच्यात झालं पाहिजे . हे सगळं ज्ञानेश्वरांनी सुध्दा संबंध सांगितलेलं आहे . आणि ते सगळं आज घडत आहे कारण ज्ञानेश्वर सुध्दा फार मोठे द्रष्टा होते . आणि त्यांनी जे पसायदान दिल आहे तेच हे पसायदान . जे तुमच्या हातामध्ये चैतन्य वाहणार आहे तेच पसायदान आहे . हे सर्व चैतन्य म्हणजे देवांनी हि जी सृष्टी रचली त्या प्रज्ञेचाच ,त्या चैतन्याचच हे दान तुम्हाला मिळणार आहे तेव्हा ते तुम्ही घ्यावं ,त्याला जपावं ,त्याची जोपासना करावी ,त्याची इज्जत करावी ,आपल्या देशाचा उदयाचा काळ दूर नाही तो येणार आहे . त्यात किती लोक तुम्ही समवाल ते तुमच्या शहाणपणावर अवलंबून आहे . शहाणपण धरावं आणि नम्रपणे हि गोष्ट घ्यावी . 

अहंकार करू नये ,शिष्ट पण दाखवू नये . अक्कल काही नाही पण शिष्टपणा फार आहे . ह्याच मला फार आश्चर्य वाटत ते आपल्या कडे साधारण मनुष्य ज्याला काही अक्कल नाही तो सुध्दा लेक्चर द्यायला लागतो कि मला आश्चर्य वाटत कि हे कुठले विद्वान आलेत म्हणून . एक गृहस्थ आमच्या कडे आले शेती होती ,म्हणे मला एअरकंडिशनर खरेदी करायचं मी पुष्कळ पैसे केलेत .म्हंटल  कशाला? म्हणे शेतात मी जातो तर मला फार गर्मी लागते म्हणून मला एअरकंडिशनर लावायचं आहे . तर हे असल्या प्रकारचे वेडे पणाचे विचार लोकांनी ठेवले तर कस होणार ?शेतात जाता तर शेतकऱ्या सारखं राहायचं .आता  सगळे अंग्रेज इथे एअरकंडिशनर शिवाय राहून गेले आणि आपल्या भारतीयांना एअरकंडिशनर शिवाय जमतच नाही . आपण म्हणजे अंग्रेजां न पेक्षा मोठे झालो आता एकदम . असं व्हायला नको ,बेफाम जो मनुष्य सुटतो त्याला लगाम नाही ,शिस्त नाही ,त्याला वळण नाही . तेव्हा आपल्या कुलस्वामिनी च ध्यान करून तिच्या मर्यादेत तिच्या दंडकात राहिलेले लोकच सात्विक लोक आहेत . तेव्हा ती केव्हडी मोठी आपल्याला देण आहे . ह्या लोकांना कुलस्वामिनी नाही ,ह्यांना देवाचं ,धर्माचं काही विशेष माहिती नाही . तरी सुध्दा हे लोक इतके वरती आले ,मी म्हणते कि नरकातून निघून एखाद्या कमळा सारखे झाले आणि सगळ्या देशानं मध्ये आपलं एव्हडं सुरभीत करून ठेवलं आहे ,सगळी कडे सुगंध ह्यांचा पसरलेला आहे आणि आपल्या देशामध्ये हे होऊ नये हि फार दुःखाची गोष्ट आहे . अडीशे माणस इथे जी आलेली आहेत ती चौदा देशातून आलेली आहेत . आणि अगदी समृध्द देशातून आलेली आहेत . आणि ती तुमच्या कडे नम्रभावाने आलेली आहेत . कि प्रेम तुमचं बघायला ,हे करायला वैगेरे . पण त्यांना माहित नाही ह्या प्रेमाच्या पोटी मनुष्याला हा विचार आहे कि नाही कि हे विश्वाचं प्रेम आपल्याला द्यायचं आहे . ते तुमच्या जवळ विश्वाचं प्रेम मागायला आलेली आहेत . तेव्हा त्यांना प्रेमानी तुम्ही आपलंस करावं आणि इथे ते आरामात येऊन तुमच्या मध्ये मिसळले तुम्हाला बघतात ,भेटतात त्यांना फार आनंद होतो . आणि तुम्ही सुध्दा त्यांचा उत्साह बघून त्यांच्या सारखाच उत्साह दाखवावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे . पुढे हळू हळू हि प्रजा वाढत जाणार ,आपले लोक वाढत जाणार आणि अशे शहाणे लोक जगामध्ये पुष्कळ आले म्हणजे सगळ्या जगाची जी समस्या आहे ती दूर होणार आहे . आता आपण थोडासा प्रयोग करूयात . मागची मंडळी जरा पुढे येऊन बसा . 

म्हणजे सगळ्यांना आत्मबोध देता येईल . नम्रपणानी सगळ्यांनी येऊन बसायचं . फॉरेनर लोक इथे येऊन कशा परिस्तितीत राहतात हे बघा . त्यांच्या देशात आहे ते आपल्या देशात आहे का ?इथे येऊ न ते मजा करत नाहीत ,त्यांच्या देशात जे आहे ते बघाल तर आश्चर्य चकित व्हाल . इथे येऊन बिचारे अशा परिस्तितीत राहतात त्याचंच आश्चर्य वाटत मला आणि कधी कधी असं वाटत आपल्या कडच्या श्रीमंत लोकांना असं राहा म्हणून सांगितलं तर ओरडून ओरडून एक करतील . हे लोक तर तिथे इतके मजेत राहतात,त्यांच्या जवळ इतकी श्रीमंती आहे  आणि ते सगळं सोडून तुमच्या साठी ते इथे आले आहेत , कि तुम्ही कस गरिबीत आनंदात राहता ते बघायला . आणि तुम्ही उलट समजायचं कारण डोकं उलट आहे ना आपलं ,सगळं उलट दिसत आपल्याला . डोकं देवाने उलट बसवलेलं आहे आपल्याला तेव्हडंच चुकलेलं आहे बाकी सगळं ठीक आहे . ह्यांना इथं काय मजा मिळणार आहे . ?त्यांच्या देशात जे आहे ते आपल्या देशात आहेका ?तुम्ही कधी पाहिलं आहे ते ?इतका आराम इतकं सगळं काही आहे कि काही विचारू नका . ते इथे आले तर काही उलट डोक्यात घेऊन बसायचं . 

आणि परत हे बाईच्या अंगात आलं तरते भूत आहे  हे सुध्दा काळात नाही आपल्याला . बाईच्या अंगात देवी कशाला येणार ?देवीला काही आणखीन धंदे नाहीत का आणि मग तिच्या पाया पडायचं मग त्या भुताच्या . आमच्या मुंबईला तर मोलकरणीच्या अंगात येत आता त्या देवीला काही काम नाही ते मोलकरणीच्या अंगात येईल . डोकंच नाही आपल्याला . त्या भुताच्या मागे लागायचं . भूत जस बोलेल तस ऐकायचं . भूत असतात हे माहित आहे का नाही ?पिसाटलेली बाई तिला काही अक्कल नाही तिच्या पाया पडायचं . कुणी अकलेची  गोष्ट सांगितली तर ती ऐकायची नाही . मग आपली प्रगती कशी होणार ?हे मला तुम्ही सागा . जर तुमच्या साठी जे  चांगलं आहे ,जे तुमच्या भल्या साठी आहे ते ऐकायचं नाही तर तुमची प्रगती कशी होणार ?. समजा आम्ही म्हंटल हे विष आहे आणि हे अमृत आहे ,मी अमृत खा म्हणते तर तुम्ही विषच खाणार आणि आम्ही मेलो कशे असं जर तुम्ही विचारलं तर खायला कुणी सांगितलं होत विष तुम्हाला . हि अशी परिस्तिथी आहे डोकं उलट आहे प्रत्येक गोष्टीच काहीतरी विकल्प काढतो . कारण आता हि माणस इतकी चांगली आहेत पण याना विश्वास च वाटत नाही कारण आपण पण इतके चांगले असू शकत नाही . दुसरी मंडळी इतकी चांगली असू शकतात कि ती आपल्याला भेटायला प्रेमाने बघायला अली हे आपल्या डोक्यातच येऊ शकत नाही कारण आपण अशे चांगले नाहीच आहोत . अशी आपल्या कडे कोण लोक आहेत  असं वाटत कि जी आपल्या भल्या साठी आपल्या कडे येतात . माझ्यावर तरी विश्वास ठेवा . मी काय तुमच्या कडून पैसे बिसे घेत  नाही ना . स्वतःचेच खर्च करून येते . आणि यांनी तुमच्या देवळासाठी पैसे दिले .तर म्हणे कि हिंदू धर्माच्या विरोधात आहे .असं कस ,म्हणजे डोकं नाही जे म्हणतात ते हे . उलट्या टोप्या बसल्यात असं मी म्हणेन . काहीतरी डोकं खराब झालेलं आहे लोकांचं . पूर्वी अस कधी विचार यायचा नाही . आणि आता हे नवीन विचाराचं भूत कुठून आलं आहे समजत नाही . कोणी तरी भरवत असेल डोक्यात उलट्या गोष्टी . आपल्याला स्वतःचा विचार नाही .कुणी काही सांगितलं त्याच्या पाठी चालले . पण चांगलं सांगितलेलं ऐकत नाही . हे मुख्य सांगते . 

साधुसंत आले त्यानी चागलं सांगितलं कि बाबारे असं करू नका . मारून टाकायचं त्यांना . दगडांनी मारा नाहीतर कसही करा नाहीतर त्याला उपाशी मारा ,त्याला हे करा ते करा . जे चागलं आहे ते ओळखलं असत तर आज पर्यंत कुठल्या कुठे गेले असते . पण जो कुणी चांगलं सांगायला आला त्याचा छळ केला . गांधीजींना पण गोळ्या घातल्या ना शेवटी . कुणाला सोडलं का तुम्ही . तेव्हा जे चांगल आहे ते समजून घ्या . स्वतःच डोकं लावू नका . आणि आत्मबोध घ्या . आपल्या मध्ये जो आत्मा आहे तो जरा अंधारात आहे ,तो जर तुमच्या चित्तात आला तर चांगल काय आणि वाईट काय ते कळेल तुम्हाला . 

आता तुमच्या मध्ये जी संपत्ती आहे ती घेऊन टाका . काय सांगायचं ,तिकडे हि लक्ष नाही इकडे हि लक्ष नाही . थोडं गांभीर्य पाहिजे . त्याच्या शिवाय कोणतीही गोष्ट येत नाही . मुख्य म्हणजे आत्म्याचं जागरण व्हायचं आहे ,फार मोठी गोष्ट आहे . देवाच्या साम्राज्यात जायचं आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे . 

आता सगळ्यांनी नुसते अशे हात ठेवायचे ,स्वतःकडे लक्ष द्यायचं . पुरुषांनी टोप्या काढाव्यात . कारण हे इथे ब्रम्हरंध्र आहे . टाळू . ह्या टाळूतून कुंडलिनी अशी निघते . म्हणून टाळू झाकायचा नाही . आता हे जागरण तुम्हाला इतक्या लवकर इथे घडत तस तिथे होत नाही मला फार मेहनत घ्यावी लागते . पण ज्यांना घडत ते सांभाळत नाहीत आणि ज्यांना घडत नाही ते सांभाळतात . दात आहे तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशी स्तिती आहे . आलं ना आता गार वाटलं ना . आता खूप आनंद वाटेल आतून आणि डोळे एकदम चमकतील . असं वाटेल कि डोळ्यामध्ये एखादा दीप आला आहे . थोडा वेळ चित्त टाळूवर ठेऊन शांत बसा . डोळे मिटा . कोणच्याही जुन्या ,कुजलेल्या रूढी डोक्यावर घेऊन फिरायचं नाही . रूढी जी आपल्याला जिवंत ठेवेल अशाच रूढी मानल्या पाहिजेत . ज्या आपल्याला मारून टाकतील अशा रूढी मानायचा नाहीत . सगळयांना क्षमा करून टाकली असं म्हणा . देव हा प्रेमाचा ,दयेचा आणि क्षमेचा सागर आहे . तेव्हा एव्हढाच म्हणायचं माझं जर काही चुकलं असेल तर क्षमा कर फक्त मला . मी दोषी आहे असं काही म्हणायचं नाही . चूकल असेल तर हे परमेश्वरा मला क्षमा कर एव्हढच म्हणायचं . 

आता जेव्हड काय आम्ही केलेलं आहे ते तुमच्या डोक्यात राहूद्या . ध्यान कस करायचं हे शिकून घ्या . फोटो घ्या ,फोटो वर मेहनत घ्या . संध्याकाळी सहा वाजता मंगळवारी इथे ध्यान होत ,सगळ्यांनी तिथे यायचं . ध्यान करायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची . उद्या तुम्ही सगळे मोठे मोठे गुरु होणार आहात . स्वताचेच तुम्ही गुरु होणार आहात . याने सर्व तऱ्हेची तुम्हाला मदत होईल . आणि काही प्रश्न असला तर मला पत्र लिहा . अनंत आशीर्वाद .