Public Program

Deolali Pravara (India)

1985-01-23 Public Program Marathi, Deolali Pravara India DP-RAW, 56'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

स्वधर्म सूर्य विश्व पाहो , स्व म्हणजे आत्मा . त्याच्या धर्माचा सूर्य सर्व विश्वानी पहिला पाहिजे . असं त्यांनी सांगितलं होत . शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे कि स्वधर्म जागवावा . शिवाजी महाराज सुध्दा एक साक्षात्कारी पुरुष होते . त्याशिवाय एव्हडं संतुलन एखाद्या माणसात येऊ शकत नाही . एव्हडा धर्म अंगात बाणवू शकत नाही . आणि इतकं संतुलन त्याच्या मध्ये होत ते येऊ शकत नाही . आणि त्यांच्यावर देवीची विशेष कृपा होती . त्यांनी सुद्धा स्वधर्म जोडावा ,नेहमी ते स्वधर्म जोडावा असं म्हणायचे . आता स्वातंत्र्य हा शब्द पण आपण पहिला तर स्व च तंत्र जाणणे हाच अर्थ होतो . स्व म्हणजे आत्मा त्याच तंत्र जाणल्या शिवाय आपल्या भारतात तरी काहीही साध्य होणार नाही . म्हणून भक्तीचे मार्ग काढले ,भक्ती करा ,परमेश्वरात रत राहा . वाईट मार्गाला जाऊ नका ,वाईट काम करू नका . त्याच्यात पण एकांगी पणा करायचा . भक्ती म्हणजे भक्ती . म्हणजे एखाद्या घाण्याला बैल बांधावा आणि त्याला झापड घालावी तशी आपण गोलगोल त्यालाच फिरत आहोत . 

तेव्हा संतांनी स्पष्ट लिहिलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेच्या प्रवृत्या आहेत . एक असते ती तामसिक दुसरी असते ती राजसिक आणि तिसरी जी उत्तम असते ती सात्विक . तामसिक लोक जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी चुकीला धरून बसतात किंवा कोणत्या तरी एका कडेला जातात आणि ते धरून तेच तेच करत बसतात . म्हणजे ती तामसिक वृत्ती . आता आपल्या कडे कोणत्याही गोष्टीला धरलं म्हणजे उपास करायचा म्हणजे सगळे दिवस उपास करायचा . हे कुणी सांगितलं आहे . देवांनी तर सांगितलं नाही ,कुठेही तुम्ही शास्त्रात  आधार दाखवा मला ,तुम्ही उपास करा देवाच्या नावाने असं लिहिलेलं नाही . पण जे तुम्हाला सांगतात उपास करायला ते पैसे भरू लोक आहेत .,पोटभरू लोक आहेत . तुम्ही उपास करायचा आणि पैसे त्यांना द्यायचे . अशी व्यवस्था आहे . अशा रीतीने अनेक प्रथा जगामध्ये आलेल्या आहेत पण आपण विचार सुद्धा करत नाही आणि त्या आपण सारख्या वापरत असतो . आता आपल्या देशात तशीही उपासमार चालू आहे . तुम्हाला जर उपासाचा शौक असला तर करा . तुम्हाला जर उपास करायचा असेल तर देवाच्या नावावर करू नका ,स्वतःच्या नावानी करा . तुम्ही जरी उपास केला तरी ते दान काय दुसऱ्याला देणार आहात काय ?. उपास केला कि पैसे वाचवायचे आणि बँकेत घालायचे आणि मग सगळी गडबड करायची . लक्ष तुमचं पैशावरून उठत का ?.तस काही होत नाही  , तेव्हा त्या उपासाला पण काय अर्थ आहे नाहीतर कबुल मी दहा दिवस उपास केला आणि त्यातले जे पैसे होते ते मी कुणाला तरी वाटले ,दिले . तस होत नाही . म्हणजे एक सारासार विचार लोकांनी ठेवलाच पाहिजे कि देवाने हि बुद्धि माणसाला एव्हड्या साठी दिली आहे कि आपण सारासार विचार ठेवला पाहिजे . पण सामाजिक लोकांचं वैशिष्ट्य असं आहे कि कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी आयुष्य घालवायचं . आता आपल्या सहजयोगातच बघा आता पुष्कळ मंडळी अली आहेत . मला कधी कधी फार वाईट वाटत ,सहजयोगात फार चांगली ,कर्तृत्वान मंडळी अली आहेत . पण काही काही लोकांचं मी असं पाहिलं आहे कि एक आमच्या सहजयोगात असं आहे कि तंबाकू खायची नाही . ते खात होते . आता तुम्हाला म्हंटल म्हणून तुम्ही उठून जाऊ नका ,कारण तुम्ही खाताय हे मला माहित आहे . काही वाईट वाटून घ्यायचं नाही . एकदा सहजयोग केला म्हणजे सुटत . १०० लोकांची सुटली नाही तरी ९९ लोकांची तरी सुटती च . समजा एखाद्याची नाही सुटली तर त्या तंबाकू पायी सगळं आमचं घालवणार का . एक त्या तंबाकू पायी तुम्ही आपले सगळे दात घालवणार का ?”दंताजींचे ठाणे उठले “. हे कशा मुले तर तंबाकू मुळे . आता माझे ६२ वर्षाचं वय आहे मी कधी सुद्धा डेंटिस्ट कडे गेले नाही ,मला दाताचा त्रास नाही . पण तंबाकू मात्र मी कधी हि तोंडात घेतली नाही . तर सांगायचं असं कि अशा लहान लहान गोष्टी न वरती तुम्हाला आपलं आयुष्य खराब करायचं आहे का ? . असा विचार केला पाहिजे . आपल्यात जरा सुध्दा इच्छा शक्ती नाही कि एव्हडीशी लहान गोष्ट आपण सोडू शकत नाही म्हणजे काय ? . आपण आपल्या आयुष्याची काय कदर केली ? आता हा जो सहजयोग आहे हा आत्मबोध आहे हा समाजोन्मुख आहे . समाजाकडे लक्ष देणारा आहे . समाजातल्या ज्या घाणी आहेत त्या निघाल्या पाहिजेत . असं नाही कि समाजातली घाण आहे ती जशी च्या तशी तुंबून ठेवायची आणि त्याच्या मधेच आपला आत्मबोध घ्यायचा . म्हणजे कस एखाद कमळ असलं ते जरी चिखलात उगवलं तरी त्याच जे कारण आहे ते संबंध चिखला साठी ,म्हणजे सगळ्या चिखलालाच ते सुगंधित करत . तसच आहे . जेव्हा तुमचा आत्मबोध होतो ,कुणी मोठे साधुसंत बघा त्याना केव्हड छळलं ,किती त्रास दिला ,काही लोकांचा खून केला ,किती मारलं तरी सुध्दा ते समाजाला सोडून गेले नाहीत ,पळून गेले नाहीत कि नको रे बाबा नको हा समाज . ह्यांच्या मध्ये राहून फायदा काय आहे ,आता होते काही फार मोठे पोहोचलेले त्यांना मी म्हंटल अहो तुम्ही इकडे घरात का येऊन बसले ?म्हणाले मला नको समाज आता माझे हात तोडले ,पाय तोडले आता माझी मान राहिली ती पण तोडून टाकतील . मी काय जात नाही . 

अशा रीतीने लोकांचा आपण छळ केलेला आहे आणि ते लोक तरी सुद्धा समाजात राहिले ,समाजाला समजावून सांगितलं बाबा असं करू नका . पण सहजयोग जरा वेगळा आहे . सहजयोगात मी काहीही सांगत नाही . तुम्ही सगळं करायचं ते करा . एकदा तुम्ही इकडे या . आले, तुम्हाला आत्मबोध झाला कि त्या प्रकाशात तुम्हीच स्वतःला नीट करून घ्याल . तुम्हाला एव्हडी शक्ती येईल कि तुम्ही समर्थ व्हाल . मग समर्थाला कसली काय उणीव असणार ?समर्थाला कसला विचार येणार ?समर्थ जो असतो तो स्वतः च चांगला होतो . आपल्याला काय ज्ञानेश्वरांना सांगायला लागायचं का तुम्ही नीट व्हा . कुणा साधुसंताना सांगायला लागलं का कि तुम्ही नीट व्हा म्हणून ?तसच होत जेव्हा तुमच्या मध्ये आत्मबोध होतो तेव्हा तुम्ही स्वतः समर्थ होता आणि तुमच्यात कोणतीही अशी वाईट सवय किंवा वाईट गोष्ट सापडू शकत नाही . अगदी स्वच्छ समोर दिसत ,स्वधर्म सूर्य जो आपल्या मध्ये जागृत झाल्या बरोबर सगळं स्पष्ट दिसू लागत आणि मग समजत कि हे आपलं चुकीचं आहे . आता किती आपल्या समाजामध्ये अशा वृत्ती आहेत कि ज्या आपल्याला कशातरी करून काढल्या पाहिजेत . आणि त्या काढण्या साठी आपण थोडासा विचारही केला पाहिजे . आणि आपलं आत्मबलच हे करू शकत दुसरं कोणाचंच बळ चालणार नाही . कारण आपला समाज इतका रूढीत अडकलेला आहे इतका वाकलेला आहे कि त्या रुढितून कस निघायचं हे त्यानाच माहित नाही . 

उदाहरण अर्थ आता आपल्या कडे बघा जातीपातीचे खूळ . एक जात ,त्या जातीतल्या जातीत तुम्ही लग्न करणार आणि या साठी पर्याय नाही . हे केलच पाहिजे ,लग्न तिथेच झालं पाहिजे . जातीतच लग्न केलं पाहिजे . समजा त्या मुलीला उद्या सोडली ,विनाकारण त्या मुलाची चूक असली तरी सोडली तर मग सोडल्या बरोबर जातीतले लोक मुलीच्या बाजूने उभे राहतात का ?कुणी जर म्हंटल हुंडा द्या तर जाऊन सगळे जात वाले म्हणतात का खबरदार तुम्ही हुंडा कसे घेता ?. झालं ते झालं ,असं कुणी म्हणायला तयार नाही . उलट आपली मुलगी परत घेउन  जातील आणि म्हणतील बर बाबा हीच चुकलं तर सांभाळून घे . म्हणजे एकच वेड आहे त्यांच्या मध्ये ,बघा तुम्ही जरा सुप्त विचार करा ,एकच वेड आहे कि आमच्या जातीत लग्न झालं पाहिजे . त्यांनी काय तुमचे दिवे लागले . त्यांनी काय फायदा झाला ? विचारा ,काय फायदा झाला . मी आई आहे तुमची तुमच्या समोर सगळं स्पष्ट मांडते आहे . पण जाती म्हणजे काय ?देवी बद्दल म्हंटलेलं आहे ,”या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण संस्थिता “. देवी हि जात बनून मनुष्यामध्ये राहते . असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे . हा श्लोक चौदा हजार वर्षा पूर्वीचा आहे . त्याचा अर्थ काय ?जाती मध्ये राहते म्हणजे काय ?आपल्या मध्ये तीनच जाती आहेत . महालक्ष्मी , महाकाली ,आणि महासरस्वती . म्हणजे ज्या तीन जाती ज्या मी आधी सांगितल्या त्या कि तामसिक ,राजसिक आणि सात्विक . अशा तीनच जाती आहेत . बाकी कोणत्याही जाती नाहीत . तामसिक जाती मध्ये लोक भक्ती मार्गाला जास्त असतात . देवाला रिधयानी आळवतात . त्याच्याकडे त्यांचं लक्ष असत पण बऱ्याच वेळेला चुकीच्या गोष्टींना मान्यता देतात . . दुसरं राजसिक म्हणजे पाश्चिमात्य देशातले लोक म्हणजे राजसिक . या लोकांचं काय असत कि बुद्धि जास्त वाढलेली असल्या मुळे प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटत कि हि चांगली हि चांगली . म्हणजे अहंकार फार . म्हणजे ह्याच्यात काय वाईट ,त्याच्यात काय वाईट , काही म्हंटल तरी म्हणतील त्याच्यात काय वाईट . आता  तुम्हाला आश्चर्य वाटेल इतके वर्ष हि साहेब लोक आपल्या वरती राज्य करून गेले ते अगदी मुर्खात निघाले . आता त्यांची मूल सगळी व्यसन झाली ड्रग्ज झालं ,आता ते काय करतात माहित आहे ,डोक्याला लाल रंग फासायचा ,नाकामध्ये अशा पिना खुसपायच ,गालाला पिना लावायच्या . म्हणजे आहे काय प्रकार हा ?म्हणे पंख आहे पंख . मग हे कशाला करता तुम्ही ?त्यात काय वाईट आहे ?. म्हणजे त्यांना हेच लक्षात येत नाही वाईट काय आणि चांगल काय . आता वाईट काय आहे हा मूलभूत प्रश्न आहे . तोच त्यांना माहित नाही तर त्यांच्याशी बोलायचं काय ?. म्हणजे जी राजसिक मंडळी असतात त्यांची अशी स्तिती असते कि त्यांना वाईट काय आणि चांगल काय हेच कळत नाही . पहिले जे असतात ते अतिला गेले कि त्यांना जे वाईट जे असत तेच बरोबर वाटत आणि ते तिकडे घाण्यासारखे फिरत असतात . दुसरे जे आहेत ते वाईट हि चांगल आणि चांगल हि चांगल ,त्यांना दोन्ही कळत नाही ,हेही आणि तेही चांगलंच . वाटलं तर आपल्या बापाला मारलं तरी चांगलच त्याच्यात काय वाईट झालं ,बापाला मारलं तर काय झालं ,बाप मला मारतो मग मी बापाला मारलं तर काय झालं ?असं त्यांच्या मूलभूत प्रश्न सुध्दा त्यांच्या डोक्यामध्ये येत नाहीत . जे आपल्या डोक्यात येतात . म्हणजे अजून आपण तस पाहिलं तर आपल्या मध्ये रूढी मुळे एक फायदा आहे कि आपल्यावर अजून जे संस्कार उरले आहेत ते आहेत . पण ते संस्कार सुध्दा आता बिघडायला लागले आहेत . 

आपल्या देशाच्या काही भागामध्ये उन्नती झाली आहे त्या ठिकाणी कस झालाय ते  बघायला पाहिजे . आता जर तुम्ही up किंवा बिहार ला गेले ,बिहार ला तर अशी वाईट स्तिती आहे ,मुलांची शाळा सुटली कि तिथे जाऊन लुबाडतात ,इतके खुनशी लोक झाले आहेत कि विचारू नका ,नुसते खून माऱ्यामारा काही विचारायला नको . तेव्हा अशी स्तिती आपल्या महाराष्ट्रात तरी येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे . आणि जस जस इथे कारखाने वाढतील तस उत्पादन वाढेल तशा या गोष्टी इथे येतील . कारण पैशाचं महत्व वाढलं कि काही झालं तरी पैसे पाहिजेत मग कुणाला तरी ठोका मारा ,काय करायचं ते करा . मग पैसे जास्त आले कि आपल्याला सुख मिळते हि आपली चुकीची कल्पना आहे . परदेशात आता मी पाहिलं कि एव्हडे पैसे वाले लोक आहेत ,एकेका माणसा जवळ तीन तीन चार चार गाड्या आहेत . आता आलेत ते लोक आमच्या बरोबर ,सगळे श्रीमंत लोक आहेत पण काय आहे त्यांचं ,त्यांना मिळालं का सुख ?नाही मिळालं . कारण त्यांचे दुसरे प्रश्न सुरु होतात . पैसा आला कि दारू अली . आपल्याकडे कुणाला शंभर रुपये दिले कि निघाला दारू प्यायला . दारू नसली तर आणखीन काहीतरी दुसरा प्रकार ,मग बायकांचे प्रकार ,इतकं सगळं विचत्र कि नवरा बायको पाच पाच वेळा लग्न करतात . आणि शेवटी सगळ्यांची मुलबाळ ,नवराबायको ,म्हातारा म्हातारी सगळे अनाथालयात . तिथे अनाथालय बांधले आहेत सगळ्यांसाठी . सगळे अनाथालयात जातात . कुणाचा कुणाशी संबंध नाही . हा पैशाचा प्रताप . स्विझर्लंड सगळ्यात समृध्द देश आहे आणि तिथल्या चार पाच मुली मला भेटायला आल्या होत्या . आता आपलं तिथे सेंटर झालं ,पण सुरवातीची गोष्ट सांगते अगदी तरुण मुली होत्या आणि दोन मूल होती त्यांच्या मध्ये . तर ते माझ्या समोर आले त्यांच्या मधून अशा चैतन्याच्या लहरी येऊ लागल्या जस काही भूता सारखे लहरी वाटल्या त्या . काय प्रकार आहे ते कळेना . तर मी विचारलं तुम्ही करता काय ?काही नाही म्हणे आम्ही अभ्यास करतो . आणि मग फावल्या वेळेत काय करता ?फावल्या वेळेत आम्ही म्हणे असा विचार करतो कि आत्महत्या कशी करायची . आईवडिलानी याना तिथे शिकायला पाठवलं आणि हे कॉन्फरन्स भरवतात कि कशी आत्महत्या केली पाहिजे . अशा लोकांना जर तुम्ही म्हंटल कि असं का करता तर म्हणतात त्यांच्यात काय चुकलं  ? आम्हाला मरायचा हक्क आहे . आम्ही जिवंत राहायला पाहिजे असं काही आहे का . पण तुम्ही मरता कशाला ?म्हणे आम्हाला सुख मिळालं नाही . आनंद मिळाला नाही . आम्हाला असं वाटलं पैशात आनंद असेल म्हणून पैसे कमावले . अभ्यास केला सगळं झालं पण कुठेच आनंद दिसत नाही म्हणून आम्ही मरायला निघालो . पण मरणात आनंद आहे हे कुणी येऊन सांगितलं तुम्हाला ?. तर म्हणे आनंद कुठे आहे ?आनंद तुमच्या आत आहे .तो मिळवा .  आत्मा जागृत झाल्या शिवाय जर पैसे दिले तरते हि समजत नाही ,  त्याची हि कदर आपल्याला राहणार नाही . इतकच नाही सत्ता द्या एखाद्या माणसाला तो गेला कामातून ,अगदी घोड्यावर बसतो तो एकदम ,एकदा सत्ता अली कि तोंडच बदलत त्याच . त्याचा चेहराच बदलतो ,सगळंच बदलत . त्याला कारण असं कि सत्ता झेपत नाही ,पैसा झेपत नाही ,स्वातंत्र्य हि झेपत नाही . अमेरिकेत तर असं हातात ,अंगावर काही दागिने घालून गेलो तर मोटर थांबवून सगळं काढून घेतात , इथं देवळालीला घालून आले तर काही भीती नाही . अमेरिकेत तर दहा मीटर सुध्दा कुठे असं जाऊ शकत नाही . अशी भयंकर स्तिती आहे तेव्हा कसलं स्वातंत्र्य ते . अशी परिस्तिथी त्या अमेरिकेत आहे ,तिथे लोकांजवळ इतका पैसा आहे काय करावं काय ते कळत नाही . तेव्हा असं समजलं पाहिजे कि आपल्याला अमेरिके बद्दल जी काही कल्पना आहे ती चुकीची आहे . त्यांच्या पासून काही शिकायचं नाही ,ते चुकलेले आहेत आणि आपलं जे चुकलेलं आहे तेव्हड नीट केलं म्हणजे झालं . त्यांच्या सारखं होऊन परत डबल नीट करायला नको . म्हणजे तुमची मूल उद्या हिप्पी होऊन ड्रग्ज घेऊन फिरले म्हणजे मग तुम्ही सहजयोगात आणण्या पेक्षा आत्ताच सहजयोगी झालेले बरे . शेवटी तीच दशा येणार कारण त्यांचं तसच होऊन राहील आहे . ते सगळे या परिस्तितीत गेले ,डॅग्ज घेतले ,हिप्पी झाले मग त्याच्या नंतर ती भूत माझ्याकडे आली . आणि माझे हात दुखतात त्यांना ठीक करताना . तेव्हा तुम्ही जसे आहात तसे फार उत्तम आहात . कारण हि एक योग  भूमी आहे . आणि विशेषतः आपलं महाराष्ट्र हि खरोखर एक पुण्यभूमी आहे . आणि यामध्ये इतक्यानी आपलं रक्त ओतलंय ,सगळ्या साधुसंतांचे आपल्यावर उपकार आहेत . हे सांगावं तेव्हड थोडं आहे . आता परवा एका गावात गेलो होतो त्याच नाव कोमलवाडी ,तिथे कानिफनाथांची समाधी आहे असं सांगितलं ,मला व्हायब्रेशन्स पण आले .जेव्हा मी भाषणाला बसले तेव्हा मी त्यांना सांगितलं आता आपण आत्मबोध घेऊया .म्हणून आत्मबोधाला बसवलं तर एकालाही चैतन्य जाणवलं नाही . म्हंटल आता कानिफनाथांची माफी मागा . तुम्ही फार छळलं आहे त्यांना . त्या बरोबर झरझर हातामध्ये चैतन्य सुरु झालं . मी म्हंटल ,हे बघा आता तुम्ही म्हणता अशी आमची दुर्दशा झाली ,असा दुष्काळ असतो आमच्या इथे ,पाच पाच दिवस पाऊस पडत नाही . तुम्ही त्या कानिफनाथांना जो देवाचा दूत म्हणून आला होता त्याला इतका त्रास दिला ,तुम्ही मुसलमान ,तुम्ही हे ,ते म्हणून सगळ्यांनी म्हणून छळलं . दोन माणसांनी छळलं असत तर गोष्ट वेगळी असती पण सगळ्यांनी छळलं . साईनाथांना पण छळलं ,सगळ्यांना छळलं . त्याची आता फळ भोगा . आता क्षमा मागा त्यांची ,आणि जाऊन त्यांची मी पहिली समाधी एव्हडा मोठा जीव देवाने इथे घातला होता त्याची काय समाधी झाली आहे . आणि संबंध तिथे एका झाडाचं पान पण  हालत नव्हतं पण ज्या ठिकाणी त्यांची समाधी होती तिथे फक्त हालत होत . आणि त्या समाधीला काहीही नव्हतं सगळी पडझड झालेली . तरी सुध्दा त्यातून थंडथंङ लहरी येत होत्या . त्याच वर्णन केलेलं आहे शंकराचार्यांनी सलीलां सलीलां . थंड थंड अशा चैतन्याच्या लहरी . आता सहजयोग पूर्वीच्या लोकां सारखं नाही कि कुठंही दरी डोंगरात जाऊन देवाचं नाव घेत बसावं . किंवा अशी नाही कि तुम्ही आपल्या घरी फोटो लावला आणि आम्ही माताजींना मानतो म्हणायचं . हि सामाजिक घटना आहे . आपल्या समजा मधेच हे सर्व घटित होणार आहे . हि वैयक्तिक गोष्ट नाही ,हि व्यक्तीची गोष्ट नसून समष्टीची गोष्ट आहे . संपूर्ण समाजाचं काम झालं पाहिजे तेव्हाच आपला देश उभा राहणार आहे . गांधीजींनी पुष्कळ प्रयत्न केले आपल्या देशाला बदलण्याचे . त्यांना गोळ्या घातल्या . पण ते जेव्हा लंडन वरून परतले तेव्हा त्यांना नाशकात प्रायश्चित करायला लावल . मला सांगत होते ,मी गांधीजींच्या बरोबर होते तेव्हा जर मी गेलो नसतो तर मला आधीच गोळ्या घातल्या असत्या त्यांनी . पण शेवटी घातल्याचं सोडलं का त्यांना . तेव्हा जो कोणी आपल्या देशाचं भलं करायला आला त्याला आधी गोळ्या घाला हे आपलं वैशिष्ट्य आहे . त्याचे गळे कापा ,नाहीतर त्याच काहीतरी वाईट करा . पण जो दुष्ट आहे ,वाईट आहे ,खराबी करतो त्याचे मात्र पाय धरा . हे तामसिक लक्षण . आता एखादा जेल मधून सुटून आला ,आणि त्यानं भगवे कपडे घातले बाबाजी झाला कि लागल्या बायका त्याच्या पाया पडायला . घेरे बाबा तुला पैसे ,अजून काय पाहिजे ते घे . आता पालखी अली ,आता पालखी म्हणजे काय ,पैसे कमावण्याचे धंदेच नाहीत काय ,जरा डोकं लावा . काय त्याच्यात तुम्हाला फायदा दिसतो कळत नाही . थोडा विचार केला पाहिजे आता मी तोंड उघडायला सुरवात केली आहे . माझं म्हणणं असं आहे कि जो पर्यंत विश्वधर्म होणार नाही तो पर्यंत लोकांच्या डोक्यात हि गोष्ट येणार नाही . तुम्ही लोक सुशिक्षित आहात ,जग पाहिलेलं आहे तुम्ही तेव्हा लक्ष घाला . मी म्हणते त्या गोष्टीत लक्ष घाला . अशा गोष्टीन मध्ये तुम्ही आपल्याला बरबाद करून घेऊ नका . 

दुसरं हा आपला जो भक्ती मार्ग आहे तो भक्ती हा मार्ग आहे ध्येय नाही . तुम्ही जर मार्गात अडकला तर तुम्ही तामसिक लोक आहात . हा मार्ग आहे . अहो त्या बैलाला सुद्धा घाण्यावरून उतरवून घेतात पण जे लोक नुसते वर खाली ,वरखाली वाऱ्या करत बसले आहेत त्यांनी देव कुणाला मिळाला आहे का सांगा . उलट डोकी फुटली ,तब्बेती गेल्या नुसती पाप्याची पितर झाले . एका वारकऱ्यांच्या दिंडीत बोलावलं होत मला ,माताजी तुम्ही देवा बद्दल काहीतरी सांगा याना म्हणून . म्हंटल याना काय सांगायचं ,यांची स्तिती खराब . सगळे आजारी . म्हणजे विचार हा केला पाहिजे कि मार्ग कुठला त्याच ध्येय काय ,देवाला मिळवणे . मग मिळाला का देव . नाही . अहो जर तुम्हाला मी म्हटलं, जेवायला बसा आणि पानावर बसा आणि जेवा , तुम्ही म्हणाल नाही आम्ही प्रार्थना म्हणू मग जेवण  कोण खाणार ,अहो जेवणासाठी प्रार्थना केलीत ना, हा भक्ती मार्ग तुम्ही कशासाठी अवलंबिला परमेश्वराला मिळवण्यासाठी ना ,एक विचार करा जरा ,ते असं झालं संबंध तुलसीदासांनी रामायण लिहिलं आणि त्याच्यावर लिहिलं त्यांनी स्वतःच ,”चित्रकूट के घाट पर हुई संतन कि भीड ,तुलसीदास चंदन घीसे ,तिलक करत  रघुवीर ,”आणि ओळखलंच  नाही ते चंदनच घिसत बसले . म्हणजे ते चंदन च घासत बसले आणि तिथे श्रीराम आले त्यांना ओळखलंच नाही त्यांनी . तर काय फायदा त्या चंदनाचा ?. अहो तुम्ही चंदन तुम्ही कुणासाठी घासत होते ,ते साक्षात येऊन उभे राहिले तर त्यांना नमस्कार हि केला नाही आणि नुसतं  सगळ्यांना टिळे लावतात तस रामालाही लावलं . हि अशी आपली आंधळे पणाची परिस्तिथी आहे . अंधारात चाचपडत राहायचं नाही ,त्यांनी आपला काही फायदा होणार नाही . आणि त्या बद्दल स्वतःला काहीही अहंकार लावून घ्यायचा नाही . कि आता माताजी असं सांगतात आमच्या बापदादा नि असं केलं होत पण त्या वेळेला आम्ही नव्हते . त्यानं च काही चुकलं नाही . तुम्ही पण अतिशया कडे चालले ,ह्या कलियुगात प्रत्येक गोष्ट ची अतिशय ता आहे . इतके वारकरी पूर्वी सुद्धा होते पण असा प्रकार काही नव्हता . अहो नामदेव सुद्धा दुसरी काम करत असत ,त्यांचं जे काम होत ते करत असत . असं नाही कि रात्रंदिवस  ,महिना महिना भर दिंड्या काढत फिरायचे . ठीक आहे देवाला जायचं ,देवाला भेटायचं पण ते साक्षात्कारी लोक होते . साक्षात्कारी लोकांचं वागणं वेगळं त्यांनी कधी अतिशयता च्या गोष्टी केल्या नाहीत . आणि हि अतिशयता आपल्या मध्ये आलेली आहे त्यामुळे जो आंधळे पण आलेलं आहे ते आधी काढून टाकलं पाहिजे . 

म्हणून हि जी जात आहे ती आम्ही फक्त एकच जात आम्ही मानतो ती म्हणजे सात्विक लोक . कारण दोन्ही जातीचे लोक सात्विक होऊ शकतात पण सात्विक लोक ह्या जातीत जाऊ शकत नाहीत . जेव्हा तुम्ही सात्विक झाले तुमच्या मध्ये एकदा ते संतुलन आलं ,म्हणजे आता तुम्ही मला म्हणाल कि माताजी तुम्ही दारू प्या तर ते मला जमेल का ,जमणार नाही . काही झालं तरी जमणार नाही ते . तुम्ही म्हणंलत तंबाखू खा ,अजिबात नाही जमणार ते . मला तर वास जरी आला तरी मी खाली पडते . मला जमायचंच नाही ते . जी मंडळी सात्विक असतात त्यांना जर तुम्ही म्हंटल कि अरेरावी पणा करा आणि कोणत्या तरी माणसाला मारून या तर जमेल का ?. असं जमू शकत का ?नाही जमणार . आता सात्विक झालो आम्ही ,म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना ते आहे हे . आता हे जे आम्ही बिघडलो आहे ते तुमचं पण बिघडलं पाहजे . तुम्ही हि घडाना . तुम्हाला हि तो अंकुर फुटला पाहिजे ,तुमच्या मध्ये कुंडलिनी शक्ती देवाने तिथे ठेवली आहे . किती सुंदर तुम्हाला बनवलेलं आहे . कुंडलिनी शक्ती तुमच्यात ठेवून त्याच्या वरती सहा चक्र सुंदर बनवलेली आहेत . हि सहा चक्र निवडली कि तुमची तब्बेत खराब होत नाही . कँसर सारखे आणि दुसरे वाट्टेल ते रोग सहजयोगाने ठीक होऊ शकतात . पण सहजयोग करायला पाहिजे . लोकांना वाटत माताजी नि ठीक करायचं पण तस नाही ,तुमच्याच कुंडलिनीनी तुम्ही ठीक होणार आहे .माझ्या कुंडलिनीनी तुम्ही किती दिवस ठीक राहणार , तेव्हा तुमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे ,करायला पाहिजे . वाट्टेल ते रोग ठीक होतात त्यांनी . तुम्हाला दवाखान्याची गरज नाही ,डॉक्टर ची गरज नाही ,तुमचे पैसे किती वाचतील ते बघा . आज आपल्या देशामध्ये जर एखादा हेल्तमिनिस्ट्रीचा माणूस आला आणि तो म्हणाला कि आम्ही इतकं काही करू शकत नाही ,इतक्या लोकांना आम्ही बघू शकत नाही ,आम्ही होमिओपॅथीचे सुध्दा औषध देऊ शकत नाही . म्हंटल मग सहजयोग सांगा . सरकारी लोकांचं कस कि माताजी तुम्ही मग आमच्या त सगळं घाला . पण मी त्यांच्या राज्यात कशी बसणार . आमची इच्छा असेल तिथे आम्ही जाणार . मी काय तुमच्या कडून पैसे घेते कि काय ?म्हंटल त्यांना खरोखर विचार आला कि आपल्या देशाचं भलं झालं पाहजे तर ते म्हणतील कि माताजी तुम्ही जिथे काही कराल तिथे आम्ही तुमची मदत करू . चारलोक देऊ तुम्हाला . मला आणखीन काही नको फक्त चार लोकच पाहिजेत . हा मांडव असो वा नसो मी कुठेही जंगलातही बसू शकते . पण तिथे चार माणस पाहिजेत ज्यांना मी पार करू शकेन . मग बघा त्यांच्या कडे तुम्ही . चेहऱ्यावर एकदम तजेला येणार . आणि चेहरा एकदम असा दिसेल जसा काही राजबिंडा माणूस आहे . तुम्हाला सांगते आमचे सहजयोगी बघा इंग्लिश लोक आहेत त्यांचा चेहरा दुसऱ्या परदेशी लोकांशी जुळवून बघा म्हणजे कळेल हे काय आहेत आणि ते काय आहेत . सगळं अगदी कांती बदलते ,स्वभाव बदलतो .सगळा धर्म बदलतो इतका सुंदर माणूस होऊन जातो कि लोकांना आश्चर्य वाटत कि असा कसा झाला हा . अहो नरकातून लोक उठलेले आहेत ,नरकातून उठून स्वर्गात आलेले आहेत . आणि तुम्ही सगळे  तर भारत वर्षातले त्यातल्या त्यात ह्या महाराष्ट्रातले ,ह्याला मी अत्यंत पुण्य भूमी मानते . म्हणजे रामाला सुध्दा इथे पायातल्या वहाणा काढून याव्या लागल्या अशी हि पुण्य भूमी आणि ह्या पुण्यभूमीत तुमचा जन्म झाला म्हणजे पूर्वजन्माचे काहीतरी पुण्य असायलाच पाहिजे असा विचार करा . स्वतः बद्दल विचार करा हे काय तंबाकू खाण्यात आयुष्य घालवणार का?पण मी तंबाकू बद्दल मी काहीही बोलत नाही ,माझं म्हणणं असं आहे कि तुम्ही एकदा आत्मबोध घ्या मग सगळं आपोआप सुटेल . काही करावं लागणार नाही . कारण आत्मा हा शुद्ध आहे आणि समर्थ आहे तो काहीही असलं तरी त्याला तो थांबवेल . तेव्हा आता तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा .मागच जे झालं ते झालं . आम्ही आमच्या मुलांना काय दिल याचा विचार करा . ह्या मुलांना आता आम्ही काय दिलेलं आहे त्यांना धर्माच शिक्षण दिल कि नाही ,धर्माच शिक्षण म्हणजे भांडणाचं शिक्षण नव्हे प्रेमाचं शिक्षण . आणि प्रेमानी आम्ही मुलांना समर्थ केलं कि नाही . समर्थ जो मनुष्य असतो तो कुणाशी भांडत नाही ,कुणाला मारत नाही ,कुणावरती जबरदस्ती करत नाही ,आततायी पणा करत नाही . असा माणूस आपल्या जागी असा व्यवस्तीत उभा असतो . आणि उभा असतो म्हणजे त्याच्या वरती कुणी हातवारे केले तर तेच पडतात खाली . त्याला त्यांची काहीही भीती वाटत नाही . असा जर एक जीव तयार झाला तर अशी आता सोय झाली आहे कि त्यातून हजारो माणस निर्माण होऊ शकतात . आपण करू पार . आणि तुमच्यात ला जो होईल आणि जो शिकेल ,होईल पार तो हजारों ना पार करेल . एकानी हजारों ना करायचं असं लिहिलेलेच आहे . एका दिव्याने हजारो दिवे पेटवता येतात . पण पहिला दिवा पेटला पाहिजे नाहीतर तो हि आंधळा आणि बाकीचे पण आंधळे . आंधळाच आंधळ्याला काय सांगणार . तेव्हा सगळ्यांनी हे समजलं पाहिजे कि सहजयोग हे नुसतं काही टाळ कुटण्याचं किंवा भक्ती मार्गच नाही . हे सगळंच आहे . हे सर्व समाजाला आम्ही व्यवस्तीत लावणार आहोत . 

आणि त्यासाठी आपल्या समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढल्या पाहिजेत . हुंड्याच्या चाली . कि ज्याच्या आम्ही विरोधात आहोत . एक हजाराच्या वरती लोकांना आम्ही खर्च करू देत नाही लोकांना . आणि ज्यांची लग्न होत नाहीत त्या देशांमध्ये आता अशा मुली आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल आठ वर्षाच्या मुलीच लग्न करून टाकलं . आठ वर्षाच्या मुलीच लग्न बेकायदेशीर झालं . आणि तो मुलगा चाळीस वर्षाचा . आता त्याला ती मुलगी नकोच होती ,त्यानं तिला सोडली . सोडणं आपल्याकडे जस काही गाईम्हशी सोडतो तस बायका सोडतात . तिला सोडून टाकलं . ती मुलगी नंतर थोडं शिकून वर आली तर तिला सगळे म्हणायला लागले तीच लग्न झालेलं आहे आता तीच लग्न होणार नाही . त्या मुलीन आता काय करायचं ?अशा मुलीच लग्न आम्ही एका फ्रेंच मुळाशी करून दिल . तो अगदी तिला राणी सारखं ठेवतोय . त्याच्यावर माझ्यावर त्यावेळी लोक ओरडत होते तीच लग्न तुम्ही का करून दिल . तीच लग्न जर नसत केलं तर फार चूक झाली असती . तिला लोकांनी मारलं असत .छळलं असत ,त्रास झाला असता तिला . आपल्या देशा मध्ये असही आहे कि काही लोक छळायला लाही पाहिजेत . आता वैधव्य सुध्दा आपल्या कडे एक मोठा प्रॉब्लेम आहे . 

आगरकरांनी ,टिळकांनी ,रानड्यां नि ह्या सगळ्यांनी विधवेशी लग्न केलं आणि  बालविवाह कायदा केला . पण गेलय का ते सगळं ?. मुळीच गेलेलं नाही . विधवा म्हणजे जिने पूर्व जन्माचं काही तरी पाप केलं म्हणून ती विधवा झाली . कुणी सांगितलंय हे ?. समजत नाही . अहो श्री राम जे सहा हजार वर्षा पूर्वी झाले त्यांनी सुद्धा मंदोदरी जी रावणाची पत्नी होती तीच लग्न बिबिषणाशी लावलं . म्हणजे ते आपण बघायचच नाही . ते बघतच नाही आपण काहीतरी विचित्र काढायचं . आता सोवळं ओवळं ,अहो त्या रामानी त्या भिल्लीणीची उष्टी बोर खाल्ली ,एव्हडी म्हातारी ती तुटलेले दात त्यात तिने चावून ती बोर ठेवलेली आणि ती बोर रामानी केव्हडी प्रेमानी खाल्ली . विदुराच्या घरी जाऊन कृष्ण जेवले . आणि दुर्योधना कडे गेले नाहीत . म्हणजे काय आहे कि हे समजलं पाहिजे कि प्रेमाचं महत्व च आपल्याकडे  सर्व जेव्हडे साधुसंत झाले ,मोठी अवतरण झाली त्यांनी प्रेमाचं च महत्व सांगितलं आहे . आणि बाकीच्या गोष्टीच महत्व नाही सांगितलं . 

आता दुसरं बघा तुम्ही जातीपाती मध्ये वाल्मिकी कोण होते ,कोळी होते . कोळी जातीचा माणूस होता तो . बर त्याच्यावर अजून सांगते गीतेचा आधार घेतात हे लोक . गीतेचा आधार घेतात कसे हे मला समजत नाही कारण व्यास कोण होते माहित आहे का तुम्हाला ?कोळीणीचा मुलगा तो हि असा तसा ,त्यांनी जर गीते सारखं मोठं महान काव्य लिहिलं आहे मग तो ब्रम्हाला प्राप्त झाला म्हणून ब्राम्हण . जो ब्रम्हाला प्राप्त झाला तो ब्रांम्हन . म्हणजे सहजयोगी हा खरा ब्राम्हण आहे . बाकी हे खोटे . काहीतरी उगीचच नावाला आम्ही हे ,आम्ही ते म्हणून खोत बोलू नये .आणि स्वतःला स्वतःच सर्टिफिकेट देऊ नये .  जो खरा ब्राम्हण असेल त्यांनी ब्रम्हाला प्राप्त करून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे . आणि प्राप्त झालं पाहिजे . तर अशा प्रमाणे आपल्या लोकांमध्ये सुध्दा अशी पुष्कळ लोक आहेत कि जे ह्या गोष्टींना सोडलेलं आहे . पण ब्राम्हणांनी च या बद्दल बिडा उचललेला आहे कि आम्ही हे सर्व सोडून टाकू . म्हणजे आता बघा आपले टिळक ब्राम्हण होते ,तस आपले रामदास स्वामी हे हि ब्राम्हण होते . रामदास स्वामींनी इतकं यावर लिहिलं आहे कि काय विचारू नका . म्हणजे त्यांनी जितके कोरडे ओढले तेव्हडे मला नाही वाटत कुणी ओढले असतील . पण आता मला एव्हडं आश्चर्य वाटलं कि रामदास स्वामी एव्हडे मोठे ,शिवाजींचे गुरु त्याच्यावरती लिहा म्हंटल थोडं काही तर सरळ मला सांगितलं आम्ही लिहिणार नाही तो ब्राम्हण होता . म्हणजे ब्राम्हण होता म्हणूनही वाईट आणि ब्राम्हण नव्हता म्हणून हि वाईट . जे देवाचे साधुसंत आहेत ते सगळे देवाला मान्य आहेत बाकी सगळं बेकार आहे . तुम्हाला उद्या देवाच्या साम्राज्यात जायचं आहे ,त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं आहे त्या वेळेला तो समाज वेगळा असणार आहे साधुसंतांचा . आणि त्या साधुसंतांच्या समाजा पुढे आपण कशा रीतीने वागलो आपण समाजात आपण काय काय केलं ते सर्व त्याच्या समोर येणार आहे . आणि ह्या मुलांना तुम्हाला काय द्यायचं असेल तर सुज्ञ बुद्धि दिली पाहिजे आणि हि सुज्ञता फक्त आपल्या मध्ये फक्त प्रज्ञा जागृत होईल तेव्हाच येईल . तेव्हा सगळ्यांनी आत्मबोध घ्यावा . हे आपल्या हिंदू धर्माच ब्रीद आहे ,हिंदू धर्माचा जो काही गाभा आहे तो म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होणे . तो न मिळवता बाकी सगळं काही म्हणतात ते खोट आहे . तो एकदा मिळवल्यावर मग कुणाची सुद्धा तुमच्या वरती कोणच्याही तऱ्हेची जबरदस्ती चालणार नाही . कोणाचाही तुम्हाला त्रास होणार नाही . सगळी काम तुमची व्यस्थित होतील . म्हणजे चमत्कार होईल . अनेक चमत्कार घडतात . चमत्कार घडणे म्हणजे काय कि कारण आणि परिणाम याच्या पलीकडे जात तुम्ही . देव हा कारण आणि परिणाम याच्या पलीकडे आहे . अनेक चमत्कार घडतात . आता हे चमत्कार मी सांगायला बसले आणि लिहायला बसले तर एव्हडं मोठं पुस्तक होईल . तेव्हा त्या बद्दल मी सांगणार आहे पण काल रात्री मी सांगितलं आमच्या कडे भजनाला मंडळी अली होती त्यांना सांगितलं कि कस चमत्कार घडतात . आणि मग लक्षात येत कि देव हा आहे त्याची शक्ती आहे ,त्याच्या प्रेमाची शक्ती आहे . आपण एव्हड्या साठी मुकलो कारण आपली द्रीष्टी देवा कडे नाही .तेव्हा आपण आपला स्वार्थ बघितला पाहिजे . स्वार्थ म्हणजे स्व चा अर्थ काढणे आणि ज्याने स्वचा अर्थ काढला तोच स्वार्थी आहे . बाकी स्वला काही अर्थ नाही . तेव्हा आपल्या साधुसंतांनी पण बरोबर अर्थ वापरला स्वार्थ शब्द वापरला आहे . तसे ते हुशार होते त्यांना माहित होत स्वार्थ म्हणजे लोक लागतील भलत्या मार्गाला . म्हणून तुम्ही स्वार्थ गाठा म्हणजे पहा स्वचा अर्थ घ्या . समर्थ तुमचा जो आत्मा  आहे त्या नावाला त्या अर्थाला समर्थ व्हा . त्यांनी बरोबर शब्द काढून ठेवले आहेत . हे सगळं समजून घेतलं म्हणजे प्रत्येक शास्त्रात काय लिहिलं आहे ते सगळं सहजयोगात आहे . सगळ्या जगातल्या शास्त्राचं  तत्व एकच आहे . आणि हे सर्व तत्व सहजयोगात आहे म्हणून आम्ही असं मानतो कि हा एक विश्व धर्म आहे . ह्यात सर्व धर्म समानत्व आहे जे गांधीजींनी सांगितलेलं आहे . पण विशेष करून हिंदू धर्माचा ह्याला पाया आहे . कारण हिंदू धर्मा मध्ये ,धर्म म्हणता येणार नाही पण हिंदूंची आपली परंपरा आहे त्याच्या मध्ये मोठ्या मोठ्या साधूसंन्यासी लोकानी ,द्रष्ट्यानी ,अनेक अवतरणांनी जे काही सांगितलं ते ह्या पायामधे आहे . म्हणून हि फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या साठी तुम्ही सर्वानी माझी मदत केली पाहिजे . सर्व जगामध्ये आपलं राज्य आहे असं समजलं पाहिजे . सर्व जगामध्ये आपलं घर आहे असं समजलं पाहिजे . आणि सर्व तुमची मित्र मंडळी अली इथे तुम्हाला भेटायला ,ते म्हणतात आम्हाला फार अहंकार आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांना अहंकार नसतो . त्यांना असं वाटत कि तुम्हाला काही अहंकार नाही . आम्ही इथे शिकायला आलो कि आमचा अहंकार आम्ही कसा जिंकायचा  . आता तुम्ही सांगा मी काय बोलायचं त्यांना आपलेच दात आणि आपलेच ओठ . काही सांगता येत नाही . त्यांच्या मते दिल्लीला जायला नको मुंबईला जायला नको ,कारण दिल्लीच्या लोकांना फार अहंकार आहे . फक्त महाराष्ट्रातच फिरायला पाहिजे . त्यांना असं वाटत कि महाराष्ट्रात लोकांना अहंकार नाही अत्यंत धार्मिक लोक आहेत ,काही त्यांना अवगुण नाहीत ,अगदी सालस लोक आहेत आणि कोणतीही वाईट गोष्ट त्यांनी केलेली नाही . आता त्यांना जेर याचा फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे . जरी दगडाला आपण देव मानलं आणि त्यांनी जर आपल्याला फायदा झाला तर काही हरकत नाही . म्हणून मी म्हणते त्यांनी तुमच्या बद्दल अशी भावना ठेवली तरी दोन्ही फायदे होऊ शकतात . ते चांगले होतील आणि तुमच्यावर इतका विश्वास टाकला म्हणून तुम्ही हि जागणार त्या गोष्टीला कि हे लोक आम्हाला इतकं देवा सारखं मानत आहेत तेव्हा आम्ही हि कुठंतरी देवा सारखं झालं पाहिजे . 

अशारितीने आपला सर्व समाज उत्तम होऊन इथे रामाचं राज्य येऊ दे हीच एक माझी इच्छा आहे . दुसरं मला काहीही नको आहे . काही प्रश्न असतील तर विचारा . नाहीतर तुम्हाला एक अनुभव देते मी . अनुभवा शिवाय काय आहे . आता सिध्द करायचं आहे कि देव आहे कि नाही ते . आत सांगायचं म्हणजे तुमचा हा अहमद नगर जिल्हा म्हणजे माझं माहेर आहे हे तुम्हाला माहीतच आहे . आणि मी इथलीच राहणारी आहे आमचे बापडाजे हजारो वर्षे इथे राज्य करत होते . शालिवाहनाचे , त्यामुळे तुम्ही माझ्या माहेरची मंडळी आहात . तेव्हा आपल्या घरच्या मुलीने जर काही आपल्याला सांगितलं तर कुणी वाईट वाटून घेत नाही . सासरच्या लोकांना वाईट वाटत पण माहेरच्या लोकांना वाईट वाटत नाही . तेव्हा मी तुमचीच मुलगी आहे असं समजून कोणत्याही गोष्टीच वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे . जे आहे ते चांगलं व्हावं ,उत्तम व्हावं हीच एक आशा आहे . 

आता सोपं काम म्हणजे असं आहे कि सगळ्यांनी डोक्यावरच्या टोप्या काढून घ्या बायकांनी पदर ठेवायचा नाही डोक्यावर . इथे टाळूवर आपल्या ब्रम्हरंध्र आहे . ती जागा जी आहे ती उघडते आणि कुंडलिनी सात चक्रातून वरती येऊन या टाळूतून बाहेर पडते . आता पुस्तक वैगेरे मागवून तुम्ही शिकून घ्या सोपं काम आहे अगदी . आणि ती अशी सहा चक्रातून भेदन करत वरती आली कि सातव चक्र गणपतीचं आहे गणपतीला कुणी भेदू शकत नाही ,पण गणपती हा कुंडलिनीच्या खाली बसला आहे आणि सगळं काही त्याला माहित असत म्हणजे असं समजा कि कुणी ऑफिसर बसला आहे . आणि तो सांगतो कि ह्या माणसाची कुंडलिनी वर चढवा किंवा नाही चढवा ते . आणि तुमची कुंडलिनी म्हणजे जस काही टेपरेकॉर्डर असावं तस तुमचं जे काही चुकीचं आहे ते त्याच्यात लिहिलेलं आहे . म्हणजे समजा त्याच्यात सगळे अनुभव आहेत . अनादी काळापासून . तर ती कुंडलिनी हळू हळू उठते म्हणजे काय पुष्कळ असे दोर एकत्र बांधावेत अशी ती आहे . आणि ती साडेतीन वेटोळे घालून बसली आहे . पण त्यातले काहीच दोर पहिल्यांदा वरती येतात सगळेच दोर येत नाहीत . म्हणजे जशी जागा चक्रान मध्ये व्हायला लागते ,आधी चक्र खुली व्हायला पाहिजेत आणि चक्र खुली होण्या साठी जेव्हा तुम्ही माझ्याकडे अशे हात करता तेव्हा दोन्ही हातावरची साती चक्र मिळून मध्ये मध्ये चक्र तयार होतात ,आणि म्हणजे मधली जी सुषुम्ना   नाडी जी  आहे ती तयार होते . तुम्ही असे हाथ करून माझ्याकडे बसलात कि त्यातून चैतन्य वाहायला लागत . आणि हाताच्या बोटातून जाऊन सर्व चक्रना खुलं करत . सर्वचक्र खुलं झाल्या बरोबर त्याच्या अंदाज आपल्या कुंडलिनीला लागला म्हणजे गणपती असा म्हणतो कि तू आता चल . झालं सुरु . तर तो गणपती म्हणजे तुमच्या मध्ये असलेली तुमची बाल्यावस्था ,भोळेपणा हे सगळं त्या गणपतीत आहे . आणि हि कुंडलिनी हि तुमची आई ,प्रत्येकाची आई हि वेगवेगळी आहे . ती प्रत्येका पुढे बसलेली आहे आणि तीच तुम्हाला पुन्हा जन्म देते . तुम्हाला काही त्रास होत नाही,तुम्हाला काही होत नाही  पण तिला मात्र धडपडावे लागत . तेव्हा कृपा करून कोणताही मागचा पुढचा विचार करायचा नाही ,मी हे पाप केलं ,वाईट काम केलं ,हे केलं ते केलं सगळं विसरून जा . झालं असेल काही तर विसरून जा सगळं . कुणी विचारत नाही ,कुणी मोजत नाही . कुणी बघत नाही काही नाही . आत्ता तुम्ही वर्तमान काळात बसलेले आहात तर एव्हढाच विचार करायचा कि ह्या वेळी हि आत्मबोधाची घटना घडली पहिजे . आता सहाव्या अध्यायात याला निषिद्ध करून ठेवलं आहे का केलं ते समजत नाही . जो मुख्य त्याचा गाभा तोच मना करून ठेवला आहे . 

तेव्हा हि कुंडलिनी तुमच्यात जागृत झाली कि तुमच्या सुषुम्ना नाडीतून वरती येऊन शेवटी हे टाळूतील ब्रम्हरंध्र आहे त्यातून बाहेर पडते . ती बाहेर पडली कि तुम्हाला इथे आपल्याच डोक्यावर गारगार असं चैतन्य जाणवायला लागत . नंतर हि सर्व सृष्टी जी आहे ती ज्या ऋतुंभरा प्रज्ञेने चालते म्हणजे आता आपण म्हंटल तर हि हिरवी पान करू शकत नाही . एका फुलाचं फळ करू शकत नाही . हि सगळी जी क्रिया घडते ती ऋतुंभरा प्रज्ञेने घडते . आणि हि प्रज्ञा म्हणजे काय आहे तर परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे . आणि हि सूक्ष्म रूपाने सगळीकडे वावरत असते ती हे कार्य करते . तर ह्या शक्तीला तुम्ही प्राप्त होता . तर सर्व प्रथम तुम्हाला हाताला थंड थंड असे वाऱ्या सारखे जाणवायला लागत . आणि ते झालं कि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ह्या शक्तींनी अनेक लोकांचे रोग बरे करू शकता , स्वतःचे रोग बरे करू शकता . आणि तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आल्या मुळे तुम्हाला पदोपदी किती देवाचं साहाय्य आहे आणि किती त्याच सवरक्षण आहे हे लक्षात घ्या . प्रत्येक गोष्टीन मध्ये ,तसेच पैशाच्या बाबतीत तुमचं जर लक्ष्मी तत्व जागृत झालं तर ते ,तुमच्या मध्ये ब्रम्हदेवाचे जागृत झालं तर तुम्ही फार मोठे आर्टिस्ट होता अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी घडतात . 

तेव्हा आता सरळ पणे असा हात ठेवायचा ,दोन्ही हात असे समोर ठेवा माझ्या कडे . आरामात सहज बसा . बसताना काही अडचण वाटली नाही पाहिजे . गंडे दोरे असतील तर गळ्यात काढून टाका ,ते सर्व खोट आहे . दोन पैशाची वस्तू एक रुपयाला कशी विकायची ते ह्यांना विचारा ,महा भामटे लोक हे . आता उजवा हात जमिनीवर ठेवूया आणि डावा हात माझ्याकडे करा . डोळे मिटून घ्या . हळू हळू बघा डाव्या हातात तुम्हाला काहीतरी जाणवतंय गारगार . टाळू कडे लक्ष द्या आता . आता मना मध्ये प्रश्न विचारा माताजी मी आत्मा आहे का . तीनदा विचारा . आता हळू डोळे उघडायचे पण निर्विचारतेत ,विचार नाही करायचा . कोणताही विचार मनात येऊ द्यायचा नाही . आता उजवा हात माझ्याकडे करायचा ,असा आकाशाकडे आता दुसरी बाजू आपण स्वच्छ करणार आहोत . आणि डावा  हात सरळ मांडीवर ठेवा . परत डोळे मिता . आता तुम्ही म्हणा मनामध्ये माताजी मला आत्मसाक्षात्कार द्या . तुम्ही मागितल्या शिवाय मी देऊ शकत नाही . लक्ष टाळू कडे . आता उजव्या हातात काही गारगार येतंय का बघा . आता डावा पोटावर ठेवा . आता डावा हात माझ्याकडे घ्या आणि डोक्यावर ,टाळूवर गार येतंय का बघा . आता डोळे उघडून माझ्याकडे बघा . आता पुढचं बघायचं ,इथं सेंटर आहे तिथे जाऊन नुसतं एक महिना मेहनत केली तरी तुमि गुरु व्हाल . शाळेमध्ये सुद्धा मुलांना जागृती द्या आणि सगळ्यांना संपन्न करून टाका . सगळ्यांना नमस्कार . सगळ्यांना दर्शन घ्यायचं असेल तर अशी व्यवस्था करा कि माझ्या पायाला हात लागणार नाही .