Puja, Attention on Quality

Rahuri (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja

हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक, त्या बुद्धालाच मिळाले, बाकीचे गेले की काय! आमच्याचजवळ हा प्रकार कशाला ? बर दुसऱ्यांचे जे फालतू गुरू आहेत त्यांच्या शिष्यांना बघा! सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं, ‘हो सके तो सेवा हम से करा लेना ,’ काही होऊच शकत नाही तर सेवा कसली करून घ्यायची. तरी आता कृपा करून ह्यांना वाढायचं वगैे काम सहजयोग्यांनी केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला त्याने स्वयंपाक केला! बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजेत. काहीतरी करा हाताने काम! त्यांना अशी आचार्यांच्या जेवणाची सवय नाही स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात ते ब्राह्मण लोक झालेत आणि तुम्ही मात्र त्यांना आचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी! मग असं म्हटलं, की माताजी पैसे वाचवायच्या मागे आहेत. अरे, पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते आहे मी! ते काही मी खाते आहे का? लाखोंनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले ! सगळं लक्ष पैशांकडे. सगळ लक्ष तिकडे. म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले आहेत. आज म्हटलं राहरीला हे सांगितलेलं बरं! आता ही टेप तुम्ही ন

सगळीकडे पाठवा. ही काही नुसती राहरीकरांसाठी नाहीये किंवा तिथे औरंगाबादसाठी नाहीये. ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा. हा प्रकार आपला माताजी म्हणताहेत, हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा म्हणजे पुढे होणार काहीतरी. अहो, म्हणजे घोर अंधःकार आहे नुसता ह्याबाबतीत. तुम्हाला काय हवं होतं ते सगळ दिलं. सहजयोगासंबंधीचे ज्ञान, सात चक्रावरची माहिती. कुंडलिनी उचलण्याची शक्ती, जी फारच कमी लोकांना आहे. नव्हतीच ती तुम्हाला. एका क्षणात ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतके उच्च पदावर बसवल्यावर, एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन तर त्याला काय म्हणायचं! ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडीत मारत असत, श्रीमुखात देत असत, ते आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही. मला करायचं नाही आणि मला जमणारही नाही. एवढेच बोलायचे जीवावर येते माझ्या. फक्त विनंती आहे, की आता कृपा करून हृदयापासून सहजयोग स्वीकारावा. हृदयापासून कार्य करा. हृदयामध्ये बसवा मला. तेव्हा कार्य होणार आहे. मी ह्या वयात एवढी मेहनत करते. सकाळ – संध्याकाळ धडपडत आहे तुम्हाला माहिती आहे. हे लोक नुसते फिरतीवरच आहे, पण मी किती मेहनत करते, तुम्हाला शोभतं का ? तुम्ही तरुण लोक आहात. तरुण आहात सगळेजण. माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार? आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे. स्वत: पूरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे. सजवले पाहिजे. कधीही हे लोक डेकोरेशनला कोणाला बोलवणार नाहीत. काय काय डेकोरेशन केले ह्यांनी! जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बरं आाजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही, जो रियलायज्ड नाहीये. ह्या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही. त्याला कारण तुम्ही लोक. मी नाही. कारण असं आहे, जशी तुमची परिस्थिती असेल, तितकेच परमेश्वर तुम्हाला देईल. तितकेच झेपले पाहिजे. जास्त दिलं म्हणजे डोक खराब होतं माणसाचं. तरी किती दिलेले आहे. विचार करा, ‘किती दिलं आहे माताजींनी. किती दिलं, किती प्रेम दिलं. किती विचार ठेवला. आम्ही जरी मूर्खासारखे वागलो, तरी माताजी आम्हाला किती प्रेमाने वागवत राहिल्या. पदोपदी आमच्याकडे लक्ष ठेवलं. कुठे आम्हाला त्रास झाला. मुल फस्स्ट क्लास आली. सगळे काही झालं व्यवस्थित. व्यवस्थित होत आहे. आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या. आमच्या मनाप्रमाणे सगळं काही झालं. पैसे मिळाले. सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे.’ तर हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. तुमच हित साधायचं आहे मला आणि हित ह्याच्यात नाही, की नुसते तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं. काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे. अलौकिक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिजाईंनी एवढं मोठं केलं. एकटे शिवाजी महाराज उभे केले. मला हजारो आज उभे करायचे आहेत. तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात. त्यावेळेला तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते. पण आज तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे. जात-पात, आणि घाणेरड्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत. ह्याच्यातून निघून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे. साधु-संतांना काही जात नव्हती. इथे इतकी साधु-संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे. अरे ह्या लोकांना तर काय साधु-संत माहिती

नव्हते. रामासारखे लोक पाहिले नाहीत. कृष्णासारखे लोक पाहिले नाहीत. तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवाने इथे! ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे! शक्य नाही. ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे. ते आहे आतमध्ये. त्या पूर्वपुण्याईशिवाय तुम्ही इथे आला नाहीत. ह्या देशात जन्माला यायचं म्हणजे फार पूर्वपुण्याई पाहिजे. ही सगळी पूर्वपुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतलात. मच्छिंद्रनाथांपासून सगळ्यांनी इथे एवढी मेहनत केलेली. ती सगळी काय तुम्ही वाया घालवणार आहात? आज त्याची फळें लागली आहेत. आज त्याला रूप आलेले आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत, की सहजयोगी म्हणजे काहीतरी आहेत. आपापसात भांडणं आणि हे, ते सगळं बंद करून एकजुटीने, सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही एक कमिटी करा. सगळे मिळून पैसा खर्च करा. कुठे खर्च झाला तो व्यवस्थित करा, त्याचा हिशेब, अहवाल पूर्णपणे मला एका माणसाकडून नको, सगळ्यांकडून पाहिजे. पण असं होतील. तशी भांडणं करायची नाहीत. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात. चौदा केल्याबरोबर भांडणं सुरू देशातले लोक आहेत. आपले एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोकसुद्धा एकत्र राहू शकत नाही. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं, शिंग फुटली तरी हरकत नाही. पण ती शिंग सारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुकृत आलं पाहिजे, एक विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, की इथले लोक काही विशेष आहेत. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही. हात आमचे चालत नाही आणि ह्या सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. तेव्हा कृपा करून लोकांनी हा विचार करावा, सहजयोग्यांनी, की आता आपण सगळ्यांनी मिळून काय कार्य करावं? आपण काय उभं करावं? आपण काय करू शकतो? आमच्या भाषणाला…. प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वत:मध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होतील आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवाल. उद्या तुमच्या कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय? लोक आम्हाला तसच म्हणतात, तुम्ही आदिशक्तीच आहात. म्हणजे आम्ही कोणीतरी दुसरीच वस्तू आहोत. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं, ते दिसलं पाहिजे आणि ते जेव्हा दिसेल तेव्हाच सगळं ठीक होईल. असो, आज मुद्दामहून मी सांगितलं, कारण थोडीशी तरी वीरश्री यायला पाहिजे. धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळी कामं आपल्याबरोबर करतो आहे, तर आपल्याला आपल्यासमोरच (काल्पनिक) उभं राहन विचारलं पाहिजे, ‘का रे बाबा, तू केलस काय आजपर्यंत? काय मिळवलस तू सहजयोगामध्ये? स्वत:चा स्वार्थ, की परमार्थही मिळवला आहे थोडासा?’ असा प्रश्न विचारून पुरुषांनी कार्याला लागलं पाहिजे.