Shri Mahalakshmi Puja, The Universal Love (India)

Shri Mahalaxmi Puja, The Universal Love, Kalwe, India (1992-1230) [Shri Mataji speaks English] आता मराठीत बोललं पाहिजे, कारण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. जे पोलिटिक्स मध्ये चाललेलं आहे तेच आपल्या आज घरोघर, सहजयोगामध्ये झालेलं आहे. ह्याचा पाय त्याने ओढायचा, त्याचा पाय त्याने ओढायचा, म्हणजे आहे तरी काय मला समजतच नाही. अहो जर तुमच्यामध्ये सामुहिकता आली नाही, समष्ठी आली नाही तर या वैष्टी स्वरूपासाठी का आम्ही इथे एवढे दिवस इथे मेहनत केली आणि संत साधूंनी हेच सांगितलं का? इथपर्यंत सांगितलं, ‘तेची सोयरिक होती’. अहो त्या ज्ञानेश्वरांनी एवढं कशाला सांगितलं? ते कोणासाठी सांगितलंय? मला समजत नाही. परदेशातल्या लोकांसाठी सांगितलेलं दिसतं. कारण इथं कोणावर परिणामच होत नाही त्याचा. तुमचे सोयरिक कोण? तेच सहजयोगी. पण ह्याचं हे चुकलं आणि त्याचं ते चुकलं आणि एवढी मोठमोठाली मला पत्र पाठवतात. मला हे ऐकून बरं वाटेल का? देवीला प्रसन्न केलं पाहिजे कि तिला अशा गोष्टी लिहून पाठवल्या पाहिजे? आता प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे सुद्धा मला वाटतं कि मी कोणाशी बोलते. अहो तुम्ही संत, साधू, तुम्हाला साधू केलं मी, संत केलं, तुम्हाला इतक्या उच्च दशेला आणलं. धृवासारखं तुम्हाला नेऊन बसवलं त्या अढळ पदावर आणि तुम्ही आता कुठे इथे पडले आहात, मला समजतच नाही याला Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महत्प्रथासाने ते पालन करतात, उपास करतात, हिमालयांत जातात. डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर | की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक देवावर ते विश्वास ठेवतात पण ते गुरुच्या सारखे होण्याचा प्रयतल करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या होत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते आमेनियामधे पहायला मिळते. मारतेवेळी ते एका हातांत बायबल ध्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता, आणि त्यांना वाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे. मुस्लिम Read More …

Shri Saraswati Puja (India)

Shri Saraswati Puja 3rd February 1992 Date : Place Kolkata Type Puja ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वत:च्या आईला आपण जाणू शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभूमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत जातो, हे मी पाहिले आहे. मला आश्चर्य वाटतं की, जिथे इतकी वर्षे मी घालवली, इतके कार्य केले, तेथील लोक इतके गहन नाहीत. इथल्यासारखी इतकी सुरेख सामूहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा, विशेष म्हणजे इथलं प्रेम आणि सामूहिकता ही पूर्णत: नि:स्वार्थी आहे, हे बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. महासरस्वतीची इथे उपासना होणे फार महत्त्वाचे आहे. ह्या भूमीला तिने आशीर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे, पण ही सरस्वतीची उपासना फार सीमित आहे. इथले कष्ट आणि दारिद्रय यांचे कारण हे आहे. आपल्या कलागुणांची वृद्धी करण्यासाठी किंवा विद्वान बनण्यासाठी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. इथले लोक फार हुशार आणि अभिमानी आहेत, पण तरीही दारिद्रय कां? तुमच्याहून जास्त पैसा असणाऱ्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले पाहिजे. सरस्वतीचे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानवर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वाढीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मूर्तिशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही, पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभराच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे आणि जे फार सुरेखरीत्या निर्माण केलेले आहे ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतीकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायब्रेशन्सचा Read More …