Public Program Brahmapuri (India)

पब्लिक प्रोग्राम ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९            या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.             कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.            त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.            अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे Read More …

Puja Talk, In 10 years we can change the whole world (and Talk about the science) Brahmapuri (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Puja Brahmapuri (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दूसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वरगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल. तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण Read More …

Puja by the Krishna’s river Brahmapuri (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, की खेडोपाडी आमचे बांधव आहेत. आपण सगळे एका सूत्राने बांधले गेले आहोत. तुम्ही कोणत्याही देशातले असलात, कुठलेही असलात, तरी सगळी माझीच मुलं आहात. तेव्हा त्यात काहीही भेदभाव न पाळता सगळ्यांनी आपापसात मित्रता साधली पाहिजे. आणखीन सगळ्यांनी एकमेकांना ओळखून घेतलं पाहिजे. म्हणजे कोण कसं आहे, काय आहे. आता सांगायचं म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. शनिवारचा दिवस, कृष्णा नदीच्या काठी. म्हणजे कृष्णाचं सगळें सुरू झालेलं दिसतंय साम्राज्य इकडे. आणि ह्या सगळ्या त्याच्या साम्राज्यात आजची तुम्ही पूजा मांडलेली आहे. पूजेत सांगायचं काहीच नसतं खरं म्हणजे. कारण स्वत:च चैतन्य वाहून तुम्हाला भरपूर करून टाकत असतं. तेव्हा तेच फक्त तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. सहजयोगाची विशेषता ही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान-धारणा करावी लागते. जर तुम्ही ध्यान- धारणा केली नाही, तर मात्र सहजयोग जमत नाही. म्हणून थोडा तरी वेळ ध्यान- धारणेस दिला पाहिजे. आणि आपल्यामध्ये कुठे चुकतं ते तुम्हाला ध्यानातच कळू शकेल. ते तसेच पाळत ठेवायचं नाही. ते काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकल्याबरोबर त्याचे जे काही आपल्याला लाभ होतील, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती त-्हेचे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील. आणि तुम्ही ते इतरांनासुद्धा सांगू शकाल. Read More …

Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …

Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985. Marathi Transcript इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच Read More …