Talk Rahuri (India)

Talk तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . Read More …

Public Program Rahuri (India)

Public Program At Agricultural University ICU 1st February 1982 Date: Place Rahuri Public Program Type मराठी माणसाला अजून स्वत:बद्दल विशेष जाणीव नाही. विशेष करून तरूण मंडळींना सांगायचे आहे मला. परवा एका भाषणात एक गृहस्थ मला म्हणाले की आपल्या तरूण मंडळींची अगदी अधोगती होते आहे माताजी आणि त्याबद्दल तुमचे काय कार्य चालले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हे लोक उद्या वाया जाणार. दारू पिऊन, अगदी वाट्टेल तसे वागून सगळ्यांची नाचक्की करणार आहेत. यांना कोणाही बद्दल आता श्रद्धा वाटत नाही, कुणाचाही मानपान ठेवत नाही, सगळ्यांची थट्टा करतात आणि अगदी त्यांचे जीवन एखाद्या मूर्खासारखे झाले आहे. मी म्हंटले, ‘इतके काही वाईट नाही आहे हो . असं सगळच म्हणू नका तुम्ही. काही लोक आहेत तसे. आणि सगळ काही इतके बिघडलेले नाही आणि बिघडू शकत नाही.’ कारण अनंत शक्त्या या आपल्या भारत भूमीला आशीर्वादीत करताहेत. या तुमच्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी नावाची शक्ती आहे. पण ही कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे एवढच आहे. पण तिचे परिणाम मात्र आपल्या चरित्रावर, आपल्या संस्कृतीवर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले ज्यांचे वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर एक असे झाले तरी आपल्याला माहिती आहेत की कितीतरी संत साधू वारंवार म्हणजे तुम्ही दत्तात्रयांच्या वेळेपासून पाहिले तर आदिनाथ सुद्धा – त्यांच्या आधी पासून आदिनाथ-दत्तात्रयांचे जे अवतरण होते सुरूवातीचे आदिनाथांचे, ते सुद्धा या महाराष्ट्रात झाले. इतकच नव्हे तर जे मोठे मोठे संत-साधू झाले त्यांनी नेहमी महाराष्ट्राला भेट दिली. जे बाहेर होते, गुरूनानक होते ते इकडे आले किंवा जे जे असे- वल्लभाचार्य होते फार मोठे ते महाराष्ट्रात येऊन गेले. इतकेच नव्हे तर श्री राम आणि श्री सीता या पुनीत भूमीवर फिरलेले आहेत. त्यांचे Read More …

Talk to Sahaja Yogis Mumbai (India)

Sahaj Seminar Date : 10th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता चव्हाणांनी आपल्याला सहजयोगाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीची जर माहिती मिळाली, तर ती गोष्ट मिळाली असं नसतं. माहितीने आपण फक्त जाणतो, की अमुक वस्तू अशी आहे. समजा आम्ही लंडनची आपल्याला माहिती दिली. तरी तुम्ही काही लंडनला अजून गेले नाहीत नां ! तेव्हा लंडनला जाऊन तिथलं वातावरण कसं काय आहे, त्याचा अनुभव यायला पाहिजे. त्यानंतर सबंध लंडनमध्ये काय काय प्रकार आहेत, कोणते रस्ते आहेत, कोणत्या इमारती आहेत, त्या सर्वांचेसुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर, ते सगळे कळल्यावर तिथले कायदेकानून काय आहेत ? मग आपण तिथे वागायचं कसं? ज्याने आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल, ज्यासाठी आपण आलो. हा सगळा विचार करावा लागतो. अगदी तसेच सहजयोगाचे आहे. फक्त फरक एवढाच आहे, की सहजयोग ही जिवंत क्रिया आहे. जिवंत क्रियेत आणि कृत्रिम क्रियेत फार अंतर असतं. जिवंत क्रियेत कोणती गोष्ट कशी घडेल ते सांगता येत नाही. म्हणजे आता एखादं झाड जर तुम्ही लावलं, त्याला कुठे फांदी फुटेल, कुठे फुलं येतील, कधी येतील, कशी उमलतील, किती फळें येतील? ते काही आधी सांगता येत नाही. परत ते दिसायचं नाही काही सकाळी उठले फुलं आली. नंतर एखाद्या दिवशी सकाळी उठले फळं झाली. तसं सहजयोगाचं आहे. आधी पार व्हायचं. म्हणजे तुमचे कोंब फुटले. पार झाल्यावर, आता काय काय होतंय आमच्या आतून ते बघत रहायचं, साक्षी स्वरूपात. त्यासाठी पोषक काय करावे लागेल, तेवढं करत जायचं आणि ते करण्यासाठी शक्ती येते माणसामध्ये. म्हणजे मी आता कधीही प्रोग्रॅमच्या आधी म्हणत नाही की तुम्ही दारू पिऊ नका, की सिगरेट पिऊ Read More …

Evening prior to departure for London Pune (India)

Evening prior to Her departure for London (Marathi). Pune, Maharashtra, India. 30 March 1979. किती लवकर आलात सगळे जण? सगळ्यांना त्रास होतोय. आता मात्र मना करायचं लोकांना कोणी आलं तर. इतका उशीर करून यायचं आपलं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून. अस कस चालणार आहे? सगळ्यांना त्रास होतो कि नाही? बसा आता, बोलू नका. इतर लोक ध्यानात बसले आहेत. ही तपोभूमी ह्यावेळेला झालेली आहे. इथे येऊन निदान लोकांच्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. असे हात करून बसा. तुम्ही देवाला भेटायला येता. मग वेळेने आल पाहिजे नं थोडे तरी? थोडसं तरी गांभीर्य असायला पाहिजे. केवढं मोठं मागायला आलात माझ्याकडे!

Puja Pune (India)

महाशिवरात्रि,राजवाडे मंगल कार्यालय, पुणे,दिनांक २५/०२/१९७९,वेळ सायंकाळी ६.०० वा. Part 1 आजची महाशिवरात्री आहे.म्हणून मी आपल्याला आज शिवांचं महत्व सांगणार आहे. ते समजून घेतलं पाहिजे. ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी जरी घडवली असली आणि त्या सृष्टीत उत्क्रांतीमूळे मानवपद आपल्याला मिळालेलं आहे आणि हे मानवपद आपल्याला विष्णूच्या शक्तीमुळे मिळालेलं आहे. तरीसुद्धा ह्या मानवाला शिवतत्व मिळवायचं असतं. शेवटी विष्णूला शिवाची पूजा करावी लागते. एवढं शिवाचं महत्व आहे.शिवतत्व म्हणजे आपला आत्मा आहे. ही सगळी धडपड,हि सारी उत्क्रांती त्या तत्वाला जाणण्यासाठी आहे जे शिवतत्व आहे. म्हणजे आदितत्व जे आहे ते शिवतत्वच आहे. सदाशिवाचं तत्व आहे.ते सदा असतं. आणि त्यातून हि सर्व तत्वे निघून मानवनिर्मिती झाली. आता मानवानी त्या शिवाला ओळखलं पाहिजे,ज्यानी ही इच्छा केली होती कि ही सृष्टी करावी,त्यात मानव निर्माण करावेत आणि त्या मानवानी परमेश्वराला ओळखावं, त्याची शक्ती वर्णावी आणि त्याच्या शक्तीच्या आनंदात,त्याच्या कार्यात रतं राहावे,त्याचा बोध मानवाला व्हावा हि त्याची इच्छा. ती आज सहजयोगातून घडून आलेली आहे. विष्णू तत्वानी तुम्ही जरी पार झालात,तरी मिळवलं तुम्ही काय तर शिवतत्व. ते शिवतत्व हातातून वाहतय त्याला आपण चैतन्यलहरी असं म्हणतो. हाच योग घडलेला आहे. शिवानी आपली शक्ती जी शिवशक्ती आहे तिला आपण महाकाली शक्ती म्हणतो त्यातलाच थोडासा भाग कुंडलिनी म्हणून प्रत्येक मानवात ठेवलेला आहे आणि ती ह्या साही चक्रातून निघून भेदून परत शिवालाच मिळते,हे असं शिवतत्व आहे. शिव म्हणजे करुणेचा सागर,दयेचा सागर,प्रेमाचा ठेवा. हे सगळं प्रेमतत्व आहे. शिवाला जाणलं म्हणजे सत्य जाणलं आणि तो आनंदसागर आहे. त्याच्यात्न आनंद वाहत असतो. शिवाला प्रसन्न करायचं फार सोपं काम असतं. भोळा आहे तो अगदी. प्रेमाचा भूकेला परमेश्वर आहे तो. फार सोपं काम आहे .त्याची दृष्टी फार वर होत नाही,नेहमी खाली Read More …

Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe Pune (India)

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९ पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. याचं महत्त्व परमेश्वराला जास्त आहे, १ म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्षे याच्यावर मेहनत करून आणि निवडसुद्धा फारच मेहनतीने करून याला आपल्याला जो गरजेंद्र मोक्षाचा प्रसंग माहिती आहे, तिथेसुद्धा मॅमल्स सारखे जे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत, पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचे वाहन आहे. आपल्याला माहीत आहे, ते लक्ष्मीचे वाहन आहे, तसेच गणेशाचे स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्रमोक्षामधे जे अवतरण घेतलं, श्री विष्णूंनी त्याचं रक्षण केलं, ते काहीच नव्हतं, जे पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा या संसारात जन्म घेतला आणि किती तरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्याशी लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. ही मेहनत हजारो वर्षे चालली. चौदा हजार वर्षांपूर्वी सुद्धा लढाया होत होत्या. त्यानंतर श्रीरामांच्या काळातसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठ हजार वर्षाचा काळ म्हटला पाहिजे, जेव्हा श्रीराम या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना ते कार्य करायचं होतं, की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची Read More …

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …

Sahajayogyanmadhe Dharma Stapna Aur Sahajayog, Dharma has to be established Within Mumbai (India)

Sahajyogyan Madhe Dharma Sthapna Zali Pahije 18th December 1976 Place Mumbai Seminar & Meeting Type ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितले की मी गणपतीसारखं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ही विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात . अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे, फारच हळुवारपणे सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे, पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झाले नसते. पैकी आज हजारो मंडळी इकडेतिकडे धावत आहेत. वेड लागलंय लोकांना. विचार करत नाहीत की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे अनादी काळापासून, मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि श्रीकृष्णांसारख्या महान, परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्या एकीकडे फेकून, त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेलं आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते महम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो किंवा श्रीकृष्णांनी गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला ‘स्व’ जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असं म्हटल्याबरोबर लोक यापासून परावृत्त होतात कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना पटतच नाही मुळी. असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतंही जास्त. असत्याची जास्त कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर तक्काची पायरी. तर्क गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. ते कलीयुगात दिसतंय आपल्याला चोहीकडे. बापाला मुलावर विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. Read More …

2nd Talk Mumbai (India)

2nd talk, 1976-12-18 [Marathi Transcript]  मी आज आपण सर्वाना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात .जन्मजन्मांतराचे असता ते,आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी होते हे ,ते आपल्या एवढे लक्षात येणार नाही .कारण आपल्याला आपला  पूर्वजन्म माहित नाही .पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहेत आणि त्यामुळेच आज परत हया जन्मात सुद्धा आपल्या सर्वाना भेटण्याचा हा उत्तम वेळ आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे कि खरंच तो मी शब्दांनी  कधीच वर्णन करून सांगू शकत नाही .   ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम पणे पोचला जाईल .हे मला माहित  आहे . कारण  शहरात राहाणारी लोक हि मंडळी स्वतःला फारच शहाणी समजतात . एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख  नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात . त्यांना असं वाटतं कि सर्व जग त्यांनीच निर्माण केलेले आहे . हे आकाश सुध्दा त्यांनीच निर्माण केलेले आहें . आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत . आणि परमेश्वर नावांची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतेही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही,  कि आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातील ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मुंबई परमेश्वरालाआठवून आहे . आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे . आणि रामानी आणि सीतेने पायी प्रवास करुन सर्व भूमीला पूनीत केलेले आहे. पवित्र केलेले आहे . ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे. (notclear )सुद्धा लोक करतात पण पुष्कळसे लोक खोटया गोष्टी सांगुन पैसे उकळतात . काहीतरी भोळ्याभाबडया लोकांना भुलवुन काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्या कडून पैसे उकळत असतात.  हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं Read More …

Sahajyog Sagalyana Samgra Karto Mumbai (India)

Sahajyog Sagalyana Samgra Karto 29th May 1976 Date : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला मी पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो. मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार. तुम्ही करू नका. ते तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्या कडून काही नको. फक्त हे एवढंच. तुमचं भलं आणि कल्याण झाले पाहिजे. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार. त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आलेली आहेत, त्यांना मी सांगते. कोणी वाईट वाटून घेतलं, तर ते गेले कामातून. व्हायब्रेशन्स जाणार. मी काढत नाही हं. डॉक्टरसाहेबांची डोकी म्हणजे खोकी करून ठेवलेली आहेत. कोणी ऐकायला तयार नाही हो! मी करू तरी काय? मलाच समजत नाही. घरामध्ये देवाचा फोटो ठेवतील पण मी जर म्हटलं तुम्हाला देवाचा आणि कॅन्सरचा संबंध दाखविते तर तयार नाहीत म्हणजे त्यांच्याशी बोलायचे तरी कसे ? प्रॉब्लेमच आहे ना….. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा आणि जी मंडळी ध्यानात बसलेली आहेत त्यांनी येतंय थंड? …..तुम्हाला? हातामध्ये थंड वाहतंय…उत्तम….! जरा असे बघायचे. बघुया. तो असतो. तुम्हाला जो आवाज आला किनई असाच आवाज आपल्या ‘ओम’ जो आवाज म्हणतात, कळलं का! म्हणजे ही एनर्जी वाहत आहे नं, आणि जेव्हा ती वाहते आहे पण ती पूर्णपणे चैनलाइज्ड झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो. ती चैनलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो म्हणून आपल्यामध्ये ‘ओम’चा आवाज कधी कानामध्ये येणार, कधी Read More …

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा Read More …

Public Program Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

१७ मार्च १९७५              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर Read More …

Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

[Marathi transcript ver 1] भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. Read More …

Teen Shaktiya Mumbai (India)

Teen Shaktiya [Marathi Transcript – Soundcloud track: 1975-0121 Seminar Mumbai (Marathi), from 18:13 to 21:00] ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळं व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असते, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे. समजलं पाहिजे. कळेल का? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे.

Talk Mumbai (India)

लहान मुलांना घड्याळ बघता येत नाही आणि रागवता येत नाही. माझी अशी इच्छा आहे,  या वेळेला, थोडं लहान मुलासारखं आपल्या मनामध्ये, आपल्या आईकडे कशी आपली दृष्टी असते, तसा दृष्टीने जरा घड्याळ बिड्याळ बाजूला काढून, डोक्यावरची सगळी ओझी एकीकडे उतरवून आरामात बसा. आपण आईकडे गेलो म्हणजे सगळं फेकून बेकून आईच्या मांडीवर डोकं ठेवतो – आता पुष्कळ झालं सगळं, आता थोडं आरामात राहू द्या आम्हाला. असं समजून, थोड्यावेळ आराम करायला आलाय, असं समजून सहज भावनेत बसा. मी कधी कधी थट्टेनी सांगत असते, की काही अडाणी लोकं, ट्रेन मधून पहिल्यांदा चालले होते आणि आपल्या डोक्यावर पुष्कळस  सामान लादून घेतलं होतं. लोक म्हणाले हे काय करता तुम्ही? आम्ही हे ट्रेनचं ओझं जरा कमी करतोय. तसंच आपण घरातून पुष्कळ ओझी घेऊन आलोय, पैकी आठ वाजता इकडे जायचं दहा वाजता तिकडे जायचं आहे. देवाच्या घरात काही घड्याळ नाही, तेव्हा त्यांना म्हटलं अहो काय तुम्ही ओझी लादत्ता? तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसला आहात, तीच ट्रेन तुमचं सगळं वजन घेत आहे, तुमचही आणि तुमच्या डोक्यावर आहे त्याचाही. तसंच आपण आपल्या डोक्यावर उगीचच बोजी घेऊन सगळ्या जगाचं कर्तृत्व घेऊन बसले आहोत आणि कर्ता झालेलो आहोत  खरं करणारा तर परमात्मा आहे, आपण काहीही करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की उद्या हा माईक म्हणायला लागेल की मी भाषण देतो, आपण त्याच्यावर हसू पण आपली स्थिती ही तीच आहे. आपण नुसतं परमात्म्याच्या हातातले एक खेळणं आहोत.  ही जाणीव सामूहिक भाषणांनी, विवादांनी याने त्याने येत नाही. ही जाणीव फक्त एकदा झाली की आपण मोकळे होतो. जी मंडळी आम्ही म्हणतो की पार झाली, घरी जाऊन  घोडे विकून जसे झोपतात तसे झोपून जातात. कारण झालं पुष्कळ उचललं उगीचच.   तुम्ही Read More …