Shri Saraswati Puja Dhule (India)

Shri Saraswati Puja, Dhulia (India), 14 January 1983. [Marathi Transcript] आता धुळ्याच्या सहजयोग्यांसाठी अस सांगायचं की, आता बरेच लोकं काल पार झालेले दिसले. आणखी थोडं सिरियसली पण सहज योगात येतायत अस वाटलं. तेव्हा धुळ्यांच्या लोकांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. राऊळ बाईंनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याचं घर‌ इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे सगळ्यांनी रविवारी सकाळी अगदी व्यवस्थित पणे ध्यान हे केलं पाहिजे. तसंच घरी रोज बैठक पाहीजे. बैठक जर तुम्ही केली नाही तर सहजयोगी जमणार नाही. तुमच्या वर अवलंबून आहे. जितकी तुम्ही बैठक कराल, जितकी तुमच्या मध्ये गहनता येईल, तितका सहजयोग वाढणार आहे. जर तुम्ही स्वतः मेहनत नाही केली, तर सहज योग वाढणार नाही आणि तुम्हालाही सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. म्हणून रोज अगदी न चुकता सकाळ-संध्याकाळ बैठक ही पाहिजे. सकाळी जरी थोडा वेळ असला, तरी संध्याकाळी व्यवस्थित आरामात बैठक पाहिजे. हळुहळू तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या जवळ पुष्कळ टाईम वाचू लागले, कारण बाकीचे तुम्हाला काय आवडणारच नाही. इकडे जायचं, तिकडे जायचं, गप्पा मारायच्या, फालतूच्या गोष्टी तुम्हाला काही आवडणार नाही.  नको रे ते असं होईल उगीचच्या गोष्टी करत राहतात. उलट तुम्हाला वाटेल की काय बसून राहिलेत सगळे, बेकारचे लोक यांना काही समजत नाही. उगीचच आपला कशाला इथे वेळ घालवायचा. तेव्हा ते ही सुटून जाईल आणि त्याच्या नंतर मग, तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुम्ही जमू लागला, जसे तुम्ही मूळात जाल. मुळं दोन चारच असतात पण ती जेव्हा खोल जायला लागतात झाडं वाढू लागतं. असा सहज योग वाढताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा तुमच्यावरअनंत आशिर्वाद आहे. काल मी धुळ्याच्या लोकांना खूप समजावून सांगितले. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे, खूप पॉजिटिवली राहिलं Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …

Vastushanti Puja (India)

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे Read More …

Shri Mahakali Puja (India)

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982. [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …

Evening prior to departure for London Pune (India)

Evening prior to Her departure for London (Marathi). Pune, Maharashtra, India. 30 March 1979. किती लवकर आलात सगळे जण? सगळ्यांना त्रास होतोय. आता मात्र मना करायचं लोकांना कोणी आलं तर. इतका उशीर करून यायचं आपलं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून. अस कस चालणार आहे? सगळ्यांना त्रास होतो कि नाही? बसा आता, बोलू नका. इतर लोक ध्यानात बसले आहेत. ही तपोभूमी ह्यावेळेला झालेली आहे. इथे येऊन निदान लोकांच्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. असे हात करून बसा. तुम्ही देवाला भेटायला येता. मग वेळेने आल पाहिजे नं थोडे तरी? थोडसं तरी गांभीर्य असायला पाहिजे. केवढं मोठं मागायला आलात माझ्याकडे!

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra  [ 1 ] ही पुण्यभूमी आहे. राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, सह म्हणजे आपल्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. [ 2 ]   असे हात करून बसा, कुंडलिनी जागृत व्हायची तर असे हात करून बसा साधे, टोप्या जरा काढा, काळे कारगोते असतील तर काढून घ्या, म्हणजे बरोबरच होईल ते काळे. काही गळ्यात माळाबीळा असतील तर काढून ठेवलेल्या बऱ्या, कारण त्याने रुकते, कुंडलिनी तिथे थांबते.  आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही संस्था आहे असं अनादी काळापासून लोकांनी सांगितलेलं आहे. विशेष करून आदिशंकराचार्यानी, मार्केंडेयस्वामींनी त्याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. त्यानंतर कबीर, नानक यांनीसुद्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेल आहे. ही तुमची आई आहे आणि आई हे फार पवित्र स्थान आहे. आता फ्रॉईड सारख्या घाणेरड्या माणसाने आपल्या आईशी घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी स्थिती काढलेली आहे. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालीये ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य वाटत कि ह्या राक्षसांनी, हिटलरनी तर नुसता लोकांचा शिरच्छेद केला पण याने सगळ्यांची ही कुंडलिनीच फिरवून टाकलेली आहे कारण कुंडलिनी ही आई आहे आणि ती पवित्र आई आहे. आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना सहजयोग लाभू शकत Read More …

Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९ आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या Read More …

Puja Pune (India)

महाशिवरात्रि,राजवाडे मंगल कार्यालय, पुणे,दिनांक २५/०२/१९७९,वेळ सायंकाळी ६.०० वा. Part 1 आजची महाशिवरात्री आहे.म्हणून मी आपल्याला आज शिवांचं महत्व सांगणार आहे. ते समजून घेतलं पाहिजे. ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी जरी घडवली असली आणि त्या सृष्टीत उत्क्रांतीमूळे मानवपद आपल्याला मिळालेलं आहे आणि हे मानवपद आपल्याला विष्णूच्या शक्तीमुळे मिळालेलं आहे. तरीसुद्धा ह्या मानवाला शिवतत्व मिळवायचं असतं. शेवटी विष्णूला शिवाची पूजा करावी लागते. एवढं शिवाचं महत्व आहे.शिवतत्व म्हणजे आपला आत्मा आहे. ही सगळी धडपड,हि सारी उत्क्रांती त्या तत्वाला जाणण्यासाठी आहे जे शिवतत्व आहे. म्हणजे आदितत्व जे आहे ते शिवतत्वच आहे. सदाशिवाचं तत्व आहे.ते सदा असतं. आणि त्यातून हि सर्व तत्वे निघून मानवनिर्मिती झाली. आता मानवानी त्या शिवाला ओळखलं पाहिजे,ज्यानी ही इच्छा केली होती कि ही सृष्टी करावी,त्यात मानव निर्माण करावेत आणि त्या मानवानी परमेश्वराला ओळखावं, त्याची शक्ती वर्णावी आणि त्याच्या शक्तीच्या आनंदात,त्याच्या कार्यात रतं राहावे,त्याचा बोध मानवाला व्हावा हि त्याची इच्छा. ती आज सहजयोगातून घडून आलेली आहे. विष्णू तत्वानी तुम्ही जरी पार झालात,तरी मिळवलं तुम्ही काय तर शिवतत्व. ते शिवतत्व हातातून वाहतय त्याला आपण चैतन्यलहरी असं म्हणतो. हाच योग घडलेला आहे. शिवानी आपली शक्ती जी शिवशक्ती आहे तिला आपण महाकाली शक्ती म्हणतो त्यातलाच थोडासा भाग कुंडलिनी म्हणून प्रत्येक मानवात ठेवलेला आहे आणि ती ह्या साही चक्रातून निघून भेदून परत शिवालाच मिळते,हे असं शिवतत्व आहे. शिव म्हणजे करुणेचा सागर,दयेचा सागर,प्रेमाचा ठेवा. हे सगळं प्रेमतत्व आहे. शिवाला जाणलं म्हणजे सत्य जाणलं आणि तो आनंदसागर आहे. त्याच्यात्न आनंद वाहत असतो. शिवाला प्रसन्न करायचं फार सोपं काम असतं. भोळा आहे तो अगदी. प्रेमाचा भूकेला परमेश्वर आहे तो. फार सोपं काम आहे .त्याची दृष्टी फार वर होत नाही,नेहमी खाली Read More …

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …

Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणार आहे , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहूुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसग्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी म्हणून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भूकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा Read More …

The Creation New Delhi (India)

“The Creation”, New Delhi (India), 20 February 1977 [Marathi translation from English] आज आपण ‘सृजन’ बद्दल बोलण्याचे ठरविले आहे. पण आपल्या आयोजकांना आपल्याला खडू व फळा देणे जमले नाही. मला माहीत नाही, चित्र काढल्याशिवाय ते समजावण्याचा मी प्रयत्न करते. हा फार अवघड विषय आहे, पण तुम्हाला समजेल असा तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सृष्टीची निर्मिती (सृजन) अशा अवघड विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते. तुमच्यापैकी पुष्कळांना चैतन्य लहरी समजतात हा आजचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि एवढेच नाही, तर तुम्हाला याचे ज्ञान व समज (अनुभव) आहे, की चैतन्य लहरी विचार करू शकतात व प्रेम करू शकतात. हा फार मोठा आशीर्वाद आहे. अर्थात्‌ तुमच्या पैकी काहींना ते मिळाले नाही. पण ज्यांना मिळालंय त्यांना हे ज्ञान आहे, की चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) संघटित करू शकतात, कारण ते कुंडलिनी चढवतात. जिथे कमतरता तिथे दयेने जातात, त्या भागात जातात जिथे कमतरता (व्हायब्रेशन्सची) आहे. त्यांना समजते, त्यांचे वैश्‍विक स्वरूप, त्यांचा वैश्‍विक स्वभाव, ती संघटित करतात आणि ती प्रेम करतात. ती तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात, तुम्ही प्रश्‍न विचारता तेव्हा त्यांच्याकडून उत्तरे मिळतात. ती जिवंत व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स परमेश्वरी (डिव्हाईन)’ कडून येतात. या परमेश्वराला ब्रह्म, ब्रह्म तत्त्व – ब्रह्माचे तत्त्व असे म्हणतात. आपल्याला असे म्हणता येईल, की सृष्टीचे सृजन ही चिरंतन प्रक्रिया आहे, म्हणजे बीजाचा वृक्ष होतो आणि तो वृक्ष पुन्हा बीज होतो व ते बीज वृक्ष होते. हे होतच असते. हे चिरंतन आहे. याला सुरूवात नाही आणि याचा शेवटही होऊ शकत नाही. हे होतच राहते. म्हणून याच्या अस्तित्वाच्या विविध अवस्था असू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता, की ‘असण्याची’ अवस्था. तेव्हा प्रथम Read More …

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976. सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास Read More …

Poem: To My Flower Children (United States)

माझया फुलांसारख्या मुलांसाठी तुम्ही जीवनावर रुष्ट आहातजशी की लहानगी मुल॑ –ज्यांची आई अंधारात हरवली आहे . तुमचे उदास, म्लान चेहरेदाखवताहेत दु:ख, निराशा –कारण की तुमच्या प्रवासाचा अंत निष्फव्ठ आहे. सौंदर्याला शोधण्यासाठी तुम्ही तरकुरूपताच परिधान केली.सत्याच्या नावाखाली तुम्ही तर प्रत्येक गोष्टीलाअसत्याचं नाव देता. प्रेमाचा पेला भरण्यासाठी तुम्ही तर भावनांनाच रितं करून टाकलं आहे ! माझया सुंदर, गोड बाव्डंनो, माझया प्रिय लेकरांनो,युद्ध लदून तुम्हाला शांतता कशी लाभू शकेल ?युद्ध-स्वतःशी, स्वत:च्या अस्तित्वाशी आणि स्वत:च्या आनंदाशी देखील !आता कमब्ठच्या पाकब्ब्यांम ध्येतुमच्या वत्सल, कृपाव्दू आईच्या च्या कुशीतविसावा घ्या ! मी फुलांच्या सुंदर बहरानं तुमच्या जीवनाला सजवेन, शोभिवंत करेन.आणि तुमचा प्रत्येक क्षण आणि जीवनआनंदाच्या आमोदानं दरवव्दून टाकेन. मी मस्तकावर तुमच्या दिव्य प्रेमाचा अभिषेक करेन! तुमच्या यातना आता मला अधिक सहन नाही करता येत. मला तुम्हाला प्रेमाच्या महासागरात डुंबवू देतज्यामुब्ठे तुम्ही तुमचं अस्तित्व अधिक महान असणान्या ‘एका’मध्ये विरघव्ठवून टाकेन !जो तुमच्या च्या आत्म्याच्या कब्ठीच्या या कोशातून शातूनमंद हास्य करतो आहे आणि तुम्हाला सारखं सारखं चिडवायला तो गुपचूप लपला आहे – तुमच्यातच ! जरा जाणीव होऊ दा, भानावर या. आणि तुम्ही त्या ‘महान’ला शोधू शकाल,तुमच्या कणाकणात, तंतू तंतूत, नसा-नसांमध्येपरमानंदाच्या सुखान॑ स्पंदित करतो आहे तो !आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशानं व्यापून, लपेटूनझाकून टाकत आहे तो ! आई निर्मला